नशिबाची परीक्षा घेतली
असाच नंबर डायल केला
समोरून मधुर आवाज आला
हॅलो , मी बोलतेय , बोला ...
आवाजानेच जीव गारेगार झाला
आहाहा , मनातल्यामनात जणू स्वप्नांचा बंगला
बंगल्यात लगेच राहायला गेलो, मिळून आम्ही दोघे
दोनाचे चार , कुटुंब फोनवरच झाले मोठे
देऊन टाकल्या तीन चार ऑफर
उधळली नको ती मुक्ताफळे
समोरची पार येडी झाली
रस्ते झाले सारे मोकळे
गेलो तडक बाजारात अन घेतल्या साऱ्या वस्तू
शोधत गेलो पत्ता तिचा तर तिथे नव्हती ती वास्तू
परत लावला नंबर तर येत होता व्यस्त
आता मात्र घाबरुन गेलो, झालो चिंताग्रस्त
बंटी काही ऐकत नव्हता
कळा येत होत्या पुन्हा पुन्हा
झक मारली आणि नंबर लावला
केला होता मोठा गुन्हा
केळेवाली दुरून सारे चाळे बघत होती
फोनवरती व्यस्त पण ओळखीची वाटत होती
डोके खाजवून आठवून पहिले , पण ओळख पटली नाही
पुन्हा एकदा मी शोधू लागलो ती फोनवरची बाई
तेवढ्यात माझा फोन वाजला
अन ती कोकीळ बोलू लागली
आवाजावरून का कुणास ठाऊक
मला ती वैतागलेली वाटली
गाठले तडक घर तिचे नि
मागितले थंडगार पाणी
एकटेच आलात का तुम्ही इथं
कि अजून सोबत आहे कुणी ?
मनात आलं झालं बंट्या , काम तुझं आता फत्ते
कुटत जा तू एकावरती , अशेच पत्त्यावर पत्ते
कोकीळराणी घेऊन पाणी
लाजत लाजत आली
हातामध्ये प्याला देउनी
अलवार जरा लाजली
गटागटा मी सारे पाणी
प्यायलो अधाश्यावानी
पाणी पिताक्षणी मला हळूहळू
यायला लागली ग्लानि
बंटी आत रुसून बसला
डोळे जड झाले
अंगावरचे दागदागिने
कायमचे उडून गेले
भानावरती येता मजला
उलगडले मग सारे
मोरावानी चालत गेलो
दाखवत आपले पिसारे
थेट गाठला रद्दीवाला
उधार घेतले पेपर
असे बांधले करगोट्याला
जणू वाटावे नवीन डायपर
घरी पोचल्यावर वाजवली , मी दारावरची घंटी
बायको बघून अशी किंचाळली
कि बेशुध्ध झाला बंटी
सबबी सांगण्यात रात्र उलटली
तरी तिची शंका नाही सुटली
पुन्हा हृदयात ती कळ गेली
जेव्हा फोनची घंटी वाजली
पुन्हा नको ती परीक्षा कसली
कुठून लावला तो फोन ?
सरळ साधे ते जगणे उत्तम
उगा नको आयुष्यात त्रिकोण
------------------------------------------------------------
सिद्धेश्वर विलास पाटणकर
प्रतिक्रिया
30 Apr 2021 - 3:56 am | चित्रगुप्त
त्रिकोणी कविता आवडली. मात्र तिचा पत्ता कुठे मिळाला ते समजले नाही.
30 Apr 2021 - 6:19 am | अभिजीत अवलिया
कवितेचे नाव 'नशिबाची परीक्षा' ऐवजी 'मिपाकरांची परीक्षा' असे जास्त योग्य राहील.
असो. आयुष्यात असे मोहाचे क्षण येतातच. कवितेतील नायक भविष्यात असले क्षण टाळेलच' असा विश्वास व्यक्त करुन मी माझे दोन शब्द संपवतो.
30 Apr 2021 - 2:15 pm | खिलजि
चालतं रे ...
सध्या वॉर्म अप चालू है .. अजून बरेच नो बॉल टाकेन .. मग बघू .. तोपर्यंत सहन कर रे बाबा ..
2 May 2021 - 9:36 pm | उपयोजक
:)))
3 May 2021 - 11:48 am | राघव
धन्य आहात.. =))