ब्रह्मानंदी

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
30 Jul 2022 - 12:35 pm

इ. स. १८५९-६० सालची चिपळूण मधली सकाळ,कदाचीत पावसाळी असावी.

रंगो भट नुकतेच पुजा अर्चना करून पडवितल्या लाकडी झोपाळ्यावर सुपारी कातरत बसले होते. आडकित्याच्या आवाजात झोपाळ्याचा 'कर्र ~, ~कर्र' आसा लयबद्ध आवाज मीसळून नादब्रह्म निर्माण होत होते. रंगो भटाच्या संजाबा वरची शेंडी प्रशिक्षीत नर्तकी प्रमाणे नर्तन करत होती. रंगो भटाची सुद्धा ब्रह्मानंदी टाळी लागली असावी.

तेवढ्यात रूबाबदार लष्करी गणवेशातला एक हरकारा त्यांच्या चौसोपी वाड्याकडे येताना पाहून आजूबाजूच्या वाड्यात खळबळ माजली. सगळे अंदाज घेत होते कुणाकडे हा राक्षस आला आसावा. इकडे तीकडे लक्ष न देता सरकारी माणूस थेट रंगो भटांच्या वाड्याचा दिंडी दरवाजा ओलांडत आत शिरला. बाकीच्या वाड्यातून सुटकेचे निश्वास बाहेर पडले.

दिंडी दरवाज्याच्या बिजागर्या उगीचच कुरकुरल्या.

रंगोभट, ओ रंगोभटानू

सरकारी मुलाजीमाच्या कडक सलामीच्या आवाजाने रंगोभट खडबडून जागे झाले.

साठ पावसाळे पाहिलेला,मुरलेला,खट, चित्पावन,त्याच्या चेहर्‍यावरची एक ही रेश हालली नव्हती.उगाचच शेंडी कुरवाळत प्रश्नार्थक नजरेने सरकारी मुलाजीमा कडे बघीतले. त्याने साहेबाचा निरोप रंगोभटाला दिला.

सरकारी मुलाजीम - भटानू साहेबान तुका शिबिराक आपयलो.

रंगो-ते कित्याक?

स मु- म्हाका कितें खबर आसां?

रंगो- तूं जा मी येतां.

खुंटीवरची पगडी,काठी,ऐनक सांभाळत मोठ्ठे पोथ्यांचे बाड पडशीत टाकल्या. दोन चिमट्या नसवार ओढली.

मुदपाकखान्या कडे नजर फिरवत रंगोभट म्हणाले,

"साहेबानं शिबिराक आपयलो, तां येता".

आतून काळजीचा सुर आला,

"पयलींच येतां",

"तू कित्याक चिंता करतां", इती रंगो भट.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बरेच वेळाने दिग्दर्शकाने वर पाहीले.
नटसम्राटांची ब्रह्मानंदी टाळी लागली होती.

दिग्दर्शक कप्पाळावर हात मारत म्हणाला " गयी भैंस पानीमे".
‐--------------------------------------------------------

पेर्णा @ चिमी यांच्या धाग्यावरून

https://www.misalpav.com/node/50504/backlinks

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

31 Jul 2022 - 5:40 am | प्रचेतस

मस्त एकदम

टर्मीनेटर's picture

31 Jul 2022 - 11:46 pm | टर्मीनेटर

आधी वाचून काय कल्ला नाय!
चिपळूण मध्ये ही मालवणी + कोकणी भाषा बोलतात? मी तरी कधी ऐकली नाही बुवा!

अर्थात शेवट वाचून काहीतरी काल्पनिक आहे हे समजलं आणि प्रेरणा वाचल्यावर थोडी टोटल लागली 😀

कर्नलतपस्वी's picture

1 Aug 2022 - 4:33 pm | कर्नलतपस्वी

@टर्मीनेटर जी,बरोबर आहात,मी पुण्यातला,कोकणी भाषेशी दुरवर संबध नाही. भाषा गुगल दुभाष्या कडून भाषांतरीत. "द लिजण्डस ऑफ कोकण" यांच्याबद्दल मिपावर वाचले. पुस्तक अंतरजालावरून उतरवून घेतले. अती लघुकथा लिहीण्याचा प्रयत्न. काल्पनिकच पण प्रत्यक्षात पुस्तक वाचताना कळाले अगदी आसेच घडले जसे मी लिहीले आहे.