✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रंजन आणि कल्पनाविस्तार (४)

ह
हेमंतकुमार यांनी
Sun, 06/06/2021 - 09:46  ·  लेख
लेख
भाग ३ ..................... कल्पना लढवा ! काही वर्षांपूर्वी एका खेळाच्या जाहिरातीचा फलक एका शहरातील खांबावर लागलेला होता. त्यातील ठराविक भाग खाली दाखवला आहे. सदर खेळ पाहण्याचा माणशी तिकीट दर १ रुपयाहून कमी होता ! ok आता खालील प्रश्नांची कल्पनेने उत्तरे द्यावीत. प्रश्न : १. सदर जाहिरातीला आकर्षक शीर्षक सुचवा २. जाहिरात अंदाजे कोणत्या काळातील असेल ? ( दहा वर्षांचा टप्पा चालेल) ३. या खेळातील विजेत्याला इनाम अंदाजे किती रुपये असावे ? ४. या खेळाचे काही नियम देखील जाहिरातीत लिहिलेले होते. एखादा मजेशीर नियम अंदाजाने लिहा. ... प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल आणि तोच आपला हेतू आहे ! म्हणजेच इथे काही ‘ओळखणे’ हा प्रकार नाही. बिनधास्त लिहा. शक्यतो प्रश्न विचारू नका. आतापासून पूर्ण २४ तास मुदत देतो. तुमचे तयार झाले की कधीही लिहू शकता. तुमच्या आधी एखाद्याने उत्तर लिहिलेले असेल तर त्याला उगाचच अनुमोदन देऊ नका. तुमच्या मनातले काय असेल तेच लिहा. मूळ जाहिरातीबद्दल मी २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी तुमच्या उत्तरावर प्रतिक्रिया देणार नाही. धन्यवाद !
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8582 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

सत्तरच्या दशकातील फ्रिस्टाइल

आग्या१९९०
Sun, 06/06/2021 - 11:14 नवीन
सत्तरच्या दशकातील फ्रिस्टाइल कुस्तीची जाहिरात असावी. दारासिंग, रांधवा, किंगकाँग असे खेळाडू असायचे. चिमटे,चावे घेऊ नये असे नियम असत. वल्लभभाई स्टेडियम वरळी येथे ह्या कुस्ती बघितल्या आहेत. तेव्हा मजा वाटायची, परंतू त्या नूरा कुस्ती असल्याचे समजल्यावर बघणे सोडून दिले.
  • Log in or register to post comments

...

हेमंतकुमार
Sun, 06/06/2021 - 16:42 नवीन
छान सुरवात.
  • Log in or register to post comments

त्यातील एक अथवा दोघेही मल्ल

गॉडजिला
Sun, 06/06/2021 - 18:26 नवीन
मागील जन्मीचे मिपाकर असावेत....
  • Log in or register to post comments

ओरिजनल आणि डु आय डी

नावातकायआहे
Sun, 06/06/2021 - 22:05 नवीन
ओरिजनल आणि डु आय डी ह्यांच्यातील (वैचारिक) द्वंद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

:)

गॉडजिला
Mon, 06/07/2021 - 10:27 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

१. सदर जाहिरातीला आकर्षक

सिरुसेरि
Sun, 06/06/2021 - 20:15 नवीन
१. सदर जाहिरातीला आकर्षक शीर्षक सुचवा -- जंगी कुस्तीचे सामने , खासबाग मैदान . कोल्हापुर . २. जाहिरात अंदाजे कोणत्या काळातील असेल ? ( दहा वर्षांचा टप्पा चालेल) -- १९८० ३. या खेळातील विजेत्याला इनाम अंदाजे किती रुपये असावे ? -- दहा हजार रुपये ४. या खेळाचे काही नियम देखील जाहिरातीत लिहिलेले होते. एखादा मजेशीर नियम अंदाजाने लिहा. -- नुरा कुस्ती रद्द केली जाईल , व त्या स्पर्धकांचे गुण वजा केले जातील .
  • Log in or register to post comments

३. या खेळातील विजेत्याला इनाम

शाम भागवत
Sun, 06/06/2021 - 20:31 नवीन
३. या खेळातील विजेत्याला इनाम अंदाजे किती रुपये असावे ? -- पंचवीस हजार रुपये + चांदीची गदा
  • Log in or register to post comments

कुस्तीला

हेमंतकुमार
Sun, 06/06/2021 - 21:40 नवीन
हळूहळू रंग भरतोय...... 😍
  • Log in or register to post comments

अजून

हेमंतकुमार
Mon, 06/07/2021 - 07:52 नवीन
२ तास राहिलेत.... येउद्यात...
  • Log in or register to post comments

पैलवान बीडीची जाहिरात असावी

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 06/07/2021 - 09:35 नवीन
बरेच वर्षांपूर्वी पैलवान बीडीची जाहिरात पेपरात यायची त्यात बहूदा हा फोटो पाहिला आहे. वरची जाहितात नाही सापडली पण जालावर या बीडीच्या काहि जाहिराती सापडल्या. Image removed. https://i.ebayimg.com/images/g/AKQAAOSw2cNah5yB/s-l1600.jpg Image removed. Image removed. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

मुदत

हेमंतकुमार
Mon, 06/07/2021 - 09:44 नवीन
४ तासांनी वाढविली आहे.... कल्पना छान आहेत.
  • Log in or register to post comments

अजून एक प्रयत्न..

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 06/07/2021 - 09:51 नवीन
१. सदर जाहिरातीला आकर्षक शीर्षक सुचवा -
ग्रेट गामा पैलावान विरुध्द पैलवान पंडीत बीड्डू यांची जंगी कुस्ती
२. जाहिरात अंदाजे कोणत्या काळातील असेल ? ( दहा वर्षांचा टप्पा चालेल) - १९१६ ३. या खेळातील विजेत्याला इनाम अंदाजे किती रुपये असावे ? रु १०० पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

समारोप !

हेमंतकुमार
Mon, 06/07/2021 - 13:56 नवीन
सर्व सहभागी मंडळींचे मनापासून आभार ! आपण सर्वांनी कल्पनेने लिहिलेला मजकूर उत्तम आहे. विविध प्रकारच्या उत्तरांनी खूप मजा आली. आता मूळ जाहिरातीबद्दल :

प्रचंड मल्लयुद्ध

स्थळ : डे. जिमखाना, पुणे. सन : १९३१ विजेत्यास इनाम : रु. ८७५ तिकीट दर : ४ आणे नियम : खेळ सुरु होण्यापूर्वी लढणाऱ्याबरोबर दोन इसमांनी लंगोट बांधण्यास आखाड्यात यावे !

  • Log in or register to post comments

देवा थापा नावाचा एक नेपाळी

साहना
Tue, 06/08/2021 - 02:08 नवीन
देवा थापा नावाचा एक नेपाळी पैलवान भारतांत येऊन विविध कुस्तीच्या फडात पंजाबी आणि हरयाणा च्या पैलवानांची फजिती करतो. व्हिडीओ जरूर पाहावेत. https://www.youtube.com/watch?v=36lUj1MiyaI
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

...

हेमंतकुमार
Tue, 06/08/2021 - 08:29 नवीन
साहना, धन्यवाद व्हिडिओ चांगला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

मागल्या लोकडाऊनच्या सुरुवातीला मी

गॉडजिला
Tue, 06/08/2021 - 12:14 नवीन
ह्याला फार कुतूहलाने फॉलो करत होतो... कारण त्या फाईट्स खऱ्या आहेत अशी माझी श्रद्धा होती...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

हे खोटे आहे का ? मला तरी हे

साहना
Tue, 06/08/2021 - 13:34 नवीन
हे खोटे आहे का ? मला तरी हे सर्व खरेच आहे असे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

मग तुम्ही आयपीएल देखील

गॉडजिला
Tue, 06/08/2021 - 14:01 नवीन
मन लावून बघू शकाल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

वरील

हेमंतकुमार
Mon, 06/07/2021 - 13:58 नवीन
रंगीत चौकटींचे आकार गरजेनुसार कमी कसे करायचे हे कोणी सांगेल काय ?
  • Log in or register to post comments

प्रचंड मल्लयुद्ध

शाम भागवत
Mon, 06/07/2021 - 14:37 नवीन

प्रचंड मल्लयुद्ध

width:125PX; एवढं वाढवायचं अधिक माहितीसाठी/अभ्यासासाठी कंकाकांचा हा धागा व त्यावरील प्रतिसाद पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

वा,

हेमंतकुमार
Mon, 06/07/2021 - 14:57 नवीन
धन्यवाद शा भा !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा