काल आणी आज

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
1 Mar 2021 - 10:22 pm

पत्र नाही चिठ्ठी नाही
कावळा ओरडतो फांदीवर
चला चला गोडधोड करा
पाव्हणा पोचला पांदिवर

तोंडभरून आवातन
चार दिस आदुगरच यायचं
तेलच्या गुळवणी नळीचा
पहुणचार घ्यायचां
पाव्हणं तुमच्या बिगर जत्रा नाय
आस सोयर धायर म्हणायचं

वरमाई रुसली लाडाची
सार गाव धावलं
पोरीच्या आईबापाला
जग भरून पावल

आमंत्रण येत ऩव्हतं
निमंत्रण लागत नव्हतं
सुख दुखाःच्या वाटेवर
माणुस माणसाला भेटत होतं

जसा जसा काळ पुढ गेला
तसा तसा मेळ कमी झाला
माणुस सुधारला पण
नात्याचा भाव मात्र वधारला

ट्रिंग ट्रिंग फोन आला
भेटी गाठी कमी झाल्या
धडाधड माणूस
खोट बोलू लागला

ट्रिंग ट्रिंग हँलो हँलो
येवू का आज
आहात का घरी
आज नको नंतर भेटू
तब्येत नाही बरी

एक फोन केला आसता
आम्हीपण आलो आसतो
सुख दुःखाचे
भागीदार झालो आसतो

माना पानाचा दिड कानाचा
फोनची वाट बघत बसला
स्वतःच्याच लग्नाची
गाडी हुकला

३-१२-२०२०

कविता

प्रतिक्रिया

रंगीला रतन's picture

27 Apr 2021 - 4:02 pm | रंगीला रतन

आवडली!