ती

Primary tabs

आर्णव's picture
आर्णव in जे न देखे रवी...
7 Mar 2021 - 7:34 am

हिरवी गर्द वनराई, भोवताली पर्वत रांगा
ते भिरभिरणारे पक्षी, ती संथ प्रवाही गंगा
डोळे भरून पाहताना, ते स्मरणी साठवताना
मज ती अचानक दिसली, विवस्त्र स्नान करताना

भोळी आदिवासी अबला, स्वच्छंद तिच्या जल क्रिडा
ना भोवतालची जाण, संकोच, भीती ना पीडा
सौंदर्य मिसळले होते, सृष्टी ने तिच्या यौवनात
कोलाहल होता उठला, माझ्या अस्थिर मनात

क्षण मोहाचा सामोरी, क्षण नाजूक परी अघोरी
क्षण लपवणे ही चोरी, क्षणात पाटी कोरी
क्षणभर गढूळ झालो मी, ती क्षणाचीच कसोटी
क्षणी भानावर ज्या आलो,तो क्षण किमती कोटी कोटी

त्या दिवशी पर्वत, वारा, व्योम, सूर्य अन पाणी
हे सर्व तिला पाहून, विरक्त राहीले होते
मग मी ही विलीन झालो, त्या पंचमहाभुतात
निसर्ग होऊन तिला मी, अनासक्त पाहिले होते

कविता

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

7 Mar 2021 - 6:00 pm | कर्नलतपस्वी

क्षण मोहाचे विचलित करिती मजला
झुगारुन दे सर्व संस्कार मिळालेले तुजला
क्षणभर भान हरपले माझे पाहुनी भीत्तीचित्राला
कळले मज नसे मर्यादा कलाकार आणी कल्पनेला

सुंदर कल्पना, सुरेख विचार

कर्नलतपस्वी's picture

7 Mar 2021 - 6:02 pm | कर्नलतपस्वी

क्षण मोहाचे विचलित करिती मजला
झुगारुन दे सर्व संस्कार मिळालेले तुजला
क्षणभर भान हरपले माझे पाहुनी भीत्तीचित्राला
कळले मज नसे मर्यादा कलाकार आणी कल्पनेला

सुंदर कल्पना, सुरेख विचार