लॅपटॉप साध्या कामासाठी - Laptop for Basic Work

हेमंत सुरेश वाघे's picture
हेमंत सुरेश वाघे in तंत्रजगत
6 Mar 2021 - 11:32 am

लॅपटॉप घेताना अनेक जण गोधळतातयात
अनेकांना फार साधी कामे करायची असतात.

आणि तरीही गरज नसतील तर उद्या लागेल म्हणून प्रचंड ताकदीचा लॅपटॉप घेतला जातो - वस्तूत: हि ताकद कधीही वापरली जात नाही - किंवा फार क्वचित वापरली जाते .
अनेकदा दुकानदार तुम्हाला अति ताकदवान लॅपटॉप उद्या लागेल म्हणून विकतो , वस्तूत: तितकी ताकद कधीही लागत नाही, ताकदवान प्रोसेसर हे महाग असतात आणि त्याचे दुकानदाराला अधिक फायदा मिळतो .आज लॅपटॉप अतिशय मागणी आल्याने आणि चीन मधून पुरवठा बराच कमी झाल्याने लॅपटॉप च्या किमती - नवीन आणि जुन्या फार वाढल्या आहेत . आणि आता मार्केट खराब असल्याने पैसे वाचवणे ही गरज झाली आहे.
तसेच इंटेल चे आय सिरीज च्या जुन्या प्रोसेसर चे लॅपटॉप हि आय सिरीज चे आहेत म्हणून विकले जातात . यातील काही फार जुने असतात. थर्ड जनरेशन च्या आय ३ प्रोसेसर हे २०१२ ला लाँच झाले होते आणि २०१४ पर्यंत विकत होते फार फार तर २०१५ पर्यंत - म्हणजे हे ५ वर्षे जुने लॅपटॉप आहेत .बरेच नवीन पेंटियम हे सेकण्ड / थर्ड जनरेशन च्या आय ३ / आणि काही आय ५ पेक्षा पॉवरफुल आहेत - आणि जर बेसिक काम असेल तर पुरेसे आहेत .

बहुसंख्य लोकांची कॉम्प्युटर वर कामे असतात

१) इंटरनेट ब्राउजिंग - फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही .
यात मी मी सांगेन कि बरेच  टॅब उघडून ठेवायची सवय असेल तर गुगल क्रोम वापरू नका .- त्याऐवजी ऑपेरा / ब्रेव्ह / इज असे ब्राउसर वापरून पहा - फायरफॉक्स - पूर्वी चांगला होता - आता तो हि लोड देतोय असे दिसले आहे . 
२) व्हिडीओ कॉल - झूम वगैरे - याला हि फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही
३) मायक्रोसॉफ्ट ऑफिस -वर्ड . एक्सेल फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही पॉवर पॉइंट वापरायचा थोडी जास्त , पण काम चालून जाते .४) व्हिडिओ बघणे ( व्हीलसी वगैरे)
५) गाणी ऐकणेवरील कामासाठी फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही
बरीच सॉफ्टवेअर पण कमी प्रोसेसिंग पॉवर वर चालतात
अनेक प्रोग्रामिंग च्या युटीलिटी ही कमी प्रोसेसिंग पॉवर वर सहज चालतात.
त्याचबरोबर ऑनलाइन टीव्ही आपणास ब्राऊसर मध्ये बघता येईल

आय ३ हा प्रोसेसर फार जास्त होईल आणि आता किमती ही वाढल्या आहेत .
इंटेल ने पेंटियम हे तुलनेने स्वस्त प्रोसेसर काढले आहेत -
पेंटिअम मध्ये हि गोल्ड सिल्व्हर आणि क्वाड कोअर आहेत ( quad core - 4 cores)
तसेच एएमडी या कंपनीचे अनेक स्वस्त प्रोसेसर आहेत मी यात AMD A6 / A8 / A9 / A10 सुचवतो.

लॅपटॉप फार बाहेर नेण्याची गरज नाही तर आपण १५. ५ इंची स्क्रीन चा घ्या - हे तुलनेने स्वस्त आणि जड असतात - पण स्क्रीन तुलनेत मोठी असते .
सिनिअर सिटीझन / विद्यार्थी साठी चांगले .

रॅम हे कमीत कमी ४ जीबी - शक्यतो ८ जीबी घ्या - रॅम हे डीडीआर ४ प्रकारचेच घ्या डीडीआर ३ रॅम जुने तंत्रद्नाण आहे आणि ते स्लो असते.
हार्ड डिस्क शक्यतो एसएसडी प्रकारची घ्या - तिने चांगला स्पीड मिळतो पण जर साधी हार्ड डिस्क असेल तर आपणास सहज एसएसडी हार्ड डिस्क टाकू शकतो - साधारण २४० जीबी एसएसडी अडीच तीन हजारात यावी आणि विकत जिकडून घेता तिकडेच आपणास बदलून मिळेल . त्याला बदलण्याचा आणि त्यावर विंडोज परत लोड करण्याचा चार्ज किती ते विचारा

तर बेसिक लॅपटॉप साठी सुचवलेले स्पेसिफिकेशन

Processor - Intel Pentium or AMD A4/A6/A8/A9/A10 *
Ram - 8GB DDR 4 **
Hard Disk - Preferred SSD or 1 TB of hard disk***
Screen - 15.5 Inch
If you are used to num pad see if there is num pad

* याहून ही स्वस्त आणि स्लो प्रोसेसर आले होते पण आता ते मला तरी मार्केट मध्ये दिसले नाहीत - खरे तर ते ही चालून जावेत - हे प्रोसेसर म्हणजे Intel Atom Intel Celeron, Amd Sempron (mostly discontinued)
**बऱ्याचदा लॅपटॉप मध्ये ४ जीबी रॅम असते - तर अनेक लॅपटॉप मध्ये हे रॅम वाढवता येते - फक्त एक रॅम चा स्लॉट खाली आहे आणि किती रॅम वाढवता येईल त्याची चौकशी करा . तो दुकानदार रॅम वाढवून देतोय का ते विचारा .
***हार्ड डिस्क च्या जागी SSD  टाकता येते - आणि त्याने स्पीड वाढतो .

आता वेगळ्या आकाराच्या वेगळा कनेक्टर असलेला आणि अधिक फास्ट अशा M. 2 हार्ड डिस्क आल्या आहेत ,
आणि त्यात हि २ प्रकार आहेत
m.2 SATA
m.2 NVME - हि सर्व प्रकारात फास्ट आहे
आपल्या लॅपटॉप ला कोणता m.2 स्लॉट आहे ते बघा आणि हा असेल तर नेहमीची हार्ड डिस्क ठेवून हि अजून एक लावतात येते - ऑपरेटिंग सिस्टीम व सर्व महतवाचे प्रोग्राम हिच्यावर घ्यावे .
हे बदलणे हे काहीवेळा कौशल्याचे होऊ शकते - त्यामुळे ते विचारून , योग्य ते पार्ट आणून सर्व्हिस सेंटर मधून करून घ्यावे आणि त्याबरोबर वॉरंटी वर काही परिणाम होणार नाही का हे पण विचारावे . आता रॅम / हार्ड डिस्क बदलणे साठी लॅपटॉप उघडावा लागतो

अधिक ची वॉरंटी - अनेकदा लॅपटॉप अधिक ची वॉरंटी विकतात - नॉर्मल वॉरंटी वर बहुतेक वेळा २ वर्षे वाढवून मिळतात - यात बॅटरी आणि अडाप्टर सोडून सर्व कव्हर होते - तरी मला तरी याचा फायदा मिळाला आहे - तर हि वॉरंटी घ्यावी . अनेक दा कंपनी च्या स्कीम असतात आणि वॉरंटी स्वस्तात वाढवून मिळते

कंपनी च्या स्कीम - या काय आहेत ते बघा - बर्याचदा खूप फायदेशीर असतात . अनेकदा या डुलकण आत नाहीत सर साईट वर जाऊन लॅपटॉप रजिस्टर करावा लागतो

तर यावरून आपणास आपल्या सर्वसामान्य गरजेसाठी लॅपटॉप सहन शोधता येईल अशी आशा करतो .
हेमंत वाघे
HuntMyJob.in
Coming Soon
Job Hunt Support – Basics, Preparation, Resume, Approach

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

15 Apr 2021 - 7:23 am | तुषार काळभोर

प्रश्न दुसऱ्या प्रतिसादावर आहे, पण माझ्यापुरतं उत्तर देतो.
मी विंडोज १० वापरतोय. त्यावर एकही अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नाही.
विंडोज १०चं स्वतःचं डिफेंडर अँटीव्हायरस पुरेसं सुरक्षित आहे.
आणि या लॅपटॉप वर होणारी बहुतेक सगळी कामे ऑनलाईन असतात. उदा मुलाचा ऑनलाईन वर्ग, ऑनलाईन खरेदी, NetBanking, शेअर्स चे व्यवहार, बाकी इंटरनेट ब्राउझिंग, युट्यूब, व्हॉट्सॲप वेब, टेलिग्राम (पिक्चर डाऊनलोड करण्यासाठी), असं सगळं काही त्यावर सुरक्षित पणे करता येतं.

वामन देशमुख's picture

26 Apr 2021 - 9:17 pm | वामन देशमुख

एकही अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नाही पण व्हायरस आलेला नाही.

माझ्याही स्वत:च्या विंडोज् १० लॅपटॉपवर अँटीव्हायरस नाही आणि व्हायरसचा कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही.

आनन्दा's picture

18 May 2021 - 11:27 am | आनन्दा

मला पण असेच वाटत होते, पण मधल्या काळात एका कंपनीत training द्यायला गेलो होतो, तेव्हा त्या कंपनी च्या फायरवॉल ने माझा लॅपटॉप ब्लॉक केला malware असल्यामुळे.

तेव्हा अँटी व्हायरस टाकून सगळे साफ करून घेतले. आता सरळ ubuntu वापरतो, टेन्शन कमी.

Bhakti's picture

18 May 2021 - 11:37 am | Bhakti

+१

चौथा कोनाडा's picture

18 May 2021 - 11:45 am | चौथा कोनाडा

आजारी पडल्याशिवाय औषधाची किंमत कळत नाही !

चौथा कोनाडा's picture

20 Mar 2021 - 8:12 am | चौथा कोनाडा

वाघोबासाहेब,
लॅपटॉप साध्या कामासाठी (Laptop for Basic Work) साठी तीन चांगले ब्रँड्स, कॉनफिगरेशन, किंमत, वैशिष्ट्ये या सह सुचवल्यास उत्तम राहील.

मुक्त विहारि's picture

20 Mar 2021 - 10:10 am | मुक्त विहारि

Second Hand ....

साधारण पणे, निम्म्या किंमतीत खालील गोष्टी होतील

Microsoft ची सगळी कामे

Internet

चौथा कोनाडा's picture

21 Mar 2021 - 12:46 pm | चौथा कोनाडा

ओक्के, हा ही पर्याय विचारात घ्यायला हरकत नाही !

मुक्त विहारि's picture

21 Mar 2021 - 12:56 pm | मुक्त विहारि

बनवून घ्या ....

तूमच्या गरजेनूसार, प्रोफेसर, हार्ड डिस्क, टाकता येते

शिवाय, एक्स्ट्रा पोर्टस् पण टाकता येतील, असे वाटते

मुक्त विहारि's picture

20 Mar 2021 - 10:25 am | मुक्त विहारि

स्वस्त पडला, 10-12 वर्षे झाली , अद्याप तरी टिकून आहे...

Second hand लॅपटाॅप्स, अजून तग धरून आहेत...गेली 14-15 वर्षे जुना असलेला, Acer अद्याप जिवंत आहे...

ashok dalvi's picture

24 Mar 2021 - 9:43 pm | ashok dalvi

छान महिती

मराठी_माणूस's picture

31 Mar 2021 - 12:44 pm | मराठी_माणूस

क्रोम मधे फक्त एकच साईट ओपन असताना , टास्क मॅनेजर मधे ८ chrom.exe चालु असताना दिसतात. असे का ? त्या एंड टास्क केल्या तरी नविन तयार होत रहातात.

"90,000 रुपयांचा लॅपटॉप अवघ्या 29 हजारात, 13 हजारांचा लॅपटॉप 10 हजारात, वॉरंटीसह" https://www-tv9marathi-com.cdn.ampproject.org/v/s/www.tv9marathi.com/tec...
-------

@ हेमंत वाघे,

ही गोष्ट कितपत खरी आहे?

लॅपटाॅप्स खरोखरच स्वस्त झाले आहेत का?

नाही, उलट लॉकडाऊन सुरु झाल्यापासून फोन, लॅपटॉप इ. च्या किंमती वाढल्या आहेत.

वरच्या लिंकमधल्या बातमीचे शीर्षक दिशाभूल करणारे आहे. तिथले हे वाक्य पहा - (सूचना : यामध्ये तुम्हाला रिफर्बिश्ड (नुतनीकरण करण्यात आलेले) लॅपटॉप्स खरेदी करता येतील.)

मुक्त विहारि's picture

26 Apr 2021 - 9:39 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

वामन देशमुख's picture

26 Apr 2021 - 9:35 pm | वामन देशमुख

रच्याक,

या धाग्यावर हा प्रतिसाद अस्थानी वाटला तर क्षमस्व.

मागच्या वर्षाहून अधिक काळ WFH सुरु आहे आणि अजून वर्षाअखेरपर्यंत तरी WFH संपेल असे वाटत नाहीय. याआधी कधीच घरी बसून इतका वेळ लॅपटॉप / डेस्कटॉप वर काम केलं नव्हतं.

मी एक collapsible टेबल बनवून घेतलंय आणि त्यापुढे आता एक चांगली कॉम्पुटर खुर्ची हवीय. जवळच्या दुकानांमध्ये पाहून आलो पण काही पसंद पडेना. ऑनलाईन शोधलं पण गोंधळ उडतोय. मिपाकरांपैकी कुणी अशी खुर्ची घेण्यासाठी योग्य लिंका / युजर फीडबॅक देऊ शकेल का?

मुक्त विहारि's picture

26 Apr 2021 - 9:46 pm | मुक्त विहारि

टेबलाची उंची आणि तुमची उंची आणि लॅपटाॅपची स्क्रीन, ह्या तिन्ही गोष्टी, रडीमेड मॅच होत नाहीत...

तुमची उंची, तुम्ही कमी-जास्त करू शकत नाही

त्यामुळे टेबलाची उंची आणि लॅपटाॅपची स्क्रीन, Adjust करणे किंवा खुर्चीची उंची Adjust करणे, ह्या पैकी एकच पर्याय शिल्लक राहतो...

मी खुर्ची प्रमाणे, संगणकाच्या टेबलाची उंची Adjust केली आहे, कारण खुर्ची दणकट आहे...

तुम्ही, खुर्ची बनवून घेणे, हा दुसरा पर्याय पण अवलंबू शकता....

Flipkart

लिंक पहा...मी वापरतोय ही खुर्ची, हाईट अ‍ॅडजस्टेबल आहे, अगदी आपल्या ऑफिसांत असतात त्याच प्रकारची...

सिरुसेरि's picture

28 Apr 2021 - 5:26 pm | सिरुसेरि

खुर्चीसाठी उपयुक्त लिंक . टेबल घेण्यासाठीही अशी एखादी लिंक असेल तर सुचवा .

अमर विश्वास's picture

26 Apr 2021 - 9:53 pm | अमर विश्वास

हाय एन्ड गेमिंग पीसी वर एखादा धागा येउद्या

चौकस२१२'s picture

27 Apr 2021 - 8:33 am | चौकस२१२

कामासाठी चांगल्या दर्जाचे ग्राफिक कार्ड लागते आणि १७ इंच मॉनिटर त्यामुळे तसा लॅप टॉप हि.. आत्तापर्यंत दोन वेळा एच पी चा वापरला त्यानंतर https://in.msi.com/ यांचा खालील लॅपटॉप गेले ४-५ वर्षे वापरतोय उत्तम ३ वर्षांनी बॅटरी मात्र गेली , त्या आधी एच पी पण असेच .. उष्णतेमुळे
( येथे सर्वसाधारण तापमान २० ते ३५ कधी भारतातात किंवा आखाती देशात गेलो तेव्हा ४० )
WT170 20K
१७ इंच , डीव्हीडी ड्राईव्ह ( त्यामुळे एकूणच जड + पॉवर सप्लाय )
रॅम = ३२ जि बी
६४ बिट सिस्टीम
एन व्हिडीआ qUADRO CARD
आता तेवढ्याच किमतीती जास्त काही मिळेल

अमर विश्वास's picture

27 Apr 2021 - 11:09 am | अमर विश्वास

धन्यवाद चौकसजी

जरा शांतता झाल्यावर एक high end PC असेम्बल करायचा प्लॅन आहे.

हौसच जास्त ... कारण ऑफिस चा लॅपटॉप आहे .. त्याला पर्याय नाही

मुक्त विहारि's picture

27 Apr 2021 - 11:33 am | मुक्त विहारि

पार्टस् कुठले वापरले आणि खर्च किती आला?

हे पण सांग

गॉडजिला's picture

1 May 2021 - 12:50 pm | गॉडजिला

जर तुम्ही सॉफ्टवेअर बनवत नसाल तर एक मस्त आयपॅड घ्या त्यावर बॅटरी मस्त आहे, लॅपटॉपपेक्शा पावरफुल आहे, मॅजिक किबोर्ड जोडला कि लॅप्टोप प्रमाणे काम करता येते, जागा व्यापत नाही, अतुल्य साउंड पिक्चर अन कॅमेरा क्वालिटी मिळते. हाताळायला सुलभ असल्याने ती सर्व कामे जी लॅपटॉपवर होतात ती यावर लिलया केली जातात.

सध्या महाविद्यालयात जाणार्या मुलासाठी लॅपटॉप घ्यायचा विचार होता. मुलगा जंगल, प्राणी इ. मध्ये अत्यंत रस घेतो आणि त्यातच त्याला करियर करायचे आहे. कधी मधी व्हिडीॅओज करतो, पण पूर्णपणे तेच करायचे आहे असे नाही. मुलीला मात्र जनरल कामासाठीच लॅपटॉप हवा आहे.
@गॉडजिला, सध्या (मे २०२१) ३२ जीबी चे आयपॅड २९९९० रु. ला मिळत आहे. मॅजिक किबोर्ड १५००० ला. म्हणजे ४५००० झाले. पेन्सिल ८००० रु. मात्र, ती फारशी गरजेची नाही. म्हणजे हे प्रकरण ४५००० रु पर्यंत जातेच. मी नुकतेच काही कोट्स घेतले आणि खालील कॉन्फिगरेशनच्या किमती साधारण ५०,००० च्या आसपास आहेत.
रायझेन ५/ आय ५ प्रोसेसर, ८ जीबी रॅम, ५०० टीबी एसएसडी, १ टीबी एचडीडी, व्हीजीए इंटीग्रेटेड ग्राफीक्स (बेसीक व्हिडीओ एडीटींग साठी पुरेसे), विंडोज १०, होम ऑफिस २०१९ सह - डेल आणि एच पी मध्ये उपलब्ध
त्यामुळे आयपॅडचा पर्याय स्वस्त तर फारसा नाही, पण कदाचित काही कामांकरिता एकदम अडचणीचाही ठरू शकतो. तसा अडल्या नडल्या कामासाठी घरी डेस्कटॉपही आहे.
मी स्वत: ऑफिसच्या कामासाठी (युएक्स डिझाइन) मॅकबुक प्रो गेली ७-८ वर्षे वापरत आहे. त्याचे सर्वात स्वस्त मॉडेल एम१ चिपसहित सध्या रू ९२५०० ला उपलब्ध आहे. हार्डवेअरचा दर्जा अतुलनिय आहे, पण मुलांचा वापर पाहता, एवढे पैसे मॅकमध्ये गुंतवावेत का? असे वाटते. शिवाय इतर मुलांकडून शेअर होत असलेल्या सॉफ्टवेअरसहीत अनेक गोष्टी मॅकवर सहजपणे मिळणार नाहीत. विंडोज ऑफिस मॅकसाठी घ्यायचे तर त्याचा १० एक हजार खर्च येणारच. एक वेगऴाच मुद्दा म्हणजे चोरीची रिस्क. कंपनीसारख्या सुरक्षित वातावरणात लॅपटॉप न वापरता, मुले तो कुठेही घेऊन जाऊ शकतात. मॅक किंवा आयफोन ट्रॅक होतो, व सापडतो हा गैरसमज आहे, याचा मला प्रत्यक्ष अनुभव आहे.
… त्यामुळे तूर्त तरी ५० हजाराचा मिड रेंज लॅपटॉप घेऊन टाकावा, या विचारात आहे.

स्वधर्म's picture

28 May 2021 - 12:07 pm | स्वधर्म

सर, तुम्ही या धाग्यावररून गायबच झालात. कुठलीतरी खवचट प्रतिक्रिया आली म्हणून एकदम संन्यास घेऊ नका. तुमच्या टीप्स नक्कीच उपयोगी आहेत.

गॉडजिला's picture

28 May 2021 - 12:23 pm | गॉडजिला

खरे तर पेन्सिल जास्त गरजेची आहे आयपॅड वापरत असाल तर.

पेन्सिल सोबत असेल तर इलर्निंग अनुभव हा आय पॅड मध्ये सर्वोत्तम आहे, कीबोर्ड ची गरज नाही, एक आय पॅड पाठीला बांधला कि कॉलेजला जायला रेडी, नोट्स पासून ईबुक पर्यंत सर्व काही हातात . शिवाय फोटो काढणे, स्टुडीओ क्वालिटी साउंड रेकॉर्डिंग, व्हिडीओ एडिटिंग हे सर्व सध्याचा आय पॅड लीलया करतो जे मुलाला फायदेशीर असेल...

माझा एक डिजाईन इंजिनिअर परिचित आहे तो निम्मे काम मॅक व निम्मे आय पॅड वर पूर्ण करतो कारण त्यावर हाताळणी माउस कीबोर्डपेक्षा सोपी आहे...

आय पॅड एअर, अथवा प्रो दुप्पट तिप्पट महागडे आहेत पण जर तो कलाकार होणार असेल तर ती गुंतवणूक जराशीही वाया जात नाही...

गॉडजिला's picture

28 May 2021 - 1:50 pm | गॉडजिला

सॉफ्टवेअरसहीत अनेक गोष्टी मॅकवर सहजपणे मिळणार नाहीत. विंडोज ऑफिस मॅकसाठी घ्यायचे तर त्याचा १० एक हजार खर्च येणारच

आता कसे बोलू ? कारण असं बोलले तर नाही पाहिजे... विशेषत: जर आपण 7-8 वर्षे मॅक वापरत आहात म्हटल्यावर अजूनही आपण वरील विधानावर ठाम असाल तर... :) व्यनी पर्याय उपलब्ध आहेच

स्वधर्म's picture

28 May 2021 - 7:45 pm | स्वधर्म

मला ऑफिसच्या कामासाठी एम एस ऑफिस ३६५ घ्यावेच लागले. उदा. कि नोट वर केलेली प्रेझेंटेशन्स इतरांसाठी पॉवर पॉइंटमध्ये एक्सपोर्ट केली, की सगळी हलतात आणि पुन्हा त्यावर काम करावेच लागते. मुलांना कॉलेजसाठी MS Teams लागणार आहे, ते आयपॅडवर आहे, का ते बघावे लागेल. असे ‘सगळे लोक मॅक वापरत नसल्यामुळे’ येणारे काही प्रॉब्लेम्स आहेत. पण कंपनी सगळे पुरवते, पण व्यक्तीगत वापरासाठी काय काय विकत घ्यावे लागेल, ते बघायला पाहिजे. पूर्वी मला अॅपस्टोअरवरून काही फ्री अॅप्स डाऊनलोड करावयाचे असेल, तरी क्रेडीट कार्डची माहिती भरावीच लागत असे. अमेरिकेत तसे नव्हते. आता माहिती नाही. तरी आपण सुचवलेल्या पर्यायाचा जरूर विचार करत आहे. खूप धन्यवाद.

सर्व काही ओरिजनल मग ते फ्रिवेर असो की पेड वर्षन, मॅक व विंडोजला तो प्रॉब्लेम येत नाही.

खरं तर मुलांना यातलं सगळं व्यवस्थित कळत असतं त्यामुळं त्यांनाच विचारा त्यांच्या कॉलेजसाठी काय योग्य ते. नाहीतर एखादं मॅकबुक अथवा लॅपटॉप घ्याल अन सहा महिन्यांनी पोरं टॅब हवा म्हणून भुणभुण सुरु करतील.

लॅपटॉप घ्या. विंडोज घ्या. कमीत कमी 16 GB RAM वाला घ्या. जितकी जास्त रॅम तितकं उत्तम. एक SSD पण टाका आणि विंडोज त्यावर इन्स्टॉल करा. माझं मध्यमवर्गीय मत.

असे लेख फार मोलाचे असतात. लिहित राहा

कुमार१'s picture

7 Mar 2022 - 6:47 pm | कुमार१

या कंपनीचा लॅपटॉप माझ्याकडे आहे जेमतेम अडीच वर्षांनी बॅटरी वेगाने उतरू लागली आहे

त्यांच्या दुकानात विचारले असता नवी बॅटरी आठ हजार रुपये आणि फक्त 90 दिवस वॉरंटी असे म्हणत आहेत
योग्य सल्ला मिळेल का ?

लॅपटॉप सतत मेन्सला चालू ठेवून असाच घोडा पळवत राहणे काही दिवस योग्य असते का ?

खुप जास्त किंमत आहे.

त्यांच्या दुकानात विचारले असता नवी बॅटरी आठ हजार रुपये आणि फक्त 90 दिवस वॉरंटी असे म्हणत आहेत

दुसर्‍या ठिकाणी बघा किंवा संगणक बघा.

हरवलेला's picture

8 Mar 2022 - 6:49 am | हरवलेला

ebay अथवा amazon वर तुम्हाला बदली बॅटरी स्वस्तात मिळू शकते. किंमत रु. २५०० ते ६०००. वॉरंटी ६ ते १२ महिने पर्यंत मिळेल.
तुम्ही Lenovo कडूनही ओरिजिनल बॅटरी मागवू शकता. त्यांच्या website वरील किंमत आणि दुकानातील किंमत यातील फरक बघा.
Youtube वर व्हिडिओ बघून तुम्ही स्वतः बॅटरी बदलू शकता.
खराब बॅटरी फुगते अथवा लिक होऊ शकते. त्यामुळे लॅपटॉप सर्किट ला धोका पोहोचू शकतो.

Battery pack मध्ये चार/सहा सेल टाकून बनवलेली असते. ती बदलणे स्वस्त आहे ( removable battery type)

एकच चपटी battery ( user non replaceable) कंपनीची असते त्याची किंमत जास्त असते. पण तीही बदलता येते.

स्वतःच बॅटरी तयार करायचा प्रयत्न करु नका जर त्या क्षेत्रातील नसाल तर. लागणारा वेळ, असलेला धोका (तुम्हाला, तुमच्या संगणकाला आणि माहितीला), नसलेली वॉरंटी हे बघितले तर थोडे जास्त पैसे घालवणे योग्य वाटते.

कंजूस's picture

8 Mar 2022 - 2:15 pm | कंजूस

विशेषत: डिवाईस battery बाबत.

मी हे विडिओज, साईट पाहिले /
//

Technical Sokil
https://youtu.be/-Moy5ez5g4Y
10:06

Allhandmade
https://youtu.be/i7cQliPt2Is
09:47

Technical Drops
https://youtu.be/OPlCgwaaj-w
08:50

Live Free
https://youtu.be/HKf0iSUk_R8
12:40

Laptop battery voltage
https://community.microcenter.com/discussion/6281/laptop-battery-101-how....

//

वामन देशमुख's picture

7 Mar 2022 - 7:27 pm | वामन देशमुख

मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंगच्या पद्धती अगदी वेगवेगळ्या आहेत.
चार्जिंग होत असताना मोबाईल वापरू नये.
चार्जिंग उपलब्ध नसताना लॅपटॉपचा वापर कमीत कमी करावा.

कंजूस's picture

7 Mar 2022 - 8:10 pm | कंजूस

मोबाईलात कूलिंग नसतं म्हणून का?

वामन देशमुख's picture

7 Mar 2022 - 11:23 pm | वामन देशमुख

मोबाईल हा बॅटरीच्या ऊर्जेवर चालेल अशा रीतीने बनवलेला असतो. रॉ-पॉवर ही केवळ मोबाईलच्या बॅटरीला चार्ज करण्यासाठी वापरली जाते, त्यावर मोबाईल चालत नाही.

---

आय फोनची चार्जिंग केबल सुरुवातीला केवळ चार-पाच इंच लांबीची असायची. त्याचं कारण चार्जिंग सुरू असताना फोन वापरू नये हे होतं.

---
लॅपटॉपमधली कुलिंग यंत्रणा मुख्यतः प्रोसेसर ला थंड ठेवण्यासाठी असते; मोबाईलमधल्या प्रोसेसरला थंड ठेवण्याची यंत्रणा काय आहे यावर संशोधन करावे लागेल.

लॅपटॉपमधली कुलिंग यंत्रणा मुख्यतः प्रोसेसर ला थंड ठेवण्यासाठी असते; मोबाईलमधल्या प्रोसेसरला थंड ठेवण्याची यंत्रणा काय आहे यावर संशोधन करावे लागेल.

अक्रिय वातानुकुलन (passive cooling)
https://www.arrow.com/en/research-and-events/articles/thermal-management...

कुमार१'s picture

7 Mar 2022 - 8:11 pm | कुमार१

ट्रम्प व वा दे.
म्हणजे चार्जिंग चालू ठेवून लॅपटॉप वापरायला हरकत नाही ना ? असे किती दिवस चालेल ?

वामन देशमुख's picture

7 Mar 2022 - 11:14 pm | वामन देशमुख

म्हणजे चार्जिंग चालू ठेवून लॅपटॉप वापरायला हरकत नाही ना ?

वर म्हटल्याप्रमाणे, लॅपटॉप हा शक्य तेवढा चार्जिंग सुरू ठेवूनच वापरायला हवा. लॅपटॉपची बॅटरी ही जेव्हा रॉ-पॉवर उपलब्ध नाही तेव्हाच बॅकअप म्हणून वापरायची असते.

असे किती दिवस चालेल ?

वरील प्रमाणे वापरून पहा, लॅपटॉपचे बॅटरीचे आयुष्य कदाचित अजून दीर्घकाळ वाढेल.

कुमार१'s picture

8 Mar 2022 - 7:35 am | कुमार१

उपयुक्त माहिती दिल्याबद्दल वरील सर्वांचे मनापासून आभार !

वामन देशमुख's picture

30 Jun 2022 - 12:35 pm | वामन देशमुख

मला माझ्या व्यावसायिक कामासाठी एक लॅपटॉप हवाय. शक्यतो येत्या ८-१० दिवसांत घ्यायचा आहे.

अनिवार्य गरज -
१४ इंच किंवा लहान स्क्रीन
(वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी न्यावा लागतो म्हणून)

किमान गरजा -
प्रोसेसर: i7 10g
रॅम: 16GB
एसएसडी: 512GB
रिझॉल्यूशन 1080*1920

प्रणाली ही विंडोज असेल तर ठीक नाहीतर उबुंटू देखील चालेल.

लॅपटॉप मजबूत हवा. किंमतीचे बंधन नाही.

मिपाकर्स वापरात असलेल्या लॅपटॉप्सचे अनुभव वाचून मला निर्णय घ्यायला मदत होईल.

आगाऊ धन्यवाद!

Thinkpad बघा. बांधणी मजबुत असते.

तुषार काळभोर's picture

3 Jul 2022 - 2:14 pm | तुषार काळभोर

Lenovo T-series, Dell Latitude, HP EliteBook
थोडा कमी प्रसिद्ध ब्रॅण्ड चालत असेल तर MSI Modern ही बिजनेस सिरीज बघा.

वामन देशमुख's picture

16 Jul 2022 - 10:45 pm | वामन देशमुख

बरेच संशोधन करून काल CTC मध्ये जाऊन dell Inspiron 7420 (i7 12th Gen 1255U) लॅपटॉप घेतला.

वापरायला सोयीस्कर वाटतोय.

श्रीगुरुजी's picture

17 Jul 2022 - 9:21 am | श्रीगुरुजी

मी नुकताच हा घेतला.

HP (11th Gen Intel Core i5 Processor / 8 GB RAM / 512 GB SSD / 15.6' inch (39.6 cm) Display / Intel UHD Graphics / Windows 11 / MSO) silver 55, 400/-

यात I7 processor, 16 GB RAM अश्या वाढीव गोष्टी वाढीव किंमत देऊन मिळू शकतात.