फोनमधली connectivity 4G/4G+/5G कोणती?

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
19 Apr 2022 - 9:19 am

( डिस्क्लेमर : मी तंत्रज्ञानी नाही पण शोधाशोध करत असतो. तंत्रज्ञान गटात लेख टाकला आहे पण चर्चा आहे.)

सध्या वापरात असलेल्या 4G net मध्ये काही फोन्स 4G+ support करतात. यामध्ये 850,900,1800,2300 हे चारही फ्रिक्वेन्सी bands एकाच वेळी चालू राहून चांगला नेट स्पीड मिळतो. तुमच्या फोनमध्ये 4g+ तपासण्याचे
1)4g+ फोनमध्ये चालू असेल तर नोटिफिकेशन पट्टीवर
LTE-A /LTE CA/4g+/LTE+ असे दिसते.
किंवा
2)android app -

Netmonster
https://play.google.com/store/apps/details?id=cz.mroczis.netmonster

(( 4g networking मध्ये 4G, 4G-LTE,4G-VOLTE प्रकार आहेत. ))
जिओ सिम फक्त 4GVOLTE वरच चालते. फोनमध्ये दोन सिमची जागा असेल तर आणि फोन 'dual sim - dual 4G Volte' असला तरच जिओसिम अधिक दुसरे एरटेल वोडाफोनवगैरे फुल्ल दोन्ही चालतात.

5G band येण्याला आणि स्थिर होऊन फोनमध्ये परवडण्याला तीन वर्षे लागतील असा अंदाज वर्तवला जातो. शिवाय त्याची रेंज कमी असल्याने फक्त शहरांत काही ठिकाणी साध्य होईल म्हणतात. - नेटग्यान.

पण तोपर्यंत 4G+ वाले फोन पाहून घेणे फायदेशिर आहे.

जालावर वाचन करून माहिती जमवून लिहिली आहे. चुका असतील. सूचना,सुधारणा आणि आपले अनुभव,मत मांडावे.

प्रतिक्रिया

कॉमी's picture

19 Apr 2022 - 9:35 am | कॉमी

4G

कंजूस's picture

19 Apr 2022 - 9:44 am | कंजूस

पेपरवर असते तसे नसते. शिवाय अमुक एक प्रसेसरवाला 4g+ असतोच असं नाही.
माझा मोटो e5plus हा साधा फोन आहे. Qualcomm 430 प्रसेसरवर. 4g+ नाही.
इथे काही विडिओ आहेत.
1)4g+?
https://youtu.be/ISEFT3fr4gI
2)4g+?
https://youtu.be/vk0LPEBo7Xs
3) dual volte?
https://youtu.be/H1j5bVS7hBg

चौथा कोनाडा's picture

19 Apr 2022 - 5:37 pm | चौथा कोनाडा

4G चा वेग समाधानकारक वाटतो, काहई वर्षे तोच वापरणार,
5 G अनिवार्य झाल्यावर बघता येईल !

चौथा कोनाडा's picture

19 Apr 2022 - 5:37 pm | चौथा कोनाडा

4G चा वेग समाधानकारक वाटतो, काहई वर्षे तोच वापरणार,
5 G अनिवार्य झाल्यावर बघता येईल !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Apr 2022 - 9:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोरजीचा वेग बरा वाटतो. आम्ही फोरजी वाले. फायव्हजी आल्यानंतर फोनही फायव्हजी सपोर्ट असणारा घ्यावा लागेल असे वाटते. मला तर फोनवर नेटस्पीड रपारप मिळालं पाहिजे असे वाटत असते. पण, एका एमबीला पंचवीस मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ लागत असे तो काळ आठवला की असे वाटते आजचं जे चालु आहे, ते बरं आहे. पैसे फार लागू लागले नेटसाठी तो त्रास फार हळुहळु वाढायला लागला आहे.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

20 Apr 2022 - 3:15 pm | चौथा कोनाडा

पैसे फार लागू लागले नेटसाठी तो त्रास फार हळुहळु वाढायला लागला आहे.

सहमत.
फायव्हजी ची गरज निर्माण करून जरूरी पेक्षा मोठे प्लान बनवुन प्रॉफिट वाढवायची आयडिया आहे !

sunil kachure's picture

20 Apr 2022 - 8:08 pm | sunil kachure

84 दिवसाला 839 रुपये म्हणजे सरासरी दिवसाला 10 रुपये.
एअरटेल च rate आहे हा.
हे फक्त सर्व्हिस provider आहेत.satelite नॉर्मल किमतीत वापरत असतील. Infrastructure साठी किरकोळ पैसे खर्च करून जनतेला लुटण्याचा जोरदार कार्यक्रम चालू आहे.

sunil kachure's picture

20 Apr 2022 - 9:49 am | sunil kachure

4G हा नेटवर्क प्रकार आहे.4G हे इंटरनेट च स्पीड दाखवत नाही.
जगात.
4G network la वेगवेगळं स्पीड मिळते.
South कोरिया.103.18. Mbps.
UAE. 86.77 Mbps.
China. 67.71 mbps.
आणि भारत
11.46. Mbps.

टर्मीनेटर's picture

20 Apr 2022 - 10:25 am | टर्मीनेटर

5G ची वाट बघतोय!
आता हायस्पीड वाय फाय उपलब्ध नसेल तिथे फोन डेटा वापरावा लागला तर 4G सुद्धा स्लो वाटते 😀

कंजूस's picture

20 Apr 2022 - 11:21 am | कंजूस

म्हणजे career aggregation हे सर्वच फोनात झाले तर आठ दहापट स्पीड मिळेल. पण ते कशात आहे हे स्पेसिफिकेशनला द्यायला सुरुवात झाली पाहिजे. आणखी स्क्रीन ब्राईटनेस लेवलसुद्धा. ती ५०० nitsपेक्षा अधिक असली तर उन्हामध्ये दिवसाउजेडी वाचता येते.
Display test - https://youtu.be/cxZlh4-NL4g

Nokia च E71 हा ब्लॅक बेरी सारखा दिसणारा मोबाईल होता.त्याची स्क्रीन खूप वेगळी होती.
भर उन्हात अगदी सूर्याच्या दिशेने जरी मोबाईल असेल तर स्पष्ट दिसायचे स्क्रीन वर काय आहे ते
अक्षरे सोनेरी रंगात स्पष्ट दिसायची.
ब्राईटनेस शी काहीच संबंध नव्हता.
तशी स्क्रीन नंतर कोणत्याच मोबाईल मध्ये बघितली नग

श्रीरंग_जोशी's picture

20 Apr 2022 - 8:58 pm | श्रीरंग_जोशी

अमेरिकेत 5G गेल्या तीन वर्षांपासून फारसे यशस्वी होताना दिसत नाहीये.
युरोपातल्या मिपाकरांकडून त्यांचा 5G बाबतचा अनुभव जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.

सामान्यनागरिक's picture

11 May 2022 - 5:44 pm | सामान्यनागरिक

फाई जी चा वापर फक्त व्हिडीओ डाउन्लोड करण्यासाठी करणार का ? ज्या कामाला आज ५ मिनीटे लागतात ते ३/४ मिनीटांत होईल .
जी २ मिनीटे वाचतात त्या वेळेत जबरदस्त शोध वगैरे लावणार का ?

मला वाटते आपल्याला गरज नाही फाई जी ची. जो पर्यंत फाई जी चा स्पीड लागणारे एप्लीकेशन्स तयार होत नाहीत तो पर्यंत ते आणण्याची गरज नाही. उगीच टेलीफोन/ इन्टरनेट कंपन्यांचा फायदा कशाला करुन द्यायचा ? गरज नाही त्यावर आपली उर्जा/वेळ्/पैसा खर्च करु नये.

सामान्यनागरिक's picture

11 May 2022 - 5:44 pm | सामान्यनागरिक

फाई जी चा वापर फक्त व्हिडीओ डाउन्लोड करण्यासाठी करणार का ? ज्या कामाला आज ५ मिनीटे लागतात ते ३/४ मिनीटांत होईल .
जी २ मिनीटे वाचतात त्या वेळेत जबरदस्त शोध वगैरे लावणार का ?

मला वाटते आपल्याला गरज नाही फाई जी ची. जो पर्यंत फाई जी चा स्पीड लागणारे एप्लीकेशन्स तयार होत नाहीत तो पर्यंत ते आणण्याची गरज नाही. उगीच टेलीफोन/ इन्टरनेट कंपन्यांचा फायदा कशाला करुन द्यायचा ? गरज नाही त्यावर आपली उर्जा/वेळ्/पैसा खर्च करु नये.

चौथा कोनाडा's picture

13 May 2022 - 11:11 pm | चौथा कोनाडा

सहमत आहे.
आधीच बिनगरजेच्या वस्तू गरजेच्या करून ठेऊन खर्च वाढवलेत, त्यात ५ग ची भर कशाला घालायची ?.

योगी९००'s picture

23 May 2022 - 10:28 am | योगी९००

बाकी 5g हे आता व नंतरही मार्केटींग gimmik आहे. जास्त bandwidth मिळाल्यावर तुम्ही काय करणार आहात?

तुमच्याकडे जरी 100 gb bandwidth जरी असली तरी ज्या server ला तुम्ही connect त्याची capacity किती आहे त्यावरच पुढचे अवलंबून असणार ना?

म्हणजे समजा एखादी मोठी file download करत आहात व जेथून download करत आहात तो server त्याच्यावरील लोडनुसार जर 10 mbps च्या वर data पाठवू शकत नसेल तर तुमच्या high bandwidth चा काहीच उपयोग नाही.

माझ्याकडे hathway आहे आणि ते सांगतात 100 mbps speed मिळेल. पण मला साधारण ५० ते ५५ mbps up/down speed मिळतो. यावर माझ्या घरातले एक tv, 3 मोबाईल, 2 laptop एकाचवेळी video stream करू शकतात. आणखी काय हवे? हे झाले घरचे नेटवर्क. मोबाईल 4g नेटवर्क ( वोडाफोन किंवा जिओ) 10-12 mbps speed देते. ते ही खूप म्हणजे खूपच झाले.

म्हणून उगाचच आतापासून 5g वाला फोन घेण्याच्या मागे लागू नका. नेटवर्क establish झाले की नंतर कसे आहे ते बघून घेऊ शकता.

गामा पैलवान's picture

24 May 2022 - 7:28 pm | गामा पैलवान

१०० % सहमत. मिळतेय म्हणून जोडणी घ्यायची याला फारसा अर्थ नाही. उगीच खर्च वाढतो. वाढीव खर्चाच्या प्रमाणात परतावा तेव्हढाच वाढीव हवा ना. पलकोघे.
-गा.पै.