लॅपटॉप साध्या कामासाठी - Laptop for Basic Work

Primary tabs

हेमंत सुरेश वाघे's picture
हेमंत सुरेश वाघे in तंत्रजगत
6 Mar 2021 - 11:32 am

लॅपटॉप घेताना अनेक जण गोधळतातयात
अनेकांना फार साधी कामे करायची असतात.

आणि तरीही गरज नसतील तर उद्या लागेल म्हणून प्रचंड ताकदीचा लॅपटॉप घेतला जातो - वस्तूत: हि ताकद कधीही वापरली जात नाही - किंवा फार क्वचित वापरली जाते .
अनेकदा दुकानदार तुम्हाला अति ताकदवान लॅपटॉप उद्या लागेल म्हणून विकतो , वस्तूत: तितकी ताकद कधीही लागत नाही, ताकदवान प्रोसेसर हे महाग असतात आणि त्याचे दुकानदाराला अधिक फायदा मिळतो .आज लॅपटॉप अतिशय मागणी आल्याने आणि चीन मधून पुरवठा बराच कमी झाल्याने लॅपटॉप च्या किमती - नवीन आणि जुन्या फार वाढल्या आहेत . आणि आता मार्केट खराब असल्याने पैसे वाचवणे ही गरज झाली आहे.
तसेच इंटेल चे आय सिरीज च्या जुन्या प्रोसेसर चे लॅपटॉप हि आय सिरीज चे आहेत म्हणून विकले जातात . यातील काही फार जुने असतात. थर्ड जनरेशन च्या आय ३ प्रोसेसर हे २०१२ ला लाँच झाले होते आणि २०१४ पर्यंत विकत होते फार फार तर २०१५ पर्यंत - म्हणजे हे ५ वर्षे जुने लॅपटॉप आहेत .बरेच नवीन पेंटियम हे सेकण्ड / थर्ड जनरेशन च्या आय ३ / आणि काही आय ५ पेक्षा पॉवरफुल आहेत - आणि जर बेसिक काम असेल तर पुरेसे आहेत .

बहुसंख्य लोकांची कॉम्प्युटर वर कामे असतात

१) इंटरनेट ब्राउजिंग - फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही .
यात मी मी सांगेन कि बरेच  टॅब उघडून ठेवायची सवय असेल तर गुगल क्रोम वापरू नका .- त्याऐवजी ऑपेरा / ब्रेव्ह / इज असे ब्राउसर वापरून पहा - फायरफॉक्स - पूर्वी चांगला होता - आता तो हि लोड देतोय असे दिसले आहे . 
२) व्हिडीओ कॉल - झूम वगैरे - याला हि फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही
३) मायक्रोसॉफ्ट ऑफिस -वर्ड . एक्सेल फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही पॉवर पॉइंट वापरायचा थोडी जास्त , पण काम चालून जाते .४) व्हिडिओ बघणे ( व्हीलसी वगैरे)
५) गाणी ऐकणेवरील कामासाठी फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही
बरीच सॉफ्टवेअर पण कमी प्रोसेसिंग पॉवर वर चालतात
अनेक प्रोग्रामिंग च्या युटीलिटी ही कमी प्रोसेसिंग पॉवर वर सहज चालतात.
त्याचबरोबर ऑनलाइन टीव्ही आपणास ब्राऊसर मध्ये बघता येईल

आय ३ हा प्रोसेसर फार जास्त होईल आणि आता किमती ही वाढल्या आहेत .
इंटेल ने पेंटियम हे तुलनेने स्वस्त प्रोसेसर काढले आहेत -
पेंटिअम मध्ये हि गोल्ड सिल्व्हर आणि क्वाड कोअर आहेत ( quad core - 4 cores)
तसेच एएमडी या कंपनीचे अनेक स्वस्त प्रोसेसर आहेत मी यात AMD A6 / A8 / A9 / A10 सुचवतो.

लॅपटॉप फार बाहेर नेण्याची गरज नाही तर आपण १५. ५ इंची स्क्रीन चा घ्या - हे तुलनेने स्वस्त आणि जड असतात - पण स्क्रीन तुलनेत मोठी असते .
सिनिअर सिटीझन / विद्यार्थी साठी चांगले .

रॅम हे कमीत कमी ४ जीबी - शक्यतो ८ जीबी घ्या - रॅम हे डीडीआर ४ प्रकारचेच घ्या डीडीआर ३ रॅम जुने तंत्रद्नाण आहे आणि ते स्लो असते.
हार्ड डिस्क शक्यतो एसएसडी प्रकारची घ्या - तिने चांगला स्पीड मिळतो पण जर साधी हार्ड डिस्क असेल तर आपणास सहज एसएसडी हार्ड डिस्क टाकू शकतो - साधारण २४० जीबी एसएसडी अडीच तीन हजारात यावी आणि विकत जिकडून घेता तिकडेच आपणास बदलून मिळेल . त्याला बदलण्याचा आणि त्यावर विंडोज परत लोड करण्याचा चार्ज किती ते विचारा

तर बेसिक लॅपटॉप साठी सुचवलेले स्पेसिफिकेशन

Processor - Intel Pentium or AMD A4/A6/A8/A9/A10 *
Ram - 8GB DDR 4 **
Hard Disk - Preferred SSD or 1 TB of hard disk***
Screen - 15.5 Inch
If you are used to num pad see if there is num pad

* याहून ही स्वस्त आणि स्लो प्रोसेसर आले होते पण आता ते मला तरी मार्केट मध्ये दिसले नाहीत - खरे तर ते ही चालून जावेत - हे प्रोसेसर म्हणजे Intel Atom Intel Celeron, Amd Sempron (mostly discontinued)
**बऱ्याचदा लॅपटॉप मध्ये ४ जीबी रॅम असते - तर अनेक लॅपटॉप मध्ये हे रॅम वाढवता येते - फक्त एक रॅम चा स्लॉट खाली आहे आणि किती रॅम वाढवता येईल त्याची चौकशी करा . तो दुकानदार रॅम वाढवून देतोय का ते विचारा .
***हार्ड डिस्क च्या जागी SSD  टाकता येते - आणि त्याने स्पीड वाढतो .

आता वेगळ्या आकाराच्या वेगळा कनेक्टर असलेला आणि अधिक फास्ट अशा M. 2 हार्ड डिस्क आल्या आहेत ,
आणि त्यात हि २ प्रकार आहेत
m.2 SATA
m.2 NVME - हि सर्व प्रकारात फास्ट आहे
आपल्या लॅपटॉप ला कोणता m.2 स्लॉट आहे ते बघा आणि हा असेल तर नेहमीची हार्ड डिस्क ठेवून हि अजून एक लावतात येते - ऑपरेटिंग सिस्टीम व सर्व महतवाचे प्रोग्राम हिच्यावर घ्यावे .
हे बदलणे हे काहीवेळा कौशल्याचे होऊ शकते - त्यामुळे ते विचारून , योग्य ते पार्ट आणून सर्व्हिस सेंटर मधून करून घ्यावे आणि त्याबरोबर वॉरंटी वर काही परिणाम होणार नाही का हे पण विचारावे . आता रॅम / हार्ड डिस्क बदलणे साठी लॅपटॉप उघडावा लागतो

अधिक ची वॉरंटी - अनेकदा लॅपटॉप अधिक ची वॉरंटी विकतात - नॉर्मल वॉरंटी वर बहुतेक वेळा २ वर्षे वाढवून मिळतात - यात बॅटरी आणि अडाप्टर सोडून सर्व कव्हर होते - तरी मला तरी याचा फायदा मिळाला आहे - तर हि वॉरंटी घ्यावी . अनेक दा कंपनी च्या स्कीम असतात आणि वॉरंटी स्वस्तात वाढवून मिळते

कंपनी च्या स्कीम - या काय आहेत ते बघा - बर्याचदा खूप फायदेशीर असतात . अनेकदा या डुलकण आत नाहीत सर साईट वर जाऊन लॅपटॉप रजिस्टर करावा लागतो

तर यावरून आपणास आपल्या सर्वसामान्य गरजेसाठी लॅपटॉप सहन शोधता येईल अशी आशा करतो .
हेमंत वाघे
HuntMyJob.in
Coming Soon
Job Hunt Support – Basics, Preparation, Resume, Approach

प्रतिक्रिया

कंजूस's picture

6 Mar 2021 - 12:00 pm | कंजूस

धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

6 Mar 2021 - 12:09 pm | चौथा कोनाडा

छान माहिती !

लेखाचा ले-आऊट जास्त चांगला करता आला असता.
लेख आंजावरुन थेट कॉपी+पेस्ट केलेला दिसतोय.
HuntMyJob हे पान उघडत नाहीय !
गिचमिड वाटत असल्यामुळे वाचन त्रासदायक होते.
याटमी मी सांगेन कि बेच टॅब उघडून ठेवायची सवय असेल तर गुगल क्रोम वापरू नका
म्हंजे नक्की काय ? मग काय वापरायचे ?

हेमंत सुरेश वाघे's picture

6 Mar 2021 - 1:03 pm | हेमंत सुरेश वाघे

सर धन्यवाद - लेआउट बदलला आहे
सर धन्यवाद - लेआउट बदलला आहे
गुगल मधील लेखाचे पूर्ण फॉरमॅटिंग गेले होते
आता काही शंका / गोंधळ असेल तर सांगा

त्याऐवजी ऑपेरा / ब्रेव्ह / इज असे ब्राउसर वापरून पहा - फायरफॉक्स - पूर्वी चांगला होता - आता तो हि लोड देतोय असे दिसले आहे . 
हे मूळ लेखात पण टाकले आहे

HuntMyJob हे पान उघडत नाहीय !
HuntMyJob.inहि साईट येत आहे सर ( तरी https://huntmyjob.in/ हे पण उघडावे ) 
नोकरी शोधण्यासाठी पार्टमिक गोष्टीपासून मदत करावी असा या साईट चा उद्देश आहे
मी एक मल्टि नॅशनल हेड हंटिंग कंपनी मध्ये होते - जी सिनिअर लेव्हल नोकरी साठी उमेदवार शोधून द्यायची .

चौथा कोनाडा's picture

6 Mar 2021 - 5:02 pm | चौथा कोनाडा

खुप छान !
धन्यवाद !

मराठी_माणूस's picture

6 Mar 2021 - 12:23 pm | मराठी_माणूस

गिचमिड वाटत असल्यामुळे वाचन त्रासदायक होते.

ह्याच कारणाने लेख पुर्ण वाचला नाही.

हेमंत सुरेश वाघे's picture

6 Mar 2021 - 1:11 pm | हेमंत सुरेश वाघे

सर धन्यवाद - लेआउट बदलला आहे
गुगल मधील लेखाचे पूर्ण फॉरमॅटिंग गेले होते
आता काही शंका / गोंधळ असेल तर सांगा

रंगीला रतन's picture

6 Mar 2021 - 1:12 pm | रंगीला रतन

चांगली माहिती.

तुषार काळभोर's picture

6 Mar 2021 - 1:23 pm | तुषार काळभोर

डेस्कटॉप न घेता लॅपटॉपच घ्यावा, याचं काही विशेष कारण असेल का?
दुसऱ्या शब्दात,
डेस्कटॉपची किंमत, मेंटेनन्स खर्च कमी असतो का?
हालचाल शून्य असल्याने आणि किमान जागेत जास्त हार्डवेअर न बसावल्याने, डेस्कटॉपची हार्डवेअर प्रॉब्लेम यायची शक्यता कमी असते का? याच कारणाने डेस्कटॉपचे आयुष्य जास्त असतं का?
डेस्कटॉप कॉम्प्युटर मध्ये घटक बदलणे सोपं आणि स्वस्त असतं का?

की आजकाल डेस्कटॉप कॉम्प्युटर पूर्ण आउटडेटेड होऊन संगणक = लॅपटॉप असं झालंय?

हेमंत सुरेश वाघे's picture

6 Mar 2021 - 1:54 pm | हेमंत सुरेश वाघे

सर यावर खरे तर एक पूर्ण लेख लिहिता येईल
यात आपले काही मुद्दे खरे आहेत
खास करून किमतीचा आणि रिपेअर चा 

पण आता गेल्या काही वर्षात माझे तरी असे निरीक्षण आहे कि लॅपटॉप च्या बाजूने आल्या आहेत .आता मी पाहिले आहे कि काही स्पेसिफिकेशन साठी लॅपटॉप ची किंमत डेस्कटॉप पेक्षा थोडी शी जास्त - आणि काही वेळा कमी दिसली आहे !त्यात लॅपटॉप ला बॅटरी असल्याने वीज गेल्यास थोड्या वेळाचा फायदा होतो . अगदी १५ मिनिटे बॅटरी चालत असेल तरी काम सेव्ह करायला वेळ मिळतो .
तसेच वर जी M. 2 हार्ड डिस्क सांगितले आहे ती मदर बोर्ड वर असावी लागते . आता डेस्कटॉप चे असले मदर बोर्ड आले आहेत , पण सहज मिळत नाही आणि महाग आहेत .
आणि सगळीकडे जागांच्या किमती वाढत आहेत त्यामुळे लॅपटॉप ने वाचणारी जागा हा मुदा आहे . डेस्कटॉप आणि टेबल ला ३- ४ चौरस फूट जागा लागते आणि ती ठेवावीच लागते - लॅपटॉप कोठेही रहातो - आणि मग पाहिले तर ३ चौरस फूट जागेची किंमत पाहिली तर लॅपटॉप फुकट पडतो असे वाटेल

तरी यावर मी डिटेल मध्ये लिहीन

तुषार काळभोर's picture

6 Mar 2021 - 3:52 pm | तुषार काळभोर

हम्म..
रोचक मुद्दा आहे!

हडपसर मध्ये त्या जागेची किंमत पंचवीस हजार झाली!

सुबोध खरे's picture

11 Mar 2021 - 12:34 pm | सुबोध खरे

दुसरी बाजू

डेस्कटॉपचा एक फार मोठा फायदा म्हणजे तो सहसा कोणी चोरून नेत नाही. ११ वर्षांपूर्वी दवाखाना सुरु केला तेंव्हा हा एक महत्त्वाचा मुद्दा मी विचारात घेतला होता. रोज दुपारी आणि संध्याकाळी दवाखाना बंद करून घरी जायचे असल्याने रोज लॅपटॉप घरी नेणे कटकटीचे झाले असते.

शिवाय दवाखान्यात ups असलेला इन्व्हर्टर घेतल्यामुळे बॅटरी किंवा व्होल्टेज स्टॅबिलायझर इ ची गरज पडत नाही.

लॅपटॉप ची बॅटरी ३-४ वर्षांनी बदलायला लागते. लॅपटॉपचा स्क्रीन, कीबोर्ड, बॅटरी बदलायला जास्त खर्च येतो. त्या तुलनेत डेस्कटॉपचा खर्च बराच कमी असतो. त्याच किमतीत डेस्कटॉप जास्त चांगल्या कन्फिगरेशन चा ( प्रोसेसर रॅम इ जास्त उच्च क्षमतेचे मिळत असत) आताशा यातील तफावत कमी झाली आहे.

लॅपटॉप चा कि बोर्ड जवळ घेणे आणि स्क्रीन लांब ठेवणे शक्य नसते. त्यामुळे चाळीशीचा चष्मा लावणाऱ्या लोकांना लॅपटॉप लांब ठेवायला लागतो त्यामुळे हात लांब करून टाईप केल्याने खांदे दुखू लागतात.

आपल्याला संगणक हलवायचा नसेलच आणि जास्त वेळ( तासंतास) काम करायचे असेल तर डेस्कटॉप , टेबल आणि उत्तम दर्जाची खुर्ची हि अनिवार्य आहे.

बिछान्यावर बसून तासंतास काम करणाऱ्या (घरून काम करणाऱ्या) बहुसंख्य लोकाना पाठदुखीचा त्रास होत आहे.

याची किंमत आपल्याला वयाच्या ३५ वर्षानंतर समजू लागते.

If you sit a lot in front of a computer, here are some tips to help your posture.

https://www.nhs.uk/live-well/healthy-body/how-to-sit-correctly/

सुबोध खरे's picture

11 Mar 2021 - 12:35 pm | सुबोध खरे
चौकटराजा's picture

15 Mar 2021 - 8:28 am | चौकटराजा

मला लॅपटॉप अजिबात आवडत नाही ! त्यात विझूअल प्लेझर मिळत नाही असे माझे मत आहे ! माझ्या कडे २००१ पासून डेस्कटॉपच आहे ! मी मागे झुकणारी खुर्ची घेतली आहे त्यात माझ्या पाठीला ताण बसणार नाही अशी गादी मी स्वतः:च फोम वापरून घरी बनविली आहे . विमानात बसल्याचा फील येणारी ! पण विमानात जी लेगरूम ची समस्या असते तशी माझ्याकडे नाही कारण एरवी मी डेस्क ज्या दिशेत ठेवतो त्याचा डायगोनल दिशेत पी सी वापरताना ठेवतो. त्यात डेस्का च्या पुढच्या दोन सपोर्ट मधून मला पाय लांब करता येतात . पाठ टेकलेली व पाय तर लांबवले जात आहेत अशा स्थितीत मस्त दोनेक तास बसता येते. नंतर दुसरे काहीतरी शारीरिक काम करतो .त्यावेळी डोळे व स्क्रीन यांचा विरह साधता येतो.

वामन देशमुख's picture

26 Apr 2021 - 9:23 pm | वामन देशमुख

डेस्कटॉप आणि टेबल ला ३- ४ चौरस फूट जागा लागते आणि ती ठेवावीच लागते - लॅपटॉप कोठेही रहातो - आणि मग पाहिले तर ३ चौरस फूट जागेची किंमत पाहिली तर लॅपटॉप फुकट पडतो असे वाटेल

अरे वा! असा विचार कधीच केला नव्हता!

टर्मीनेटर's picture

6 Mar 2021 - 4:43 pm | टर्मीनेटर

माहीतीपुर्ण लेख आवडला 👍

आणखी हलका होईल ना?

हेमंत सुरेश वाघे's picture

6 Mar 2021 - 7:01 pm | हेमंत सुरेश वाघे

सर नक्की काय विचारायचे आहे ?

शिवाय रिपेरिंग सोपे होईल ना.. मोड्युलर केला तर?
लेखाच्या विषयाबाहेर प्रश्न गेल्यास सोडून द्या.

हेमंत सुरेश वाघे's picture

6 Mar 2021 - 10:04 pm | हेमंत सुरेश वाघे

अगदी ४/५ वर्षांपूर्वी लॅपटॉप च्या बॅटरी या बाहेर असत . आणि सहज बदलता येत . काही वेळा त्याच जागी बसणार्या मोठ्या आणि अधिक काळ टिकणाऱ्या बॅटरी हि मिळत ( म्हणजे साधी बॅटरी - ३ तास - मोठी बॅटरी ५ तास )
आता जून वजन कमी करणे - आणि बहुतेक पार्ट चे अधिक पैसे काढायचे म्हणून बॅटरी बॉडी मध्येच येतात . आता त्या बदलणे पण कठीण केले आहे

मॉड्युलर म्हणाल तर लॅपटॉप मध्ये असले प्रयत्न झाले आहेत चालले नाहीत
आणि आता फ्रेमवर्क म्हणून एक कंपनी येत आहे ती असा परत प्रयत्न करीत आहे
अर्थात किंमत माहीत नाही आणि याची प्रचंड किंमत असेल तर हे पण चालणार नाहीत

उलटे मॉड्युलर पेक्षा प्रोसेसर , रॅम , हार्ड डिस्क ( स्टोरेज ) असलेले बोर्ड आले आहेत - आणि काही त्यावर आधारित छोटे आणि स्वस्त लॅपटॉप पण

हेमंत सुरेश वाघे's picture

6 Mar 2021 - 10:05 pm | हेमंत सुरेश वाघे
कंजूस's picture

7 Mar 2021 - 5:56 am | कंजूस

आता गेल्या वर्षापासून शैक्षणिक महत्त्व वाढल्याने स्वस्त, मॉड्युलर वस्तू बाजारात येणे फार गरजेचे आहे. शिवाय ब्याटरीचे लीड्स, पोझीशन, वोल्टेज इन - आउट यांमध्ये काही प्रमाणिकरण ( standardisation) झाल्यास अदलाबदल करणे सोपे आणि स्वस्त होईल. इ कचरासुद्धा कमी होईल. भारतासारख्या गरीब (९०% गरीबच आहेत) देशासाठी गरजेचं आहे.

कंजूस's picture

7 Mar 2021 - 6:00 am | कंजूस

अशा प्रकारचे बरेच बाजारात येवो.

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Mar 2021 - 3:52 pm | अनिरुद्ध.वैद्य

करायचे असल्यास बरेच टुलस लागतात, त्याकरता, आय ५ घ्यावा कि आय ७? रॅम किमान ८ जिबी लागते, पण प्रोसेसरबाबत कंफुजन होतेय ..
पुर्वी बर होतं पी ४ टाकला की झालं, आज्काल खुपच जास्त ऑप्शन्स आलीत. राय्झॉन प्रोसेसर विचारात घेतला तर अजुन जास्त!!

हेमंत सुरेश वाघे's picture

8 Mar 2021 - 11:59 pm | हेमंत सुरेश वाघे

प्रोग्रामिंग मध्ये बरेच काही येते
मला यात फारसे नाही कळत नाही
तरी काही याबाबी बद्दल यातील अधिकारी व्यक्तींना विचारले तर सांगितले कि अनेक प्रोग्रामिंग ला फारशी प्रोसेसिंग पॉवर लागत नाही
अनेकदा नेट वर बरीच माहिती मिळते .
साईट वर अनेकदा least configeration and best configeration असतात .
आणि मग बघा .

अनिरुद्ध.वैद्य's picture

9 Mar 2021 - 10:36 pm | अनिरुद्ध.वैद्य

भारतात कुठल्या बऱ्या साईट्स आहेत?

हेमंत सुरेश वाघे's picture

10 Mar 2021 - 7:46 am | हेमंत सुरेश वाघे

कोणत्या गोष्टी साठी सर ?

अनिरुद्ध.वैद्य's picture

10 Mar 2021 - 12:57 pm | अनिरुद्ध.वैद्य

least configeration and best configeration वगैरे सांगणार्‍या किंवा उत्तम लॅपटॉप रीव्ह्यु असणार्‍या ...

हेमंत सुरेश वाघे's picture

10 Mar 2021 - 11:05 pm | हेमंत सुरेश वाघे

system requirements for ......
minimum system requirements for ......
best system requirements for ......
गुगल करा.
बहुतेक वेळा अधिकृत साईट वर पण असते
नेट वर लोक आपले अनुभव टाकतात

माझ्याकडे असुस लॅपटॉप आहे.
साधारण 80000 ला पडला.
I7 with 4 physical cores
24गब RAM, SSD आणि Ubuntu.

जबरदस्त परफॉर्मन्स देतो. बॅटरी life मात्र 1.5 तासच. पण मला परवडते ते पण. Portable desktop म्हटले तरी चालेल.

मराठी_माणूस's picture

10 Mar 2021 - 4:49 pm | मराठी_माणूस

एक HP चा लॅपटॉप (I5,2.5 GHZ, 8 GB RAM, windows 10).
word ,excel ही अ‍ॅप्स उघडायला खुप वेळ घेतो.
बूट व्हायला पण खुप वेळ लागतो.
काय कारण असेल , काय करता येइल ?

मुक्त विहारि's picture

10 Mar 2021 - 5:37 pm | मुक्त विहारि

फाॅरमॅट करून घ्या...

डोंबिवली मध्ये, थेटे नावाचा एक उत्तम टेक्नीशियन आहे, तो हे काम चांगले करतो...

माझे लॅपटाॅप तोच सांभाळतो...

सगळा डाटा पण परत मिळतो...

हेमंत सुरेश वाघे's picture

10 Mar 2021 - 10:28 pm | हेमंत सुरेश वाघे

I5,2.5 GHZ सर पूर्ण प्रोसेसर नम्बर द्या - त्यामुळे वर्ष कळेल
आणि रॅम ddr ३ आहे कि ४ ?

हेमंत सुरेश वाघे's picture

10 Mar 2021 - 10:57 pm | हेमंत सुरेश वाघे

Intel® Core™ i5-2400S Processor - हा 2.50 GHz दिसत आहे
हा जानेवारी - मार्च २०११ ला आला होता
म्हणजे १० वर्षे जुना

रॅम हि जुने DDR ३ असावे

आता
१) लॅपटॉप खोलून साफ करून घ्या
२) कुलिंग सिस्टीम चेक करा - साफ करून घ्या , पंखा खराब झाला असेल तर बदलून मिळतो का बघा
३) प्रोसेसर हा बोर्ड वर लावताना उष्णता शोषण करण्या साठी थर्मल पेस्ट नावादाचा प्रकार असतो . तो खराब होतो - तो साफ करून नवीन टाका
( हे एक्सपर्ट रिपेअर वाला करतात )

आता
हार्ड डिस्क चा बॅक अप घ्या
फॉरमॅट करा आणि नवीन विंडोज साफ्टवेअर टाका
एखाद वेळी हार्ड डिस्क खराब असेल किंवा बॅड सेक्टर असतील
SATA प्रकारची हार्ड डिस्क असेल आणि शक्य असेल तर अगदी स्वस्त १२० जीबी एसएसडी टाका =२००० पर्यंत पण मिळेल
जुनी हार्ड डिस्क वापरली तर डिफ्रॅगमेंट करा ( नेट वर प्रोसेस मिळेल )

मराठी_माणूस's picture

11 Mar 2021 - 12:11 pm | मराठी_माणूस

धन्यवाद .

प्रोसेसरः intel(R) core (TM) i5-7200U CPU 2.50 GHz
काही शंका
१)साफसफाइ करुन गती मधे फरक पडेल का ?
२)फॉरमॅट केला तर आणि नवीन विंडोज साफ्टवेअर टाकले तर जे licensed softwares असतील त्यांचे काय करायचे ? उदा: anti virus softeware जे preloaded होते
३) चालु अवस्थेत defrag करता येणार नाही का ?
४)जुनी डिस्क काढुन तिथे नवीन एसएसडी बसु शकते का ?

हेमंत सुरेश वाघे's picture

11 Mar 2021 - 3:32 pm | हेमंत सुरेश वाघे

i5-7200U - हा २०१६ च्या तिसर्या क्वाटर ला आला होता इतका जुना नाही आहे
आणि रॅम पण DDR ४ आहे का ते सांगाल का ?
तसेच लॅपटॉप चे नक्की मॉडेल द्या

आता खरे तर हा स्लो झाला नाही पाहिजे
काही कारणे मला दिसत आहेत

१) अँटी व्हायरस - आता विंडोज १० मध्ये एक बिल्ट इन अँटी व्हायरस - येते आणि मी अनेक वर्षे - विंडोज ७ पासून वापरत आहे ३-४ लॅपटॉप एका वेळी असतात घरी त्यावर आणि उत्तम अनुभव आहे
तर इतर अँटी व्हायरस - ची गरज पडत नाही आणि गेल्या १० वर्षात १३-१४ लॅपटॉप वर हा अनुभव आहे .
तर बाकीचे अँटी व्हायरस काढून टाका आणि विंडोज सेक्युरिटी चालू करा .

२) जुनी हार्ड डिस्क - ज्यात बॅड सेक्त्र आहेत

३) हार्ड डिस्क वर अनेक प्रोग्राम - म्हणून फॉरमॅट करून नवीन विंडोज १० टाकणे चांगले - जर अधिकृत विंडोज असेल तर ते ऑटोमॅटिक कि घेते ( मी यावरील एक लेख टाकतो ) इतर कोणते अधिकृत सॉफ्टवेअर आहेत ?
https://www.belarc.com/products_belarc_advisor
यावर आपल्या लॅपटॉप चा रिपोर्ट येतो आणि हे सॉफ्टवेअर सर्व कि दाखवते

४) एक डिस्क इमेज बनवून लोक री इंस्तोल करतात - यात मला गती नाही

५) चालु अवस्थेत defrag करता येणार नाही का ? हो मी लिंक देत आहे
पण मला वाटते कि काहीतरी फॉरमॅट न केल्या शिवाय जाणारा इशू आहे का ?
https://support.microsoft.com/en-us/windows/defragment-your-windows-10-p...

६) )साफसफाइ करुन गती मधे फरक पडेल का ? फार घाण असते आत आणि मग तापल्याने मशीन स्लो होते , बहुतेक काही वेळा ते प्रोटेक्शन मोड मध्ये जात असावे - मला तरी चांगला अनुभव

७) जुनी डिस्क काढुन तिथे नवीन एसएसडी बसु शकते का ? आपला लॅपटॉप बराच नवीन आहे - सहज
तुम्ही मॉडेल नम्बर द्या एक नवीन प्रकारची m २ एसएसडी आली आहे - तिची खच वेगळी असते - ती अजून फास्ट आहे - तिचा स्लॉट आहे का बघतो

मराठी_माणूस's picture

12 Mar 2021 - 3:26 pm | मराठी_माणूस

धन्यवाद.

१)रॅम DDR ४ का ३ ते सांगता येणार नाही. मॉडेल चे नाव pavilion आहे.
२)अँटी व्हायरस विकत घेताना लोड करुन दिले होते (McAfee), त्याचे मी दर वर्षी नुतनीकरण करतो.
३)अधिकृत विंडोज सोबत microsoft office आणि McAfee आहे.
४)touch supoort with 10 touch points आहे.
५)Hard disk WDC 500 GB

हेमंत सुरेश वाघे's picture

12 Mar 2021 - 5:02 pm | हेमंत सुरेश वाघे

pavilion एचपी ची अनेक वर्ष चालत आलेली सिरीज आहे - अजून एक डिटेल मॉडेल नम्बर असतो
आपला लॅपटॉप यातील कोणता आहे का ?
HP PAVILION 15-AU620TX
HP PAVILION 15-AU621TX

असला काहीतरी नंबर असेल
यात DDR ४ रॅम आहे

यात ५०० जीबी हार्ड डिस्क ची भानगड वाटत आहे - कारण हा लॅपटॉप आला तेंव्हा १ टीबी कॉमन होते आणि नेट वर पण दाखवत आहे

McAfee काढून टाका - माझा अनेक मशीन वर विंडोज चा अनुभव अतिशय चांगला आहे
microsoft office अधिकृत आहे का ?
विंडोज अधिकृत असताना कि अनधिकृत टाकले असे काही आहे का ?

कारण हे बर्यापैकी फास्ट कॉन्फिगरेशन आहे

आता पहिले म्हणजे फॉरमॅट करून विंडीज १० / ऑफिस टाकून चालवून बघा
साधी एसएसडी यात लागेल
खरे तर मला असे दिसत आहे कि यात m2 nvme ssd हि लागावी - पण कोणीतरी एक्सपर्ट ने उगडून पहावे लागेल
आपण कोठे रहाता ?

मराठी_माणूस's picture

12 Mar 2021 - 8:08 pm | मराठी_माणूस

त्याच्या मागच्या बाजुला 3168NGW लिहलेले आहे.

अरे वा! आता लॅपटॉप दुरुस्तीचं दुकान उघडलंय वाटतं मिपावर! का नुसताच "चंपु वहिनींचा सल्ला" सदरात असतो तसा फुकटचा सल्ला?
नाही म्हणजे माझा पण एक लॅपटॉप दुरुस्त करून घ्यायचा आहे तो इथे पाठवतो. काय वाघोबा? चालेल का?

मुक्त विहारि's picture

13 Mar 2021 - 1:18 pm | मुक्त विहारि

मिपाकर कामास येतात....

हा स्वानुभव आहे...

आमच्या सारख्या अशिक्षित लोकांसाठी, ह्या लेखातून चांगली माहिती मिळत आहे...

चौकटराजा's picture

15 Mar 2021 - 8:33 am | चौकटराजा

खरे तर इथे अनेक जाणती मंडळी आहेत कॉन्फिगरेशन सुचविणारी .. पण एक नक्की- जास्त मेमरीचा उपयोग पी सी चा वेग वाढविण्यासाठी होत नाही ते काम प्रोसेसर चेच आहे. मेमरीच्या वेगाने थोडाफार फरक पडत असेल .मेमरीच्या आकाराचा ( फिजिकल नव्हे लॉजिकल ) संबंध कोणती ओसी व कोणते सॉफवेअर लोड करणार यांच्याशी !

जॅक द रिपर's picture

16 Mar 2021 - 5:57 am | जॅक द रिपर

मेमरीचा मुख्य उपयोग एकाच वेळेस किती प्रोग्रॅम्स चालू शकतात हा.
त्यातही ग्राफीक्स किंवा अ‍ॅनिमेशन सॉफ्टवेअर्स आणि फोटो एडीटींग सॉफ्टवेअर्स असतील तर जास्त मेमरी लागते.

अनिरुद्ध.वैद्य's picture

16 Mar 2021 - 5:00 pm | अनिरुद्ध.वैद्य

काम प्रोसेसर चेच >>

मेमरीचा रोल प्रचंड असतो.

मेमरी मोठी असेल तर सेग्मेन्ट फाल्ट कमी होउन प्रोग्रॅम लवकर चालतो! सोप्या भाषेत सिपियु प्रोग्रॅम आधी हार्ड ड्राइव्ह हुन मेमरी मध्ये घेतो अन मग चालवतो. आता ह्यात मेमरी अन व्हर्च्युअल मेमरी (जी हार्ड ड्राईव्हवरच) असते.

जास्त मेमरी आजकाल ओएस अन मोठे ओफिस प्रोग्रॅमस वापरतात, त्यामुळे बॅकग्राऊंडला भरपुर प्रोसेसेस असतात. त्यामुळे मेन मेमरी बरेचदा भरते अन व्हर्च्युअल मेमरीत प्रोग्रम जातो. तो तिथे गेला की सेग फाल्ट होतो अन काम स्लो होतं, कारण जरी प्रोसेसर फास्ट असला तरी हार्डडिस्का स्लो असतात :)

आज्कालच्या एसएस्डी रॅमच्या वेगाच्या जवळपास जातात, त्यामुळे स्पीड सुपरफास्ट असतो.

अजय देशपांडे's picture

20 Mar 2021 - 12:33 pm | अजय देशपांडे

केवळ मेमरी वाढवण्याने सगणक जास्त गतीने चालत नाही तर त्याला processor पण तसा हवा

जॅक द रिपर's picture

16 Mar 2021 - 5:55 am | जॅक द रिपर

हे माझ्या लॅपटॉपचं कॉन्फीगरेशन आहे -

२०१५ च्या ऑक्टोबरमध्ये घेतला आहे. त्याच वर्षीचं नवीन मॉडेल

इंटेल कोअर आय-७ प्रोसेसर - २.२ गिगाहर्ट्झ क्वाड कोर
१६ जीबी डीडीआर ३ रॅम
इंटेल आयरीस प्रो ग्राफीक्स
२५० गिगाबाईट फ्लॅश स्टोरेज
१५ इंच रेटीना डीस्प्ले

गेल्या ६ वर्षात बॅटरी, पॉवरकॉर्ड, अ‍ॅडॉप्टर, डिस्प्ले, मेमरी, हार्डडीस्क यापैकी एकाचाही प्रॉब्लेम नाही.
एकही अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नाही पण व्हायरस आलेला नाही.
वापर - दिवसाला किमान ८ ते १० तास ऑफीसचं काम.
जॉब प्रोफाईल - डेटावेअरहाऊस अ‍ॅडमिनिस्ट्रेटर सपोर्ट

आता गेस करा -

किम्मत - ???
मॉडेल - ????

तुषार काळभोर's picture

16 Mar 2021 - 6:30 am | तुषार काळभोर

मॅक बुक प्रो 15
150000-170000?

जॅक द रिपर's picture

16 Mar 2021 - 6:56 pm | जॅक द रिपर

येस सर!

मॅकबुक प्रो - २०१५ मॉडेल.
किमत - बेस्टबाय मध्ये सेलमध्ये होता २००० डॉलर्स.
त्यावेळेस डॉलरचा भाव ६६ रुपये होता, त्यामुळे रुपयात किंमत १३२,०००!
पण मॅकबुक ही वन टाईम इन्व्हेसमेंट आहे.
आणखीन पुढची ५ वर्ष तरी दुसरा लॅपटॉप लागणार नाही.

टवाळ कार्टा's picture

15 Apr 2021 - 4:34 am | टवाळ कार्टा

थोडा वेगळा विचार

बहुतेकवेळा एका मॅकबुक प्रोच्या किंमतीमध्ये इतर चांगल्या ब्रँडचे ३ लॅपटॉप येतात...मग एक मॅकबुक प्रो ५-६ वर्षे वापरण्यापेक्षा त्याच किंमतीत इतर चांगल्या ब्रँडचे ३ (किंवा २) लॅपटॉप घेतले तर ते जास्त काळ उपयोगी येतात आणि नवीन लॅपटॉप घेताना त्यावेळचे लेटेस्ट हार्डवेयर मिळते
बाकी सफरचंदासाठी accessories घेताना खिशाला मोठा फटका बसतो ते वेगळेच

चौकस२१२'s picture

15 Apr 2021 - 5:29 am | चौकस२१२

एकही अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नाही
कसं काय? काही तांत्रिक कारण ?
लॅपटॉप ची मालकी कोणाची आपली कि जिथे काम करता त्यांची?