कझाखस्तानमधील अशांतता

Primary tabs

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in काथ्याकूट
14 Jan 2022 - 11:24 pm
गाभा: 

कझाख सरकार सरकारने 1 जानेवारी 2022 पासून स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान रद्द केल्यावर त्याचे दर जवळजवळ दुपटीने वाढले. त्याविरोधात जनतेने सुरू केलेल्या शांततापूर्ण निदर्शनांना अचानक हिंस्र स्वरुप आले आणि त्याचे लोण संपूर्ण देशभर पसरण्याची भिती निर्माण झाली. अलमातीच्या विमानतळावरही त्या हिंसक निदर्शकांनी अल्प काळासाठी ताबा मिळवला होता. या हिंसाचारात 18 पोलिस आणि 164 सामान्य नागरिकांचे प्राण गेले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कझाख राष्ट्रपती कासिम-जोमार्त तकायेव (Kassym-Jomart Tokayev) यांनी पंतप्रधानांना पदावरून हटवले आणि सरकार तातडीने बरखास्त केले. पाठोपाठ देशात 19 जानेवारीपर्यंत आणीबाणी जाहीर केली. त्याचवेळी हिंसाचार करणारे दहशतवादी असून त्यांना दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश सुरक्षादलांना दिले. त्यापाठोपाठ सामूहिक सुरक्षा करार संघटनेच्या (Collective Security Treaty Organisation/CSTO) शांतिरक्षक दलाला तातडीने मदतीला बोलावून घेतले.

कोविड-19 संकटाचा कझाख अर्थव्यवस्थेवर अतिशय विपरीत परिणाम झालेला आहे. वाढलेली बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, पोलिसांची दमननीती आणि देशातील स्रोतांच्या वितरणातील प्रचंड असमतोल या कारणांमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढलेला होताच, त्यातच इंधनाच्या वाढलेल्या दरांमुळे नागरिकांमधील सरकारविरोधी भावना आणखी भडकल्या.

देशातील सध्याची अशांतता पाहून कझाख नागरिकांनी शेजारील देशांमध्ये आश्रयासाठी जाण्यास सुरुवात केली होती. या परिस्थितीचा फायदा घेत त्यांच्या आडोशाने दंगलखोरांनीही पलायन करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे कझाख पोलिसांनी सर्व सीमा बंद करत तपासणी सुरू केली. त्यानंतर पकडण्यात आलेल्या काही दंगलखोरांच्या चौकशीतून हे स्पष्ट झाले की, त्यांना अन्य देशांमधून पैसे देऊन तिथे दंगे घडवण्यासाठी आणले गेले होते. देशामध्ये अस्थिरता पसरवण्यासाठी बाहेरून मदत मिळत असल्याच्या कझाख राष्ट्रपतींच्या आरोपाला पकडलेल्या दंगलखोरांच्या चौकशीतून पुष्टी मिळू लागली. कझाखस्तानमधील काही सरकारविरोधी गटांनीही सरकार बदलण्यासाठीच आपण या आंदोलकांमध्ये सहभागी झाल्याचे म्हटले.

कझाखस्तानने स्वातंत्र्यापासून रशिया आणि अमेरिका यांच्याबरोबरच्या संबंधांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी कझाखस्तानसाठी परराष्ट्र धोरणात रशियाबरोबरच्या पारंपारिक, राजकीय, लष्करी आणि आर्थिक संबंधांचे महत्व अनन्यासाधारण राहिले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात कझाखस्तानने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यामुळे देशात परकीय गुंतवणूक वाढत गेली. आज त्याची अमेरिकेबरोबर व्यूहात्मक भागीदारी आहे. कझाखस्तानात ऊर्जा क्षेत्रात अमेरिकेने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे कझाखस्तानात अस्थिरता वाढणे अमेरिकेला नको आहे. मात्र त्याचवेळी मध्य आशियात रशिया असलेला आणि सध्या चीनचा वाढत असलेला प्रभाव याकडे वॉशिंग्टनकडून गांभीर्याने पाहिले जात आहे.

मध्य आशियाचे रशियासाठी सामरिकदृष्ट्या महत्व आहे. त्यामुळे तेथे आपली पकड कायम ठेवण्यासाठी मॉस्को जागरूक आहे. रशियाचा मध्य आशियावर असलेला प्रभाव कमी करण्यासाठी या क्षेत्रातील देश स्वतंत्र झाल्यापासून वॉशिंग्टनहून सातत्याने प्रयत्न होत राहिले आहेत. पुढे अमेरिकेने सैन्य काढून घेण्याची मागणी या देशांकडून होऊ लागली होती. 2014 मध्ये या क्षेत्रात अमेरिकन सैन्याचे अस्तित्व संपुष्टात आले; मात्र उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि किरगिझस्तानात मूलतत्ववादी कायम राहिले. त्यांचा प्रभाव मध्य आशियात वाढणे रशियालाही धोकादायक वाटत आहे. म्हणूनच कझाखस्तानच्या विनंतीनंतर मॉस्कोने तातडीने कझाखस्तानला CSTO चे शांततारक्षक सैन्य पाठवले. या मूलतत्ववाद्यांबरोबरच गुन्हेगारी गटही या हिंसाचारात सहभागी झाले असल्याचे सांगितले जात आहे.

एकूणच रशिया, अमेरिका, चीन आणि अन्य देशांसाठीही व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या क्षेत्रात प्रत्येकाकडून आपला प्रभाव वाढवण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मध्य आशिया भारतासाठीही सामरिकदृष्ट्या महत्वाचा असल्यामुळे कझाखस्तानमधील हिंसक परिस्थितीबाबत नवी दिल्लीहून चिंता व्यक्त केली गेली होती. तसेच तेथे लवकरात लवकर शांतता पुन:स्थापित होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचेही आवाहन करण्यात आले होते.

लिंक
कझाखस्तानमधील अशांतता (avateebhavatee.blogspot.com)

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Jan 2022 - 10:48 am | अमरेंद्र बाहुबली

त्यापेक्षा वाईट परिस्थीती भारतात आहे. सिलेंडर, पेट्रोल च्या दरांनी ऊच्चांक गाठलाय. भारताचाही काही दिवसानी कझाकस्थान झाल्यास आश्चर्य वाटू नये.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2022 - 10:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन कझाखस्तानमधील अशांततेचे असले तरी थोडे फार प्रमाणात भारतातही अशीच महागाईची स्थिती आहे. नुसते गॅसच नव्हे तर अन्य वस्तूंची महागाई तर विचारुच नका. बाकी, वृत्तवाहिन्या महागाईची चर्चा सोडून सर्व चर्चा करतात. लोकप्रतिनिधीही रिमोटने म्यूट झालेले आहेत. लोक रस्त्यावर येत नाहीत कारण लोक करोना, डेल्टा, ओमायक्रॉन यात परेशान आहेत आणि त्याचा फायदा येथील व्यवस्थेला मिळत आहे.

बाकी, कझाखस्तानमधे शांतता नांदावी अशीच प्रार्थना करतो.

-दिलीप बिरुटे

रावसाहेब चिंगभूतकर's picture

15 Jan 2022 - 2:32 pm | रावसाहेब चिंगभूतकर

थोडे फार प्रमाणात भारतातही अशीच महागाईची स्थिती आहे. नुसते गॅसच नव्हे तर अन्य वस्तूंची महागाई तर विचारुच नका.

सध्याचा रिटेल कन्झ्युमर कस्टमर प्राईस इंडेक्स 5.59% आहे. 2014 पूर्वी तो 12% च्या आसपास होता. कन्झ्युमर प्राइसेस डिसेंम्बर मध्ये 0.36% ने कमी झाल्या (वाढल्या नाहीत). आपण स्टेटमेंट करताना काही डेटा वगैरे पाहून करता की आपलं असंच राहुल गांधी टाइप ढकलबाजी करता?

Cpi

https://tradingeconomics.com/india/inflation-cpi

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2022 - 3:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> आपण स्टेटमेंट करताना काही डेटा वगैरे पाहून करता की आपलं असंच राहुल गांधी टाइप ढकलबाजी करता?

शेठ सारखी फेकाफेकी समजा. तान घेऊ नका.._/\_

-दिलीप बिरुटे

शेठ सारखी फेकाफेकी समजा. तान घेऊ नका.
म्हणजे फेकाफेकी करता तर ,,, नका लोकहो ताण घेऊ नका
प्राध्यापकांना मुद्देसूद डेटा वैगरे सादर करण्याची सक्ती नसते त्यामुळे सतत हा.. पा,,,, ला "शेठ यावं आणि सेठ त्याव" करणे यासाठी सरकार पगार देत आहे असे समजूयात .. आपण ताण नको घ्यायला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2022 - 6:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>शेठ यावं आणि सेठ त्याव" करणे यासाठी सरकार पगार देत आहे.

परदेशात बसून भारतात काड्या सारायचे आणि शेठची तळी उचलायचे तुम्हाला किती मिळतात म्हणे ?

-दिलीप बिरुटे

Trump's picture

15 Jan 2022 - 6:51 pm | Trump

परदेशात बसून भारतात काड्या सारायचे आणि शेठची तळी उचलायचे तुम्हाला किती मिळतात म्हणे ?

परदेशात राहणार्‍या भारतीयांनी काहीच बोलु नये का?

कंजूस's picture

15 Jan 2022 - 11:23 am | कंजूस

उत्तर आफ्रिकी देशांतही आहे. कारण एकच की इथे लाकूड, खनिज संपत्ती यासाठी युअरोपिअन वसाहती झाल्या. आता पुढे काय हा प्रश्न आहे. औद्योगिक क्रांती करणारे देश श्रीमंत झाले पण हे मागे पडले.लोकसंख्या वाढते आहे त्यांचा अन्नाचा पुरवठा वाढवणे अशक्य होत चालले.

शाम भागवत's picture

15 Jan 2022 - 12:03 pm | शाम भागवत

कझागिस्तानची तुलना आफ्रिकी देशांशी करणे बरोबर वाटत नाही. कझागिस्तानमधील डॉलरमधील दरडोई उत्पन्न हे भारतीयांपेक्षासुध्दा कितीतरी अधिक म्हणजे अंदाजे सहा ते सातपट (युएस डॉ ९-१० हजार) आहे. त्यामुळे तिथले श्रीमंत अधिक श्रीमंत होत जाताना दिसत असले तरी वार्षिक ६-७ लाख रूपयांचे उत्पन्न मिळवणारे लोक ही भारतात तरी सुखवस्तू अशीच म्हटली पाहिजेत.
मुख्य म्हणजे तिथे सध्या महागाई वाढत असली तरी तुलनात्मक दृष्ट्या तिथे स्वस्ताईच आहे. पीपीपी उत्पन्नाचा (पैशाची क्रयशक्ती) विचार केला तर तेथील उत्पन्न अंदाजे २५००० अमेरिकन डॉलरच्या घरात जाते. हे लक्षात घेतले तरी तेथे किती स्वस्ताई आहे हे लक्षात येते.
भारतातील सामान्य माणसाच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला जर दरमहा खर्चासाठी १५००० (२५०००*७०/१२) मिळत असतील तर थोडीफार कल्पना आपल्याला करता येईल.

मला वाटते महागाई तात्कालीन निमित्त असावे. सौदी अरेबियाचे राजकारण जास्त असावे. कारण आजही सौदी अरेबियाची कट्टर धार्मिकतेची झूल पांघरायला काझीक लोकं तयार नाहीत.

पण या सगळ्याचा उपयोग भारतातील राजकारणासाठी कोणाला करायचा असल्यास माझी हरकत नाही. :) त्यांनी लिहित जावे. कोणी खोडत जावे. आम्ही वाचत जाऊ. :))

पराग१२२६३'s picture

15 Jan 2022 - 2:49 pm | पराग१२२६३

सौदी अरेबियाची कट्टर धार्मिकतेची झूल पांघरायला काझीक लोकं तयार नाहीत. कारण कझाखी नागरिकांच्या आणि मध्य आशियाई नागरिकांच्या वैचारिक जडणघडणीवरचा सोव्हिएत काळातील प्रभाव आजही दिसून येतो. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही तेथील समाजजीवनात कट्टर धार्मिकता रुजू शकलेली नाही.

अनन्त अवधुत's picture

15 Jan 2022 - 2:56 pm | अनन्त अवधुत

पण या सगळ्याचा उपयोग भारतातील राजकारणासाठी कोणाला करायचा असल्यास माझी हरकत नाही. :) त्यांनी लिहित जावे. कोणी खोडत जावे. आम्ही वाचत जाऊ. :))

+१

विजुभाऊ's picture

16 Jan 2022 - 1:50 am | विजुभाऊ

कझाकस्तान ची इरीगेशन आणि पर्यावरण शेती सिस्टीम चे रशियाकृपेने अगोदरच वाट लागलेली आहे.
तिथल्या नद्यांवर धरणे बांधुन त्यांचे पाणी समुद्राला मिलु दिले नाही. समुद्र आटले.
आता पाऊसही पडायचा बंद झालाय
भारतात ही परिस्थिती कधीच असणार नाही

Trump's picture

16 Jan 2022 - 7:45 pm | Trump

नमस्कार भाउ.

कझाकस्तान ची इरीगेशन आणि पर्यावरण शेती सिस्टीम चे रशियाकृपेने अगोदरच वाट लागलेली आहे.

सविस्कर लिहीता का?

पराग१२२६३'s picture

15 Jan 2022 - 2:57 pm | पराग१२२६३
शाम भागवत's picture

15 Jan 2022 - 5:02 pm | शाम भागवत

हा एक आठ मिनिटांचा चांगला व्हिडीओ आहे.

मराठीत कझागिस्तानच्या आत्ताच्या उठावाबद्दल माहीती दिलेली आहे. भारतीय राजकारणाबद्दल काही त्यात नसल्याने सगळ्यांना पहायला आवडेल. भरपूर माहीती दिलेली आहे. चीन, रशिया व अमेरिका यांचे हितसंबंध तसेच अफगाणिस्तानच्या संदर्भात कझाखचे महत्व वगैरे चांगले समजावून सांगितले आहे.

ज्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबत उत्सुकता असेल त्यांनी जरूर पहावा.

बोलघेवडा's picture

15 Jan 2022 - 6:12 pm | बोलघेवडा

इथे काही लोक सतत एक विशीष्ट अजेंडा घेऊन वावरत असतात. जरा खुट्ट झाले की देशात अशांतता, अराजकता माजेल, यादवी युद्ध होईल, लोक रस्त्यावर यावीत, दंगली व्हाव्यात अशीच यांची इच्छा असते. मुद्दामूनच अस नरेटिव्ह सेट करायचं प्रयत्न करतात की आता परिस्थिती हाताबाहेर जात आणि कधीही भडका उडेल.

पण प्रत्यक्षात असा भडक उडत नसल्याने ही लोक नाराज होऊन मिळेल तिथे आगीत तेल ओतत असतात.

संपादक मंडळाने कृपया अश्या सभासदांकडे लक्ष द्यावे आणि योग्य ती समज द्यावी. सरकार कोणतेही असो, पंतप्रधान कोणीही असो या सर्व पदांचा योग्य तो मान राखला जावा.

शाम भागवत's picture

15 Jan 2022 - 6:22 pm | शाम भागवत

अहो, याच लोकांमुळे मला खूप महत्वाची माहिती आत्तापर्यंत मिळाली आहे. ते लिहितात व काही खोडतात, आपण फक्त माहिती मिळवत राहायची.
अगदी आत्ताचं उदाहरण द्यायचे तर, महागाईचा विषय निघाला. लागलीच कोणितरी चार्ट टाकला. सगळं कसं आयतं मिळते. :)

काटे नसलेला गुलाब शोधायचा प्रयत्न करण्याऐवजी, हाताला काटे न बोचता हातात गुलाबाचे फूल हातानेपकडण्याची कला शिकणे फायद्याचे असते. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2022 - 6:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोन्ही बाजूने माहिती यायला लागली की खरी स्थिती समजायला कठीण जाते. आपण गूगल आणि प्रत्यक्ष माहिती घेऊन विश्वास ठेवायचा. हल्ली खोटी माहिती इतकी ढकलल्या जाते की ती माहिती खरी वाटायला लागते. आजकाल तर खोटी माहितीचा भरणा खुप वाढलाय.

काका महागाईच्या बाबतीत हा पण लेख वाचून घ्या...!

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

15 Jan 2022 - 6:59 pm | कंजूस

दोन्ही बाजूने माहिती यायला लागली की खरी स्थिती समजायला कठीण जाते.

आपण जो पहिला लेख वाचतो तेच बरोबर वाटते. नंतर दुसरे विरोधी येतात.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

15 Jan 2022 - 8:23 pm | रावसाहेब चिंगभूतकर

लोकसत्ताचा लेख बहुधा मूळ क्विंट किंवा प्रिंट वरून कॉपी केलेला आहे. मी मूळ लेख वाचलेला आहे आणि मला त्या वेळी ही याचं आश्चर्य वाटलं होतं की अशा प्रकारे डेटा चं सेलेक्टिव्ह रिडींग कसं केलं जातं. उदाहरणार्थ १. या लेखातली काही वाक्ये:

जुलै २०२१ नंतरचा महागाईने गाठलेला हा सर्वोच्च स्तर.

काळजीपूर्वक न वाचणारा जुलै 2021 वाचणारच नाही.
२. दुसरी गोष्ट
होलसेल प्राईस इंडेक्स हा 12 वर्षात सर्वोच्च आहे हे खरे, पण जर मुळात त्याचे बेस इयर 2012 आहे तर त्या आधीची वर्षे का गृहीत धरलेयत? शिवाय हा इंडेक्स मोदी सरकार येण्या आधी किती होता? तो काही 5 च्या खाली वगैरे नव्हताच.
Wpi
३. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की सामान्य जनतेला झळ होलसेल प्राईस इंडेक्स ची नव्हे तर कन्झ्युमर प्राईस इंडेक्स ची बसते. आणि त्याच्यावर सगळ्यात महत्वाचा परिणाम करणारा घटक म्हणजे तेलाच्या दरात होणाऱ्या वाढीने खाद्यपदार्थांच्यात होणारी वाढ. पण तो 5 महिन्यात सर्वोच्च आहे, आतापर्यंत चा सर्वोच्च नव्हे.
४. शेवटची गोष्ट. महागाई वाईट असते ही चुकीची धारणा का केली जातेय? जर बाकी सगळ्यांच्या किमती वाढतायत, जर तुमच्या नोकरीच्या ठिकाणी मिळणाऱ्या पगारात वाढ होतेय, जर इकॉनॉमी वरच्या दिशेने सरकतेय, जर मार्केट ओपन होऊन डिमांड जनरेट होतेय तर किमती वाढणे मुळीच आश्चर्यकारक नाही. उलट किमती वाढल्या नाहीत तर ती चिंतेची गोष्ट असेल.

नोकरीच्या ठिकाणी मिळणाऱ्या पगारात वाढ होतेय
असं कसं रावसाहेब . . पगारवाढ तर व्हायलाच हवी. तो हक्क आहे आमचा. बाकी डिझेल / पेट्रोल मात्र २० वर्षापुर्वीच्या भावात मिळायला हवे. षेठ काय फक्त विमानात फिरायला निवडुन आलेत काय.

एक ते अजुन शेठ ने करोडो रुपायचे विमान / गाडी घेतली विकत फिरायला. किती शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाले असते त्या पैशात. म्हणुन आम्हाला पप्पु जास्त चांगला पंप्र होईल असे वाटते ...

सर टोबी's picture

15 Jan 2022 - 8:41 pm | सर टोबी

काही गफलत होतीय का? तो आलेख २०१२ च्या तुलनेत महागाई कमी झालीय असा वाचला तर तुम्ही म्हणता तसा समज होण्याची शक्यता आहे. तो आलेख महागाईचा दर दर्शवत आहे आणि तो जरी कमी वाटत असला तरी सध्याची ५% हून जास्त असलेली महागाई ही संकलित स्वरूपात वाढलेली आहे.

महागाईची झळ व्यक्ती सापेक्ष असू शकते पण ती नाहीच असे म्हणणे म्हणजे जरा जास्तीच प्रेम उतू जातंय ना?

रावसाहेब चिंगभूतकर's picture

15 Jan 2022 - 10:44 pm | रावसाहेब चिंगभूतकर

हा प्रतिसाद मी टाकलेल्या ग्राफ्स वर होता असे समजून उत्तर देतोय. महागाई हा आधीच्या वर्षात (किंवा क्वार्टर मध्ये) असणाऱ्या किमतीमधली वाढ दर्शवते. दोन प्रकारचे महागाईचे निर्देशांक असतात. होलसेल प्राईस इंडेक्स (wpi) आणि कन्झ्युमर प्राईस इंडेक्स (cpi). महागाई कायमच असते. ती तशी असते याचा अर्थ बाजारात डिमांड आहे आणि सप्लाय पेक्षा डिमांड जास्त आहे. जर वस्तुंच्या किमती खाली येत असतील तर याचा अर्थ लोक वस्तू खरेदी करत नाहीयेत (कारण बहुधा त्यांची वस्तू खरेदी करण्याची कॅपॅसिटी संपलीय) असा होतो. इकॉनॉमि वाढत असेल तर महागाई असणारच. सरकारपुढचे मूळ ध्येय महागाईवर ताबा ठेवणे हे असते, महागाई संपवणे नव्हे. सरकारला खास करून CPI वर ताबा ठेवण्यात रस असतो कारण ही महागाई सामान्य जनतेशी संबंधित गोष्टींची असते. महागाई बऱ्याच गोष्टींनी वाढू शकते उदाहरणार्थ खाद्यपदार्थांची महागाई ही पेट्रोल, खते, शेतमजुरी, दुष्काळ, एक्स्पोर्ट अशा अनेक गोष्टींशी संबंधित असू शकते. पण किती % म्हणजे वाईट हे आपल्याला चार्ट वरूनच समजेल. आपण जर 2012 पासून चा एव्हरेज काढलं तर त्याच्या आसपास असणारी महागाई म्हणजे फारसे काळजीचे कारण नाही असे मला वाटते. बाकी या ठिकाणी एक अतिशय महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. जर महागाई (उदाहरणार्थ) डाळींमुळे आणि तेलामुळे वाढत असेल तर सरकारने त्याच्या एक्स्पोर्ट वर बंदी घातली आणि त्याची आयात वाढवली तर ते शेतकरी, व्यापारी आणि त्यांच्या प्रतिनिधींना चालेल का? माझ्या मते मग विरुद्ध बाजूने ओरडा सुरू होईल की सरकार शेतकरी विरोधी आहे. जर महागाई एका लिमिट च्या वर गेली तर मात्र सरकार नक्कीच ही हत्यारे वापरेल. सरकारचे या नंबर्स वर लक्ष असणारच आणि त्यांनी ते केलेले नाही याचा अर्थ हे नंबर्स त्यांना फारशी काळजी करण्यासारखे वाटत नाहीत. कुणी तरी परवा ऑपशन्स आणि futures बद्दल डिस्कशन केलं होतं. सरकारने या सारख्या डेरिव्हेटिव्हज आणि त्यांच्या किमतीवर पडणाऱ्या परिणामाबद्दल चिंतीत होऊनच कदाचित त्यावर बंदी आणली असू शकेल. जस्ट या थॉट.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jan 2022 - 10:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महागाईची झळ व्यक्ती सापेक्ष

महागाईची झळ हल्ली पक्षीय सापेक्ष झालेली आहे. पूर्वीच्या सरकारात असलेली झळ प्रचंड महागाई होती आणि आताची महागाई ही एवढी तेवढी असते. आपला मूळ प्रश्न असा आहे की लोक महागाईचा निषेध करायला रस्त्यावर आले पाहिजेत, बोलले पाहिजेत. स्मृती इराणी या जशा महागाईविरोधात रस्त्यावर येऊन आंदोलन करायच्या तसे नेतृत्त्व आणि तसे वातावरण झाले पाहिजे तर सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करेल.

काल म्हणजे १४/०१/२०२२ तारखेला भारत सरकारच्या ऑफिस ऑफ दी एकोनॉमिक अ‍ॅडव्हायजरच्या सायटीवर वेगवेगळा डेटा तिथे प्रसिद्ध केला आहे. आपला प्रश्न ग्राहक किंमत निर्देशांकाशी संबंधित आहे, किरकोळ स्वरुपाच्या जो व्यवहार ज्या किंमतीवर होतो त्या किंमतीवरुन हा निर्देशांक जाहीर होत असतो. ग्राहकोपयोगी वस्तूंचे दर सतत वाढत आहेत त्यामुळे महागाई वाढतच आहे, आणि ती पुढेही वाढत राहील. त्यावर सध्या तरी नियंत्रण नाही असेच दिसते.

-दिलीप बिरुटे

शाम भागवत's picture

16 Jan 2022 - 12:51 pm | शाम भागवत

याचे दोन अर्थ होतात.
१) महागाई वाढलीय असं विरोधकांना वाटत असलं तरी सामान्यजनांना तसं वाटतं नाहीये. त्यामुळे आंदोनलन होत नाही आहेत.
किंवा
२) महागाई वाढतीय, लोकक्षोभही आहे पण विरोधी पक्ष त्यातून प्रभावी जनआंदोलन उभारण्यात कमी पडताहेत. त्यांना विरोधकांची भूमिका नीट निभावता येत नाहीये.
उलट पूर्वीचे विरोधक (स्मृती इराणी वगैरे) मात्र विरोधकांची भूमीका अंत्यंत उत्तम रितीने पार पाडत होते. ;))

स्वातंत्र्य मिळाल्या नंतर, 77-78 पर्यंत, सलग 30 वर्षे, कॉंग्रेस कडेच सत्ता होती

मग, तेंव्हा का नाही उपाय योजना केली?

कॉंग्रेसने फक्त आर्थिकच नाही तर संरक्षणाची पण हेळसांड करून ठेवली.

कॉंग्रेस, आता कुठल्या तोंडाने विरोध करणार?

पन्नास रूपये किलो कांदा, कांग्रेसच्याच राजवटीत होता.

सध्याच्या काळांत, भाजप शिवाय, इतर कुठल्याही पक्षांत, विश्र्वासार्ह नेता नाही.

हवं असेल तर, हुकुमदेव नारायण यादव, यांची लोकसभेतील भाषणे आणि परमपूज्य राहुल गांधी, यांची लोकसभेतील भाषणे, यांची तुलना करून बघा....

एकटा, हुकुमदेवच, कॉंग्रेसला पुरून उरतो ...

घराणेशाही लादली की काय होते? याचे सध्याच्या काळांत, उत्तम उदाहरण म्हणजे, कॉंग्रेस.... ऐतिहासिक उदाहरणे म्हणजे, दुसरा बाजीराव, वाकाटक साम्राज्य, राष्ट्रकूट साम्राज्य, नंद साम्राज्य...

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Jan 2022 - 2:33 pm | अमरेंद्र बाहुबली

घराणेशाही लादली की काय होते? याचे सध्याच्या काळांत, उत्तम उदाहरण म्हणजे, कॉंग्रेस.... ऐतिहासिक उदाहरणे म्हणजे, दुसरा बाजीराव, वाकाटक साम्राज्य, राष्ट्रकूट साम्राज्य, नंद साम्राज्य...
महाराष्ट्र भाजप?? फडणवीसांच्या काकू मंत्री नी वडील आमदार होते.

मुक्त विहारि's picture

16 Jan 2022 - 6:56 pm | मुक्त विहारि

बर्र

सर टोबी's picture

16 Jan 2022 - 5:22 pm | सर टोबी

बोलायचं नव्हतं पण वेळ आणतात हे भक्त. श्रीनगर, उरी, पठाणकोट इथे थेट लष्करी तळावर झालेले हल्ले काय दर्शवतात?

सुखीमाणूस's picture

16 Jan 2022 - 6:41 pm | सुखीमाणूस

मोदि सत्तेवर आल्यामुळे जिहादी कारवाया थाम्बल्या आहेत. मुम्बै शान्त आहे.
लष्कर नक्कीच जास्त सुसज्ज होते आहे.
कौन्ग्रेस् ने केवळ सत्तेवर रहाण्यासाठी ज्या तडजोडी केल्या आहेत आणि त्यामुळे जी अर्थिक आणि सामाजिक दरी निर्माण झाली आहे ती भरुन काढायला खुप वर्ष जातील.

मुक्त विहारि's picture

16 Jan 2022 - 6:58 pm | मुक्त विहारि

"कौन्ग्रेस् ने केवळ सत्तेवर रहाण्यासाठी ज्या तडजोडी केल्या आहेत आणि त्यामुळे जी अर्थिक आणि सामाजिक दरी निर्माण झाली आहे ती भरुन काढायला खुप वर्ष जातील."

सहमत आहे

अनन्त अवधुत's picture

17 Jan 2022 - 6:26 am | अनन्त अवधुत

विसरता येण्याजोगे २ वाक्य आठवले.
जुलै २०११ मध्ये मुंबईत रेल्वे बाँबस्फोट झाले होते त्यावर तत्कालीन केंद्रिय गृहमंत्री चिदंबरम म्हणाले होते,

"एकतीस महिन्यांनी अशी घटना घडली आहे."

जणू काही असे हल्ले हे नैसर्गिक आहेत, आणि इतक्या कालावधी नंतर घडल्याने सामान्य जनतेने वाईट वाटून न घेता पुढील हल्ल्याची वाट पहा. असेच त्यांना सांगायचे होते.

अर्थात ह्या ३१ महिन्यात मुंबई जवळील पुणे येथे हल्ला झाला हे सांगायला ते विसरले नाहित.

तपशिल हवे असल्यास बातमी

मुंबई हल्ल्यावर (२००८) 'बडे शहरो मे शहरो छोटे हादसे होते रहते है' हा अशाच प्रतिक्रियेचा नमुना. ही प्रतिक्रिया आबां कडुन आली होती. जनरेट्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला गेला.

ही काँग्रेस आणि त्यांच्या बगलबच्च्यांची अंतर्गत सुरक्षेची प्रायोरिटी.

भारतात असल्या मुळे आणि संपूर्ण दक्षिण भारत, दिल्ली,पंजाब आणि महाराष्ट्र सारख्या राज्यात विकास ला चालना देणारी राज्य सरकार असल्या मुळे भारताची अर्थ व्यवस्था सांभाळली जाते.
आणि आणि ह्या राज्यात राहणारी लोक समाधानी असल्या मुळे विरोधी चळवळी होत नाहीत.
केंद्रीय सरकार च्या निर्णयाचा परिणाम होतो पण ही राज्य सरकार सक्षम आहेत त्या संकटावर मात करण्यासाठी.

शाम भागवत's picture

16 Jan 2022 - 12:54 pm | शाम भागवत

धाग्याचा विषय नक्की काय आहे? ;)))

मुक्त विहारि's picture

16 Jan 2022 - 1:53 pm | मुक्त विहारि

धाग्याचे काश्मीर होणे, ही इथे परंपरा आहे.

चर्चा करतांना, विषयांतर होतेच.

भाषा सुयोग्य असणे, इतकीच माफक अपेक्षा असते...

चंद्रसूर्यकुमार's picture

16 Jan 2022 - 2:49 pm | चंद्रसूर्यकुमार

इथे असे एकेक रथी महारथी आहेत की धाग्याचा विषय कझाकस्तान नसता आणि बुर्किना फासो असता तरी त्यांनी ती चर्चा त्याच दिशेला नेली असती- तो देश कुठे आहे हे जसे मला माहित नाही तसे त्यांना माहीत नसते तरी :)

रंगीला रतन's picture

16 Jan 2022 - 4:04 pm | रंगीला रतन

विषयावरून आठवले
घोड्यांचे भाव काय आहेत हो हल्ली?

https://www.google.com/amp/s/www.tv9marathi.com/maharashtra/other-distri...

आजकाल, गुगलबाबाला विचारले की उत्तरे मिळतात...

कर्नलतपस्वी's picture

16 Jan 2022 - 6:39 pm | कर्नलतपस्वी

प्रतिसाद आवडला आणी सहमत आहे.
पेट्रोल महाग झाले म्हणून सायकलींची संख्या वाढली नाही किंवा रस्त्यावर वहातुक कोंडी संपली नाही.