नमस्कार मिपा मंडळी,
बरोबर २ वर्षापूर्वी दर महा १०% परतावा शक्य आहे का? हा लेख मी मिसळपाववर लिहीला होता. त्यावर बरीच धूळ उडाली. मला काही आह्वाने दिली गेली. पण मी माझ्या स्वतःवरच्या ठाम विश्वासाने माझी वाटचाल
आणि संशोधन इथे न येता चालूच ठेवले.
सांगायला आनंद वाटतो की मार्च २०२० मध्ये माझा ट्रेडींग पोर्ट्फोलिओ ६०% तोट्यात जाउनही आज माझी मान ताठ आहे. याचे कारण माझा स्वतःवरचा विश्वास. असो.
या कालावधीत मी पूर्णपणे माझी दोन तंत्रे विकसित केली. ही तंत्रे अशी -
० स्मार्ट मनी फुट प्रिंट - महाजनो येत गतः स पन्थः या सुप्रसिद्ध श्लोकातून प्रेरणा घेऊन स्मार्ट मनी कोणत्या दिशेने जातो आहे हे फक्त OHLC डेटा वरून ओळखण्याचे तंत्र. या तंत्राने FII, DII प्रमोटर्स कुठे खरेदी करत आहेत याचा शोध घेता येतो. तंत्र गुंतागुंतीचे असून मराठीत वा इंग्लीश्मध्ये समजावायचा उत्साह मला सध्या तरी नाही. कारण यासाठी मी ChartAlert आणि R ही दोन सॉफ्टवेअर्स वापरतो. Daily, Weekly आणि Monthly टाईमफ्रेमवर NIFTY 500 मधिल समभाग अभ्यासून मग ते खरेदीसाठी निवडले जातात.
० प्राईस डेव्हीएशन प्रोफाईल - समभागाची किंमत रास्त आहे की नाही हे ठरवणे. ब-याच आपण महाग अथवा अवाजवी किंमतीला समभाग खरेदी करतो. स्मार्ट मनी फुट प्रिंट तंत्राने सुचवलेला एखादा स्टॉकची किंमत अवाजवी वाढलेली असू शकते आणि ते धोक्याचे असते. या तंत्रावर मी मिडीयमवर लिहिलेला लेख जिज्ञासूनी जरूर वाचावा.
ज्यांना याचा स्वत:च्या जबाबदारीवर फायदा घ्यायचा असेल त्यांनी माझा फेसबुक समूह अवश्य जॉईन करावा...
प्रतिक्रिया
7 Apr 2021 - 10:56 am | युयुत्सु
तुम्ही माझ्याकडे यावे अशी माझी अपेक्षा नाही. माझ्यावर विश्वास ठेवावा अशी पण अपेक्षा नाही. मार्केटमध्ये रास्त अपेक्षा ठेवऊन काम करणे फार महत्त्वाचे असते. माझ्यासाठी हे रास्त अपेक्षेचे आह्वान मी स्वीकारले. माझ्या तंत्रामधला जो भाग शेअर करता येण्यासारखा आहे, तो शेअर केला आहेच. त्याचे महत्त्व जाणकरांना समजले आहेच. जे उघड केले नाही ते त्यातील अडचणी मो़कळे पणाने सांगितल्या आहेत. असो...
7 Apr 2021 - 10:56 am | युयुत्सु
तुम्ही माझ्याकडे यावे अशी माझी अपेक्षा नाही. माझ्यावर विश्वास ठेवावा अशी पण अपेक्षा नाही. मार्केटमध्ये रास्त अपेक्षा ठेवऊन काम करणे फार महत्त्वाचे असते. माझ्यासाठी हे रास्त अपेक्षेचे आह्वान मी स्वीकारले. माझ्या तंत्रामधला जो भाग शेअर करता येण्यासारखा आहे, तो शेअर केला आहेच. त्याचे महत्त्व जाणकरांना समजले आहेच. जे उघड केले नाही त्यातील अडचणी मो़कळे पणाने सांगितल्या आहेत. असो...
7 Apr 2021 - 5:53 pm | चौकस२१२
आपले तंत्र एक तंत्र म्हणून विचार करायला काहीच हरकत नाही हो .. प्रश्न आहे १०% महा असले दावे करणे .. त्यापेक्ष आपण फक्त "शेर शोधनाची २ तत्वे / तंत्रे " असे काही लिहिले असते तर आधीच्या वर्षीच्या धाग्यात आणि यात पण एवढा धुरळा उडालं नसता !
तुम्ही माझ्याकडे यावे अशी माझी अपेक्षा नाही.
जेथे -६०% ते +१०% महिना असा दावा केला जातो त्याकडे कोण जाणार !
7 Apr 2021 - 4:58 pm | युयुत्सु
"फंड म्यानेजर ला त्याचा आधीच्या "परफॉर्मन्स " चा लेखा जोखा द्यावा लागतो "
तो लोकांचा पैसा घेऊन खेळतो. मी स्वत:च्या पैशाने खेळतो.
7 Apr 2021 - 5:42 pm | चौकस२१२
तो लोकांचा पैसा घेऊन खेळतो
हो माहिती आहे आणि तुम्ही फंड मॅनेजर नाही हे हि माहित आहे .. मुद्दा होता "एखाद्याने दावे करणे आणि त्याचे प्रत्यक्ष जोखीम पत्करून दाखवल्याचे पुरावे ना देणे हा..."
पण तुम्हाला असे प्रश्न विचारलेलं आवडले दिसत नाहीये ( आपला आधीचा खरे यांचं बरोबर चा संवाद !) पण एकीकडे "मला कसे जादूची कांडी सापडली आहे " हे विधान मात्र आपण केलेत
असो ज्याची गुंतवणूक ६० खाली जाते आणि नंतर असा दावा करण्यात येतो कि "महिना १०% कमाई होऊ शकते" हे म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असं दिसतंय ..
अंटार्र्जलवरील अनेक "ट्रेडिंग गुरु" पैकी नमुना ..
7 Apr 2021 - 5:55 pm | युयुत्सु
तुम्हाला सुताने स्वर्ग गाठायला फार आवडते असे दिसते. मी स्वत:ला ट्रेडींग गुरु मानत नाही आणि मला कोणी म्हणावे असे ही मला वाटत नाही.
7 Apr 2021 - 6:14 pm | चौकस२१२
तुम्ही स्वतःला ट्रेडिंग गुरु माना अथवा नाही ..ते सर्व जाऊद्या.. जो दावा केलाय त्याचा पुरावा देता का ? तुम्हीं ती तंत्र वापरून असा परतावा आणि तो सुद्धा लांब पर्यंत मिळवलाय का ... आणि सुतावरून स्वर्ग हे काय .. दावा तुम्ही करणार आणि कोणी विचारलं तर उत्तर टाळणार ! मग लोक शंका घेणारच ...
तंत्र असेल हो तुमचे चांगले नाही घेतली शंका.. प्रश्न मोठाल्ले दावे करण्याचा आहे ...मी एकटा नाही इतरांनीही यावर प्रश्न विचारले आहेत
2 May 2021 - 9:53 am | युयुत्सु
माझ्या ट्रेडींग मॉडेलचे कल्पनाचित्र (visualization)
High probability stocks जास्तीत जास्त अचूकतेने ओळखण्यासाठी या कल्पनाचित्राची मदत होते. या आकृतीमधले रंगीत मणी समभागांचे निदर्शक आहेत.
हिरवे आणि तांबडे हे पडलेले समभाग आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरु झाली (तिमाही निकाल, व्यवसाय बातम्या) की ते त्यांचा रंग बदलतो ते निळ्या गटात येतात. निळ्या आणि काळ्या गटातल्या समभागांमध्ये भरमसाठ खरेदी चालू आहे. सर्वात धोकादायक समभाग काळ्या गटातले आहेत. कारण त्यातली बेसुमार खरेदी अतिलोभापोटी आहे म्हणून निळ्या गटातले समभाग हवा तसा परतावा देण्याची शक्यता जास्त. याशिवाय यांची खरेदी मोठ्या धेंडानी (smart money) केलेली असते. त्यामुळे यातील काही समभाग तात्पुरते खाली आले तरी नंतर ते लगेचच वर जातात. उदा० Dredging Corp मधली मोठी खरेदी तांबड्या वर्तुळाने दाखवली आहे. या नंतर हा समभाग करेक्ट झाला आहे. पण विक्रीचा व्हॉल्युम तूलनेने कमी आहे. त्यामुळे घाबरायचे कारण नाही.
टीप - १% वाल्याना हे कळावे अशी अपेक्षा नाही
2 May 2021 - 9:56 am | युयुत्सु