अनन्त्_यात्री in जे न देखे रवी... 17 Dec 2021 - 7:54 pm स्वप्न जागृतीची सीमा अर्ध सत्य अर्धा भास अलौकिकाच्पा कवेत पडे वास्तवाचा फास सीमेवर कल्लोळती नाद रंगांचे सागर अपूर्वाची अनुभूती गंध, रस, स्पर्शापार उंबरा हा अदृष्टाचा असूनही नसण्याचा नसलेल्या असण्याशी उराउरी भेटण्याचा मुक्तक प्रतिक्रिया कवीता आवडली. 18 Dec 2021 - 8:36 am | कर्नलतपस्वी सोऊं तो सपने मिलूं, जागूं तो मन मांहि । लोचन रातें सब घडी, बिसरत कबहू न मांहि ॥ कबीरदासजी छान.. 18 Dec 2021 - 12:00 pm | ज्ञानोबाचे पैजार ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः। अनेन वेद्यं सच्छास्त्रमिति वेदान्तडिण्डिमः॥ तेव्हा जागृती सत्य आणि स्वप्नही सत्यच, अर्ध सत्य असे काहीच नसते पैजारबुवा,
प्रतिक्रिया
18 Dec 2021 - 8:36 am | कर्नलतपस्वी
सोऊं तो सपने मिलूं, जागूं तो मन मांहि ।
लोचन रातें सब घडी, बिसरत कबहू न मांहि ॥
कबीरदासजी
18 Dec 2021 - 12:00 pm | ज्ञानोबाचे पैजार
ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः।
अनेन वेद्यं सच्छास्त्रमिति वेदान्तडिण्डिमः॥
तेव्हा जागृती सत्य आणि स्वप्नही सत्यच, अर्ध सत्य असे काहीच नसते
पैजारबुवा,