सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


रंजन आणि कल्पनाविस्तार (४)

Primary tabs

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
6 Jun 2021 - 9:46 am
गाभा: 

भाग ३
.....................

कल्पना लढवा !

काही वर्षांपूर्वी एका खेळाच्या जाहिरातीचा फलक एका शहरातील खांबावर लागलेला होता. त्यातील ठराविक भाग खाली दाखवला आहे. सदर खेळ पाहण्याचा माणशी तिकीट दर १ रुपयाहून कमी होता !

ok

आता खालील प्रश्नांची कल्पनेने उत्तरे द्यावीत.
प्रश्न :

१. सदर जाहिरातीला आकर्षक शीर्षक सुचवा
२. जाहिरात अंदाजे कोणत्या काळातील असेल ? ( दहा वर्षांचा टप्पा चालेल)
३. या खेळातील विजेत्याला इनाम अंदाजे किती रुपये असावे ?
४. या खेळाचे काही नियम देखील जाहिरातीत लिहिलेले होते. एखादा मजेशीर नियम अंदाजाने लिहा.
...

प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल आणि तोच आपला हेतू आहे ! म्हणजेच इथे काही ‘ओळखणे’ हा प्रकार नाही. बिनधास्त लिहा.
शक्यतो प्रश्न विचारू नका.

आतापासून पूर्ण २४ तास मुदत देतो. तुमचे तयार झाले की कधीही लिहू शकता. तुमच्या आधी एखाद्याने उत्तर लिहिलेले असेल तर त्याला उगाचच अनुमोदन देऊ नका. तुमच्या मनातले काय असेल तेच लिहा.

मूळ जाहिरातीबद्दल मी २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी तुमच्या उत्तरावर प्रतिक्रिया देणार नाही.
धन्यवाद !

प्रतिक्रिया

आग्या१९९०'s picture

6 Jun 2021 - 11:14 am | आग्या१९९०

सत्तरच्या दशकातील फ्रिस्टाइल कुस्तीची जाहिरात असावी. दारासिंग, रांधवा, किंगकाँग असे खेळाडू असायचे. चिमटे,चावे घेऊ नये असे नियम असत. वल्लभभाई स्टेडियम वरळी येथे ह्या कुस्ती बघितल्या आहेत. तेव्हा मजा वाटायची, परंतू त्या नूरा कुस्ती असल्याचे समजल्यावर बघणे सोडून दिले.

कुमार१'s picture

6 Jun 2021 - 4:42 pm | कुमार१

छान सुरवात.

मागील जन्मीचे मिपाकर असावेत....

नावातकायआहे's picture

6 Jun 2021 - 10:05 pm | नावातकायआहे

ओरिजनल आणि डु आय डी ह्यांच्यातील (वैचारिक) द्वंद!

गॉडजिला's picture

7 Jun 2021 - 10:27 am | गॉडजिला

+1

सिरुसेरि's picture

6 Jun 2021 - 8:15 pm | सिरुसेरि

१. सदर जाहिरातीला आकर्षक शीर्षक सुचवा -- जंगी कुस्तीचे सामने , खासबाग मैदान . कोल्हापुर .

२. जाहिरात अंदाजे कोणत्या काळातील असेल ? ( दहा वर्षांचा टप्पा चालेल) -- १९८०

३. या खेळातील विजेत्याला इनाम अंदाजे किती रुपये असावे ? -- दहा हजार रुपये

४. या खेळाचे काही नियम देखील जाहिरातीत लिहिलेले होते. एखादा मजेशीर नियम अंदाजाने लिहा. -- नुरा कुस्ती रद्द केली जाईल , व त्या स्पर्धकांचे गुण वजा केले
जातील .

३. या खेळातील विजेत्याला इनाम अंदाजे किती रुपये असावे ? -- पंचवीस हजार रुपये + चांदीची गदा

कुमार१'s picture

6 Jun 2021 - 9:40 pm | कुमार१

हळूहळू रंग भरतोय......

😍

कुमार१'s picture

7 Jun 2021 - 7:52 am | कुमार१

२ तास राहिलेत....
येउद्यात...

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Jun 2021 - 9:35 am | ज्ञानोबाचे पैजार

बरेच वर्षांपूर्वी पैलवान बीडीची जाहिरात पेपरात यायची त्यात बहूदा हा फोटो पाहिला आहे.
वरची जाहितात नाही सापडली पण जालावर या बीडीच्या काहि जाहिराती सापडल्या.

pailwan
https://i.ebayimg.com/images/g/AKQAAOSw2cNah5yB/s-l1600.jpg

pailwan2

Pailwan3
पैजारबुवा,

कुमार१'s picture

7 Jun 2021 - 9:44 am | कुमार१

४ तासांनी वाढविली आहे....

कल्पना छान आहेत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Jun 2021 - 9:51 am | ज्ञानोबाचे पैजार

१. सदर जाहिरातीला आकर्षक शीर्षक सुचवा -

ग्रेट गामा पैलावान विरुध्द पैलवान पंडीत बीड्डू यांची जंगी कुस्ती


२. जाहिरात अंदाजे कोणत्या काळातील असेल ? ( दहा वर्षांचा टप्पा चालेल) - १९१६
३. या खेळातील विजेत्याला इनाम अंदाजे किती रुपये असावे ? रु १००

पैजारबुवा,

कुमार१'s picture

7 Jun 2021 - 1:56 pm | कुमार१

सर्व सहभागी मंडळींचे मनापासून आभार !
आपण सर्वांनी कल्पनेने लिहिलेला मजकूर उत्तम आहे. विविध प्रकारच्या उत्तरांनी खूप मजा आली. आता मूळ जाहिरातीबद्दल :

प्रचंड मल्लयुद्ध

स्थळ : डे. जिमखाना, पुणे.
सन : १९३१
विजेत्यास इनाम : रु. ८७५
तिकीट दर : ४ आणे

नियम : खेळ सुरु होण्यापूर्वी लढणाऱ्याबरोबर दोन इसमांनी लंगोट बांधण्यास आखाड्यात यावे !

देवा थापा नावाचा एक नेपाळी पैलवान भारतांत येऊन विविध कुस्तीच्या फडात पंजाबी आणि हरयाणा च्या पैलवानांची फजिती करतो. व्हिडीओ जरूर पाहावेत.

https://www.youtube.com/watch?v=36lUj1MiyaI

कुमार१'s picture

8 Jun 2021 - 8:29 am | कुमार१

साहना,

धन्यवाद व्हिडिओ चांगला आहे.

ह्याला फार कुतूहलाने फॉलो करत होतो... कारण त्या फाईट्स खऱ्या आहेत अशी माझी श्रद्धा होती...

हे खोटे आहे का ? मला तरी हे सर्व खरेच आहे असे वाटले.

गॉडजिला's picture

8 Jun 2021 - 2:01 pm | गॉडजिला

मन लावून बघू शकाल...

कुमार१'s picture

7 Jun 2021 - 1:58 pm | कुमार१

रंगीत चौकटींचे आकार गरजेनुसार कमी कसे करायचे हे कोणी सांगेल काय ?

शाम भागवत's picture

7 Jun 2021 - 2:37 pm | शाम भागवत

प्रचंड मल्लयुद्ध

width:125PX; एवढं वाढवायचं

अधिक माहितीसाठी/अभ्यासासाठी कंकाकांचा हा धागा व त्यावरील प्रतिसाद पहा.

कुमार१'s picture

7 Jun 2021 - 2:57 pm | कुमार१

धन्यवाद शा भा !