तिची वारी

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
20 Jul 2021 - 1:33 pm

मानसीची बदली होऊन ती नवीन गावी आली होती.ऑफिसचा पहिला दिवस होता.शाखाधिकारी कडून काम समजून घेऊन मानसी लगबगीने तिच्या केबिनमध्ये शिरली.प्रसन्न दरवळ खोलीभर पसरला होता.समोर मोगऱ्याची फुले एका फुलदाणीत सजवली होती.हळू हळू मानसी कामात व्यस्त होऊ लागली.
तोच आवाज आला “चहा की कॉफी?काय आणू madam?”
मानसीने समोर पाहिले .तीस वयोगटातील एक सामान्य अंगकाठीची, गुलाबी गणवेशाची साडी नेसलेली,कपाळावर मोठी टिकली ,गळ्यात तुळशीची माळ घातलेली सावळी मुलगी उभी होती.
”चहाच चालेल,पण तुमच नाव?”मानसीने प्रश्न केला.
“नंदा ,मला सगळे नंदा मावशीच म्हणतात इथे.आता आणते चहा” असे म्हणून नंदा बाहेर गेली.
नंदा तिथली मदतनीस होती.चुणचुणीत हसरी.मानसीच्या टेबलवर रोज वेगवेगळी सुंदर फुले नंदाच मांडायची.मानसी आणि नंदाची ओळख वाढली.तेव्हा या हसर्या नंदा मागच मोठ दुख: ऐकून मानसीला धक्काच बसला.
नंदा सांगत होती, “माझ्या घरी पाच बहिणी ,मी सगळ्यात लहान होती.माझी आई गेली आणि त्याणे आम्हांला सावत्र आई आणली.तोपर्यत माझ्या बहिणींची लागणे झाली होती.माझ्या सावत्र आईने पैशासाठी माझ लग्न सोळाव्या वर्षीच एका विधुर आणि पन्नाशीतल्या माणसाशी लावल.खूप दारू प्यायचा ,मारायचा.माझ्या पदरी पाच वर्षाचा पोर सोडून दारूने त्याचा घात केला आणि तो अपघातात गेला.इथे पाच वर्षापासून इथे कंत्राटी पद्धतीणे काम करतेय.मुलगा शाळा शिकतोय ..असच पांडूरंगाच्या कृपेने होईल सगळ चांगल ,पण एकदा त्याच्या पायावर डोक ठेऊन गार्हाण मांडायचं आहे बघा ....पायी वारी करून त्याच्या भेट घ्यायची आहे.”

नंदाला वारकरी सांप्रदायाची आवड होती.एवढाशा कमी वयात अनेक सोसलेल्या जीवाला विठूनाम एक आधार होता.कीर्तन तिचा ध्यास होता.
मानसीने ठरवलं की नंदाला वारीसाठी यंदा आपण मदत करायची.
नंदा चहा घेऊन आली .मानसी म्हणाली.
”नंदा २४ तारखेला गावातली पालखी वारीला निघणार आहे.तुझ्यासाठी मी रेनकोट,चांगले शूज ,काही पैसे देतेय .तू यंदा वारी करायची आणि तुझ्या विठूला मोठे गार्हाण घालून यायचं बघ”
नंदा म्हणाली “पण madam माझी सुट्टी ,इतक्या दिवस मला सुट्टी मिळे का?”
“सुट्टी मंजूर” मानसीने अर्ज दाखवला.
“madam तुम्ही एवढ करताय ,पण माझ्या मुलाला मी एकट्याला सोडून ...”
नंदाच वाक्य मधेच खोडत मानसी म्हणाली “त्याची काळजी करु नको ,त्याला मी सांभाळेल”
बास ..नंदाच स्वप्न....पंढरीची वारी पूर्ण होणार होती.
ठरल्या दिवशी पालखी सोबत नंदा आपल स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोहमाया ठेवत गेली.तिच्या थकलेल्या जीवाला भक्ती रंग ,साज सगळ कस भारवलेल होत.विठूच्या पायी माथा ठेऊन ती पुन्हा आली.
नंदा ऑफिसला आली तेव्हा मानसीने उठून तिचे पाय धरले.
“madam हे काय करताय ?”  नंदा संकोचली.
“वारकर्याच्या पायाची पंढरीची धूळ माथी लावतेय” मानसी म्हणाली.
“नाही madam मी तुमच्या पायी पडायला हवे ,माझ स्वप्न तुमच्यामुळे पूर्ण झाल” नंदा खाली वाकणार तोच मानसीने तिला गळाभेट दिली .
“माझ्या विठूदेवाच्या पायी माथा ठेवण्यासाठी जसा मला माणसातला देव भेटला तसा सगळ्यांना भेटो”....
तिच्या कानी भजन गुंजत होत ...
“देव देव्हार्यात नाही ....”
-भक्ती

कथा

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

20 Jul 2021 - 2:01 pm | कुमार१

'भक्ती'मय कथा.
छान.

गॉडजिला's picture

20 Jul 2021 - 9:57 pm | गॉडजिला

उलगडा होइलच ;)

Bhakti's picture

21 Jul 2021 - 7:51 am | Bhakti

हा हा
हो पण अर्धसत्यकथा आहे.नंदा मावशी खरी आहे.
@जिला असे सगळे पत्ते खुले केले तर कसं होईल ;)

गॉडजिला's picture

22 Jul 2021 - 2:30 pm | गॉडजिला

पण मई सिर्फ व्यक्तिगत पातलीपे लोगोका दिमागी अभ्यास क्रेनु वास्ते लेख के बारेमे सोच्या तो पत्ता खुल्या हुवा

गॉडजिला's picture

20 Jul 2021 - 2:04 pm | गॉडजिला

त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा

Bhakti's picture

20 Jul 2021 - 5:38 pm | Bhakti

भक्तीकडून भक्तीमय धन्यवाद!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jul 2021 - 2:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भक्तीभावाने फ़ुललेली कथा पोहोचली. धन्यवाद.
लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे