लक्ष्मणपूर, एक पडाव........३

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
6 Jan 2022 - 3:50 pm

https://www.misalpav.com/node/49710 लक्ष्मणपूर १
https://www.misalpav.com/node/49726/backlinks लक्ष्मणपूर २

चार बाग रेल्वे स्टेशन

चार बाग रेल्वे स्टेशन

आपली रथयात्रा शहरातील प्रमुख आणी प्रसिद्ध ठिकाणी जात असताना "उल्टे हाथ, सीधे हाथ " जाणार्‍या रस्त्यांकडे लक्ष ठेवा कारण या शहरात जागोजागी इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत.थोडा वेळ थांबून दुरून, जवळुन शक्य आसेल त्याप्रमाणे आढावा घेऊ आणी यात्रा पुढे सुरू ठेवूयात. नखलऊवाले उजवीकडे सीधे हाथ तर डावीकडच्या वळणास उल्टे हाथ म्हणतात.

अवध प्रातांची बोली भाषा अवधी , पुर्वी हिन्दी( पुरबिया हिन्दी) भाषेची एक मुख्य उपभाषा.आयोध्या कोशल राज्याची राजधानी म्हणून अवधी, कोसली. ही भाषा इतर भाषें प्रमाणेच गोड आहे.उर्दू चा प्रभाव बोलचाली मधे दिसुन येतो.

"तुलसी-तुलसी सब कहें, तुलसी बन की घास।
हो गई कृपा राम की तो बन गए तुलसीदास।। "

रामचरीत मानस हा प्रसिद्ध ग्रंथ गोस्वामी तुलसीदास यांनी अवधी भाषेत लिहीला आहे.गुरूचरीत्रा प्रमाणेच याचे पारायण या भागातील लोक नेहमीच करतात. संत तुलसीदास एक सामान्य संसारी माणूस,त्यांचे मुळनाव रामबोला,जनरीती नुसार उपवर वयात लग्न झाले.एकदा त्यांची सुंदर पत्नी माहेरी गेली असताना प्रेमविव्हळ रामबोला वादळ वाऱ्याची,नदीला आलेल्या पुराची पर्वा न करता बायकोच्या माहेरी पोहचले.आता तुम्ही म्हणाल यात काय विषेश सगळेच नवविवाहित उतावीळपणा करतात. रामबोलाची ती अवस्था पाहून त्याच्या पत्नीने त्याला झिडकारले, उपरती झाली, बायकोने केलेला उपहास रामबोलाचा गोस्वामी तुलसीदास होण्यास कारणीभूत झाला.

"अस्थि चर्म मय देह यह, ता सों ऐसी प्रीति !
नेकु जो होती राम से, तो काहे भव-भीत ?

" आता आसा विचार येतो,"आशीच आमुची बायको असती,आम्ही ही तुलसी झालो असतो".

आसो,भाषा सोपी,सहज आणी समजण्या सारखी. रामलल्ला ,गोस्वामी तुलसीदास यांचा उल्लेख केल्याशिवाय अवध यात्रा पूर्ण होऊच शकत नाही. सायकल रिक्षा सुद्धा लखनौची एक ओळख आहे. जेव्हां मी प्रथम इथे आलो होतो तेव्हां पुण्या मुंबईत काळी पिवळी टॅक्सी आणी आँटोरिक्षा पारंपारीक प्रवासी टाग्यांना काळाच्या पडद्याआड ढकलत होत्या तेव्हा लखनौ आणी उत्तर भारतातील अनेक ठिकाणी सायकल रिक्षा हे प्रवासी आणी माल वाहातुकीचे स्वस्त आणि मस्त आसे मुख्य साधन होते.तीन चाकी सायकलवरची घासलेटची टाकी आपल्या पैकी बरेच जणाना आठवत असेल.सायकल रिक्षावर थोडा प्रकाश, कलकत्त्यामधे साधारण १९३० च्या दरम्यान सायकल रिक्षाचे आगमन त्या आगोदर पालखी, डोला, हात रिक्षा आसे प्रवासी साधन होते. गरीब लोकाचे रोजगाराचे साधन. भुपेन हजारीका यांनी आपल्या आसामी गाण्यात अमीरी गरीबीचे सटिक वर्णन केले आहे. हृदयाला भिडणारे हे गाणं सर्वानी ऐकलच आसेल.

आँके बाँके रास्तों पे कान्धे लिए जाते हैं
राजा महाराजाओं का डोला
हे डोला हे डोला हे डोला

देहा जलाइके, पसीना बहाइके
दौड़ाते हैं डोला

हे डोला हे डोला हे डोला आता मात्र लखनौचा कायापालट झालाय. चला स्टेशन रोड ने आपला प्रवास चालू करूया. रेल्वे स्थानका समोरचा स्टेशन रोड, तो पुढे विधानसभा रोडला मीळतो आणी तोच रस्ता पुढे हजरतगंज चौराहा (चौक,आताचा अटल ) पर्यंत घेऊन जातो. साधारण आर्धा कि मी वर गेल्यानंतर उजवीकडे रेल्वे पुलाखालून एक रस्ता लखनौ छावणीकडे जातो.

बक्सरच्या लढाईत नबाबाच्या दारुण पराभव नंतर साहेबांनी क्षतीपुर्ती म्हणून अवध मधे शिरकाव केला. सन १८०१ मधे साहेब व नबाबा मधे झालेल्या करारानुसार पहिल्यांदा साहेब रेसिडेन्ट म्हणून आला. तत्कालीन नबाबाने त्याला दुर सुलतानपूर रोड कडे छावणी करता जागा दिली आणी लखनौ पासुन दुर ठेवले पण साहेब खुप वस्ताद. सन १८५७ नंतर साहेबाने पाय पसरायला सुरुवात केली. प्रत्येक शहरात छावण्या उभ्या करत आपले वेगळेपण जपले. येथील मोहम्मदबाग छावणीत गनफँक्टरी, छोटी लाल कुर्ती, सदर बझार, तोफखाना,बडी लाल कुर्ती,निलमथ्था या साहेबांनी वसवलेल्या वस्त्या. मोठमोठ्या सैनिकांनी करता बराकी,हुद्दयाप्रमाणे अधिकार्‍याचे बंगले,मनोरंजना करता क्लब, बागा आंग्ल स्थापत्यकला वापरून बांधल्या आणी "home away from home ", ही भावना जपली. सरव्हटं क्वार्टर बरोबरच काही चापलूस नेटिव्ह लोकांना मेहेरबानी दाखवत थोड्याफार जमीनी दिल्या. छावणीत नवीन बांधकाम करण्यासाठी साहेबांची परवानगी लागायची. सन १८९९ मधे मोहम्मदबाग क्लबची स्थापना झाली.सुरूवातीला फक्त सेनेचे अधिकारीच याचे सदस्य होऊ शकत होते.सन १९४७ नंतर राजपत्रित नागरी अधिकारी सुद्धा सदस्य बनले. ह्या प्रतिष्ठित क्लबचा जवळपास एक तप मी सुद्धा मेबंर होतो. इथेच पिनाझ मसानीच्या गझल गायकीचा आनंद घेतला.छावणीत सेना चिकित्सा आणी गोरखा पलटन चे प्रशिक्षण केंद्र आहे. जन.रावत, आपले पहिले सि डि एस याच गोरखा पलटनचे. आता छावणीने सुद्धा आपले रुप बरेच पालटले आहे.जुन्या साहेबाच्या बराकी,बंगले,सरव्हटं क्वार्टर यांनी दोन, तीन चार मजली इमारतींचे रूप धारण केले आहे. हातानी चालवायचे कापडी सीलिंग फॅन,चिकन,वाळ्याचे पडदे जाऊन तीथे वातानुकूलित यंत्रे बसवली आहेत. छावणी मधून पुढे हा रस्ता सजंय गांधी स्नतकोत्तर आयुर्विज्ञान संस्थेकडे (SGPGI) आणी रायबरेली कडे जातो. १८४५ मधे स्थानिक लोकांचे आणी साहेबाचं रहाणीमान कसे होते त्याबद्दल सर हेन्री लाँरेन्स काय म्हणतात ते बघा,

“ Lucknow consists of an old and a new city, adjoining each other. The former like other native towns is filthy, ill-drained, and ill-ventilated. The modern city is strikingly different consisting of broad and airy streets, and containing the Royal palaces and gardens, the principal Mussulman religious buildings, the British Residency, and the houses of the various English officers connected with the court. This part of Lucknow is both curious and splendid. .There is a strange clash of European architecture among its oriental buildings.Travellers have compared the place to Moscow and Constantinople, and we cart easily fancy the resemblance.

Taken from the book of Major A T Anderson written in 1913.

छावणी मधून महात्मा गांधी रोड विधानसभा रोडला हजरत गंज चौकात येऊन मीळतो आणी स्टेशन, छावणी व गंज आसा एक त्रिभुज बनतो.या रोडवर राजभवन (हयात बक्क्ष की कोठी),ला मार्टिनियर महाविद्यालय आणी जनरल पोस्ट आँफिस (रिगं थिएटर) या तीन देखण्या प्रसिद्ध ऐतिहासिक इमारती आहेत. त्याबद्दल माहीती नतंर येईलच. आता आपण विधानसभा मार्गा कडे वळूया. विसाव्या शतकाच्या सुरूवातीस उत्तर प्रदेशची राजधानी इलाहाबाद वरून लखनऊला स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.सन १९२२ ते १९२८ मधे २१ लाख रुपये खर्चून काऊन्सिल हाँलची इमारत एंग्लो-इन्डियन स्थापत्यकलेचा एक अतीशय सुदंर नमुना. मिर्झापुरचा बलुआ पथ्थर, पिवळट गुलाबी रंगाची छटा, गोल गुम्बज, मोठे बरामदे, जयपूर, आग्रा संगमरवराचा प्रचुर वापर इमारतीला भव्य आणी सुदंर बनवतात.विधानसभा मार्गावर स्थीत हे विधानसभा आणी विधान परिषदेचे भवन. याच रस्त्यावर गणतंत्र दिवसाचा रंगारंग कार्यक्रम होतो. हे सरकारी भवन बनवताना वास्तुविद हरी सिहं यानी कलाकुसर आणी प्रशासकीय गरिमा याचे पुर्ण ध्यान ठेवत राज्य-चिन्ह (Coat of Arms )सुद्धा कोरलेले आहे.यात गंगा जमुनी तहजीब,रामलल्ला आणी अवधचे मच्छी भवन या सर्व गोष्टींचा प्रतीकात्मक पण कलात्मक रीतीने समावेश केला आहे. नबाब वाजीद अली शाह,(तखल्लूस आख्तर ) यांना इग्रंजी फौजांनी कलकत्ता,येथे नजरकैदेत ठेवले होते आणी पुढे १८८७ मधे तीथेच पैगंबरवासी झाले.त्यानां बारा लाख रुपये सालाना वजिफा मिळायचा. लखनौ सोडून जाताना त्यांनी काढलेले उद्गार त्यांच्यी लखनौ बद्दलची भावना स्पष्ट करतात.

"दर-ओ-दीवार पे हसरत से नज़र करते हैं
ख़ुश रहो अहल-ए-वतन हम तो सफ़र करते हैं".

पुढे बंगाल मधल्या मटिया बुर्ज येथील वास्तव्यात लखनौ सारख्या इमारती आणी बागा,(इमाम बाड़ा सिब्तैन, रईस मंज़िल) बनवल्या यावरून ते लखनौला किती मीस करायचे कळते.

यही तशवीश शब-ओ-रोज़ है बंगाले में
लखनऊ फिर कभी दिखलाए मुक़द्दर मेरा

तशवीश - चिंता
शब-ओ-रोज़ - हर समय, अहर्निश
मुक़द्दर। - नशीब, किस्मत

डोक्यात आठवणींच मोहळ उठलयं तरी इथेच थांबू. तुम्ही विधान भवन बघा मी जरा कोपर्‍यावरच्या हनुमानजीचे दर्शन करून येतो.

चार बाग रेल्वे स्टेशन

नोकरीविचार

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

6 Jan 2022 - 3:59 pm | कर्नलतपस्वी

चार बाग रेल्वे स्टेशन
चार बाग रेल्वे स्टेशन

कुमार१'s picture

6 Jan 2022 - 4:28 pm | कुमार१

लेखमाला छान चालू आहे. वाचतोय
फोटोही उत्तम

सुबोध खरे's picture

6 Jan 2022 - 8:09 pm | सुबोध खरे

सुंदर लेख

सायकल रिक्षा मध्ये मी पहिल्यान्दा दिल्लीत बसलो होतो आणि माणूस किती कष्ट करतो ते पाहिले होते. तेंव्हा मला धक्का बसला होता.

पण एका मित्राने समजावले कि तुझ्यासारखी माणसे जर त्याच्या रिक्षात बसली नाहीत तर त्याच्या पोटाला काही मिळणार नाही. तू मित्राच्या सायकल वर डबल सीट बसतोस तसेच समज. त्यानंतर मुं सायकल रिक्षात अनेक वेळेस बसलो.

यानंतर लखनौला मात्र मी जुन्या लखनऊची सफर करण्यासाठी किंवा अमीनाबाद मध्ये चिकनकारी खरेदी करण्यासाठी सायकल रिक्षा मध्ये बसून खूप मजेत प्रवास केला. लखनौ च्या थंडीत गरम कपडे घालून कॅम्पातून अमीनाबाद/ इमामबाडा/ हजरत गंज पर्यंत रविवारी हळू हळू शहर पाहत जाण्याची (आणि येण्याची) मजा औरच होती.

(माझ्याकडे माझी स्कुटर होती तरीही).

अर्थात मी सायकल रिक्षावाल्याशी घासाघीस अजिबात केली नाही. कारण ते करत असलेले कष्ट पाहिले तर माणसे त्याला एक दोन रुपयांसाठी त्याला पिळून घेतात हे पाहून लाज वाटते आणि संताप हि येतो.

रमेश आठवले's picture

6 Jan 2022 - 10:53 pm | रमेश आठवले

कलकत्त्यात एकेकाळी माणसाने ओढल्या जाणाऱ्या रिक्षेचा प्रघात होता

श्रीनिवास टिळक's picture

7 Jan 2022 - 9:10 am | श्रीनिवास टिळक

माणसांनी ओढल्या जाणाऱ्या रिक्षा आजही कलकत्त्यात दिसतात पण आता कदाचित कमी झाल्या असतील. सध्या मुक्काम येथे असल्यामुळे रोज त्यांचे दर्शन होते पण त्यांचा उपयोग करावा असं काही वाटत नाही.

सुबोध खरे's picture

7 Jan 2022 - 11:20 am | सुबोध खरे

खरं आहे.

माणसे घोड्याऐवजी रिक्षा ओढतात हे पाहून फार भयानक वाटते.

ओडिशामध्ये अगदी आजही सायकल रिक्षा आहेत. पुरीचे जगन्नाथ मंदिराचे पार्किंग ते मंदिर इथे नक्की असतात. भर उन्हात दहा-वीस रुपयांसाठी माणसाला इतके कष्ट करावे लागतात.

प्रचेतस's picture

7 Jan 2022 - 9:14 am | प्रचेतस

व्वा कर्नलसाहेब. लखनौची ऐतिहासिक आणि भौगोलिक अशी काव्यमय सफर तुम्ही छानपैकी घडवून आणत आहात.

कर्नलतपस्वी's picture

7 Jan 2022 - 10:21 am | कर्नलतपस्वी

सर्वश्री कुमार१,सुबोध खरे, रमेश आठवले,श्रीनिवास टिळक, मनो व प्रचेतस प्रतिसद करता धन्यवाद.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

7 Jan 2022 - 11:33 am | ॲबसेंट माइंडेड ...

हा भागही आवडला.

मुक्त विहारि's picture

7 Jan 2022 - 7:13 pm | मुक्त विहारि

शहरदर्शन, मस्तच सुरू आहे...