कझाखस्तानमधील अशांतता

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in काथ्याकूट
14 Jan 2022 - 11:24 pm
गाभा: 

कझाख सरकार सरकारने 1 जानेवारी 2022 पासून स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान रद्द केल्यावर त्याचे दर जवळजवळ दुपटीने वाढले. त्याविरोधात जनतेने सुरू केलेल्या शांततापूर्ण निदर्शनांना अचानक हिंस्र स्वरुप आले आणि त्याचे लोण संपूर्ण देशभर पसरण्याची भिती निर्माण झाली. अलमातीच्या विमानतळावरही त्या हिंसक निदर्शकांनी अल्प काळासाठी ताबा मिळवला होता. या हिंसाचारात 18 पोलिस आणि 164 सामान्य नागरिकांचे प्राण गेले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कझाख राष्ट्रपती कासिम-जोमार्त तकायेव (Kassym-Jomart Tokayev) यांनी पंतप्रधानांना पदावरून हटवले आणि सरकार तातडीने बरखास्त केले. पाठोपाठ देशात 19 जानेवारीपर्यंत आणीबाणी जाहीर केली. त्याचवेळी हिंसाचार करणारे दहशतवादी असून त्यांना दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश सुरक्षादलांना दिले. त्यापाठोपाठ सामूहिक सुरक्षा करार संघटनेच्या (Collective Security Treaty Organisation/CSTO) शांतिरक्षक दलाला तातडीने मदतीला बोलावून घेतले.

कोविड-19 संकटाचा कझाख अर्थव्यवस्थेवर अतिशय विपरीत परिणाम झालेला आहे. वाढलेली बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, पोलिसांची दमननीती आणि देशातील स्रोतांच्या वितरणातील प्रचंड असमतोल या कारणांमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढलेला होताच, त्यातच इंधनाच्या वाढलेल्या दरांमुळे नागरिकांमधील सरकारविरोधी भावना आणखी भडकल्या.

देशातील सध्याची अशांतता पाहून कझाख नागरिकांनी शेजारील देशांमध्ये आश्रयासाठी जाण्यास सुरुवात केली होती. या परिस्थितीचा फायदा घेत त्यांच्या आडोशाने दंगलखोरांनीही पलायन करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे कझाख पोलिसांनी सर्व सीमा बंद करत तपासणी सुरू केली. त्यानंतर पकडण्यात आलेल्या काही दंगलखोरांच्या चौकशीतून हे स्पष्ट झाले की, त्यांना अन्य देशांमधून पैसे देऊन तिथे दंगे घडवण्यासाठी आणले गेले होते. देशामध्ये अस्थिरता पसरवण्यासाठी बाहेरून मदत मिळत असल्याच्या कझाख राष्ट्रपतींच्या आरोपाला पकडलेल्या दंगलखोरांच्या चौकशीतून पुष्टी मिळू लागली. कझाखस्तानमधील काही सरकारविरोधी गटांनीही सरकार बदलण्यासाठीच आपण या आंदोलकांमध्ये सहभागी झाल्याचे म्हटले.

कझाखस्तानने स्वातंत्र्यापासून रशिया आणि अमेरिका यांच्याबरोबरच्या संबंधांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी कझाखस्तानसाठी परराष्ट्र धोरणात रशियाबरोबरच्या पारंपारिक, राजकीय, लष्करी आणि आर्थिक संबंधांचे महत्व अनन्यासाधारण राहिले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात कझाखस्तानने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यामुळे देशात परकीय गुंतवणूक वाढत गेली. आज त्याची अमेरिकेबरोबर व्यूहात्मक भागीदारी आहे. कझाखस्तानात ऊर्जा क्षेत्रात अमेरिकेने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे कझाखस्तानात अस्थिरता वाढणे अमेरिकेला नको आहे. मात्र त्याचवेळी मध्य आशियात रशिया असलेला आणि सध्या चीनचा वाढत असलेला प्रभाव याकडे वॉशिंग्टनकडून गांभीर्याने पाहिले जात आहे.

मध्य आशियाचे रशियासाठी सामरिकदृष्ट्या महत्व आहे. त्यामुळे तेथे आपली पकड कायम ठेवण्यासाठी मॉस्को जागरूक आहे. रशियाचा मध्य आशियावर असलेला प्रभाव कमी करण्यासाठी या क्षेत्रातील देश स्वतंत्र झाल्यापासून वॉशिंग्टनहून सातत्याने प्रयत्न होत राहिले आहेत. पुढे अमेरिकेने सैन्य काढून घेण्याची मागणी या देशांकडून होऊ लागली होती. 2014 मध्ये या क्षेत्रात अमेरिकन सैन्याचे अस्तित्व संपुष्टात आले; मात्र उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि किरगिझस्तानात मूलतत्ववादी कायम राहिले. त्यांचा प्रभाव मध्य आशियात वाढणे रशियालाही धोकादायक वाटत आहे. म्हणूनच कझाखस्तानच्या विनंतीनंतर मॉस्कोने तातडीने कझाखस्तानला CSTO चे शांततारक्षक सैन्य पाठवले. या मूलतत्ववाद्यांबरोबरच गुन्हेगारी गटही या हिंसाचारात सहभागी झाले असल्याचे सांगितले जात आहे.

एकूणच रशिया, अमेरिका, चीन आणि अन्य देशांसाठीही व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या क्षेत्रात प्रत्येकाकडून आपला प्रभाव वाढवण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मध्य आशिया भारतासाठीही सामरिकदृष्ट्या महत्वाचा असल्यामुळे कझाखस्तानमधील हिंसक परिस्थितीबाबत नवी दिल्लीहून चिंता व्यक्त केली गेली होती. तसेच तेथे लवकरात लवकर शांतता पुन:स्थापित होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचेही आवाहन करण्यात आले होते.

लिंक
कझाखस्तानमधील अशांतता (avateebhavatee.blogspot.com)

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Jan 2022 - 10:48 am | अमरेंद्र बाहुबली

त्यापेक्षा वाईट परिस्थीती भारतात आहे. सिलेंडर, पेट्रोल च्या दरांनी ऊच्चांक गाठलाय. भारताचाही काही दिवसानी कझाकस्थान झाल्यास आश्चर्य वाटू नये.

प्रसाद गोडबोले's picture

26 Jan 2022 - 9:41 am | प्रसाद गोडबोले

भारताचाही काही दिवसानी कझाकस्थान झाल्यास आश्चर्य वाटू नये.

वाह , हा आशावाद आवडला !

प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2022 - 10:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन कझाखस्तानमधील अशांततेचे असले तरी थोडे फार प्रमाणात भारतातही अशीच महागाईची स्थिती आहे. नुसते गॅसच नव्हे तर अन्य वस्तूंची महागाई तर विचारुच नका. बाकी, वृत्तवाहिन्या महागाईची चर्चा सोडून सर्व चर्चा करतात. लोकप्रतिनिधीही रिमोटने म्यूट झालेले आहेत. लोक रस्त्यावर येत नाहीत कारण लोक करोना, डेल्टा, ओमायक्रॉन यात परेशान आहेत आणि त्याचा फायदा येथील व्यवस्थेला मिळत आहे.

बाकी, कझाखस्तानमधे शांतता नांदावी अशीच प्रार्थना करतो.

-दिलीप बिरुटे

रावसाहेब चिंगभूतकर's picture

15 Jan 2022 - 2:32 pm | रावसाहेब चिंगभूतकर

थोडे फार प्रमाणात भारतातही अशीच महागाईची स्थिती आहे. नुसते गॅसच नव्हे तर अन्य वस्तूंची महागाई तर विचारुच नका.

सध्याचा रिटेल कन्झ्युमर कस्टमर प्राईस इंडेक्स 5.59% आहे. 2014 पूर्वी तो 12% च्या आसपास होता. कन्झ्युमर प्राइसेस डिसेंम्बर मध्ये 0.36% ने कमी झाल्या (वाढल्या नाहीत). आपण स्टेटमेंट करताना काही डेटा वगैरे पाहून करता की आपलं असंच राहुल गांधी टाइप ढकलबाजी करता?

Cpi

https://tradingeconomics.com/india/inflation-cpi

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2022 - 3:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> आपण स्टेटमेंट करताना काही डेटा वगैरे पाहून करता की आपलं असंच राहुल गांधी टाइप ढकलबाजी करता?

शेठ सारखी फेकाफेकी समजा. तान घेऊ नका.._/\_

-दिलीप बिरुटे

शेठ सारखी फेकाफेकी समजा. तान घेऊ नका.
म्हणजे फेकाफेकी करता तर ,,, नका लोकहो ताण घेऊ नका
प्राध्यापकांना मुद्देसूद डेटा वैगरे सादर करण्याची सक्ती नसते त्यामुळे सतत हा.. पा,,,, ला "शेठ यावं आणि सेठ त्याव" करणे यासाठी सरकार पगार देत आहे असे समजूयात .. आपण ताण नको घ्यायला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2022 - 6:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>शेठ यावं आणि सेठ त्याव" करणे यासाठी सरकार पगार देत आहे.

परदेशात बसून भारतात काड्या सारायचे आणि शेठची तळी उचलायचे तुम्हाला किती मिळतात म्हणे ?

-दिलीप बिरुटे

Trump's picture

15 Jan 2022 - 6:51 pm | Trump

परदेशात बसून भारतात काड्या सारायचे आणि शेठची तळी उचलायचे तुम्हाला किती मिळतात म्हणे ?

परदेशात राहणार्‍या भारतीयांनी काहीच बोलु नये का?

कंजूस's picture

15 Jan 2022 - 11:23 am | कंजूस

उत्तर आफ्रिकी देशांतही आहे. कारण एकच की इथे लाकूड, खनिज संपत्ती यासाठी युअरोपिअन वसाहती झाल्या. आता पुढे काय हा प्रश्न आहे. औद्योगिक क्रांती करणारे देश श्रीमंत झाले पण हे मागे पडले.लोकसंख्या वाढते आहे त्यांचा अन्नाचा पुरवठा वाढवणे अशक्य होत चालले.

शाम भागवत's picture

15 Jan 2022 - 12:03 pm | शाम भागवत

कझागिस्तानची तुलना आफ्रिकी देशांशी करणे बरोबर वाटत नाही. कझागिस्तानमधील डॉलरमधील दरडोई उत्पन्न हे भारतीयांपेक्षासुध्दा कितीतरी अधिक म्हणजे अंदाजे सहा ते सातपट (युएस डॉ ९-१० हजार) आहे. त्यामुळे तिथले श्रीमंत अधिक श्रीमंत होत जाताना दिसत असले तरी वार्षिक ६-७ लाख रूपयांचे उत्पन्न मिळवणारे लोक ही भारतात तरी सुखवस्तू अशीच म्हटली पाहिजेत.
मुख्य म्हणजे तिथे सध्या महागाई वाढत असली तरी तुलनात्मक दृष्ट्या तिथे स्वस्ताईच आहे. पीपीपी उत्पन्नाचा (पैशाची क्रयशक्ती) विचार केला तर तेथील उत्पन्न अंदाजे २५००० अमेरिकन डॉलरच्या घरात जाते. हे लक्षात घेतले तरी तेथे किती स्वस्ताई आहे हे लक्षात येते.
भारतातील सामान्य माणसाच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला जर दरमहा खर्चासाठी १५००० (२५०००*७०/१२) मिळत असतील तर थोडीफार कल्पना आपल्याला करता येईल.

मला वाटते महागाई तात्कालीन निमित्त असावे. सौदी अरेबियाचे राजकारण जास्त असावे. कारण आजही सौदी अरेबियाची कट्टर धार्मिकतेची झूल पांघरायला काझीक लोकं तयार नाहीत.

पण या सगळ्याचा उपयोग भारतातील राजकारणासाठी कोणाला करायचा असल्यास माझी हरकत नाही. :) त्यांनी लिहित जावे. कोणी खोडत जावे. आम्ही वाचत जाऊ. :))

पराग१२२६३'s picture

15 Jan 2022 - 2:49 pm | पराग१२२६३

सौदी अरेबियाची कट्टर धार्मिकतेची झूल पांघरायला काझीक लोकं तयार नाहीत. कारण कझाखी नागरिकांच्या आणि मध्य आशियाई नागरिकांच्या वैचारिक जडणघडणीवरचा सोव्हिएत काळातील प्रभाव आजही दिसून येतो. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही तेथील समाजजीवनात कट्टर धार्मिकता रुजू शकलेली नाही.

अनन्त अवधुत's picture

15 Jan 2022 - 2:56 pm | अनन्त अवधुत

पण या सगळ्याचा उपयोग भारतातील राजकारणासाठी कोणाला करायचा असल्यास माझी हरकत नाही. :) त्यांनी लिहित जावे. कोणी खोडत जावे. आम्ही वाचत जाऊ. :))

+१

विजुभाऊ's picture

16 Jan 2022 - 1:50 am | विजुभाऊ

कझाकस्तान ची इरीगेशन आणि पर्यावरण शेती सिस्टीम चे रशियाकृपेने अगोदरच वाट लागलेली आहे.
तिथल्या नद्यांवर धरणे बांधुन त्यांचे पाणी समुद्राला मिलु दिले नाही. समुद्र आटले.
आता पाऊसही पडायचा बंद झालाय
भारतात ही परिस्थिती कधीच असणार नाही

Trump's picture

16 Jan 2022 - 7:45 pm | Trump

नमस्कार भाउ.

कझाकस्तान ची इरीगेशन आणि पर्यावरण शेती सिस्टीम चे रशियाकृपेने अगोदरच वाट लागलेली आहे.

सविस्कर लिहीता का?

पराग१२२६३'s picture

15 Jan 2022 - 2:57 pm | पराग१२२६३
शाम भागवत's picture

15 Jan 2022 - 5:02 pm | शाम भागवत

हा एक आठ मिनिटांचा चांगला व्हिडीओ आहे.

मराठीत कझागिस्तानच्या आत्ताच्या उठावाबद्दल माहीती दिलेली आहे. भारतीय राजकारणाबद्दल काही त्यात नसल्याने सगळ्यांना पहायला आवडेल. भरपूर माहीती दिलेली आहे. चीन, रशिया व अमेरिका यांचे हितसंबंध तसेच अफगाणिस्तानच्या संदर्भात कझाखचे महत्व वगैरे चांगले समजावून सांगितले आहे.

ज्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबत उत्सुकता असेल त्यांनी जरूर पहावा.

बोलघेवडा's picture

15 Jan 2022 - 6:12 pm | बोलघेवडा

इथे काही लोक सतत एक विशीष्ट अजेंडा घेऊन वावरत असतात. जरा खुट्ट झाले की देशात अशांतता, अराजकता माजेल, यादवी युद्ध होईल, लोक रस्त्यावर यावीत, दंगली व्हाव्यात अशीच यांची इच्छा असते. मुद्दामूनच अस नरेटिव्ह सेट करायचं प्रयत्न करतात की आता परिस्थिती हाताबाहेर जात आणि कधीही भडका उडेल.

पण प्रत्यक्षात असा भडक उडत नसल्याने ही लोक नाराज होऊन मिळेल तिथे आगीत तेल ओतत असतात.

संपादक मंडळाने कृपया अश्या सभासदांकडे लक्ष द्यावे आणि योग्य ती समज द्यावी. सरकार कोणतेही असो, पंतप्रधान कोणीही असो या सर्व पदांचा योग्य तो मान राखला जावा.

शाम भागवत's picture

15 Jan 2022 - 6:22 pm | शाम भागवत

अहो, याच लोकांमुळे मला खूप महत्वाची माहिती आत्तापर्यंत मिळाली आहे. ते लिहितात व काही खोडतात, आपण फक्त माहिती मिळवत राहायची.
अगदी आत्ताचं उदाहरण द्यायचे तर, महागाईचा विषय निघाला. लागलीच कोणितरी चार्ट टाकला. सगळं कसं आयतं मिळते. :)

काटे नसलेला गुलाब शोधायचा प्रयत्न करण्याऐवजी, हाताला काटे न बोचता हातात गुलाबाचे फूल हातानेपकडण्याची कला शिकणे फायद्याचे असते. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2022 - 6:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोन्ही बाजूने माहिती यायला लागली की खरी स्थिती समजायला कठीण जाते. आपण गूगल आणि प्रत्यक्ष माहिती घेऊन विश्वास ठेवायचा. हल्ली खोटी माहिती इतकी ढकलल्या जाते की ती माहिती खरी वाटायला लागते. आजकाल तर खोटी माहितीचा भरणा खुप वाढलाय.

काका महागाईच्या बाबतीत हा पण लेख वाचून घ्या...!

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

15 Jan 2022 - 6:59 pm | कंजूस

दोन्ही बाजूने माहिती यायला लागली की खरी स्थिती समजायला कठीण जाते.

आपण जो पहिला लेख वाचतो तेच बरोबर वाटते. नंतर दुसरे विरोधी येतात.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

15 Jan 2022 - 8:23 pm | रावसाहेब चिंगभूतकर

लोकसत्ताचा लेख बहुधा मूळ क्विंट किंवा प्रिंट वरून कॉपी केलेला आहे. मी मूळ लेख वाचलेला आहे आणि मला त्या वेळी ही याचं आश्चर्य वाटलं होतं की अशा प्रकारे डेटा चं सेलेक्टिव्ह रिडींग कसं केलं जातं. उदाहरणार्थ १. या लेखातली काही वाक्ये:

जुलै २०२१ नंतरचा महागाईने गाठलेला हा सर्वोच्च स्तर.

काळजीपूर्वक न वाचणारा जुलै 2021 वाचणारच नाही.
२. दुसरी गोष्ट
होलसेल प्राईस इंडेक्स हा 12 वर्षात सर्वोच्च आहे हे खरे, पण जर मुळात त्याचे बेस इयर 2012 आहे तर त्या आधीची वर्षे का गृहीत धरलेयत? शिवाय हा इंडेक्स मोदी सरकार येण्या आधी किती होता? तो काही 5 च्या खाली वगैरे नव्हताच.
Wpi
३. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की सामान्य जनतेला झळ होलसेल प्राईस इंडेक्स ची नव्हे तर कन्झ्युमर प्राईस इंडेक्स ची बसते. आणि त्याच्यावर सगळ्यात महत्वाचा परिणाम करणारा घटक म्हणजे तेलाच्या दरात होणाऱ्या वाढीने खाद्यपदार्थांच्यात होणारी वाढ. पण तो 5 महिन्यात सर्वोच्च आहे, आतापर्यंत चा सर्वोच्च नव्हे.
४. शेवटची गोष्ट. महागाई वाईट असते ही चुकीची धारणा का केली जातेय? जर बाकी सगळ्यांच्या किमती वाढतायत, जर तुमच्या नोकरीच्या ठिकाणी मिळणाऱ्या पगारात वाढ होतेय, जर इकॉनॉमी वरच्या दिशेने सरकतेय, जर मार्केट ओपन होऊन डिमांड जनरेट होतेय तर किमती वाढणे मुळीच आश्चर्यकारक नाही. उलट किमती वाढल्या नाहीत तर ती चिंतेची गोष्ट असेल.

नोकरीच्या ठिकाणी मिळणाऱ्या पगारात वाढ होतेय
असं कसं रावसाहेब . . पगारवाढ तर व्हायलाच हवी. तो हक्क आहे आमचा. बाकी डिझेल / पेट्रोल मात्र २० वर्षापुर्वीच्या भावात मिळायला हवे. षेठ काय फक्त विमानात फिरायला निवडुन आलेत काय.

एक ते अजुन शेठ ने करोडो रुपायचे विमान / गाडी घेतली विकत फिरायला. किती शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाले असते त्या पैशात. म्हणुन आम्हाला पप्पु जास्त चांगला पंप्र होईल असे वाटते ...

सर टोबी's picture

15 Jan 2022 - 8:41 pm | सर टोबी

काही गफलत होतीय का? तो आलेख २०१२ च्या तुलनेत महागाई कमी झालीय असा वाचला तर तुम्ही म्हणता तसा समज होण्याची शक्यता आहे. तो आलेख महागाईचा दर दर्शवत आहे आणि तो जरी कमी वाटत असला तरी सध्याची ५% हून जास्त असलेली महागाई ही संकलित स्वरूपात वाढलेली आहे.

महागाईची झळ व्यक्ती सापेक्ष असू शकते पण ती नाहीच असे म्हणणे म्हणजे जरा जास्तीच प्रेम उतू जातंय ना?

रावसाहेब चिंगभूतकर's picture

15 Jan 2022 - 10:44 pm | रावसाहेब चिंगभूतकर

हा प्रतिसाद मी टाकलेल्या ग्राफ्स वर होता असे समजून उत्तर देतोय. महागाई हा आधीच्या वर्षात (किंवा क्वार्टर मध्ये) असणाऱ्या किमतीमधली वाढ दर्शवते. दोन प्रकारचे महागाईचे निर्देशांक असतात. होलसेल प्राईस इंडेक्स (wpi) आणि कन्झ्युमर प्राईस इंडेक्स (cpi). महागाई कायमच असते. ती तशी असते याचा अर्थ बाजारात डिमांड आहे आणि सप्लाय पेक्षा डिमांड जास्त आहे. जर वस्तुंच्या किमती खाली येत असतील तर याचा अर्थ लोक वस्तू खरेदी करत नाहीयेत (कारण बहुधा त्यांची वस्तू खरेदी करण्याची कॅपॅसिटी संपलीय) असा होतो. इकॉनॉमि वाढत असेल तर महागाई असणारच. सरकारपुढचे मूळ ध्येय महागाईवर ताबा ठेवणे हे असते, महागाई संपवणे नव्हे. सरकारला खास करून CPI वर ताबा ठेवण्यात रस असतो कारण ही महागाई सामान्य जनतेशी संबंधित गोष्टींची असते. महागाई बऱ्याच गोष्टींनी वाढू शकते उदाहरणार्थ खाद्यपदार्थांची महागाई ही पेट्रोल, खते, शेतमजुरी, दुष्काळ, एक्स्पोर्ट अशा अनेक गोष्टींशी संबंधित असू शकते. पण किती % म्हणजे वाईट हे आपल्याला चार्ट वरूनच समजेल. आपण जर 2012 पासून चा एव्हरेज काढलं तर त्याच्या आसपास असणारी महागाई म्हणजे फारसे काळजीचे कारण नाही असे मला वाटते. बाकी या ठिकाणी एक अतिशय महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. जर महागाई (उदाहरणार्थ) डाळींमुळे आणि तेलामुळे वाढत असेल तर सरकारने त्याच्या एक्स्पोर्ट वर बंदी घातली आणि त्याची आयात वाढवली तर ते शेतकरी, व्यापारी आणि त्यांच्या प्रतिनिधींना चालेल का? माझ्या मते मग विरुद्ध बाजूने ओरडा सुरू होईल की सरकार शेतकरी विरोधी आहे. जर महागाई एका लिमिट च्या वर गेली तर मात्र सरकार नक्कीच ही हत्यारे वापरेल. सरकारचे या नंबर्स वर लक्ष असणारच आणि त्यांनी ते केलेले नाही याचा अर्थ हे नंबर्स त्यांना फारशी काळजी करण्यासारखे वाटत नाहीत. कुणी तरी परवा ऑपशन्स आणि futures बद्दल डिस्कशन केलं होतं. सरकारने या सारख्या डेरिव्हेटिव्हज आणि त्यांच्या किमतीवर पडणाऱ्या परिणामाबद्दल चिंतीत होऊनच कदाचित त्यावर बंदी आणली असू शकेल. जस्ट या थॉट.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jan 2022 - 10:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महागाईची झळ व्यक्ती सापेक्ष

महागाईची झळ हल्ली पक्षीय सापेक्ष झालेली आहे. पूर्वीच्या सरकारात असलेली झळ प्रचंड महागाई होती आणि आताची महागाई ही एवढी तेवढी असते. आपला मूळ प्रश्न असा आहे की लोक महागाईचा निषेध करायला रस्त्यावर आले पाहिजेत, बोलले पाहिजेत. स्मृती इराणी या जशा महागाईविरोधात रस्त्यावर येऊन आंदोलन करायच्या तसे नेतृत्त्व आणि तसे वातावरण झाले पाहिजे तर सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करेल.

काल म्हणजे १४/०१/२०२२ तारखेला भारत सरकारच्या ऑफिस ऑफ दी एकोनॉमिक अ‍ॅडव्हायजरच्या सायटीवर वेगवेगळा डेटा तिथे प्रसिद्ध केला आहे. आपला प्रश्न ग्राहक किंमत निर्देशांकाशी संबंधित आहे, किरकोळ स्वरुपाच्या जो व्यवहार ज्या किंमतीवर होतो त्या किंमतीवरुन हा निर्देशांक जाहीर होत असतो. ग्राहकोपयोगी वस्तूंचे दर सतत वाढत आहेत त्यामुळे महागाई वाढतच आहे, आणि ती पुढेही वाढत राहील. त्यावर सध्या तरी नियंत्रण नाही असेच दिसते.

-दिलीप बिरुटे

शाम भागवत's picture

16 Jan 2022 - 12:51 pm | शाम भागवत

याचे दोन अर्थ होतात.
१) महागाई वाढलीय असं विरोधकांना वाटत असलं तरी सामान्यजनांना तसं वाटतं नाहीये. त्यामुळे आंदोनलन होत नाही आहेत.
किंवा
२) महागाई वाढतीय, लोकक्षोभही आहे पण विरोधी पक्ष त्यातून प्रभावी जनआंदोलन उभारण्यात कमी पडताहेत. त्यांना विरोधकांची भूमिका नीट निभावता येत नाहीये.
उलट पूर्वीचे विरोधक (स्मृती इराणी वगैरे) मात्र विरोधकांची भूमीका अंत्यंत उत्तम रितीने पार पाडत होते. ;))

स्वातंत्र्य मिळाल्या नंतर, 77-78 पर्यंत, सलग 30 वर्षे, कॉंग्रेस कडेच सत्ता होती

मग, तेंव्हा का नाही उपाय योजना केली?

कॉंग्रेसने फक्त आर्थिकच नाही तर संरक्षणाची पण हेळसांड करून ठेवली.

कॉंग्रेस, आता कुठल्या तोंडाने विरोध करणार?

पन्नास रूपये किलो कांदा, कांग्रेसच्याच राजवटीत होता.

सध्याच्या काळांत, भाजप शिवाय, इतर कुठल्याही पक्षांत, विश्र्वासार्ह नेता नाही.

हवं असेल तर, हुकुमदेव नारायण यादव, यांची लोकसभेतील भाषणे आणि परमपूज्य राहुल गांधी, यांची लोकसभेतील भाषणे, यांची तुलना करून बघा....

एकटा, हुकुमदेवच, कॉंग्रेसला पुरून उरतो ...

घराणेशाही लादली की काय होते? याचे सध्याच्या काळांत, उत्तम उदाहरण म्हणजे, कॉंग्रेस.... ऐतिहासिक उदाहरणे म्हणजे, दुसरा बाजीराव, वाकाटक साम्राज्य, राष्ट्रकूट साम्राज्य, नंद साम्राज्य...

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Jan 2022 - 2:33 pm | अमरेंद्र बाहुबली

घराणेशाही लादली की काय होते? याचे सध्याच्या काळांत, उत्तम उदाहरण म्हणजे, कॉंग्रेस.... ऐतिहासिक उदाहरणे म्हणजे, दुसरा बाजीराव, वाकाटक साम्राज्य, राष्ट्रकूट साम्राज्य, नंद साम्राज्य...
महाराष्ट्र भाजप?? फडणवीसांच्या काकू मंत्री नी वडील आमदार होते.

मुक्त विहारि's picture

16 Jan 2022 - 6:56 pm | मुक्त विहारि

बर्र

सर टोबी's picture

16 Jan 2022 - 5:22 pm | सर टोबी

बोलायचं नव्हतं पण वेळ आणतात हे भक्त. श्रीनगर, उरी, पठाणकोट इथे थेट लष्करी तळावर झालेले हल्ले काय दर्शवतात?

सुखीमाणूस's picture

16 Jan 2022 - 6:41 pm | सुखीमाणूस

मोदि सत्तेवर आल्यामुळे जिहादी कारवाया थाम्बल्या आहेत. मुम्बै शान्त आहे.
लष्कर नक्कीच जास्त सुसज्ज होते आहे.
कौन्ग्रेस् ने केवळ सत्तेवर रहाण्यासाठी ज्या तडजोडी केल्या आहेत आणि त्यामुळे जी अर्थिक आणि सामाजिक दरी निर्माण झाली आहे ती भरुन काढायला खुप वर्ष जातील.

मुक्त विहारि's picture

16 Jan 2022 - 6:58 pm | मुक्त विहारि

"कौन्ग्रेस् ने केवळ सत्तेवर रहाण्यासाठी ज्या तडजोडी केल्या आहेत आणि त्यामुळे जी अर्थिक आणि सामाजिक दरी निर्माण झाली आहे ती भरुन काढायला खुप वर्ष जातील."

सहमत आहे

अनन्त अवधुत's picture

17 Jan 2022 - 6:26 am | अनन्त अवधुत

विसरता येण्याजोगे २ वाक्य आठवले.
जुलै २०११ मध्ये मुंबईत रेल्वे बाँबस्फोट झाले होते त्यावर तत्कालीन केंद्रिय गृहमंत्री चिदंबरम म्हणाले होते,

"एकतीस महिन्यांनी अशी घटना घडली आहे."

जणू काही असे हल्ले हे नैसर्गिक आहेत, आणि इतक्या कालावधी नंतर घडल्याने सामान्य जनतेने वाईट वाटून न घेता पुढील हल्ल्याची वाट पहा. असेच त्यांना सांगायचे होते.

अर्थात ह्या ३१ महिन्यात मुंबई जवळील पुणे येथे हल्ला झाला हे सांगायला ते विसरले नाहित.

तपशिल हवे असल्यास बातमी

मुंबई हल्ल्यावर (२००८) 'बडे शहरो मे शहरो छोटे हादसे होते रहते है' हा अशाच प्रतिक्रियेचा नमुना. ही प्रतिक्रिया आबां कडुन आली होती. जनरेट्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला गेला.

ही काँग्रेस आणि त्यांच्या बगलबच्च्यांची अंतर्गत सुरक्षेची प्रायोरिटी.

भारतात असल्या मुळे आणि संपूर्ण दक्षिण भारत, दिल्ली,पंजाब आणि महाराष्ट्र सारख्या राज्यात विकास ला चालना देणारी राज्य सरकार असल्या मुळे भारताची अर्थ व्यवस्था सांभाळली जाते.
आणि आणि ह्या राज्यात राहणारी लोक समाधानी असल्या मुळे विरोधी चळवळी होत नाहीत.
केंद्रीय सरकार च्या निर्णयाचा परिणाम होतो पण ही राज्य सरकार सक्षम आहेत त्या संकटावर मात करण्यासाठी.

शाम भागवत's picture

16 Jan 2022 - 12:54 pm | शाम भागवत

धाग्याचा विषय नक्की काय आहे? ;)))

मुक्त विहारि's picture

16 Jan 2022 - 1:53 pm | मुक्त विहारि

धाग्याचे काश्मीर होणे, ही इथे परंपरा आहे.

चर्चा करतांना, विषयांतर होतेच.

भाषा सुयोग्य असणे, इतकीच माफक अपेक्षा असते...

चंद्रसूर्यकुमार's picture

16 Jan 2022 - 2:49 pm | चंद्रसूर्यकुमार

इथे असे एकेक रथी महारथी आहेत की धाग्याचा विषय कझाकस्तान नसता आणि बुर्किना फासो असता तरी त्यांनी ती चर्चा त्याच दिशेला नेली असती- तो देश कुठे आहे हे जसे मला माहित नाही तसे त्यांना माहीत नसते तरी :)

रंगीला रतन's picture

16 Jan 2022 - 4:04 pm | रंगीला रतन

विषयावरून आठवले
घोड्यांचे भाव काय आहेत हो हल्ली?

https://www.google.com/amp/s/www.tv9marathi.com/maharashtra/other-distri...

आजकाल, गुगलबाबाला विचारले की उत्तरे मिळतात...

कर्नलतपस्वी's picture

16 Jan 2022 - 6:39 pm | कर्नलतपस्वी

प्रतिसाद आवडला आणी सहमत आहे.
पेट्रोल महाग झाले म्हणून सायकलींची संख्या वाढली नाही किंवा रस्त्यावर वहातुक कोंडी संपली नाही.

सुबोध खरे's picture

20 Jan 2022 - 7:50 pm | सुबोध खरे

१० वर्षांपूर्वी आपला पगार किती होता आणि पेट्रोलचा भाव किती होता?

त्याचे गुणोत्तर काढा आणि तुलना करा.

पगार तेवढाच राहिला आहे का ?

बाकी काही जणांना रोज श्री मोदी याना दूषणे दिली नाहीत तर अन्न पचन होत नाही त्यांच्याबद्दल सहानुभूती.

बाकी चालू द्या

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Jan 2022 - 9:59 pm | अमरेंद्र बाहुबली

असे “गणीतं” काॅंग्रेस राजवटीत सुचले नाहीत. तेव्हा तर २००४ नी २०१४ चे आकडे तोंडावर फेकून मारले जायचे. किती त्या कोलांटऊड्या?

मांडलंय साहेब, त्या वेळच्या महागाई वैगरे ला नाही पण सरकारच्या एकंदरीत चाललेल्या भोंगळ कारभार बघून विरोध केला होता.

सुबोध खरे's picture

21 Jan 2022 - 9:49 am | सुबोध खरे

काही जणांना रोज श्री मोदी याना दूषणे दिली नाहीत तर अन्न पचन होत नाही त्यांच्याबद्दल सहानुभूती.

sunil kachure's picture

20 Jan 2022 - 10:23 pm | sunil kachure

सरकारी नोकर ,आणि काहीच खासगी कंपनी मधील काहीच लोकांचा.
बाकी सर्व ठिकाणी पगार कमी होत गेलेत.
कित्येक क्षेत्रात पगार वाढ हा प्रकार च नसतो.
आज पण आठ दहा हजारांत करोडो लोक महिनाभर काम करतात.
त्यांच्या कडे कोणाचे लक्ष नाही.
आज पण टोमॅटो लं दोन रुपये किलो भाव मिळतो.
कसले पगार वाढ आणि महागाई ह्यांचा संबंध जोडत आहात .
ठराविक दोन टक्के लोकांना समोर ठेवून.

सुबोध खरे's picture

21 Jan 2022 - 9:54 am | सुबोध खरे

मोगा खान

तुम्ही कंत्राटी कामगार आहात त्याला कोण काय करणार?

बाकी प्राध्यापक वगैरे मंडळींसाठी हा प्रतिसाद होता ज्यांना दर वर्षी महागाई भत्ता वाढत जातो आणि १० वर्षांनी वेतन आयोग मिळतो आणि निवृत्त झाल्यावर निवृत्ती वेतन मिळते.

पण तरीही रडारड चालूच असते.

लिओ's picture

20 Jan 2022 - 10:55 pm | लिओ
लिओ's picture

20 Jan 2022 - 10:56 pm | लिओ
लिओ's picture

20 Jan 2022 - 10:57 pm | लिओ
लिओ's picture

20 Jan 2022 - 10:58 pm | लिओ
निनाद's picture

21 Jan 2022 - 5:23 am | निनाद

झानाओझेनमधील आंदोलकांवर कारवाई झाली आणि सगळीकडे आंदोलन पसरले. पण इतक्या वेगाने हे घडले म्हणजे हे नियोजित कारस्थान होते का?
अज्ञात संख्येने परदेशी भाडोत्री देखील जमावाचा भाग होते असा अंदाज आहे. अशा प्रकारची व्यापक चळवळ एका दिवसात निर्माण होत नाही.
आणि हा विरोध वणव्यासारखा पसरण्याची कारणे निराळी होती आणि असावीत. लोकांअ असलेल्या असंतोषाचा फायदा घेण्याचा हा प्रयत्न आहे असे दिसते आहे.

जगातील युरेनियम साठ्यांपैकी ४० टक्क्यांहून अधिक आणि या शिवाय तेलाचे मोठे साठे कझाकस्तानच्या मालकीचे आहेत. नैसर्गिक वायूच्या साठ्याच्या संदर्भात कझाकस्तान पहिल्या १५ देशांमध्ये मोडतो.
आता असा विचार करायचा की कझाकस्तान सरकार बदलले असता कुणाचा फायदा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष्पणे होणार आहे? असा विचार ठेऊन नेटवर शोधले तर याचे धागे दोरे मिळू शकतील.

मात्र हे करतांना नेहमीचे प्रपोगंडा वेबसाईटस nytimes.com, wsj.com, cnn.com, aljazeera.com, ndtv.com, theguardian.com, theguardian.com वगैरे बाजूला ठेवायच्या. यांच्या सगळ्या लेखांचा सूर एकसारखा आहे - असतो. या पोपड्या खाली काही वेगळे प्रवाह दिसतात का ते शोधायचे.

सुबोध खरे's picture

21 Jan 2022 - 9:56 am | सुबोध खरे

कसं बोललात?

चंद्रसूर्यकुमार's picture

21 Jan 2022 - 10:17 am | चंद्रसूर्यकुमार

हा धागा कझाकस्तानविषयी आहे याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद :)

बाकी इथे कझाकस्तानविषयी फार कोणाला काही माहित आहे असे वाटत नाही. निदान मला तरी नाही. पण अगदी कझाकी लोकांना त्यांच्याविषयी माहिती आहे त्यापेक्षा जास्त माहिती इथल्या काही सदस्यांना असती तरी त्या सदस्यांनी चर्चा वेगळ्याच दिशेने नेली असती याची मात्र खात्री आहे :)

निनाद's picture

21 Jan 2022 - 12:58 pm | निनाद

माझ्या मते हे बंड चीन विरुद्ध रशिया अश्या स्वरुपाचे होते. सोवियेत रशिया आणि चीन या दोन देशात परंपरागत सीमा संघर्ष आहे. आता तो संघर्ष कझाख आणि चीन असा असू शकतो.

चीनी देशांतर्गत ऊर्जेच्या गरजा झपाट्याने वाढवल्यामुळे, चीनने कझाकस्तानमध्ये ऊर्जा उद्योगांचा करण्यात आघाडीची भूमिका घेतली आहे.
या लक्षात घेणे आवश्यक आहे की, चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशन ने पूर्वीची सोव्हिएत युनियनची सर्वात मोठी स्वतंत्र तेल कंपनी पेट्रोकझाकस्तान सुमारे चार बिलियन डॉलर्सला विकत घेतली आहे. आणखी पैसे तेल चीनच्या सीमेपर्यंत नेणाऱ्या पाइपलाइनवर खर्च केले आहेत. चिनची पेट्रोकझाकस्तान ही आतापर्यंतची सर्वात मोठी विदेशी खरेदी होती. २०१६ पर्यंत, चिनी कंपन्यांनी (उदा. चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशन, सिनोपेक आणि इतर) कझाकस्तानच्या पेट्रोलियम क्षेत्रात २० अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. सन २००० पासून कझाकस्तानमध्ये चिनी स्थलांतरितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. इतके पैसे खर्च झाल्यावर जर देश त्यांच्या धोरणाप्रमाणे वागत नसेल तर अध्यक्ष बदलणे हा सोपा मार्ग आहे.

अर्थात या सगळ्यात तेल हातातून गेल्यामुळे रशिया अस्वस्थ होऊ शकतो. लक्ष्यात घ्या की बंड रशियाच्या मदतीने चिरडले आहे. सोव्हिएत युनियनने उइघुर राष्ट्रवादी प्रचार आणि चीन विरुद्ध उईघुर फुटीरतावादी चळवळींना पाठिंबा दिला होता. आताची परिस्थिती नक्की काय ते कळले नाही.

याचा तिसरा भाग म्हणजे या प्रदेशात अमेरिकेच्या प्रभावाची वाढ आणि कझाकस्तानमध्ये अमेरिकन हवाई तळांची संभाव्य स्थापना रोखण्याचेही चीनचे उद्दिष्ट आहे .

या बंडात भारत कुठे आहे याची मात्र पुसटशी खूण ही दिसत नाही!

कुरमंगझी तेल क्षेत्रात इक्विटी मिळवण्यात भारत अयशस्वी ठरला आहे. पण कझाक राष्ट्रीय फर्म KazmunayGaz ने ONGC ला सतपायेव आणि मखमबेट फील्डमधील ऑफर दिली आणि अटीराऊ आणि अख्ताऊ प्रदेशातील पेट्रोकेमिकल औद्योगिक प्रकल्पांमध्ये भारताच्या सहभागाची मागणी केली आहे.
याचे पुढे काय झाले हे कळत नाही.

तज्ञ लोकांनी यावर अजून लिहावे ही विनंती!

sunil kachure's picture

21 Jan 2022 - 1:06 pm | sunil kachure

लोकांना त्या देशा विषयी काहीच माहिती नाही तर त्या देशावरील धागा इथे का?
आणि तो पण मराठी मध्ये.
भारतात वाढलेली भयंकर महागाई,अर्थव्यवस्था चे वाजलेले बारा.
शेतकरी पासून सर्व कष्ट करी वर्ग त्रस्त आहे
खासगी नोकरदार त्रस्त आहे.,na आवडते उद्योग पती,त्रस्त आहेत.
आणि ही लोक विरोध करतात.त्यांची सहन क्षमता संपली आहे
म्हणून काही तरी उदाहरणे देवून ज्या देशा चा भारताचा संबंध नाही
तिथे महागाई विरोधी आंदोलन परकीय देश करत आहेत
हा प्रचार करायचा .
ह्याचा लपलेला अर्थ भारतात जी आर्थिक अनागोंदी आहे लोक त्रस्त आहेत विरोध करत आहेत
त्या लोकांच्या मागे परकीय शक्ती आहेत
म्हणजे त्या पण मुस्लिम परकीय शक्ती.
हेच सुचवण्यासाठी हा धागा आहे
लोक इतकी मूर्ख आहेत का की त्यांना काहीच कळत नाही हा गैर समाज मनातून काढून टाका.
Bjp समर्थक देश भर विनोद निर्मिती चे मटेरियल बनले आहेत हे अजून त्यांच्या लक्षात येत नाही.
अंध नाही तर बहिरे पण आहेत ही लोक.

काही सदस्यांच्या कॉमेंट्स फिल्टर करायची सोय आहे का हो? वाचनाच्या ओघामध्ये आधी कॉमेंट वाचून मग वेळ वाया गेल्याचा पश्र्चाताप होतो, अन् विषयाचा बोऱ्या वाजला जातो

कर्नलतपस्वी's picture

24 Jan 2022 - 8:57 am | कर्नलतपस्वी

बादरायण संबध जोडायचा, वडाची साल पिपंळाला लावायची आणी आपले मत मांडायचे. जणू काही शपथ घेतल्या सारखे. तुम्ही काही लिहा आम्ही धाग्याचे काश्मीर करू.

क्रय शक्ती वाढली आहे, झोपडीत ला वन बीएचके मधे राहातोय, सायकल वरचा फटफटी चालवतो. मोबाईल कुणाकडे नाही हे शोधावे लागतेय, पेट्रोल महाग झाले तरी रस्तय्आ वरची कोंडी संपत नाही.

अशांतता कुठेही चालू असूदे, त्याचा परिणाम आपल्या देशावर होणार तर नाही या करता अवलोकन करणे जरूरी आसते.

सुबोध खरे's picture

22 Jan 2022 - 12:12 pm | सुबोध खरे

@ sunil kachure

मोगा खान

आपल्या भाजप द्वेषाच्या बद्ध कोष्ठाचा निचरा करण्यासाठी एक वेगळा धागा काढा कि.

कशाला कोणत्याही धाग्यात घाण करून ठेवताय?

कझाकस्तान हा देश भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. एके काळी रशियाची मोठी १४१० आणि अगणित लहान अण्वस्त्रे येथे होती

( भारताकडे १५६ आणि पाकिस्तान कडे १६५ अण्वस्त्रे आहेत)

आणि ती इस्लामी दहशतवाद्यांच्या हातात पडण्याच्या अगोदर रशियाने ती काढून घेतली होती हा इतिहास आपल्याला माहिती आहे का?

कझाकस्तानची ७२ टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे आणि सोव्हिएत युनियनच्या निधर्मी वादापासून फारकत घेतल्यावर तेथे इस्लामी पुरुज्जीवनवाद डोके वर काढू लागला आहे.

तुर्कस्तानचे उदाहरण पाहता या देशाकडची अण्वस्त्रे काढून घेतली गेली हि इस्रायल आणि भारतासाठी एक अतिशय चांगली गोष्ट आहे.

कझाकस्तानकडून आपण आतापर्यंत ९००० टन युरेनियम विकत घेतलेले आहे आणि अजून १००० टन घेण्याचा करार केलेला आहे.

हे युरेनियम आपल्या अणुऊर्जा प्रकल्पासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.

भारताचे ८० % युरेनियम कझाकस्तान कडून येते हे आपल्याला माहिती आहे का?

जिथे तिथे घाण करण्याच्या अगोदर अभ्यास वाढावा

.
१. नियमित मिपाकर्स नेहमीच प्रतिसाद देत नसले तरी ते प्रकाशित होणारे धागे आणि त्यावरचे प्रतिसाद / चर्चा सर्वसाधारणतः नेहमीच वाचत असतात.
२. मी एक नियमित मिपाकर आहे.

---

हा धागा मी सुरुवातीपासून ट्रॅक करत आहे; आंतरराष्ट्रीय घडामोडींत मला देखील रस आहे पण धाग्याच्या विषयावर काही प्रतिसाद देण्याइतका माझा अभ्यास नाही म्हणून आतापर्यंत इथे काही लिहिलं नाही. अभ्यासू सदस्यांकडून माहितीपूर्ण / विश्लेषक प्रतिसादांच्या अपेक्षेने, नवीन प्रतिसाद दिसले की हा धागा उघडून पाहतो आहे; पण एकूण प्रतिसादांच्या तुलनेत फारच थोडे काही हाती लागते आहे.

या धाग्यावरचे पहिले काही प्रतिसाद पाहून, "विषय काय आहे आणि आपण काय लिहितो आहोत याचा काहीतरी संबंध असायला हवा असं थोडंच आहे" असा विचार करणारेही मिपाकर्स आहेत हे पटायला लागते.

---

अवांतर: शरद पवार नामक वृत्तीचे लोक केवळ राजकारणीच असतात असे नाही, ते प्राध्यापक, डॉक्टर आणि अजूनही काही असू शकतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jan 2022 - 10:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हं तर कुठ पर्यंत आलो होतो आपण. वाढती महागाई आणि भारतीय नागरिकांच्या मनात असलेल्या अशांती बाबत. सामान्य माणूस महागाईने त्रस्त आहे, विरोधी पक्षाची समर्थ साथ नाही. कोणी कुठे त्याबाबत आंदोलन करीत नाही. कोणी कुठे विरोध करीतही असेल पण त्याच्या बातम्या येत नाही. सरकारी व्यवस्था असे विषय समोर येऊ देत नाही, सर्वच ठिकाणी त्याचं दमन होत आहे असे वाटते. वाढती महागाई ही सध्या भारतीयांची डोकेदुखी आहे. सहन करण्याशिवाय भारतीय जनतेकडे काही पर्याय नाही. सरकारच्या विरोधात सामान्य माणसाने रणशिंग फुंकणे गरजेचे आहे. वैचारिक ज्योत तेवत ठेवली पाहिजे. मोठ्या बदलांसाठी हे छोटे लढे उपयोगाचे ठरतात.

हं तर, ही महागाई अजून वाढेल की कसं ? पाच राज्यांच्या निवडणूका असल्यामुळे सध्या डिझेल-पेट्रोलचे दर फार वाढणार नाहीत पण निवड्णूका संपल्यावर पुन्हा येरे माझ्या मागल्या. डिझेल-पेट्रोलचे दर वाढले की इतरही महागाई वाढू लागते. साधारणतः मार्च एप्रीलमधे पेट्रोल प्रतिलिटर १२० ते १२५ रुपये होऊ शकते. ते कसं त्याची चर्चा करुया.

देशासाठी तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमती ६० डॉलरच्यावर जाणे हे धोकादायक असले तरी १९ जानेवारीला या किंमतींनी पिंपामागे ८८ डॉलरची सीमारेषा ओलांडली लवकरच हा दर १०० डॉलरवर जाऊ शकतो, एव्हाना आपण गलपटायला पाहिजे होतं. अर्थमंत्री सीतारामन हा विषय सोडून सर्व विषयावर बोलल्या. कारण विधानसभा निवडणुका पाहता या विषयावर सत्ताधा-यांना चर्चा नको असते. २०१३-१४ मधे शेठच्या आगमनास पोषक वातावरण ठरले त्याचं कारण आंतरराष्ट्रीय तेल पिंपाचे वाढलेले भाव जवळ जवळ १३५ हा दर होता आणि शेठला सत्तेसाठी ही महागाई उपयोगाची ठरली. भारतीय जनता सतत स्वप्नाच्या मागे असते, तेलाच्या किंमती कमी झाल्या तरी त्याचा उपयोग भारतीय जनतेला होईनासा झाला. (माहिती सोर्स अभ्यासू लेख वृत्तपत्र)

इंधन दर सरकारच्या नियंत्रणापासून पूर्णपणे मुक्त होऊनही आता साताठ वर्ष झाली. महागाई नियंत्रणात येत नाही. निवडणुक आल्या की तेल कंपन्या डिझेल-पेट्रोलचे दर स्थीर ठेवतात याचं आपल्याला कायम आश्चर्य वाटतं. अर्थात आपल्याला फटका बसू नये म्हणून सरकार अशी जादू करते हे सर्वसामान्यांना कळायला लागलेले आहे. बाकी दोस्त हो, एकदा निवडणुका संपल्या की पुन्हा महागाईचे स्वागत करायला तयार राहा. आपलं काम जनजागृतीचं. पटलंच पाहिजे असं काही नाही. आपली वाटचाल कझाकीस्तानसारखी होऊ नये असेही वाटते. आपल्याला शांतता प्रिय आहे, बाकी काय.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

24 Jan 2022 - 11:06 am | प्रचेतस

ओएनजीसी, इंडियन ऑईलमध्ये फ्युचर्स सौदे करावेत किंवा कसं?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jan 2022 - 11:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इश्क है तो रिस्क है. सध्या मार्केट लै बेभरवशाचं झालं आहे. आपल्या खिशातले पैसे मार्केटमधे चालले आहेत पण परतावा म्हणावा तसा येत नाही. पण सुरक्षित गुंतवणूक म्हणून ब्रँडेड मधे पैसे गुंतवणे हिताचे. आपण विचारलेल्या प्रश्नाबाबत काहीही सल्ला देऊ इच्छित नाही. रिस्क है शेठ. आपण आपल्या जवाबदारीवर रिस्क घ्यावी. आज पण मार्केट पडलेले आहे, पैसे है तो लगाओ. =))

अवांतर प्रतिसादाबद्दल धागा लेखकाची क्षमा मागतो. वेळ मिळाला की पुन्हा भारतीय महागाई, अलिप्त केंद्रसरकारआणि कझाकीस्थान या विषयावर मतं व्यक्त करीत राहीन, असा शब्द देतो.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

24 Jan 2022 - 11:42 am | प्रचेतस

काही सल्ला वगैरे द्या भो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jan 2022 - 11:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

IEX @ 240, SAIL @ 99, Real Estate @153., SBI @ 500

मित्रांनो, आमच्या दोघांच्या शे.बाजार प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा.
नादी लागू नका. भले भले मार्केटात लटकले आहेत.

-दिलीप बिरुटे

धर्मराजमुटके's picture

24 Jan 2022 - 8:23 pm | धर्मराजमुटके

आज बाजार तर पुर्ण झोपला.
यूक्रेन-रशियात कधीही युद्ध होण्याची शक्यता असल्यामुळे कदाचित अजून काही दिवस बाजार आपटेल असे वाटते मात्र ही अवस्था फार काळ राहणार नाही असे वाटते. आज ज्यांनी खरेदी घेतली ते थोडा संयम बाळगल्यास मालामाल होतील हे नक्की.
IEX तर मी २६० ला घेतला होता. पण वाट पाहणार. फळ नक्कीच चांगले येणार.

चौकस२१२'s picture

25 Jan 2022 - 6:14 am | चौकस२१२

सर्वच ठिकाणी त्याचं दमन होत आहे असे वाटते.
गेला बाजार अजूनही बरखा, रवीश , राजदीप, वागले , कुबेर इत्यादी मंडळी मोकळेचे आहेत पाहिजे ते लिहितात , बोलतात , कसलं दमन ?

वाढती महागाई ही सध्या भारतीयांची डोकेदुखी आहे.
जणू या आधी नव्हातीच? पूर्वी सिंग साहेब, राव साहेब, राजीव राजपुत्र , इंदिरा अम्मा आणि चाचा हे रोज हवन करून सोन्याचा धूर काढीत होते नाही का ( हवन हे हिंदू संस्कृतीतील असल्यामुळे बोचले असेल पण राजपौत्र राहुलचा आजकाल जनेउ जनेउ करीत उड्या मारीत असतो किँग्रेस काहे भागिवकरण झाले असे गृहीत धर!)

सहन करण्याशिवाय भारतीय जनतेकडे काही पर्याय नाही.
का हो? निवडणूक आहेत अजून उडवाकी फॅसिष्ठांना .. लोकशाही नामक टायगर अभि जिंदा है

विरोधी पक्षाची समर्थ साथ नाही.
का बांगड्या भरल्या कि काय त्यांनी ? बर ७५ सारखे तुरुंगात हि नाहीत .. मोकळे आहेत, बंगाल आणि महाराष्ट्रात सत्तेत हि आहेत कि ! करा कि म्हणावं अजून एक क्रांती ! करा फॅशिष्टांचा सुपडा साफ ... चालो बारामती ते दिली व्हाया लखनौ आणि कोलकत्ता !

सरकारच्या विरोधात सामान्य माणसाने रणशिंग फुंकणे गरजेचे आहे.
आता काय शिंगात कि फुकणारी जनतेला हवेचे कॉम्प्रेसर मिळण्याची वाट बघताय !

क्षमा करा मंडळी पण आता या " लोकशाही , सगळी मुस्कटदाबी ..." या कांगावा करनार्यांचा कंटाळला आलाय
लोकशाही ने निवडून दिलेल्या सरकार चा साधा मान ठेव्हाण्याची दानत नाही यांच्याकडे !
सतत एकांगी रडकी टिका .. ती सुधाच कढई कधी इतकी चुकीची , जगात पेट्रोल चे भाव वाढलेत एकटे भारतात नाही तरी कांगावा एकट्या भारतात आणि ते सुद्धा या भाजप सरकार मुळे वाढलेत !

वामन देशमुख's picture

25 Jan 2022 - 9:07 am | वामन देशमुख

या " लोकशाही , सगळी मुस्कटदाबी ..." या कांगावा करनार्यांचा कंटाळला आलाय
लोकशाही ने निवडून दिलेल्या सरकार चा साधा मान ठेव्हाण्याची दानत नाही यांच्याकडे !

शतशः सहमत!

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jan 2022 - 12:03 pm | अमरेंद्र बाहुबली

लोकशाही ने निवडून दिलेल्या सरकार चा साधा मान ठेव्हाण्याची दानत नाही यांच्याकडे !
७० वर्षे हुकूमशाही होती का? ते ही लोकशाहीनेच जिंकले ना? त्यांचा मान न ठेवनार्यांच्या दानत बद्दल काय?

चौकस२१२'s picture

25 Jan 2022 - 12:12 pm | चौकस२१२

काय मान नाही ठेवला त्यानचा ?
उठाव करून नाही आली भाजप सत्तेवर कि आणीबाणी जाहीर करून ? लोकशाही मार्गाने आली
सुरवातीची देश उभारणीची कामे काँग्रेस ने केली हे मान्यच आहे कि
पण पुढे एक घराणे अन फक्त आम्हीच राज करणार या काँग्रेसी नीती वर जनता वैतागली

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jan 2022 - 1:55 pm | अमरेंद्र बाहुबली

सुरवातीची देश उभारणीची कामे काँग्रेस ने केली हे मान्यच आहे कि

मग देश ऊभारणी करनारे चांगले की सध्याचे महागाई वाढवून देशाचे नूकसान करनारे चांगले?

चौकस२१२'s picture

25 Jan 2022 - 3:10 pm | चौकस२१२

तुम्ही आव आणताय कि महागाई गेल्या ७ वर्षात झाली !
काय वाटेल ते ...
मागील वर्षी मिपावर एक सध्या प्रयोगाने मी दाखवून दिले कि पेट्रोल चे दर अनेक देशात वाढले आहेत ..फक्त भारतात नाही त्यावर तुमच्यासारखे मंडळी गप्प!

वामन देशमुख's picture

25 Jan 2022 - 2:09 pm | वामन देशमुख

सुरवातीची देश उभारणीची कामे काँग्रेस ने केली

खरंतर, "सुरुवातीची अनेक वर्षे काँगेसची सत्ता असूनदेखील देश उभारणीची कामे झाली" असं म्हणावं लागेल.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jan 2022 - 11:25 pm | अमरेंद्र बाहुबली

नावडतीचे मिठ अळणी.

वामन देशमुख's picture

26 Jan 2022 - 6:56 am | वामन देशमुख

नावडतीचे मिठ अळणी.

Same to you!
---

बाकी, आमचं आवडतं-नावडतं असं काही नाही हो; केवळ देशप्रेम व धर्मप्रेम, दुसरं काही नाही; जय माहिष्मती!

---

जय हिंद! 🇮🇳

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jan 2022 - 10:04 am | अमरेंद्र बाहुबली

त्याला पक्षप्रेम म्हणतात. देशप्रेम नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jan 2022 - 2:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देशप्रेम आणि संविधान प्रेम असे पाहिजे. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

रात्रीचे चांदणे's picture

25 Jan 2022 - 1:17 pm | रात्रीचे चांदणे

महागाई नक्कीच वाढलेली आहे आणि सामान्य जनतेला त्याचा नक्कीच त्रास होत आहे, तरीपण आंदोलन वगैरे होताना दिसत नाहीत कदाचित ही काही कारणे असतील.
1) साध्याला पायाभूत सुविधांमध्ये भरपूर कामे होताना दिसत आहेत, नवीन महामार्ग, मेट्रो इत्यादींची कामे भरपूर होताना दिसत आहेत त्यामुळेच जनतेला आपला पैसा योग्य ठिकाणी वापरला जातोय खात्री वाटतेय आणि म्हणूनच बरीचशी जनता शांत आहे.
2) हीच गोष्ट defence च्या बाबतीत, माझ्यासारख्या सामान्य लोकांसाठी सरंक्षण हा आवडीचा विषय असतो. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सरंक्षणसंबंधित बरीच मोठी कामे केली आहेत किंवा चालू आहेत. राफेल विमाने, S-400 ची डील नाहीतर भारत चीन सीमेवर वाढवलेल्या पायाभूत सुविधा ह्यात पैसा हा लागणारच.
3) भ्रष्टाचार: मोदी सरकार सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचार झालाच नाही असे कोणीही म्हणणार नाही परंतु झालाच असेल तर तो खालच्या पातळीवर आणि मोठ्या भ्रष्टाचाराचं एकही प्रकरण आणखीन तरी उघडकीस आलेलं नाही. हिंदू वर्तमानपत्राने राफेल प्रकरण भरपूर ताणून धरलं होत परंतु खुद्द सुप्रीम कोर्टानेच त्याच्यातली हवा काढून घेतली त्यामुळे सामान्य जनतेचा अजूनही मोदी सरकारवरती विश्वास आहे.
4) सध्याला भारतात अतिशय कमकुवत विरोधी पक्ष आहे, काँग्रेस अजूनही राहुल आणि प्रियांका गांधींना चिकटून बसलेली आहे. आणि लोकांचा ह्या दोघांवर आजीबतही विश्वास नाहीत्यामुळेच भाजप नाही तर कोण? ह्या प्रश्नाचं उत्तर जनतेजवळ नाही. त्यात भाजपात घराणेशाही तुलनेत कमी आहे त्यामुळेच सध्यातरी भाजपाच लोकांची पसंती असणार आहे.
परंतु समजा अशीच चढती महागाई राहिली आणि सध्यातरी अशक्य वाटणारा महाराष्ट्रासारखा प्रयोग देशपातळीवर झाला तर भाजपा समोर नक्कीच आव्हान उभे राहू शकते.

चौकस२१२'s picture

25 Jan 2022 - 3:11 pm | चौकस२१२

रात्रीचे चांदणे
सहमत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jan 2022 - 3:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>> महागाई नक्कीच वाढलेली आहे आणि सामान्य जनतेला त्याचा नक्कीच त्रास होत आहे,

आभारी आहे.

>>तरीपण आंदोलन वगैरे होताना दिसत नाहीत कदाचित ही काही कारणे असतील.

आपण जी कारणे सांगितली त्याबद्दलही चर्चा होऊ शकते पण लोक आता केंद्रसरकार आणि मोदींच्या धोरणांवर टीका करायला लागले आहेत.
बोलायला लागले आहेत. लोकांचे जगण्या-मरण्याचे प्रश्न कोणते आहेत आणि सरकार लोकांना कोणत्या प्रश्नांवर भूलवत आहेत त्याची जनतेला समज येत आहे. मला वाटतं सरकारच्या विरोधात स्वतः जनता रस्त्यावर येईल हे यातलं पहिलं पाऊल वाटत आहे.

>>> समजा अशीच चढती महागाई राहिली आणि सध्यातरी अशक्य वाटणारा महाराष्ट्रासारखा प्रयोग देशपातळीवर झाला तर भाजपा समोर नक्कीच आव्हान उभे राहू शकते.

जनतेची यानिमित्ताने महागाईच्या विळख्यातून सुटका होऊन आपण म्हणता तसे देशपातळीवर प्रयोग व्हावा, बाकी आपल्या तरी मनात दुसरं तरी काय आहे.

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

25 Jan 2022 - 6:55 pm | चौकस२१२

महाराष्ट्रासारखा प्रयोग देशपातळीवर झाला तर

प्रयोग? कि खेळ
१०० + ५२ असे सरळ मत दिले असताना , तीन पायाची मोट जनतेचं कौलाला डावलून बांबूंची तिरडी बांधली आणि म्हणे प्रगल्बह पुरोगामी महाराष्ट्र्र
अरे पृष्ठभागात दम होता तर स्वतःचं बळावर १६० मिळवयाचे ना ! जाणत्या राजा च्या मार्गदर्शनाखाली !

sunil kachure's picture

25 Jan 2022 - 3:20 pm | sunil kachure

जो पर्यन्त देशातील एकमेव मर्द इंदिरा गांधी जी सत्तेवर होत्या तो पर्यंत काँग्रेस वर कोणता भ्रष्टाचार चा आरोप झाला .
येथील आयडी नी संगावेच
प्रशासन,सर्व तपास यंत्रणा,स्वतःचा पक्ष ह्याच्या वर पूर्ण command इंदिराजी ची होती आरोप कोण करणार
आणि समजा केला तर तपास कोण करणार.
आता मोदी त्या स्थिती मध्ये आहेत.
मीडिया हाऊसेस आहेत त्यांच्या मालकांना दहशती खाली ठेवले आहे
विविध केंद्रीय यंत्रणा मोदी च्या गुलाम आहेत राज्य घटनेशी त्यांना काही देणेघेणे नाही.
कोण मोदी सरकार वर भ्रष्टाचार चा आरोप करेल.
सरकार बदलू ध्या सर्व काळे व्यवहार बाहेर येतील
.

चंद्रसूर्यकुमार's picture

25 Jan 2022 - 3:29 pm | चंद्रसूर्यकुमार

जो पर्यन्त देशातील एकमेव मर्द इंदिरा गांधी जी सत्तेवर होत्या तो पर्यंत काँग्रेस वर कोणता भ्रष्टाचार चा आरोप झाला .
येथील आयडी नी संगावेच

बोंबला.

संजयच्या मारूतीसाठी सरकारी यंत्रणा दावणीला बांधणे, तुलमोहनराव-ललितमोहन मिश्रा आंतरराष्ट्रीय व्यापार परवाने लायसेन्स प्रकरण, नगरवाला प्रकरण वगैरे सगळे प्रकार आणि ते आरोप कोणाच्या कारकिर्दीत झाले होते? तुलमोहन राव- ललितमोहन मिश्रा प्रकरणात सी.बी.आय चौकशी झाली होती त्याचे पुढे काय झाले? ललितमोहन मिश्रांच्या मृत्यूचे गूढ उकलले का? ते नक्की कधी उकलले? संजय गांधींच्या मारूतीला सरकारी बँकांमधून वारेमाप कर्जे दिली जात होती यावर आक्षेप घेणार्‍या आर.बी.आय गव्हर्नर एस.जगन्नाथन यांचे पुढे काय झाले? या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितच असतील ना?

तुम्ही कुठे त्या कागलकरांच्या नादाला लागताय?

कुत्रं वाकडं होईल पण ते शेपूट सरळ होणार नाही!

))--((

चौकस२१२'s picture

25 Jan 2022 - 6:49 pm | चौकस२१२

प्रशासन,सर्व तपास यंत्रणा,स्वतःचा पक्ष ह्याच्या वर पूर्ण command इंदिराजी ची होती आरोप कोण करणार
म्हणजे ते तुम्हाला मान्य होते तर मग मोदींची ( तुमचं आणि प्रोफेश्वरनच्या मनातील) का चालत नाहो हो?
मीडिया हाऊसेस आहेत त्यांच्या मालकांना दहशती खाली ठेवले आहे
चला हे खरे आहे असे गृहीत धरुयात मग ते एन दि टी व्ही चे मालक , चालक राबिश कुमार आणि राजदीप "सरडा " देसाई कोणत्या तुरंगात खितपत आहेत ? सांगा ?

सरकार बदलू ध्या सर्व काळे व्यवहार बाहेर येतील

ह हा पुवा

गणित साधं आहे तुमचं सारख्यांना लोकशाही मार्गाने ५०-६० वर्षांनंतर निवडून सरकार पचतच नाही

पचतच नाही
पचतच नाही
पचतच नाही

हे धोकादायक च आहे.
म्हणून इंदिराजी चे उदाहरण दिले.
प्रचंड बहुमत लोकशाही साठी हानिकारक च आहे.
प्रचंड बहुमतातील सरकार अस्तित्वात असेल तर सर्व सरकारी यंत्रणा जीव मुठीत धरून असतात.
सर्व अधिकार केंद्रीय सरकार la असतात.
ते काही ही करू शकतात
बहुमत च्या जोरावर हवे ते कायदे ,नियम बनवू शकतात .कोणावर पण कारवाई करू शकतात.
कोणी अशा सरकार च काहीच वाकडे करू शकत नाही
आणि हे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच करता येते .न्यायालय पण काही करू शकत नाहीत.

सुबोध खरे's picture

28 Jan 2022 - 11:48 am | सुबोध खरे

हे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच करता येते .न्यायालय पण काही करू शकत नाहीत.

मोगा खान

चष्मा काढा आणि अभ्यास वाढवा

NJAC बद्दल केलेली घटनादुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने ४-१ बहुमताने रद्दबातल केली आहे.

UPHOLDING JUDICIAL SUPREMACY IN INDIA: THE NJAC
JUDGMENT IN COMPARATIVE PERSPECTIVE

https://www.google.com/search?q=njac+case+summary&rlz=1C1CHBD_enIN915IN9...

प्रसाद गोडबोले's picture

26 Jan 2022 - 9:53 am | प्रसाद गोडबोले

धागा आवडला.

कझाकस्थान मधील अशांतता पाहुन भारतात अशांतता व्हावी हे डोहाळे लागलेले लोकं पाहुन आनंद झाला ! =))))

असो ह्या निमित्ताने दोन मिनिट शांतता पाळुन कझाकिस्तान चे राष्ट्रगीत ऐकुयात =))))

धागा उघडल्याउघडल्या माझे हात शिवशिवलेले पण गंभीर धागा आहे म्हणून गप बसलेलो.

काझाकस्तान, काझाकस्तान, यू व्हेरी नाईस प्लेस
पूर्ण व्हर्जन-https://youtu.be/PxwylahBfp4

नवरा मेला तरी चालेल पण सवत *** झाली पाहिजे..

प्रसाद गोडबोले's picture

28 Jan 2022 - 12:21 pm | प्रसाद गोडबोले

मलाही हीच म्हण आठवली होती पण लिहायचे डेरिंग झाले नाही. =))))

चित्रगुप्त's picture

4 Jan 2023 - 10:47 pm | चित्रगुप्त

नवरा मेला तरी चालेल पण सवत *** झाली पाहिजे..

नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे.. अशी मूळ म्हण आहे. रंडकी याचा अर्थ 'विधवा' असा असल्याने यात आक्षेपार्ह असे काहीही नाही. हे उगाचच सोवळे पाळण्यासारखे झाले.
एवढे बोलून खाली बसतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2022 - 8:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारतात एकदाच्या राज्यांच्या निवडणुका संपल्या. राज्याच्या निवडणुका असल्यामुळे डिझेल-पेट्रोलचे १३७ दिवस दर स्थिर राहिले, हा एक वेगळा विक्रम राहिला. पण हा बोळा फार काळ राहु शकणार नव्हता हे चाणाक्ष भारतियांना माहिती होते. पहिली दरवाढ २२ मार्च २०२२ ला सुरु झाली. दिनांक २२ ते २९ अशी सात दिवस डीझेल मागे 'विकासदर' साधारणपणे प्रत्येक दिवशी ८० पैसे प्रती दिवस जवळ जवळ पाच रूपये वाढले. तर पेट्रोल मागे जवळ जवळ पाच रूपये वाढले.

वृत्तपत्रीय बातम्यानुसार केंद्र सरकारने डिझेल-पेट्रोलच्या उत्पन्नातून ३.३१ लाख कोटी उत्पादनावरील कराच्या माध्यमातून कमावले. अभिनंदन शेठ. दुसरीकडे घरगुतीगॅसच्या दरातही वाढ झाली आहे. ऑक्टोबर पासून त्याचेही दर स्थिर होते. पण मंगळवार पासून त्याचेही रु. ५० ने वाढ झाली आहे. आपला प्रश्न लोक महागाई विरोधात जागृत होत आहेत का ?

काही लोक म्हणायचे करोना पळविण्यासाठी, थाळी, मशाल मोर्चा काढला गेला तसा उद्या, डिझेल- गॅसच्या टाक्या घेऊन उद्या ३१ मार्चला विरोधी पक्ष आणि जनता महागाईचा विरोध करण्यासाठी, केंद्रसरकारच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. अशा शांततेने निदर्शने आणि केंद्रसरकारच्या धोरणाचा निषेध करणा-या भारतीय जनतेस मन:पूर्वक शुभेच्छा.

आपापल्या गावात जर असे निदर्शने होणार असतील तर चार मित्रांना घेऊन सहभागी व्हावे, असे सुचवावे वाटले.

-दिलीप बिरुटे

त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकार त्यांचे कर कमी करणार आहे का हो?
😉

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Mar 2022 - 8:24 pm | अमरेंद्र बाहुबली

राज्यहीतासाठी सहन करा.

शाम भागवत's picture

1 Apr 2022 - 5:25 pm | शाम भागवत

:))

निनाद's picture

2 Apr 2022 - 4:51 am | निनाद

इंधन दरवाढ जागतिक आहे. त्यात सरकार काय करणार?
सरकारने त्यांच्या स्तरावर रशियातून स्वस्त तेल मिळवले. इराण बरोबर जुने करार केलेले आहेत.
सरकारी कर कमी केले आता अजून ते काय करणार?

आँ? असं काय करता निनाद. द्या की थोड्या शिव्या शेठ ला. आमच्या कडे दुप्पट झालेत भाव एका वर्षात शेठ मुळे.