पंचमी

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
3 Jan 2022 - 7:46 pm

पंचमी पंचमी
पंचमी पंचमी
पंचमी पंचमी

बाल्कनीतली फुले

रंग सारे फूलले।
धुंद झाली बाल्कनी।
रंग सोहळा फुलांचा
नेत्र सुखावू लागली

सखी शेजारची माझ्या
वेळावून भ्रूभंग टाकते
बहरलेले झाड माझे
का ग डोळा खुपते

दृष्ट लावू नका कोणी
झाड वयात आलेले
ओढुनी मद यौवनाचा
नवचैतन्य येथे बहरले

बहरली रातराणी
पारिजात ही बहरला
शुभ्र पांढर्‍या मोगऱ्याचा
गंध आसमंती पसरला

उधळले रंग सारे
जणू रागदारी मांडली
पंचमीची मुठ माझ्या
दारी की हो सांडली

शिंपले काटे जरी मी
तरी फुल ही उमलले
सुर कळी पाकळीतून त्यांच्या
जीवनाचे उमटले

pineappleकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

4 Jan 2022 - 9:11 am | प्रचेतस

सुरेख लिहिलंय कर्नलसाहेब.

भ्रूभंग-भ्रूकूटी उडवून कटाक्ष टाकणे?

कर्नलतपस्वी's picture

4 Jan 2022 - 10:07 am | कर्नलतपस्वी

प्रचेतस जी धन्यवाद, भ्रुभंग म्हणजे "भौऐ चढना, त्योरीयाँ चढाना" , यात "मेरी कमीज से उसकी कमीज ज्यादा सफेद क्यूँ है" असा भाव.

कर्नलतपस्वी's picture

4 Jan 2022 - 10:10 am | कर्नलतपस्वी

बागवानीची चटक लागली, सेवानिवृती नंतर बाल्कनीत फुलझाडे जोपासत दुधाची तहान ताकावर भागवतोय.

चांदणे संदीप's picture

4 Jan 2022 - 5:30 pm | चांदणे संदीप

छान, कविता आवडली.

सं - दी - प