ही माहीती कशी शोधावी?

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
29 Jan 2023 - 6:50 pm

आपण कधी कधी एक प्रकारची माहीती शोधत असतो. जसे की मला तांदुळ विकत घ्यायचे आहेत.म्हणुन तांदुळ विकणारे कोण हे शोधायला गेलो कि लगेच मिळतात जे तांदुळ सप्लाय करतात. पाहीजे तेवढ्या प्रमाणात तांदुळ विकत घेता येतात. ह्यांना आपण सप्लायर बोलुया. हे स्त्रोत आहेत 'सप्लाय' चे. ह्यांचा शोध घेणे काही कठीण नाही. एक मागितले की दहा मिळतात.
पण जेव्हा कधी आपण तांदुळ विकायचे आहेत, म्हणुन तांदुळ विकत घेणा-यांचा शोध घेतो. तेव्हा ते मिळत नाहीत. आता शोधयचे आहेत जे तांदुळ विकत घेणारे म्हणजे बायर्स आहेत. ह्यांना आपण 'बायर्स' बोलुया. हे स्त्रोत आहेत 'डीमांड' चे. ह्यांचा शोध घेणे कठीण आहे. एक शोधायला गेलो तर एक पण मिळत नाही.
मग आपण विचार करुन तांदुळ कुठे विकला जाऊ शकतो ह्यांचा विचार करु लागतो, जसे की अशी राज्ये जिथे तांदुळ पिकत नाही, जिथे तांदळाच्या शेतीला हवे तसे वातावरण नाही. म्हणजे आपण 'डीमांड' कुठे आहे हे शोधायचा प्रयत्न करतो. कारण हे 'बायर्स', 'डीमांडचे स्त्रोत' ऑनलाईन कींवा ऑफलाईन सहज उपलब्ध नसतात.
मी हा लेख लिहत आहे जेणेकरुन हे बायर्स शोधायला मला ईथले विचारवंत मदत करतील, फक्त तांदुळ साठी नाही तर कोणत्याही वस्तुसाठी. असे एक कुठले शास्त्र, फॉर्मुला, ज्ञान, माहीतीचा स्त्रोत आहे जे मिळवले की बायर्स शोधायला मदत होते?
ईथल्या स्दस्यांनी आपल्या अनुभवावरुन काही सल्ले द्यावेत. जसे शळेत भुगोलचया पुस्तकात कुठले पिक कुठे जास्त येते, कुठे येत नाही ह्याची माहीती होती, ही माहीती आता सहज कुठे मिळत नाही.

जीवनमानविचार