मनोज दाणींच्या पानिपतवरील चित्रमय ग्रंथातील काही अन्य पेंटींग्ज -शनिवार वाडा सन १८२०

Primary tabs

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
14 Mar 2021 - 4:21 pm

अत्यंत कष्टपूर्वक मिळवलेल्या जुन्या वास्तूंपैकी मराठी मनाला भावणारी शनिवार वाडा वास्तू सन १८२० साली एका चित्रकाराच्या दृष्टीतून कशी दिसत होती याची झलक मिळते. मुख्य प्रवेश द्वारावरील जयपूर शैलीतील कलाकुसर १९ झुपकेदार फुलांंचे डिझाईन वरच्या पट्टीतील सजावट मोहक दिसते.

2

सध्या हे प्रवेश द्वार असे दिसते.
मात्र काही बारकावे प्रत्यक्षातील इमारतीशी जुळत नाहीत. उदा. शनिवारवाडा या निळ्या पाटी वरील सज्जातील खालचे १० भाग. बाजूची कमलपुष्पे वगैरे

2

आत ३ मजली इमारती होत्या असे दाखवणारे हे चित्र आहे.

2

सध्या फक्त चौथरे दिसतात तिथे काय बांधकाम असू शकते याची झलक मनोज जींनी या चित्रात दाखवली आहे. याठिकाणी ओसऱ्या वर भेटीसाठी आलेल्यांची बसायची सोय असावी... असे काहींचे मत आहे.
2

सध्या हे चौथरे असे दिसतात
2

मांडणीआस्वाद

प्रतिक्रिया

१९२१ च्या सुमारास प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या भारतभेटीत ते पुण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी पर्वती, शनिवारवाडा या जागांना भेट देण्याचं ठरवलं होतं. एवढा मोठा माणूस येण्यार म्हणल्यावर तत्कालीन ब्रिटिश सरकार कामाला लागले, वाड्यातील जुने अवशेष नक्की काय आहेत यासाठी उत्खनन केले गेले. महत्वाचे म्हणजे नगारखान्यातील दुरुस्ती केली गेली, तिथले कठडे वगरे गायब होते, ते कोनकर वाड्यातून आणून बसवलेले आहेत, त्यामुळे नगारखान्याचे स्वरूप आज आपल्याला थोडे बदललेले दिसते. कमलपुष्पे चित्रात थोडी वेगळी काढली आहेत, हे निरीक्षण बरोबर आहे.

तुषार काळभोर's picture

15 Mar 2021 - 8:06 am | तुषार काळभोर

गेल्यावर चौथरे पाहून प्रत्येक वेळी प्रश्न पडतो की या इमारती प्रत्यक्षात कशा असतील. सात मजली बांधकाम कसं असेल. वेगवेगळ्या महालांचे उल्लेख वाचलेले असतात. ते आकाराने केवढे असतील.

दुर्गविहारी's picture

15 Mar 2021 - 10:28 am | दुर्गविहारी

एका उत्तम विषयाला हात घालणारा लेख.वास्तविक शनिवारवाड्यात इंग्रजांची वर्दळ अगदी सुरवातीपासून असणार, त्याच्या नोंदी आणि चित्र त्यांनी नक्कीच कोठेतरी असू शकतील.दुर्दैवाने हा ठेवा आपल्याला आज उपलब्ध नाही.पेशवाईत बरेच स्थैर्य लाभले असल्यामुळे कदाचित पेशव्यांनी शनिवार वाड्याची चित्र काढून घेतलेली असू शकतात. या दृष्टीने शोधमोहीम राबवून काही मिळते आहे का बघायला हवे.

बाकी हा लेख तुटक वाटला. याविषयावर सविस्तर लिहिलंत तर फार बरं होईल. तुमच्या लेखणीतुन वाचायला आवडेल.

योगविवेक's picture

16 Mar 2021 - 10:57 am | योगविवेक

दुर्ग विहारींनी केलेले निवेदन की लेख तुटपुंजा वाटतो... बरोबर आहे. मला ही तसेच वाटते..तसे का ते ओकसरच सांगू शकतील...
मला त्यांनी काही वर्षापुर्वी तयार केलेली चित्र फित आठवते. त्यात भूत बंगला आहे कि नाशी याचा शोध घेतला होता.
मी ओक सरांना विनंती करतो की शक्य असेल तर ती फीत इथे टाकावी.