जरी नाहीस समोर तू, कायम सोबत असतेस तू ..
एकांत रात्री ही सरतात सहज, कारण स्वप्नांमध्ये असतेस तू ..
माझ्या ध्यानी मनी वसतेस तू, सुंदर विभ्रम करतेस तू ..
कल्पांती नेतील प्रेमदूत माझे, मला मोहित करतेस तू !
वाऱ्याच्या झुळूकेबरोबर येतेस तू ,
आरशातही पाहताना दिसतेस तू ..
पण प्राण अडकतो श्वासात,
जेव्हा अवचित कधी दिसतेस तू !
अव्यक्त राहूनही जिंकतेस तू, कधीही कशीही आवडतेस तू ..
कोरडी पडली होती जीभ सांगताना, "मला खूप आवडतेस तू" !
थोडी गडबडलीस तू, तरीही माफी मागत होतीस तू ..
"मला नाही जमणार" सांगताना, मात्र निर्विकार होतीस तू !
खरी आहेस समजदार तू, माझ्या नकळत मला सांभाळतेस तू ..
हळुवार जपल्या हळव्या नात्यांचे, नवे आयाम सांभाळतेस तू !
प्रतिक्रिया
14 Dec 2021 - 8:25 am | कर्नलतपस्वी
छान लिहीलय, काँलेज मधल्या नवतरूणी, नवतरूणी ने लिहीले आहे असं वाटत.
कवीतेला वय असतं
असे उगाच का वाटतं
पण कवीच्या वयाशी
काही घेणेदेणे नसतं
हे ही कधी कधी पटतं
14 Dec 2021 - 1:32 pm | रश्मिन
धन्यवाद कर्नल साहेब ! ई - सफाई करताना माझा जुना ब्लॉग मिळाला आणि मग ईथे लिहिलं :)
बरोब्बर ओळखलंत ! कॉलेजमध्ये असताना लिहिलेली आहे ;-)
एकेक ब्लॉग नोंदी वाचताना कळतं की आपण हळहळू कसे परिपक्व होत जातो :)
तुमच्या चारोळीशी प्रचंड सहमत !!
14 Dec 2021 - 4:44 pm | कपिलमुनी
अशा १०१ जिलब्या घालता येतील
स्मरतेस तू
झुरतेस तू
हसतेस तू
रुसतेस तू
आठवतेस तू
विसरतेस तू
झोपतेस तू
उठतेस तू
14 Dec 2021 - 9:06 pm | रश्मिन
त्या अडनिड वयातली जिलबी आत्ता पाडली !
भावनाओं को समझो :P
15 Dec 2021 - 9:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वरच्या चार ओळी. वैश्विक सत्य असतं. श्वास अडकणे, घसा कोरडा पडणे, मनातल्या मनात हसणे, कविता पाडणे, वगैरे.
हा संसर्ग बेक्कार असतो. प्रेमाचा विषय मला रसिक म्हणून कायमच आवडतो. लिहिते राहा.
''राहील सारा हा पसारा तू गेल्यावर
श्वासांचा मग होईल वारा तू गेल्यावर. ''
-दिलीप बिरुटे
(प्रियकर)