आपलं कुणी

Primary tabs

VRINDA MOGHE's picture
VRINDA MOGHE in जे न देखे रवी...
3 Mar 2021 - 8:01 pm

*आपलं कुणी*
जेव्हा मनाला हुरहूर लागते
मन अस्वस्थ, बेचैन होतं
काहीच नको वाटु लागतं,
तेव्हा हवा असतो एक तरी
खांद्यावर थोपटून अलगद
धीर देणारा 'मैत्रीचा हात' !!
जेव्हा मन व्याकुळ होतं,
कोणीच नाही आपलं इथं
असं वाटायला लागतं,
तेव्हा डोकं टेकवण्यासाठी
कोणाच्या तरी खांद्याची
हवी असते 'खरी सोबत' !!
कधी उदास नयनांत
दाटून येतं आभाळ, नी
टपो-या अश्रूंची येते सर,
तेव्हा असावं 'आपलं कुणी'
हळुवार समजूत घालून
हसु फुलवणारं गालावर !!
©️वृंदा

कविता