हाऊ टू थिंक लाइक आईनस्टाइन
मूळ लेखक : डनिअल स्मिथ
अनुवाद :मुक्ता देशपांडे
आईनस्टाइन म्हणजेच जगाला पडलेलं कोडं आहे. त्याच्या भौतिकशास्त्रातील अफाट कार्याने अजूनही तो विश्वाची रहस्ये उलगडायला मदत करतो.तर हे अस न सुटणार कोडं थोडेफार का होईना या पुस्तकामुळे सुटते.
आईनस्टाईन म्हणजे E=mc2 एवढेच माहित असणाऱ्या माझ्यासारख्या वाचकांना त्याच्या भौतिकशास्त्रातील प्रयोगांची जुजबी माहिती तर मिळतेच पण त्याच्या विचारांचा प्रवासही अनुभवायला मिळतो.पुस्तकाच नाव जरी आपल्याला आईनस्टाईनसारख कसा विचार करायचा?हे सुचवायचा प्रयत्न करत असला तरी आईनस्टाईन कसा विचार करायचा हे आधी समजून घ्यायला मदत करतो.आईनस्टाईन कोणत्याही काळात जन्माला आला असता,तरी त्याचे विचार त्या त्या काळात चपखल बसले असते.
व्यक्तिस्वातंत्र्य,राष्ट्रवादाचा विरोध,हुकुमशाही आणि युद्धाचे दुष्परिणाम आणि शांततेचा पुरस्कार हे त्याच्या जगण्याचे स्तंभ सतत या पुस्तकातून अधोरेखित होत राहतात.
एकूण ३० प्रकरण आणि १२ आयष्यातील मुख्य घटनांचा उलगडा करणारे लेख पुस्तकात समाविष्ट आहेत.
“मी भविष्याचा विचार कधीच करत नाही ते लवकरच येते.” अल्बर्ट आईनस्टाईन(१९३०) या सकारात्मक वाक्यापासून जो त्याचा आणि त्याच्या अवती भोवती असणाऱ्या लोकांमुळे ,परिस्थितीमुळे त्याच्या विचारांची खोली कशाप्रकारे अद्भुत आहे याची जाणीव यायला सुरुवात होती.
पुढील काही भागात अंत:प्रेरणा,कल्पनाशक्ती,कार्यासक्ती या विषयी महान शास्त्रज्ञाचे विचार समाजात.त्याचं आयुष्यातील सुरुवातीच्या काळातील थोडासा संघर्ष उजागर झाल्यावर त्याची प्रबंधाची घोडदौड थक्क करणारी आहे.
आईनस्टाईन आणि ईश्वर या प्रकरणात “
मी अशा देवाची कल्पना करू शकत नाही जो माणसांच्या कर्मावर थेट प्रभाव पाडू शकेल किंवा त्यान स्वत:च निर्माण केलेल्या प्राणीमात्रांचा निवाडा करायला बसेल”म्हणजे हे विचार कधीही कोठेही लागू पडू शकतील असेच आहेत ना!
आईन्स्टाईनचा जन्म जर्मनीतला व तो वंशाने ज्यू होता पण हिटलरच्या ज्यूवंश द्वेषाने त्याचा जर्मनीचा संबंध कायमचा तोडला.पण त्या पूर्वीच त्याने युरोप,अमेरिका देशाचे नागरिकत्व तसेच इस्त्रायल देशाचा राष्ट्रप्रमुख म्हणून व्हायची संधी नाकारताना त्याचे जागतिक देशांमध्ये शांती नांदावी म्हणून “
एक सर्वराष्ट्रीय संघटना असावी जिच्याकडे खरे अधिकार असतील जी जगाला युद्धापासून दूर ठेवील” अशी विचारधारा युद्धाने त्याला थोड्याफार जखमा दिल्या हे दिसते.
पण सर्वात मोठी काळी जखम म्हणजे अणूबांम्ब आणि आईन्स्टाईन हे विचित्र समीकरणाने त्याला दिलेले दु:ख..आपल्या शोधाचा खरे पाहता विज्ञानाचा दुरुपयोग कोणत्याही आयुष्य नैतिकपणाने जगणाऱ्या संशोधकाला पिडा देणारच आहे.त्यावरील प्रकरण विशेष आहे.
तसेच नोबेल पुरस्कार त्याला ह्या सुत्रासाठी न मिळता सापेक्षता या सिंद्धांतासाठी मिळाला हि त्यातील जमेची बाजू वाटते.
वैयक्तिक आयुष्यात तो जसा अलिप्त होता ,नात्यांमध्ये भावनिक जास्त काळ त्याला गुंतून राहणे जमत नसत.पण तरीही तो सर्वांना हवाहवासा होता ,म्हणून तर त्याची मिस्कील जीभ बाहेर काढून दिलेली प्रचि सहज मिळाली ना!साधी राहणीमान असली तरी घरातील भव्यता आणि नौकायनाचा छंद हे त्याचे आयुष्याचा पुरेपूर आनंद घेण्याचा दृष्टीकोन दाखवितो.
आयुष्याच्या शेवटपर्यंत तो स्वत:च्याच संशोधनात नवनवीन गोष्टी शोधत राहिला,असे हे गारुड कधीच न संपणार!
मराठी आवृत्तीबाबत खूपच समाधानकारक पोचपावती मला द्यावी वाटते.
-भक्ती
प्रतिक्रिया
आईनस्टाइन नोबेल फोटो-ईलेक्ट्रीक ईफेक्ट्साठी मिळले होते
आईन्स्टाईन प्रभावी संशोधक
पुस्तकाच्या माहिती बद्दल धन्यवाद
छान परिचय.
@नेत्रेश
१८ एप्रिल , आयन्स्टाइन स्मृतिदिन
_/\_
In reply to १८ एप्रिल , आयन्स्टाइन स्मृतिदिन by Bhakti
वरील