श्रावणही आला फिरूनी

Bhakti's picture
Bhakti in जे न देखे रवी...
9 Aug 2022 - 8:43 am

श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी

शालू हिरवा नेसूनी
ओली मेंदी रेखूनी
उभी ही सृष्टी अंगणी
श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी|

पायवाट मृदगंधी भिजूनी
इंद्रधनू कमान बांधूनी
डोळी श्रावण सरी भरूनी
श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी|

सरली शेतातली पेरणी
फुलले ताटवे जल धारांनी
पानांवर स्पर्शबिंदू गोठूनी
श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी|

उमलेल्या बकुल फुलांनी
कुठवर पहावे रुप दर्पणी
गंधगीत गाऊ विरघळूनी
श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी|

मुक्तक

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Aug 2022 - 10:45 am | ज्ञानोबाचे पैजार

सख्या तू ही ये फिरूनी|

श्रावण महिन्यापासून चातुर्मास सुरु होत असल्याने कवितेच्या नायिकेने सख्याला फिरुन येण्याचा सल्ला दिला आहे अशी एक कवी कल्पना मनाला चाटून गेली.

रच्याकने :- कविता आवडली.

पैजारबुवा,

प्रसाद गोडबोले's picture

9 Aug 2022 - 11:04 am | प्रसाद गोडबोले

किंव्वा श्रावण हे सख्या क्रमांक १ चे नाव ही असु शकते . म्हणजे कसे की तो फिरुन आलाय , आता तू (अर्थात सख्या क्र. २) फिरुन ये, एकावेळी दोघं एकत्र नको. ;)

सतिश गावडे's picture

9 Aug 2022 - 12:03 pm | सतिश गावडे

चेंडू थेट सिमारेषेपार !!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Aug 2022 - 2:45 pm | ज्ञानोबाचे पैजार


किंव्वा श्रावण हे सख्या क्रमांक १ चे नाव ही असु शकते . म्हणजे कसे की तो फिरुन आलाय , आता तू (अर्थात सख्या क्र. २) फिरुन ये, एकावेळी दोघं एकत्र नको. ;)

विचार बरोबर आहे पण माझ्या मते या लॉजिक मधे सख्या हा क्र ३ असला पाहिजे, कसे? ते उदाहरण घेउन सांगतो.

आपला "सख्या" केस कापायला दुकानात जातो, तिथे आधिच "आषाढ"चे केस कापण्याचे काम सूरु होते. सलून मालक सख्याला बसायला सांगतात, खरेतर "सख्या" आधि "श्रावण" पण तिथे आलेला असतो पण वेळ लागेल म्हणून मालकांना सांगून तो जरा फिरायला गेलेला असतो. पण कामाच्या गडबडीत मालक ते "सख्या"ला सांगायचे विसरतात.

"आषाढ"ची कटींग होई पर्यंत "श्रावण" परत येतो म्हणून मालक त्याला खुर्चीवर घेतात. त्यामुळे "सख्या" चिडतो त्याला वाटते आपला नंबर असताना "श्रावण"ला आधि कसे घेतले?

त्याला समजावून सांगताना मालक म्हणतात "श्रावणही आला फिरूनी, सख्या तू ही ये फिरूनी"

या उदाहरणा प्रमाणे आषाढ क्र. १ आहे, श्रावण क्र. २ आहे आणि सख्याचा क्र. तिसरा येतो.

पैजारबुवा,

श्रावण महिन्यापासून चातुर्मास सुरु होत असल्याने कवितेच्या नायिकेने सख्याला फिरुन येण्याचा सल्ला दिला आहे अशी एक कवी कल्पना मनाला चाटून गेली.

तुमची कल्पना तरी कवयित्रीच्याही कल्पनेच्या पुढे धावते आहे. 😀

सतिश गावडे's picture

9 Aug 2022 - 12:16 pm | सतिश गावडे

एखाद्या ग्रामिण पार्श्वभूमीवरील चित्रपटात अल्लड अवखळ नायिका शेताच्या बांधावरुन किंवा माळरानावर सोनकीच्या फुलांच्या ताटव्यातून जाताना ती हे गीत गात आहे असे दाखवता येईल.

हे असे काहीसे:
asdf

Bhakti's picture

9 Aug 2022 - 12:29 pm | Bhakti

फोटो गायब आहे...

सतिश गावडे's picture

9 Aug 2022 - 12:40 pm | सतिश गावडे

काही तरी गडबड आहे. इथे बघा:
http://www.idlebrain.com/movie/photogallery/genelia2/images/newpg-bommar...

Bhakti's picture

9 Aug 2022 - 12:55 pm | Bhakti

ओम मिसेस देशमुख!

Bhakti's picture

9 Aug 2022 - 12:55 pm | Bhakti

*ओह

श्रावणाचा आनंद सर्वांनी घ्यावा :);)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Aug 2022 - 1:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रावणफेरी आवडली. फिरते राहा. सॉरी लिहिते राहा. बाय द वे, कालच पाऊस होता आणि घटोत्कच लेणी फिरून आलो. श्रावण म्हणजे निसर्गाची बहार असते.

-दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी's picture

14 Aug 2022 - 7:26 pm | कर्नलतपस्वी

कवितेवरील प्रतिसाद वाचून एवढचं म्हणेन,
जे न देखे रवी......
जी कवीता इतर सुप्त कवींना जागे करते ती छानच असली पाहीजे.