लेना होगा जनम हमें कई कई बार

Primary tabs

देशपांडे विनायक's picture
देशपांडे विनायक in जनातलं, मनातलं
24 Sep 2021 - 11:56 am

वय वाढत जाते तसे काही प्रश्न हमखास विचारले जातात. त्यातून लग्नाची चाळिशी उलटून गेली असेल आणि पन्नाशी दोन तीन वर्षावर आली  असेल तर तुमच्या सुखी संसाराचे रहस्य जाणून घेणे त्यांना हक्क वाटू लागतो. पण आज सकाळी __ _ते महान रहस्य सांगता येईल असा प्रश्न बायकोने विचारला. मी ८० त प्रवेश केला आणि दोन एक वर्षात लग्नही पन्नाशीचे होईल. गेली पाच सहा वर्षे रहस्य विचारले की मी हसून उत्तर टाळत होतो.   माझ्या मनात बायकोबद्दल फार आदर आहे. तो सांगण्यासाठी मला शब्दांचा आधार घ्यावा लागत नाही. माझ्या मित्रांचा आदर तिने कमावला आहे. तो जरा जास्त आहे असे मला वाटते कारण मी बायकोबद्दल काही तक्रार करू लागलो तर मित्र हसतात ,दुर्लक्ष करतात आणि तुला आम्ही ओळखून आहोत असे म्हणून विषयांतर करतात.  मित्रांनी जाहीरपणे तिच्याप्रतीचा आदर  व्यक्त केलेला मला अजून स्पष्ट आठवतो.
 एके दिवशी सायंकाळी चार पाच मित्र माझ्याकडे मदिरा सेवन करण्यास आले. माझ्या घरी मदिरा सेवनास बायको हरकत घेत नाही. त्यामुळे अत्यंत मोकळेपणाने मित्र माझ्याकडे हा कार्यक्रम पार पाडू  शकतात. आमचे दोन दोन पेग संपले असावेत कारण संभाषण इंग्रजीत होण्यास सुरवात झाली होती. मी बर्फ आणायला उभा राहिलो आणि मला खिडकीतून जे दर्शन झाले त्याने मी नॉर्मल झालो. बायकोकडे पळतच गेलो आणि म्हटले '' आता काय करावयाचे ? ''बायको म्हणाली " मी करतीय ना भजी , आणखी काय हवय ? ''अग माझ्या सासूबाई त्यांच्या सासूबाईंना घेऊन येत आहेत असं म्हणून मी तिच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहिले . बर्फ न घेताच मी मित्रांच्याकडे आलो आणि परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. त्यांनी ते जास्तच गांभीर्यानी घेतले आणि निघण्याची तयारी करू लागले. आमच्या आवाजाने बायको स्वयंपाक घरातून आली आणि म्हणाली " तुमचे चालू दे , मी बघते काय करावयाचे ते "
अशावेळी तो आदर व्यक्त झाला होता. मग वाहिनीचा अजून एक किस्सा एकाने ऐकवला .हातातला ग्लास उंचावून तो म्हणाला ''वहिनी फार भारी आहेत. दोन एक वर्षांपूर्वी आम्ही असेच काहीजण बसलो होतो. आणि सुरवात करणार इतक्यात हे महाशय [ म्हणजे मी ] म्हणाले तुम्ही चालू करा मी आलोच. आम्ही विचारले कुठे जातोस या वेळी तर म्हणाला एक पण बाटली आता शिल्लक नाही. [ मित्रांच्यापुढे एक मोठी भरलेली बाटली ठेऊन मी निघालो होतो. ]आम्ही सांगितले अरे येवढी सहज पुरेल. तर हा म्हणाला घरात बाटली नसणे बर नाही,कधी वेळ येईल सांगता येत नाही. याच हे बोलणं संपलं नाही तर लगेच वाहिनी म्हणाल्या " अहो,मोठीच बाटली आणा ''
वहिनी  त्या काळात मार्केट यार्ड मधून ट्यामोटो घेऊन केचप बनवून आणत आणि ते केचप भरून ठेवण्यासाठी मोठी बाटली सोयीची असते. त्यांचा मैत्रणीचा ग्रुप हे काम वर्षातून एकदा करत असे. .
 तर आज सकाळी काय झाले ते सांगावयाचे राहिले बायको सकाळी सकाळी कपाट आवरत होती. ग्लासेसच्या मागे तिला ओपनर मिळाला. तो दाखवत ती म्हणाली " हल्ली हे लागत नाही का तुम्हाला ?' ''मग मी हल्ली बियरचे डबे असतात ज्याला ओपनेरची गरज नसते वगैरे समजावून सांगितले. हे सांगताना जो समंजसपणा मी दाखवला तो असला तर सगळं आयुष्य सुखाचे जाते.

मौजमजाअनुभव

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

24 Sep 2021 - 1:12 pm | चौथा कोनाडा

खुसखुषीत लिहिलंय !
शैली आवडली !

तुमचा सुखीसदरा घ्यायला हवा !

🥂

चीयर्स !

पुभाप्र.

कंजूस's picture

24 Sep 2021 - 2:24 pm | कंजूस

घेत नसल्यामुळे शब्द सुचत नाहीत.
कडकडीत, करकरीत, अल्टिमेट.

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Sep 2021 - 4:17 pm | ज्ञानोबाचे पैजार

"तुमचे चालू दे , मी बघते काय करावयाचे ते"

या नंतर काय युक्ती केली ते मात्र सांगायचे शिताफीने टाळले आहे... ती युक्ती असती तर आमच्या हिला ही हा लेख वाचायायला दिला असता.

मार्केटयार्डातले कॅनिंग सेंटर बंद झाल्या पासुन फारच गैरसोय झाली आहे. माझी आई पण दरवर्षी तिकडुन सॉसच्या १०-१५ आणि जॅमच्या ८-१० बाटल्या बनवुन आणायची.

पैजारबुवा,

गॉडजिला's picture

24 Sep 2021 - 5:27 pm | गॉडजिला

देशपांडे वहिनींका जवाब नही.
भारीच.

फिर बीवी ने इतना दिया प्यार पीना छूट गया
फिर दोनों ऐसे मिले प्यार में ही डूब गए
प्यार अगर मिले तो हर नशा है बेकार
जहाँ चार यार ...

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

24 Sep 2021 - 5:40 pm | ॲबसेंट माइंडेड ...

झकास.

श्रीरंग_जोशी's picture

24 Sep 2021 - 8:04 pm | श्रीरंग_जोशी

तुमच्या सुखी संसाराबद्दलचं मनोगत आवडलं.

सह्याद्री वाहिनीवर लोकहितार्थ दाखवली जाणारी जाहिरात तुमच्यासाठी अजिबात लागू नव्हती.

संसारा उध्वस्त करी दारू,
बाटलीस स्पर्श नका करू :-) .

चौथा कोनाडा's picture

24 Sep 2021 - 8:29 pm | चौथा कोनाडा

आता ही गोष्ट बघा:
https://youtu.be/JAAzch2aLJM

सुरिया's picture

27 Sep 2021 - 10:53 am | सुरिया

संसारा उध्वस्त करी दारू,
बाटलीस स्पर्श नका करू :-) ........
.
ते कदाचित कुणाला तरी गलासात ओतून द्यायला सांगत असतील. ;)

चौथा कोनाडा's picture

27 Sep 2021 - 12:39 pm | चौथा कोनाडा

सुरिया ....

😂

हा .... हा .... हा .... !

ज्योति अळवणी's picture

25 Sep 2021 - 10:06 am | ज्योति अळवणी

एकदम भारी.

सतिश गावडे's picture

25 Sep 2021 - 1:45 pm | सतिश गावडे

भारी खुसखुशीत किस्से. कथन आवडलं. :)

आम्ही तर वेगळेच वाचलेले..
संसार उद्ध्वस्त करी दारु..
......
.... म्हणून संसार नका करू!

जुइ's picture

27 Sep 2021 - 6:13 pm | जुइ

:-) लेख आवडला.

तुषार काळभोर's picture

27 Sep 2021 - 8:21 pm | तुषार काळभोर

लेना होगा जनम हमें कई कई बार..
अगदी खरंय!

रंगीला रतन's picture

27 Sep 2021 - 10:43 pm | रंगीला रतन

एकदम ऑदभूत :)
मस्त. मजा आली.

श्वेता व्यास's picture

2 Oct 2021 - 12:29 pm | श्वेता व्यास

फार भारी, अशी बायको सर्व इच्छुकांना मिळो :)

Nitin Palkar's picture

2 Oct 2021 - 1:40 pm | Nitin Palkar

देशपांडे.. चवीने खाणारे पिणारे का?

अभिजीत अवलिया's picture

2 Oct 2021 - 3:02 pm | अभिजीत अवलिया

छान अनुभव.

तुमचे चालू दे , मी बघते काय करावयाचे ते

या प्रसंगात पुढे काय घडले ते सांगितले असते तर उत्तम झाले असते.

वामन देशमुख's picture

3 Oct 2021 - 4:50 pm | वामन देशमुख

छान आहे कथन!

एकमेकांच्या आनंदात सहकार्य करणारे पती-पत्नी असतील त्यांना कई कई बार जन्म घ्यावा वाटेलच.

बाकी, क्रमशः लिहायचं विसरलात का? ती सासवांना टाळण्याची युक्ती नेमकी काय होती ते पुढच्या भागात येईलच म्हणा!
😉