सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्रंबके गौरी, नारायणी नमोस्तुते...

घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

फाल्गुन व. ८ इंद्रजिताशी युद्ध सुरू ! फाल्गुन व.८ रोजी लक्ष्मणाचे आणि इंद्रजिताचे युद्ध सुरू होऊन इंद्रजिताचा वध झाला.

Primary tabs

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
10 Apr 2021 - 10:48 am

आज काय घडले...

इंद्रजित

निकुंमिलेकडे इंद्रजित यज्ञ करीत होता. इकडे रामाची आज्ञा घेऊन लक्ष्मण, बिभीषण, हनुमान व जांबवान हे सर्व निकुंभिलेस आले. हनुमान आणि जांबवान यांनी इंद्रजिताच्या सैन्यावर निकराचा हल्ला केला. इंद्रजिताने आपले यज्ञकर्म सोडले व रथावर आरूढ होऊन त्याने मारुतीवर बाणाचा वर्षाव सुरूं केला. लक्ष्मणाने जोराची आरोळी मारून इंद्रजिताला द्वंद्वयुद्धासाठी पाचारण केले. तेव्हां मारुतीस सोडून देऊन इंद्रजित लक्ष्मणाकडे धांवला. प्रथम त्याने बिभीपणास कठोर शब्दांनी धिःकारल्यावर बिभीपण बोलला, “धर्मापासून परावृत्त झालेल्या पापी मनुष्यास-मग तो स्वजन असला तरी सोडलाच पाहिजे. परद्रव्याचे हरण करणारा व परस्त्रीचा अभिलाप धरणारा या दोघां पाप्यांस जळत्या घराप्रमाणे टाकून जावे असे शास्त्र सांगते.-"

इंद्रजिताने रागाने लाल होऊन लक्ष्मणावर चाल केली. दोघांचे द्वंद्वयुद्ध सुरू झाले. तीन दिवसपर्यंत एकसारखें युद्ध होऊन शेवी लक्ष्मणाने इंद्रजिताचें डोके उडविलें ! “ तेव्हां देवांनी आकाशात दुंदुभि वाजविल्या व लक्ष्मणावर पुष्पवृष्टि केली. इंद्रजितासारख्या महान् पराक्रमी व मायावी राक्षसाचा लक्ष्मणाने नाश केल्यामुळे सर्व पृथ्वीचा भार हलका झाला. आणि तीनहि लोकांना आनंद झाला." बिभीषणाने लक्ष्मणाचा मोठा गौरव केला. सर्व जण विजयी होऊन रामापाशी आले. श्रीरामांनी लक्ष्मणास पोटाशी धरून मोठ्या ममतेने कुरवाळले आणि म्हटले, " लक्ष्मणा, तूं आज एक दुष्कर कर्म केलेंस, आतां रावण मेलाच असें मी समजतो. त्याचे कुंभकर्ण व इंद्रजित हे दोनहि हात तुटले."

इंद्रजित हा लंकेचा राजा रावण व मंदोदरी यांचा ज्येष्ठ पुत्र. याचे मेघनाथ असेंहि नांव होते. याने इंद्राला जिंकिले म्हणून याला इंद्रजित हे नांव प्राप्त झाले. 'जर श्रीराम धर्मात्मा आणि सत्यनिष्ठ असेल तर इंद्रजित मरेल' असे म्हणून लक्ष्मणाने ऐंद्रास्त सोडले व त्याचा वध केला.

इतिहास