कसं पटवावं पोरीला ?

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
3 Jun 2021 - 2:05 pm

कसं पटवावं पोरीला ?

शोधत होतो लवगुरु

अथक प्रयत्नांनी एक मिळाला

ज्याची लफडी होती सुरु

माग काढुनी भेट घेतली

पण वाटला तो थकलेला

प्रेमरसात तो न्हाउनी डुंबुनी

असेल कदाचित पिकलेला

मी पण होतो आसुसलेलो

एक पोरगी पटवण्यासाठी

सांगेल ते मी करणार होतो

माझ्या मधल्या काठीपोटी

पदस्पर्श करून मी त्याला म्हणालो

मलापण प्रेम करायचंय

तुमच्यावानी रुबाबात पार

पोरींना घेऊन फिरायचंय

ऐकून माझा उद्देश गुरुचे , हरपले सारे भान

जुन्या आठवणींनी रडू कोसळले, कंठाशी आले प्राण

रडू आवरून मला म्हणाला

यात अवघड नसते काही

वायफळ बडबड केली म्हणजे

पोरी पटतात कशाही

अक्कल यांची गुडघ्यात आणि दिडबुद्धी असतात

वायफळ बडबड करणाऱ्यावर जीव ओवाळून टाकतात

बडबडीने का कधी कुणाचे पोट भरत असते

खरे द्वंदव तर तेव्हा होते जेव्हा प्रेम खिशाशी येते

खिसा रिकामा पाहुनी मग त्या अद्वातद्वा बोलतात

हीन पातळी गाठून हळूहळू रक्ताशी पोहोचतात

निर्लज्ज होऊनि पचवावे ते धारधार प्रहार

ती जाता मग दुसरीसाठी पुन्हा व्हावे तयार

असेच माझे जगणे मित्रा , इथवर झाला माझा प्रवास

तू ठरव आता तुला हवं का , भोगायचाय का हा त्रास ?

=======================================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

धोरणजीवनमान

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Jun 2021 - 4:27 pm | ज्ञानोबाचे पैजार

शेवट अगदी निराश करुन गेला.

सांगेल ते मी करणार होतो

माझ्या मधल्या काठीपोटी

हे विषेश आवडले आहे

पैजारबुवा,

खिलजि's picture

3 Jun 2021 - 5:32 pm | खिलजि

धन्यवाद

पै बु काका

सतिश गावडे's picture

3 Jun 2021 - 8:02 pm | सतिश गावडे

काय सिविपा लावलाय राव :)

खिलजि's picture

4 Jun 2021 - 4:13 pm | खिलजि

बाकी कै नै

टवाळ कार्टा's picture

4 Jun 2021 - 5:19 pm | टवाळ कार्टा

एक काळ होता कि अश्या कवीतेवर ३००+ प्रतिसाद हा हा म्हणता आले असते...."हाणाहिथे" नैत आता...पूमिराना

प्रसाद गोडबोले's picture

4 Jun 2021 - 9:54 pm | प्रसाद गोडबोले

कसं पटवावं पोरीला ?

>>> सदर विषयावरील आमचा जगप्रसिध्द लोकोत्तर एकमेवाद्वित्वीय लेख ह्या इथे पहावयास मिळेल >>>
पोरगीपटाव शास्त्राचे नियम : http://www.misalpav.com/node/30038

बाकी आपली कविता एकदम कटू सत्य आहे ह्यात शंकाच नाही . पोपकला हा एक अवघड खेळ आहे, ज्याला जमतो त्यानेच करावे , ज्याला जमत नाही त्याने केल्यास अंगाशी येण्याचीच दाट शक्यता असते .
>>>
गळ गिळितां सुख वाटे । वोढून घेतां घसा फाटे ।
कां तें बापुडें मृग आपटे । चारा घे‍ऊन पळतां ॥ ६६॥
तैसी विषयसुखाची गोडी । गोड वाटे परी ते कुडी ।
म्हणौनियां आवडी । रघुनाथीं धरावी । ६७॥

___/\___

Bhakti's picture

5 Jun 2021 - 11:36 am | Bhakti

_/\_
;)

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Jun 2021 - 11:43 am | ज्ञानोबाचे पैजार

मार्कस सरांची प्रतिक्रीया वाचताना आम्हाला "नवनित मार्जार योग आठवला"

- नवनित मार्जार योग -

नवनित पाहता जैसा | संयम ढळे मार्जाराचा |
नको तिकडे तैसा उठे रे | शुळ हा मस्तकीचा ||

किती दाबून धरला तरीही | दिसतो रे क्षोभ माझा |
जाणकार म्हणती की | दोश हा यौवनाचा ||

लाकडे मसणात गेली | तरी यौवन सरता सरे ना |
किती तरी गुरु केले | पण राग काबूत येईना ||

धावतो एकांत स्थळी मी | हात दाबूनी कपाळी|
हळूच गळे राग मग | रगडीता हस्त भाळी||

मोकळा होताच श्वास | मन शांत शांत होते |
त्याक्षणी नयनांना | नविन नवनित दिसते ||

नवनित पाहता ते |पित्त माझे खवळावे |
दमन करण्या तयाचे | पुन्हा एकांती मी पळावे ||

अहर्निश असा रे | खेळ चालीत राही |
शरीर थकून जाई | मन धावित राही ||

रघुनाथा माझे तू | चोचले पुरवावे |
बोचलेपण हे माझे | तू झणी निरवावे ||

निरोधू कैसा मी | या मना एकनाथा |
जगन्नाथ वाटे मज | हात अपुलाच नाथा ||

पैजारबुवा,