......अजूनही !

Primary tabs

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
4 May 2021 - 8:21 am

......अजूनही !

आसमंत व्यापून टाकलेल्या त्या मखमली ढगांमधून
वीज चर्र्कन धरणीमध्ये निघून जावी ....
------असेच त्यांचे ते शेवटचे शब्द ....
सगळं काही भेदून
विस्कळीत करून टाकणारे..... अगदी क्षणार्धात !

स्वप्नांनी तुडुंब भरलेल्या आपल्या मनाला .....
अगदी रिक्त करून डोहाच्या तळाशी नेऊन ठेवल्यासारखे !

आता सगळं अगदी रिकामं झालंय .....

जे ते जिथल्या तिथल्या किनाऱ्यावर सोडून
खळाळत निमूटपणे वाहणाऱ्या नदीसारखी ....
मीही वाहत आहे आता ...... एकटीच !

पहाटेच्या मंद प्रकाशात रेंगाळत असतील
तुझ्या आजूबाजूला ...... माझे काही शब्द
पिंजारलेल्या कापसासारख्या पसरल्या
आहेत माझ्याजवळ ...तुझ्या काही भावना
तुझ्या हृदयाशी घट्ट बिलगून बसले असतील
...... माझे काही आभास ....

अन , पुन्हा पुन्हा जाणवले असतील
काही अस्फुट, उत्कट, अनाकलनीय ......स्पर्श
अगदी कल्पनेच्या पलीकडचे ......
आणि अशातच .....
सोसाट्याच्या वाऱ्याला , बेफाम पावसाला,
किनाऱ्यावरच अडवून ठेवताना ...... थरथरत असतील
....... तुझे श्वास !

कणाकणात जाणवणाऱ्या माझ्या प्रेमाच्या
अशा लाखो खुणा घेऊन
किनाऱ्यावरच खंबीर पणे उभा आहेस तुही !
कधीतरी पुन्हा भेट होईल
हा एकच दिलासा ... आता या रितेपणाला ....

आयुष्य संपत आल्याची खंत आहेच ...
पण हे आयुष्य नव्हेच! ....हे तर फक्त जगाला
माहिती असलेले आपले...... अस्तित्व !
संपलंय ! ते फक्त त्यांच्यासाठीच !

एकमेकांच्या कणाकणात भिनलोय आता ,
हजार वेळा जन्मून पुनः पुनः एक झालोत !

हे जग कुठे आपल्याला विलग करू शकले
....... अजूनही !

-----राधा कृष्ण

_____________फिझा

कविता

प्रतिक्रिया

खिलजि's picture

4 May 2021 - 3:33 pm | खिलजि

छान आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 May 2021 - 4:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्या बात है. कविता आवडली.

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

6 May 2021 - 7:34 am | तुषार काळभोर

छान काव्य.

Bhakti's picture

6 May 2021 - 10:47 am | Bhakti

एकमेकांच्या कणाकणात भिनलोय आता ,
हजार वेळा जन्मून पुनः पुनः एक झालोत !

प्राची अश्विनी's picture

14 May 2021 - 2:50 pm | प्राची अश्विनी

वाह!