शतकापूर्वीचे मराठा युद्धस्मारक .

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
18 Oct 2022 - 12:21 pm

संदर्भ आणी आभार :-

The Armies of India,
Author- Major MacMunn and Major Lovett-
Published in the year 1911.

अंतरजालावर उपलब्ध असलेली माहीती.

संबधीत विषयावर केलेले वाचन.

लेख लिहिण्यामागे व्यवसायीक उद्देश नसून केवळ ज्ञानवर्धन,मनोरंजन आणी इतीहासात डोकावणे आहे.

कृपया लेखाचे संपुर्ण अथवा काही भाग पुर्नप्रकाशीत करू नये.

डिसक्लेमर:-

काॅपिराईट्स कायद्याचे पालन करण्याची पुर्ण काळजी घेतली आहे. यदा कदाचित अनावधानाने उल्लंघन झाले असल्यास क्षमस्व.

प्रस्तावना

एरवी उपाख्य नावाने एकमेकांना ओळखणारे मिपाकर एकत्र पुणे कट्ट्यावर जमले तेव्हां तुम्ही कोण, कुठले इत्यादी व्यक्तिगत विषयावर बोलत असताना (सर्वथा अपरिचित तरीही परीचीत म्हणूनअसे संभाषण होणे सहाजिकच),पुण्यातील वेगवेगळ्या स्थळां बद्दल जसे पेठा, वाडे ऐतिहासिक स्थळे व त्यांचे आजचे स्वरूप यावर उहापोह झाला.संभाषणात अबा (अमरेन्द्र बाहूबली) यांनी विचारले छावणीत कसले युद्धस्मारक आहे ? स्मारका बद्दल माहित होते,वाटले यावर एक सुंदर लेख लिहीता येईल ज्यामुळे पुण्यामधील मिपाकरांना स्मारकाला भेट देण्याची इच्छा होईल व इतर सदस्यांना माहीती मिळेल.मराठी वीरांनी गाजवलेल्या शौर्याचा इतीहास आहे.कृपया या बद्दल राजकीय मते प्रदर्शित करू नये. पहिल्या विश्वयुद्धा नंतर पुण्यात पहिल्यांदाच उभारण्यात आलेले मराठा युद्धस्मारक,केवळ पंधरावीस मिनीटाची भटकंती + प्रवासाचा वेळ मीळून फारफार तर तास दिड तास पण कितीतरी नवीन माहीती देऊन जाते. म्हणूनच कवी मोरोपंत यांचे शब्द यथार्थ वाटतात.

'केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार।
शास्त्रग्रंथविलोकत, मनुजा चातुर्य येतसे फार।।'

प्रथम विश्वयुद्ध हा मराठा सैनीकांचा पहिला वहिला अतंरराष्ट्रीय युद्धानुभव होता.विषय फारच मोठा आहे पण तो फक्त पुण्यातील युद्ध स्मारका पुरताच मर्यादित आहे. विश्वयुद्धात भाग घेतलेल्या मराठा पलटणींची नावे,युद्ध क्षेत्र, त्यांनी मिळवलेले सन्मान याची अतिशय संक्षिप्त,संकलीत माहीती देण्याचा प्रयत्न करत आहे.हे युद्ध स्मारक पुण्यातील या प्रकारचे प्रथम स्मारक आहे.

विश्वयुद्धात भाग घेतलेल्या मराठा पलटणी

३१वी ड्यूक ऑफ कॅनोट लॅन्सर्स .
३री रॉयल सॅपर्स व माईनर्स
१०१वी ग्रेनडियर्स
१०३ वी मराठा ला इ
१०५वी मराठा ला इ
१०९ वी इन्फन्ट्री ला.इ.
११०वी मराठा ला.इ.
११७वी रायल मराठा
१२१वी पायोनिअर्स
१२८ वी पायोनिअर्स
१०७ वी पायोनिअर्स
१०८वी इन्फन्टी ला.इ.
११४ वी मराठा
११६ वी मराठा
११७ वी मराठा

सर्व चित्रे वरील संग्रही असलेल्या पुस्तकातून.थोडीच चित्रे डकवत आहे. युद्धस्मारकाची छायाचित्रे मात्र तीथे जाऊन घेतली आहेत.

mipa******mipa

mipa*****mipa

इ.स.१९१४ ते १८ या कालावधीत झालेल्या प्रथम विश्व युद्धात अंदाजे दहा लाख ब्रीटीश शासित भारतीय सैनीकांनी विवीध विदेशी भुमीवर (थिएटर ऑफ ऑपरेशन) पराक्रम गाजवला. या कालावधीत त्यापैकी चौर्याहत्तर हजार सैनीकांनी आपले बलिदान दिले.या साठी त्यांना व्यक्तिगत शौर्य पदके व पलटनला युद्ध सन्मान दिले गेले (सैनीकांची संख्या अंतरजालावर वेगवेगळी दिलेली आहे.)

मराठा पलटणींचे युद्ध क्षेत्र.

• बसरा (Basra)
• टेसीफाॅन( Ctesiphon)
• कुट-अल-अमरा (Kut-al-Amara)
• बगदाद (Baghdad)
• शरकत (Sharqat)
• मेसोपोटेमिया( Mesopotamia) पर्शीया (Persia )
• मेगीड्डो( Megiddo)
• नाब्लूज (Nablus)
• शारोन(Sharon)
• पॅलेस्टाईन(Palestine) and उत्तर पश्चिम सीमेवर (North West Frontier)

• मेसोपोटेमिया मधे सहा व सोळा नंबरच्या पुना डिव्हिजन्सनी भाग घेतला.जनरल टाऊनशेन्डच्या (General Townshend’s) नेतृत्वाखाली १०३,११० मराठा लाईट इन्फट्री व ११७ मराठा या पलटणींनी टिग्रीस नदीच्या जवळ खुप घमासान लढाई केली (Tigris River in battles of Qurna, Es-Sinn, Ctesiphon) आणी १०५ मराठा लाईट इन्फन्ट्री व ११४ मराठा पलटणींने जनरल अलेनबाय (General Allenby)यांच्या नेतृत्वा खाली पॅलेस्टाईन मधे 'ब्रिलियंट कॅम्पेन' मधे मोठा पराक्रम केला. ११६ मराठा पलटन पुर्ण चार वर्ष मेसोपोटेमिया युद्ध क्षेत्रात आणी दक्षिणी कुर्दिस्तान मधे यशस्वी पणे कठीणतम परीस्थीती हाताळली.

विवीध युद्ध सन्मान व शौर्य पदके.

• पहिल्या महायुद्धात या युनिट्सना त्यांच्या सेवांसाठी विविध पुरस्कार मिळाले.

• १) १०३,११० मराठा ला.ई. व ११७ मराठा पलटणींना 'युद्ध सन्मान (Battle Honour) टेसीफाॅन ( Ctesiphon) ने अलंकृत केले.

• २) ११७ मराठा पलटनला मेसोपोटेमिया क्षेत्रातील पराक्रमा बद्दल 'राॅयल', हे टायटलने सन्मानित केले.

• ३) १०३ वी मराठा ला इ ला,
• 6 IOMs,
• 2 Croix-de-Guerre

• ४) १०५ वी मराठा ला इ ला,
• 3 DSOs, 4 MCs,3 IOMs,
• 5 IDSMs

• ५) ११०वी मराठा ला.इ.,
• 1 DSO, 3 MCs, 1 OBI,
• 6 IOMs, 7 IDSMS,
• 1 रोमानियाचा क्राउन

• ६) कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (CIE) दिले जाणारे 116 वे मराठा युनिट एकमेव होते.याव्यतिरिक्त युनिटला आणखीनही व्यक्तिगत सन्मान प्राप्त झाले.
• 2 DSOs, 2 MCs,
• 1 OBI, 5 IOMS,
• 14 IDSMS
ही न संपणारी मोठी यादी म्हणून इथेच थांबावे लागेल. मेडल्सचे सम्पूर्ण नाव खालील प्रमाणे आहे.

DSO-Distinguished Service Order.
OBI-Order of British India.
IDSM-Indian Distinguished Service Medal.
MC-Military Cross.
IOM-Indian Order of Merit.


युद्ध स्मारक
mipa*****mipa

हे युद्ध स्मारक शुरवीर मराठा सैनिकांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ त्यांच्या सहकाऱ्यानी बांधले आहे. स्मारकासाठी युद्धात भाग घेतलेल्या मराठा पलटणी तत्कालीन स्थानिक संस्थानिकांनी उभारलेल्या निधीतून बांधण्यात आले.

१९ नोव्हेंबर १९२१ ला प्रिन्स ऑफ वेल्स यांनी भूमीपूजन केले.यांचे नाव व इतर विवरण स्मारकाच्या खाली कोरले आहे. प्रथम हे स्मारक शनिवार वाड्या समोर उभारण्यात आले होते.या स्मारकाची रूपरेखा (Designe)ऑकाॅट,भुटा आणी कारपेन्टर (Architects) मुबंई यांनी तयार केले. बांधकामा करता कृष्णाजी रामकृष्ण आणी कंपनी यांना ठेका दिला होता.या दोन्ही कंपनीची नावे स्मारकाच्या खाली कोरलेली आहेत. हे स्मारक सुद॔र ताशीव बेसाल्टच्या दगडात बांधले आहे.ब्रिटिश भारतीय सैन्य पुण्यात छावणीत रहात आसल्यामुळे सैनीकांना प्रेरणा मिळावी म्हणून १९३१ मधे स्मारक मुळ जागेवरून छावणीतीलआताचा डाॅ. बानू कोयाजी रस्ता (तेव्हांचा अर्सनेल रस्ता,नंतर मोलेदिना रस्ता) व अंबेडकर रस्ता जीथे मीळतो तीथे वाहतुकीच्या त्रिकोणी बेटावर आहे. तिन्ही बाजुने उंच अशोकाची झाडे व सर्व बाजुने दगडी भिंतीचे कुंपण आहे. याचे गेट अंबेडकर रस्त्यावर आहे.
mipa*****mipa

तीन कोपऱ्यांवर जुन्या तीन मुघल कालीन ठेवलेल्या तोफा मुघल बादशाह औरंगजेब अलमगीरच्या तोफखान्या मधील आहेत.एका तोफेचे नाव "फतेह कुशा",म्हणजे विजय मिळवून देणारी असे आहे.तोफेवर औरंगजेबाचे नाव व पदव्या मुद्रित आहेत. ही तोफ मुहम्मद अली अरब याने इसवी सन १६६७/८ या वर्षात ओतली असे तोफेवर लिहिले आहे.तोफेत अकबरी वजनाप्रमाणे किती वजनाचा लोखंडी गोळा व दारु वापरावी हे पण लिहीले आहे. बाकी दोन तोफांवर एक जोडी सिंहाची बसलेली दिसते.या तोफा मराठ्यांनी मुघलांच्या तोफखान्यास शिकस्त देऊन जिंकून घेतल्या व पुढे इंग्रजानी मराठ्यांना हरवून आपल्या तोफखान्यात सामील केल्या.
mipa**mipa

mipa**mipa

सौज्यन- संकलन निखिल परांजपे,कार्य: सकल मराठा समाज पुणे कॅन्टोन्मेन्ट

स्मारकाचे स्वरूप कसे आहे हे चित्रावरून सहज लक्षात येईल त्यामुळे त्याचे वर्णन इथे करत नाही.

• असेच दुसरे एक युद्धस्मारक ससून रुग्णालय व बंडगार्डन पोलीस चौकी जवळच ऑकाॅट,भुटा आणी कारपेन्टर (Architects) मुबंई यांनीच बनवले आहे. हे स्मारक साधारण पन्नास फुट उंच व आग्रा स्टोन मधे बांधले आहे.(आता याचा मुळ रंग व सौंदर्य कमी झाले आहे.) या स्मारकाचे उद्घाटन तत्कालीन मुंबईचे गव्हर्नर लाॅर्ड जाॅर्ज लाॅयड यांनी २३-११-१९२२ या तारखेला केले होते.अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.
mipa***mipa

विषेश म्हणजे दोन्ही युद्धस्मारके आपली शंभरी पुर्ण करत आहेत.

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

18 Oct 2022 - 2:00 pm | कुमार१

आवडली.
वंदन!

कुमार१'s picture

18 Oct 2022 - 2:00 pm | कुमार१

आवडली.
वंदन!

अनिंद्य's picture

18 Oct 2022 - 7:55 pm | अनिंद्य

छान संकलन.

मुक्त विहारि's picture

18 Oct 2022 - 9:51 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद ....

चित्रगुप्त's picture

19 Oct 2022 - 12:56 am | चित्रगुप्त

अशा प्रकारच्या माहितीचे संकलन करणारे लेखन मिपावर फार कमी वाचायला मिळते. त्यातून सेनेविषयी तर फारच क्वचित.
असे काही लिहायचे तर बराच वेळ आणि परिश्रम लागत असतात, तरी सवडीनुसार आणखी असेच लिहीत रहावे ही विनंती.

कर्नल तपस्वींना सॅल्युट,
पूर्वीच्या लष्करातील जवानांचे पोषाख, रूबाबदार ठेवण याचे रंगीत फोटो, तोफांना सोनेरी मुलामा वगैरे पहायला मिळाले.
मिलिटरी कमांडरच्या लष्करी अभ्यासासाठी मानसिकता निर्माण व्हावी म्हणून लेफ्टनंट जनरल शेकटकर यांनी, 'आधी तुम्ही सब एरियातील युद्ध स्मारकाचे दर्शन घेऊन कामाला सुरुवात करा' म्हणून आदेश दिला. कोरेगाव पार्क येथील त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताच तडक तिथे जाऊन पूर्वजांच्या पराक्रमाचा इतिहास न्याहाळला.असो.
त्या आठवणी आपल्या धागा वाचनातून जाग्या झाल्या.

कर्नल तपस्वींना सॅल्युट,
पूर्वीच्या लष्करातील जवानांचे पोषाख, रूबाबदार ठेवण याचे रंगीत फोटो, तोफांना सोनेरी मुलामा वगैरे पहायला मिळाले.
मिलिटरी कमांडरच्या लष्करी अभ्यासासाठी मानसिकता निर्माण व्हावी म्हणून लेफ्टनंट जनरल शेकटकर यांनी, 'आधी तुम्ही सब एरियातील युद्ध स्मारकाचे दर्शन घेऊन कामाला सुरुवात करा' म्हणून आदेश दिला. कोरेगाव पार्क येथील त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताच तडक तिथे जाऊन पूर्वजांच्या पराक्रमाचा इतिहास न्याहाळला.असो.
त्या आठवणी आपल्या धागा वाचनातून जाग्या झाल्या.

प्रचेतस's picture

21 Oct 2022 - 9:55 am | प्रचेतस

खूपच सुरेख.
तुमच्यासोबत हे युद्धस्मारक पाहायला आवडेल.

कर्नलतपस्वी's picture

22 Oct 2022 - 7:37 am | कर्नलतपस्वी

धन्यवाद प्रचेतस. गेल्या पाचशेहून अधिक वर्षाचा भारताचा इतिहास पुण्याशिवाय पुर्ण होऊच शकत नाही. कुठल्याही गल्लीबोळात जा इतीहासाच्या पाऊलखुणा सापडतील.
ब्रिटिश विशेषता सेनेतील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी व भारतीय इतीहास कारांनी खुप लिहून ठेवले आहे.

नि३सोलपुरकर's picture

21 Oct 2022 - 10:27 am | नि३सोलपुरकर

सुरेख लेख .

आणी प्रचेतस भाऊ च्या वरील मताशी बाडीस.

नि३सोलपुरकर's picture

21 Oct 2022 - 10:27 am | नि३सोलपुरकर

सुरेख लेख .

आणी प्रचेतस भाऊ च्या वरील मताशी बाडीस.

चौथा कोनाडा's picture

21 Oct 2022 - 7:59 pm | चौथा कोनाडा

अतिशय रोचक आणि माहितीपूर्ण लेख.
या संकलनाच्या कष्टासाठी आपले कौतुक केलेच पाहिजे कर्नल साहेब!
पुण्यात उपनगरात गेली काही दशके राहत असून देखील अशी ठिकाणे बघणे होत नाही... आता एक एक बघण्याचा प्रयत्न आहे.

उदा. दोन चार महिन्यापूर्वी वासवानी चौकातले सेंट मीरा च्या आवरातले दर्शन म्युझियम पाहीले.. खुप सुंदर आहे... घरच्यांना देखील दाखवले मग.

चौथा कोनाडा's picture

21 Oct 2022 - 7:59 pm | चौथा कोनाडा

अतिशय रोचक आणि माहितीपूर्ण लेख.
या संकलनाच्या कष्टासाठी आपले कौतुक केलेच पाहिजे कर्नल साहेब!
पुण्यात उपनगरात गेली काही दशके राहत असून देखील अशी ठिकाणे बघणे होत नाही... आता एक एक बघण्याचा प्रयत्न आहे.

उदा. दोन चार महिन्यापूर्वी वासवानी चौकातले सेंट मीरा च्या आवरातले दर्शन म्युझियम पाहीले.. खुप सुंदर आहे... घरच्यांना देखील दाखवले मग.

कर्नलतपस्वी's picture

22 Oct 2022 - 7:49 am | कर्नलतपस्वी

सर्व वाचक आणी प्रतीसादकांचे मनापासून आभार.

पुण्याचे शक्तीस्थान कसबा,शनिवार पेठ मधून ब्रिटीशांनी पुणे लष्कर भागात स्थलांतरित केले. पुणे,खडकी,संगमवाडी या भागाला सुद्धा तीनशेहून अधिक वर्षआचा इतीहास आहे.

प्रसिद्ध घाशीराम कोतवाल याची कोठी पुलगेट जवळच आहे. यशवंतराव होळकरांनी हडपसर इथे दिलेली झुंज, शिंदे यांचा वाडा एवढेच काय छ. संभाजी महाराजांना संगमेश्वर मधे पकडून वढू तुळापुरास महादेव वाडी आताची मोहम्मद वाडी येथूनच नेले.

पुण्याचा इतीहास सांगावा तेवढा थोडाच आहे.

श्वेता व्यास's picture

22 Oct 2022 - 8:06 pm | श्वेता व्यास

सेनेविषयी छान संकलन आहे, माहितीबद्दल धन्यवाद.

दुर्दैवाने सध्या सेवानिवृत्त सेना अधिकार्यांचा भरणा असलेल्या पुण्यात सैनिक इतिहासाच्या बाबतीत उदासिनता दिसते.
राष्ट्रीय युद्ध स्मारक क्षेत्रात सैनिक इतिहासावर काहीही मिळत नाही.
रेल्वे स्टेशन वर असलेल्या लेफ्टनंट कर्नल एबी तारापोर परमवीर चक्र (मरणोत्तर) आणि मेजर आर एच बजीना, वीरचक्र यांच्या सन्मानार्थ लावलेल्या टॅब खाली गोधळ चालू असतो.
तिथे व्हेलर सेल्फी पॉइंट बनवता येऊ शकतो पण लक्षात कोण घेतो? कर्नल तारापोर यांच्या पूना हॉर्स चे "कर्नल" पुण्यात आहेत त्यांना तीन पत्र लिहिली आहेत पण २०१८ पासून अजून पोच आली नाही.
मला वाटते कारगिल इतकीच बॅटल ओफ सेनिओ आणि कॅसिनो बध्दल आजच्या पिढीला माहीती मिळणे जरुरी आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 May 2023 - 4:37 pm | राजेंद्र मेहेंदळे

पण आता चित्रांचे दुवे गंडले आहेत त्यामुळे जरा हिरमोड झाला.

मलाही फोटोज् व चित्रे अजिबात दिसत नाहीत. चांगलच गंडवलेय.

मलाही फोटोज् व चित्रे अजिबात दिसत डडकृपया माफ कर

कर्नलतपस्वी's picture

29 May 2023 - 9:14 pm | कर्नलतपस्वी

लवकरच डकवण्यात येतील. सौज्यन- निलकांत शेठ

नुकतेच वाचनात आले,
कोकणातल्या कणकवली जवळच तरंदळे गावातले 52 वीर या युद्धात सहभागी झाले होते. यातले 50 परत आले. तर दोघांना वीरमरण आलं. वीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गावात एक विजयस्तंभ उभा आहे.

तत्कालीन पोलीस पाटलांना ब्रिटीश सरकार कडून मोठ्ठे बक्षीस मिळाले.
यांचे नातवाने विरासत जपून ठेवली आहे.

अधिक माहीती साठी अंतरजालावर बघू शकता.

राजेद्रभौ,नुतनमजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मनोज28's picture

30 May 2023 - 10:55 am | मनोज28

माहिती आणि त्याची पूर्वपीठिका समजली.
एखादे स्मारक , वारसा स्थल पाहताना त्याची संपूर्ण माहिती आणि निर्मीती मागील भूमिका समजली तर वस्तूमधील सौंदर्य आस्वाद अधिक सक्षमपणे घेता येतो. अगदी तसाच उलगडा ह्या लेखातून झाला आहे.

धन्यवाद कर्नल साहेब.