खरकट्या मिसळीची गोष्ट

मीउमेश's picture
मीउमेश in जनातलं, मनातलं
27 Aug 2022 - 5:28 pm
मिसळ म्हणजे माझा जीव की प्राण !! प्रवासात चांगली आणि प्रसिद्ध मिसळ कुठे मिळते या शोधात मी असतो. कित्येक वेळा तर मिसळ खाण्यासाठी फार दूरवरचा प्रवास मी केला आहे. मी मुळचा ठाणेकर असल्यामुळे मामलेदार मिसळ ही आमच्यासाठी पंढरी आणि आम्ही मिसळपंढरीचे वारकरी. सध्या मुंबई पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा मिसळीचा सुळसुळाट झालेला आहे. पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ, नाशिकच्या काळया मसाल्याची मिसळ, कुठे चीज मिसळ, सर कुठे तंदुरी मिसळ, कुठे मडक्यातली मिसळ, तर कुठे अजून काही.. काल-परवा सर कुठेतरी चिकन मिसळ आणि मटण मिसळ मिळण्यास सुरुवात झालेली आहे असं वाचण्यात आलं. कोल्हापूर-सोलापूर नासिक हायवेवर मिसळीचे या प्रकारची जॉइंट्स दिमाखात उभे दिसतात. गर्दी पण भरपूर बघायला मिळते. आजच्या मुंबई-पुणे प्रवासात अशा एका ठिकाणाला भेट देण्याचा योग आला. हॉटेल खूपच चांगले प्रशस्त होते हॉटेलच्या सुरुवातीलाच एक फोटो बूथ होता. खाऊन परत जाताना माणसं त्याठिकाणी पुणेरी पगडी घालून फोटो काढत होते. आम्हीसुद्धा मिसळ ची ऑर्डर दिली थोड्या वेळाने वेटर एका भल्यामोठ्या ट्रॉलीवर दोन भल्यामोठ्या पितळी ताटामध्ये मिसळ आणि त्याबरोबर खूप सारे जिन्नस घेऊन आला. पितळी वाट्यांमध्ये फरसाण,कांदा, मटकी, सुकी बटाट्याची भाजी, कढी वडा असे जिन्नस होते. एका भल्या मोठ्या तांब्यात मिसळीचा रस्सा आणि एका तांब्यात कढी अशी व्यवस्था होती. सोबत पुणेरी पाट्या सुद्धा होत्याच . मिसळीची चव सुद्धा ठीक होती. मिसळ खाऊन झाल्यानंतर मी जरा फेरफटका मारण्यासाठी उठलो. हॉटेल मधली स्वच्छता टापटीपपणा, सर्वात विशेष म्हणजे पितळी भांड्यांमध्ये मिळणारी मिसळ चांगला अनुभव होता. या संबंधित माझा फीडबॅक देण्याकरता मी हॉटेल मालकाला भेटलो ते गृहस्थ सगळ्यांना सगळं काही योग्य रीतीने दिले जात आहे याची काळजी घेत होते. हॉटेल ची आणि मिसळ ची तारीफ केल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारला मिसळीच्या बरोबरचे जे पदार्थ फरसाण, कांदा, बटाट्याची भाजी, मटकी ताटात लोक बरेच टाकून जात आहेत हे सगळं उरलेलं काय करता.. ते म्हणाले आम्ही ते परत एकत्र करतो आणि पुढच्या गिऱ्हाईकआला देतो. काय?? माझी सटकली अहो म्हणजे तुम्ही खरकटे खाऊ घालताय की.. तो थोडा गोंधळाला.. नाही म्हणजे खरकट्या गोष्टी फेकून देतो न खाल्लेल्या गोष्टी परत दुसऱ्यांना देतो.. मी: तुम्हाला काय माहित कोणते पदार्थ खाल्ला आणि कोणता नाही. एखाद्या माणसाने मिसळ खाता खाता त्याच चमच्याने थोडा फरसाण किंवा कांदा आपल्या पानात घेतला असेल. तोच उरलेला फरसाण कांदा तुम्ही परत दुसऱ्या गिऱ्हाईकाना त्याच्या ताटात चिटकवता अगदी त्याच वाटीत?? या थाळी मधून त्या थाळीत....काय घाणेरडं प्रकार..आणि लोक तिकडे मिटक्या मारत खात आहेत. माझ्या थाळीमधला फरसाण किती लोकांचा उरलेलं खरकटे होता कुणास ठाउक. थोडीतरी लाज वाटते का हो?? हॉटेल मालक घाबरला नाही ते असं नाही ते तसं.. असं नाही आम्ही लक्ष ठेऊन असतो. असं नाही केलं तर अन्न वाया जाते अशी करणे देऊ लागला... माझा पारा चढला. माझी बरीच बडबड ऐकल्या नंतर तो म्हणाला सर दुर्वांकु....आणि अश्या बऱ्याच ठिकाणी सगळी कडेच असेच प्रकार असतात. बरीच बाचाबाची झाली, पण काही उपयोग नव्हता. खरंच अश्या मोठमोठ्या ठिकाणी एवढे पैसे खर्च करून निदान सात्विक आणि शुध्द अन्न मिळावे ही अपेक्षा सुद्धा चूकीची आहे का? यांच्या पेक्षा हातगाडीवर मिळणारी मिसळ तरी परवडली. पामतेलात बनली असली तरी उष्टी खरकटी तरी नसते. बाहेर पडताना फोटो बुथवर लहान मुले आणि त्याचे पालक पुणेरी पघडी घालून सेल्फी घेत होतेच.. पार्किंग मध्ये पोहोचतच माझ्या मुलीने मला एक मोठा होल्डिंग दाखवला.. गेल्याच आठवड्यात याच हॉटेल मध्ये हिंदीचा मोठा अभिनेता मिटक्या मारत मिसळ खाऊन गेला होता त्याचं ते पोस्टर होत. मी कपाळावर हात मारत तिथून निघालो खरकटी मिसळ खाल्लेला उमेश कुलकर्णी
कथाजीवनमान

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

27 Aug 2022 - 5:48 pm | कपिलमुनी

मिसळीचे नाव लिहिले नसल्याने पास ..

कानडाऊ योगेशु's picture

27 Aug 2022 - 6:09 pm | कानडाऊ योगेशु

तुम्ही उगाच फॅक्टरी बघायच्या नादात पडलात. मिठाई खायची आणि बोटे चालत चालु लागायला हवे होते.
पण हॉटेल मालक फारच भोळसट निघाला असे वाटले.

कानडाऊ योगेशु's picture

27 Aug 2022 - 6:09 pm | कानडाऊ योगेशु

तुम्ही उगाच फॅक्टरी बघायच्या नादात पडलात. मिठाई खायची आणि बोटे चालत चालु लागायला हवे होते.
पण हॉटेल मालक फारच भोळसट निघाला असे वाटले.

कानडाऊ योगेशु's picture

27 Aug 2022 - 6:09 pm | कानडाऊ योगेशु

तुम्ही उगाच फॅक्टरी बघायच्या नादात पडलात. मिठाई खायची आणि बोटे चालत चालु लागायला हवे होते.
पण हॉटेल मालक फारच भोळसट निघाला असे वाटले.

कानडाऊ योगेशु's picture

27 Aug 2022 - 6:09 pm | कानडाऊ योगेशु

तुम्ही उगाच फॅक्टरी बघायच्या नादात पडलात. मिठाई खायची आणि बोटे चालत चालु लागायला हवे होते.
पण हॉटेल मालक फारच भोळसट निघाला असे वाटले.

कानडाऊ योगेशु's picture

27 Aug 2022 - 6:09 pm | कानडाऊ योगेशु

तुम्ही उगाच फॅक्टरी बघायच्या नादात पडलात. मिठाई खायची आणि बोटे चालत चालु लागायला हवे होते.
पण हॉटेल मालक फारच भोळसट निघाला असे वाटले.

कपिलमुनी's picture

27 Aug 2022 - 6:22 pm | कपिलमुनी

सदर प्रतिसाद एकता कपूर स्टाईल प्रतिध्वनी सहीत वाचावा

कंजूस's picture

27 Aug 2022 - 6:17 pm | कंजूस

मिसळीबरोबर उगाचच बाकी गोष्टी तोंडी मारतात.

अहो म्हणजे तुम्ही खरकटे खाऊ घालताय की

हॉटेल ची दर्शनी चकचकीत बाजू बघीतली की इकडे स्वच्छता फार आहे, भटारखान्यात काहीच चालत नाहिये असे समजणे म्हणजे शुद्ध गैरसमज आहे. हॉटेलवाले भाजी मार्केटातून कमीत कमी प्रतीचे कांदे, बटाटे टॉमेटो नेतात. (अपवाद क्षमस्व). खराब आणि कमी प्रतीचा माल स्वस्त मिळतो. हॉटेलात कापाकापीत उस्ताद पोरे असतात ती खराब भाग काढून उरलेला भाग वापरतात. तुमच्या टेबलवर उरलेले लिंबू, कांदा, लोणचे फेकून कोणता हॉटेलवाला स्वतःच्या पायावर धोंडा मारेल ? तो परत वापरला जातोच.
शिवाय आत काम करणारे कामगार किती स्वच्छता पाळतात ? काम करताना लघूशंकेला / दीर्घशंकेला जाऊन आल्यावर हात व्यवस्थित धुतात काय ? शिंकल्यावर , खोकल्यावर काय करतात हे आपण पाहू शकतो काय ? तर याचे उत्तर नाही असेच येते. पैसेवाल्यांवर राग काढायचा म्हणून काहीजण मुद्दाम घाणेरडे वागतात.
त्यामुळे शक्यतो बाहेर खाणे टाळावे.
शक्य नसेल तर स्वच्छतेचा आग्रह सोडून द्यावा.

जेम्स वांड's picture

28 Aug 2022 - 9:52 am | जेम्स वांड

पैसेवाल्यांवर राग काढायचा म्हणून काहीजण मुद्दाम घाणेरडे वागतात.

हर हर असे पण असते काय ? असल्या हॉटेलचे नाव पाठवा जरा, कायम टाळण्यात येईल

- (पैसे नसले तरी जागरूक) वांड

प्रसाद_१९८२'s picture

28 Aug 2022 - 10:05 am | प्रसाद_१९८२

मुंबई-पुणे हायवेवर आहे तर त्याचे किमान नाव तरी लिहा. इतर काही जण तरी वाचतील, असे खरकटे अन्न खाण्यापासून.

आग्या१९९०'s picture

28 Aug 2022 - 1:05 pm | आग्या१९९०

हॉटेलचे नाव ' शबरी ' असेल. :)

अशा हॉटेलमध्ये उरलेले सगळे एकत्र करून ताटात हात धुवून निघायचे.

अरे देवा.. असे चालते होय..

निदान सेल्फ सर्व्हिस ऐवजी गुजराती थाळी हॉटेलात जसे वाढ्पी फिरत असतात तसे तरी करावे. फरसाण, कांदा, मटकी काय हवे ते पळीने लागेल तितके आणि तसतसे सतत वाढावे. वेस्टेज वाचेल आणि मिक्स होणार नाही.

बाकी नाव लिहायला हरकत नव्हती. उदाहरणात दुर्वांकुर स्पष्ट आले तर मूळ हॉटेलचे नाव का नसावे?

कंजूस's picture

28 Aug 2022 - 11:21 am | कंजूस

थाळी पाहून साडेसातशेच्या वर असेल मिसळ.

जेम्स वांड's picture

28 Aug 2022 - 12:27 pm | जेम्स वांड

आठ माणसे खात असली तर काय हरकत...

कपिलमुनी's picture

28 Aug 2022 - 10:52 am | कपिलमुनी

टेबल वर असलेले कांदा लिंबू रस्सा हे शेयरींग. बेसिस वर असतात..
इथे लेखक ताटा मधले उरलेले पुन्हा वापरतात अशा थापा मारतोय ...

जेम्स वांड's picture

28 Aug 2022 - 11:18 am | जेम्स वांड

मिसळ म्हणा किंवा अजून काही म्हणा, हॉटेल इंडस्ट्री सर्व्हिस आणि स्वच्छतेवर अवलंबून असते, इतकी मोठाली हॉटेल बांधून मालक लोक किंवा नोकरचाकर फक्त "श्रीमंतांवर राग काढायचा" म्हणून अजागळपण करत असतील भटारखान्यात असे काही वाटत नाही, पण मुटके सर पण तेच म्हणतात...

अश्या हॉटेल्सना नेम अँड शेम करणेत हरकत नसावी.

आत्ता पॉइंट आऊट केल्यावर लक्षात आले की लेखकांनी दुर्वांकुरचे नाव दिले आहे पण मुख्य हॉटेलचे नाही.

उमेश राव, काय ते स्पष्ट करा नाहीतर काय ते कळणार नाही कोणालाच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Aug 2022 - 12:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, लैच अवघड झालंय. सगळं.
साले असले लोक.नरकात जातील बाकी काय. :|

-दिलीप बिरुटे

होटेल मालक इतक्या सहजपणे हे सांगू शकला ?हे हे ..बोळात दिसतोय.

Bhakti's picture

28 Aug 2022 - 1:29 pm | Bhakti

*भोळा

विनोदपुनेकर's picture

29 Aug 2022 - 9:52 am | विनोदपुनेकर

फक्त उष्टी आणि खरकटिच .. .. अहो शिळी पण असते बऱ्याच ठिकाणी.. दुसरया दिवशी उरलेली उसळ फेकून न देता एकत्र करून वाढली जाते

स्वानुभव

नचिकेत जवखेडकर's picture

30 Aug 2022 - 10:05 am | नचिकेत जवखेडकर

२०१४ सालची गोष्ट आहे. बेंगळुरूमधल्या पूर्णब्रह्म मध्ये पण आम्हाला असाच अनुभव आला. टोटल मॉल मध्ये एक अगदी छोटं दुकान आहे तिकडे मिसळ मागवली होती. पाव तर दिसायलाच शिळा दिसत होता पण तरीही काही बोललो नाही. पण मिसळ शिस्तीत कडू होती.तेव्हा आम्ही तिकडच्या माणसाला सांगितलं तर आम्हाला तोंड वर करून म्हणे, हो आम्ही शिळा पाव आणि मिसळ दिली आहे आता आम्ही ताजी देतो.नंतर आणली त्यात फक्त थोडी मिसळ कमी केली होती आणि थोडी कोमट केली होती. बरोबर दिलेला कटदेखील कडू होता. म्हणजे अगदी वास पण घेता येणार नाही इतका कडू होता.मग मात्र आम्ही खूप वाद घातला आणि म्हटलं की तुला जर माहित होतं तू शिळे पदार्थ देतोयस तर दिलेसच का मुळात. तर म्हणे नाही आम्हाला तसं सांगावं लागतं की पदार्थ शिळा होता आणि आम्ही ताजा बनवून देतो आता म्हणून.अजून थोडा वाद घातल्यावर म्हणे आत्ताच २-३ जण खाऊन गेले पण कोणीच असा म्हटलं नाही आम्हाला.मी त्याला म्हटलं की हि पण एक पद्धतच असेल सांगायची तुमची. मग म्हणे मी ही मिसळ घेऊन मालकाकडे जाईन आणि त्याच्याकडे तक्रार करीन वगैरे.त्याला म्हटलं, तू काय करायचं ते कर आम्हाला १५० रुपये परत दे.पैसे दिले परत त्याने. कदाचित त्या दिवशी काहीतरी झालं असेल आणि आम्हाला शिळी मिसळ मिळाली असेलसुद्धा पण आमच्या ३ वर्षांच्या बेंगळुरू वास्तव्यात आम्ही तिकडे परत पाऊल ठेवलं नाही.

ब़जरबट्टू's picture

30 Aug 2022 - 8:04 pm | ब़जरबट्टू

आपल्याकडील सार्वजनिक जागेवरील खाण्याचे प्रकार फारच दर्जाहिन असतात हे नविन आहे का ? भरपुर तेल, रन्गाचा वापर व सध्या जोमात सुरु असलेला Street food Vblog हा प्रकार बघुन किळस जास्त येते. आपण जे रस्त्यावर खातोय ते कसे बनते ते बघितले तर आपण स्वच्छता या शब्दाच्या जवळपास पण जात नाही. त्यात हे चलचित्रण जगभरात बघितले जातेय व आपलीच नाचक्की होतेय .. उघड्या हाताचा वापर, कपडे, भान्ड्यान्ची स्वच्छता.. आरारा.... किळस आणि कळसवाणा प्रकार आहे हो ....
या सगळ्या food Vblog वाल्याना सान्गावेसे वाटते अरे नका दाखवु ते, कसे तरी अज्ञानात सुख आहे, कशाला ते पण घेता आमच्याकडुन ..

सौन्दर्य's picture

30 Aug 2022 - 11:09 pm | सौन्दर्य

मागे एकदा एका नामांकित शेफने (ज्याचे टीव्हीवर कार्यक्रम देखील यायचे) त्याच्या अप्रेंटिसशिप मधली एक घटना एका दिवाळी अंकात सांगितली होती. हा शेफ दिल्लीतल्या एका नावाजलेल्या हॉटेलमध्ये असिस्टंट शेफ म्हणून काम करत होता. एकदा मुख्य शेफने (जो बरेच वेळा दारूच्या नशेत असायचा) जमिनीवर पडलेला फरशी पुसायचा फडका पिळून चना मसालाच्या हंडीत पिळल्याचा किस्सा सांगितला होता. त्या हॉटेलचे नाव त्या लेखात दिले नव्हते. कदाचित मानहानीचा दावा ठोकल्यास सिद्ध करणे कठीण जाऊ शकत असल्यामुळे नाव देण्याचे टाळले असावे.