जात्या मधले दाणे रडती सुपातले हसती.
" वृद्धांचे फालतू लाड बंद करा" ,लेख मिसळपाव ब्लॉग वर वाचला. आवडला, भरपूर प्रतिसाद मिळाले. लेखक यशस्वी झाले.
एवढ्या सगळ्या प्रतिक्रिया वाचल्यावर असे वाटू लागले आहे की वृद्धत्व शाप की वरदान. अर्थात तो एक वेगळा धागा होऊ शकतो.
प्रत्येकाचा अनुभव, दृष्टिकोन वेगळा अगदी पंचतत्रांतल्या गोष्टी सारखा.
आमची खेळातली पहिली पारी खेळून झाली. एक्स्ट्रा ओव्हर्स पण संपल्यात. आता पँव्हेलियन मधे बसलोय सामना संपण्याची वाट बघत.
संत साहित्य विषेशतः कबीरदासजी आणी कवी बोरकर यांच्या साहित्या मधे सूर गवसला.
कबीरदासजी म्हणतात ,
जो उग्या सो अन्तबै, फूल्या सो कुमलाहीं।
जो चिनिया सो ढही पड़े, जो आया सो जाहीं।
म्हणून सामना संपण्याची भीती वाटत नाही.
" तापल्या आहेत तारा तोंवरी गाऊन घे
स्वप्न आहे लोचनीं हें तोंवरी पाहून घे "
- बोरकर
जेव्हां तार गरम होती तेव्हां, "जपानी रमलाची रात्र" मनसोक्त भोगली. ती निळी चांदरात पण अनुभवली.
"तुझे विजेचे चांदपाखरू दीप-राग गात
रचीत होते शयनमहाली निळी चांदरात"
- बोरकर
आता आयुष्याची कांचनसध्या....
पिलांस फुटुनी पंख तयांची
घरटी झाली कुठे कुठे,
आता आपुली कांचनसंध्या
मेघडंबरी सोनपुटें.
,"विसाव्याच्या क्षणी" सौभाग्यवतीला म्हणालो ,
" कशास नसत्या चिंता-खंती
वेचू पळती सौम्य उन्हे,
सले कालचीं विसरून सगळी
भले जमेचें जिवीं स्मरूं,
शिशुहृदयाने पुन्हा एकदा
या जगतावर प्रेम करूं."
- बोरकर
पण तीची अवस्था सोंगी भारूडा सारखी,
" आवा चालली पंढरपूरा
वेशीपासून आली घरा
परिसें घे सुनबाई
नको वेचू दूध आणि दही
ऐक गोष्टी सादर
बाळी करी जतन फुटकी पाळी।"
- सुमन विठ्ठल आवा
बाल भारती भारूड
मुलं आपापल्या क्षेत्रात मशगुल, आम्ही सूर्यवंशी त्यांचा सुर्य घराचे पडदे बाजुला सरकतात तेव्हाच उगवतो. हल्लीची पिढी आपल्या पेक्षा जास्त हुशार आहे याचा साक्षात्कार झाल्याने काळजी करत नाही.शेजारी डोकवावे इतपतच मुलांना सल्ले. फारसे लक्ष देत नाही कारण आपलं गाठोड आपणच वहायचं ना!
शिस्तबद्ध जीवन, कालच हिशोब करत होतो गेल्या दहा वर्षांत जवळपास २८००० किलोमीटर चाललोय. दिवेकर नाही, दिक्षीत नाही, हिरवा चहा सुद्धा नाही. चारी ठाव जेवणे आणी आठ तास घोरणे हाच दैनंदिन नित्यक्रम. वजन ९० खालीच यायला तयार नाही. "डबल हाडाचा ", " मट्टी भारी " आसा स्वताःचा गोड गैरसमज करून घेत काळजी करत नाही. उरला सुरला वेळ वाचन,संगीत मालीनी राजूरकर ते कौशीकी पं भीमसेन ते जयतिर्थ मेवूंडी, प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप ,वडाळी बंधू गुलाम अली,नुसरत फतेह कोणिही, आम्ही फक्त कानसेन. OTT ने एक चांगली सोय केली आहे. " मिपा ", सोने पे सुहागा.
कबीरदासजी च्या सांगण्या प्रमाणे योग्य वेळी योग्य आणी स्पष्ट बोलणे अन्यथा आपण बरे आणी आपलं काम भले.
" अति का भला न बोलना, अति की भली न चूप ,
अति का भला न बरसना , अति की भली न धूप "
कबीरदासजीच्यां म्हणण्यानुसार जे काय आहे ते इथेच स्वर्ग आणी नर्क त्यामुळे जे काही भोगायच ते इथेच. तेव्हा आपण गेल्यानंतर मागे काय होईल याची चितां नाही.
" वहाँ न दोजख, बहिस्त मुकामा।
यहाँही राम, यहॉँही रहमाना।।"
सुत सपुत तो क्या धन सिंचे। सुत कपूत तो क्या धन सिंचे।
पुत्र सुपुत्र आसेल तर तो स्वताःच संपत्ती तर कुपात्र आसेल तर कितीही ठेवा काही उपयोग नाही. आशी उदाहरणे आपल्या आवती भवती पुष्कळ सापडतील.
म्हणून म्हणतो आयुष्याची संध्याकाळ जर सुखकर करायची असेल अर्थात आसेल त्या परिस्थितीत तर स्वतः करता जगा. माझीच मराठी रचना विचारार्थ......
म्हणून म्हणतो.......
जीव आहे तोवर जगून घ्या
डोळे आहेत तोवर बघून घ्या
काय माहिती.......
तेलात तळत्याल का अप्सरा भेटत्याल
म्हणून म्हणतो
तुझं माझं करू नका
एकमेकाचे हात सोडू नका
मेल्यावर काय होईल त्याच उत्तर
मेल्या शिवाय कळणार नाही
म्हणून म्हणतो.....
इहलोकीचा स्वर्ग पुन्हा मिळणार नाही
काय माहिती....
देवदूत येतील का यमदूत नेतील
पुनर्जन्म देतील का तिथचं ठेवून घेतील
म्हणून म्हणतो.......
आजच्या करता जगा
उद्यासाठी काही करू नका
म्हणून म्हणतो.......
रात्रीच स्वागत, दुःखाचा उत्सव करून बघा
दुसऱ्या च्या दुःख आपलं मानुन जगा
काय माहिती......
मनाचा गाभारा कदाचित उजळेल
माणसातला देव तुम्हाला ही भेटेल
- कसरत
२२-५-२०२१
एकदा का गाडी उतारावर आली की आपल्या मनासारखं वागून घ्या. प्रत्येक जण स्वयंभू त्यात आपली भागिदारी जवळपास नाहीच.
मिपाकरांची माफी मागून माझीच एक हिन्दी रचना खाली देतोय , गोड मानून घ्या .
बोनस......
चलते चलते सुबह से शाम हो गयी।
जीदंगी यूँ ही तमाम हो गयी।
"बुढा हो गया है, अब तो सम्हल जा। "
बिना मांगे नसिहत मील गयी ।
मै भी मस्त मलंग ठैरा ।
कह देता हूँ नही मै कोई
ऐरा गैरा नथ्यू खैरा
जीता हूँ अपने तरीके से आखीर
आने वाला हर दिन, " बोनस ", जो ठैरा।
बडी मुद्दत्त से पता ढुंढ रहा था ।
जो हर मोड पर धोका देती थी
बडी शिद्दत से मुलाकात हुयी है।
ऐ जीदंगी अब मेरी बारी आयी है।
ना फाईल है ना लाईन है।
अब जीदंगी शाईन ही शाईन है।
भर भर के जी रहा हूँ।
कुदरत के जाम पी रहा हूँ।
ना जाने का डर ना खोने का गम
बांटो खुशीयौं बटोरो गम
यही है जिंदगी जीयो ठाठसे
मत सोचो चले जानेसे
किस कीस की आँखे होगी नम।
-कसरत....
२४-११-२१
प्रतिक्रिया
24 Nov 2021 - 9:02 pm | चित्रगुप्त
खूप छान. सुंदर, मननीय, वाचनीय.
24 Nov 2021 - 9:12 pm | चौथा कोनाडा
आशादायक प्रकटन आवडले.
आयुष्याच्या या टप्प्यावर शांतता, समाधान लाभत आहे हे खरेच भारी आहे !
24 Nov 2021 - 9:53 pm | सुचिता१
छान!!!
काही मुद्दे तर असे आहेत की सगळ्यांनी (व्रुद्ध /तरुण) च आचरणात आणले तर जीवन सुखकर होइल.
असे विचार असणारे व्रुद्ध सहवासात असले तर सगळे च सोपे वाटेल.
25 Nov 2021 - 6:54 am | Bhakti
क्या बात!
खुप छान शब्दबद्ध केलंय.
25 Nov 2021 - 9:52 am | कर्नलतपस्वी
चित्रगुप्त, चौथा कोनाडा, सुचिता१,भक्ती प्रतीसादा बद्दल धन्यवाद.
समाज बदलतोय, आपण पण बदलायला हवे.लहानपणी तीन -चार पिढ्या एकत्र नांदताना बघितल्या. पण तेंव्हा आर्थिक निर्भरता प्रमुख मुद्दा होता. आता पण तोच प्रमुख मुद्दा आहे पण स्वरुप बदलले आहे. अर्थात इतर कारणे सुद्धा आहेत.
सामाजिक स्तिथ्यंतरा मधे दोन पिढ्यातील टकराव अनपेक्षित नाही.
25 Nov 2021 - 11:35 am | मुक्त विहारि
नातवंडे, अपत्य आणि पालक
अजून काही वर्षांत, पतवंडे पण सामील होतील ...
माणसांचे आयुष्यमान वाढले आणि घराघरांतील प्राथमिकता पण चार प्रतलांवर जाणार
25 Nov 2021 - 11:36 am | मुक्त विहारि
योग्य लिहिले आहे
25 Nov 2021 - 12:04 pm | स्वराजित
खुप छान
25 Nov 2021 - 6:28 pm | प्रकाश घाटपांडे
जीते है शानसे मरते है शानसे| जीवनाकडे पहायचा सकारात्मक दृष्टीकोन आवडलाच. तरीही संध्याछाया भिवविती हृदया |
25 Nov 2021 - 8:10 pm | चित्रगुप्त
@ प्रकाश घाटपांडे: तरीही संध्याछाया भिवविती हृदया ...
चौरा जाऊन आता पाच दिवस झाले, तरी मन ताळ्यावर येत नाहीये. यात "संध्याछाया" ची प्रखर जाणीव असावीसे वाटते. कुणा जवळच्या व्यक्तीच्या अशा जाण्यातून मनात उठणारे तरंग, उचंबळून येणार्या भावना, स्वतःच्या ऊर्वरित जीवनाविषयी कल्पना,विचार आणि संकल्प ... या सर्वांविषयी एक धागा काढावा, आणि सर्वांनी त्यात लिहावे, असे वाटते आहे. कुणीतरी सुरुवात करा रे.
25 Nov 2021 - 10:17 pm | कर्नलतपस्वी
घाटपाडें साहेब, तुमच्या मताशी सहमत आहे. एक निर्जीव वस्तू हरवते तर बरेच दिवस रुखरुख लागते चौरा तर आपले साथीदार होते.
मी दार्शनिक वगैरे नाही पण आयुष्यात आलेले अनुभव आणी संत साहित्य या मधुन कळलेल्या काही गोष्टीं मुळे आता भीती नाही वाटत. जसजसे मोठे होत जातो तसतशा भावना व्यवहारा कडे झुकू लागतात.
कबीरदासजी म्हणतात ,
जब होवे उमर पूरी,
जब छूटेगा हुकुम हुजूरी
जम के दूत, बड़े मजबूत,
जम से पडा झमेला
उड़ जाएगा हंस अकेला,
जग दर्शन का मेला ...
कुमार गंधर्व यांनी फार सुदंर गायलआहे. बऱ्याच वेळा ऐकतो.
" चोला माटी के राम ", छत्तीसगढ़ के मशहूर लोकगीत साध्या सोप्या पद्धतीने जीवनाचे सत्य आपल्या समोर ठेवते. आशी बरीच उदाहरणे देता येतील. आपल्या हातात काहीच नाही तेव्हां आला दिवस गोड करायचा.
" द्रोणा जइसे गुरू चले गे
करन जइसे दानी संगी, करन जइसे दानी
बाली जइसे बीर चले गे, रावन कस अभिमानी
चोला माटी के हे राम
एकर का भरोसा, चोला माटी के हे रे
कोनो रिहिस ना कोनो रहय भई आही सब के पारी
एक दिन आही सब के पारी
काल कोनो ल छोंड़े नहीं राजा रंक भिखारी
चोला माटी के हे राम "
26 Nov 2021 - 11:12 am | सुरसंगम
तुमचं नाव तपस्वी कर्नल असं हवं हो.
प्रत्येक वाक्याशी सहमत.
27 Nov 2021 - 7:48 pm | कर्नलतपस्वी
सुरसंगम जी धन्यवाद. तपस्वी खानदानात जन्मलो म्हणून नाव तपस्वी. प्रारब्ध चांगले म्हणून देशसेवा त्यातही रुग्ण सेवा स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही एकाच वेळेस. कर्नल या जन्मातली उपलब्धी. नावास लांच्छन लागू नये याची सतत काळजी.
आमचे आजोबा, मामा देशपांडे, शक्तीपात दत्त संप्रदायातील मोठे साधक आणी अधिकारी, आमची पणजी स्वामी समर्थांच्या मांडीवर खेळलेली अनुग्रहीत. कदाचित त्यांच्या आशिर्वाद म्हणून आयुष्य सुखकर झाले.
चित्रगुप्त म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच आयुष्याच्या संध्याकाळी कसे वागायला हवे याचा सकारात्मक ऊहापोह होणे गरजेचे आहे.
27 Nov 2021 - 8:06 pm | मुक्त विहारि
विचारल्या शिवाय सल्ला द्यायचा नाही आणि आपल्या पाटावरून उठायचे नाही...
27 Nov 2021 - 8:18 pm | कर्नलतपस्वी
सौ सुनार की एक लोहार की.......