राष्ट्रहीतासाठी.

Primary tabs

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in जे न देखे रवी...
26 Jun 2022 - 10:24 pm

चीन ची घुसखोरी, नेपाळ ची मुजोरी
कश्मीरींची पळापळी सहण करा! राष्ट्रहीतासाठी!
पेट्रोल ११०, डिझेल ९५,
सीएनजी ९०, सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!
भरमसाठ टोल, वाढते प्रवासभाडे,
मरती जनता सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!
निर्यातीवर बंदी, धंद्यात मंदी,
शेअरबाजारतील अंधाधुंदी सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!
पीएम केअर प्रायवेट, अष्ट हजार करोडी जेट,सेंट्रल विस्टा सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!
आमदारांची पळवापळवी, सत्तेसाठी हळहळी, ईडीच्या धाडी सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!

कविता

प्रतिक्रिया

अहिंसेच्या पुतळ्याखाली..हिंसेचे हिशोब..
माणुसकीच्या सदऱ्याला.. धर्माचे ढिगळ..
भगवा.. निळा.. पिवळा..हिरवा..विखुरला भारत..
तिरंगा शान आपली हे विसरला भारत..

चेहरा शांत..चेहरा निष्पाप..मुखवट्यांचेच रंग
फकीर म्हणुनी उगा, म्यानात मौनाची तलवार
खोटी नीती.. खोटा विठ्ठल..खोटाच राम..
राष्ट्रहित फुकाचे, फक्त पैशाचा बाजार..

- गणेशा

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jun 2022 - 12:53 am | अमरेंद्र बाहुबली

जबरजस्त गणेश सर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jun 2022 - 8:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहिते राहा.
राष्ट्रहितासाठी.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

27 Jun 2022 - 10:19 am | चौथा कोनाडा

बरोबर प्रा डॉ सर!
राष्ट्रहीतासाठी हे अशुद्ध लेखन आपण "राष्ट्रहितासाठी" असे सुधारले, हे मराठी हिता साठी उपयोगी आहे !

कृ ह घे

सुबोध खरे's picture

28 Jun 2022 - 12:19 pm | सुबोध खरे

उष्ट्राणां विवाहेषु , गीतं गायन्ति गर्दभाः ।
परस्परं प्रशंसन्ति अहो रूपं अहो ध्वनिः

You scratch my back and I'll scratch yours

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Jun 2022 - 1:04 pm | अमरेंद्र बाहुबली

बाकी चिनची घुसखोरी वगैरेवर तुम्ही सैन्यदलात होतात तरीही बोलत नाहीत. ती घुसखोरी “राष्ट्रहीतासाठी” होती असं तुमचं मत आहे का??

सुबोध खरे's picture

28 Jun 2022 - 7:04 pm | सुबोध खरे

भुजबळ बुवा
संरक्षण विषयक प्रत्येक गोष्टी बद्दल प्रत्येक निवृत्त सैनिकाने बोललेच पाहिजे असा आपला अट्टाहास आहे का?

कर्नलतपस्वी's picture

28 Jun 2022 - 7:10 pm | कर्नलतपस्वी

+1

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Jun 2022 - 7:28 pm | अमरेंद्र बाहुबली

संरक्षण विषयक प्रत्येक गोष्टी बद्दल प्रत्येक निवृत्त सैनिकाने बोललेच पाहिजे असा आपला अट्टाहास आहे का?
भाजपचा प्रचार नी चुकीच्या गोष्टींचं समर्थन ही केलंच पाहीजे अशीही सक्ति नाही पण ते आपण नित्यनेमाने करत असतोच ना?
मग भारत माते च्या भूमीचे लचके तोडले जातात बरोब्बर त्यावरच कशी चुप्पी साधली जाते? काॅंग्रेस चं सरकार असतं तर आपण ईतके चुप बसलो असतो का?

सुबोध खरे's picture

28 Jun 2022 - 7:36 pm | सुबोध खरे

भाजपचा प्रचार नी चुकीच्या गोष्टींचं समर्थन ही केलंच पाहीजे अशीही सक्ति नाही पण ते आपण नित्यनेमाने करत असतोच ना?

यासाठी काही पुरावा कि आपल्या आवडीच्या संपादकांसारखे हवेतील वायबार?

मग भारत माते च्या भूमीचे लचके तोडले जातात

यासाठी काही पुरावा?

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Jun 2022 - 8:02 pm | अमरेंद्र बाहुबली

तुम्ही बातम्या नी वृत्तपत्र वाचतच नसाल त्यामुळे चिने ने गाव वसवलं, पुल बांधले वगैरे बातम्या तुमच्या पर्यंत पोहोचल्याच नसतील. तूमचं भाजपमातेवरील प्रेम खरंच वाखाणण्याजोगं आहे.

सुबोध खरे's picture

28 Jun 2022 - 8:14 pm | सुबोध खरे

आपणच इथे भाजप बद्दल सतत गरळ ओकत असता आणि तिघाडी सरकारचे टोकाचे समर्थन करत असता. मागत यात कणभर सुद्धा पुरावा नसला तरी चालतो.

चालू द्या

तूमचं भाजपमातेवरील प्रेम खरंच वाखाणण्याजोगं आहे.

सेना म्हणजेच महाराष्ट्र

आपण हसे लोकाला आणि शेम्बूड आपल्या नाकाला

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Jun 2022 - 10:49 am | अमरेंद्र बाहुबली

भाजपमाता म्हणज भारत माता! पुढील वाक्य जसेच्या तसे.

सुबोध खरे's picture

29 Jun 2022 - 12:16 pm | सुबोध खरे

भाजपमाता म्हणज भारत माता!

हि आपली मुक्ताफळे आहेत

माझी नाहीत.

मी कधीही असे म्हटलेले नाही.

तेंव्हा नसलेले शब्द माझ्या तोंडात टाकू नका

चौकस२१२'s picture

27 Jun 2022 - 10:42 am | चौकस२१२

पेट्रोल ११०, डिझेल ९५,
सीएनजी ९०, सहण करा!

काय तो कांगावा
जगात हि इंधने २५रु प्रतिलिटरच मिळतात जणू
नाही नाही फुकटच मिळत असतील कि .....

https://www.globalpetrolprices.com/Australia/gasoline_prices/

कर्नलतपस्वी's picture

27 Jun 2022 - 10:58 am | कर्नलतपस्वी

काही दिवसापूर्वीच नायगारा फॉल्स बघून आलो. पेट्रोल १०५-११० रूपये लिटर भावाने भरले.

लवकरच भटकंतीत धागा टाकतोय जरूर वाचा. कमी अशुद्ध लेखन व भरपुर फोटो टाकण्याचा मानस आहे

इरसाल's picture

27 Jun 2022 - 12:18 pm | इरसाल

तुम्ही णायगारा फॉल बघुण आलात. पेट्रोल १०५-११० रुपये भावाणे भरले.
पण कृपा करुण अशुद्ध लेखण व भरपुर फोटो टाकन्याचा माणस ठेवु नका. पिलीज.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Jun 2022 - 10:43 am | ज्ञानोबाचे पैजार

शिर्षक थोडे बदलले असते तर....."राष्ट्रहितासाठी" ऐवजी "राष्ट्रवादीहितासाठी" इतकाच काय तो बदल केला असता तर महाभारता पेक्षा मोठे खंडकाव्य लिहिता आले असते.

ये कुछ जम्या नही.

पैजारबुवा,

कर्नलतपस्वी's picture

27 Jun 2022 - 11:06 am | कर्नलतपस्वी

१९४७,६२,६५
का आ तिवारी
नसबंदी
इमर्जन्सी
इत्यादी
सोयिस्करपणे विसरले.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jun 2022 - 1:20 pm | अमरेंद्र बाहुबली

ईमर्जन्सी?? अनूशासनपर्व .

चौकस२१२'s picture

27 Jun 2022 - 10:45 am | चौकस२१२

आमदारांची पळवापळवी

२.५ वर्षांपूर्वी आज ट्रायडंट उद्या ताज आणि तोंडदाखवयायला यशवंतराव चव्हाण सेंटर .. हे चालत होता ?
हा तेव्हा ट्रायडंट काह भाव बहुतेक २०० रु खोलीला असावा !!!!!!!!!!!

कर्नलतपस्वी's picture

27 Jun 2022 - 10:52 am | कर्नलतपस्वी

अहिंसेच्या पुतळ्याखाली..हिंसेचे हिशोब..
माणुसकीच्या सदऱ्याला.. धर्माचे ढिगळ..

थोडा बदल केलातर...

अहिंसेच्या पुतळ्याखाली..हिंसेचे ओघळ..
माणुसकीच्या सदऱ्याला.. धर्माचे ठिगळ..

गणेशा's picture

27 Jun 2022 - 12:23 pm | गणेशा

भारी.. जान आणली कडव्यात तुम्ही..

डँबिस००७'s picture

29 Jun 2022 - 8:11 pm | डँबिस००७

राष्ट्रहितासाठी अजुन एक कन्हय्याने आपली जान गमावली.