लाइक द फ्लोइंग रिव्हर (ऐसी अक्षरे....मेळवीन १)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
26 Feb 2021 - 7:26 pm

लाइक द फ्लोइंग रिव्हर (ऐसी अक्षरे....मेळवीन)
लेखक –पाउलो कोएलो
अनुवाद –चंद्रकांत सहस्रबुद्धे

अल्केमिस्ट वाचल्यानंतर पाउलो यांच दुसरेच पुस्तक हाती पडले.वाचायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आले पाउलो यांची ही २०१०-२०१२ या कालखंडात लिहिलेली दायारीच आहे.नुकतेच त्यांनी लिखाणासाठी संगणक वापरायला सुरुवात केली आहे,अमेरिकेतील ट्रेड सेंटरच अपघात वगैरे समकालीन घटना यात लिहिल्या आहेत.थोड वाचून झाल्यावर स्वत:ला प्रश्न विचारला ..खरच हे बौद्धिक,वैचारिक वाचायची आता गरज आहे का?पण थोडे अजून वाचुया हे ठरवलं.

आणि खरोखरच प्रेम,मन:शांती,युद्ध विशेष म्हणजे मृत्यु याबद्दल एव्हढ सुंदर सोप्या भाषेत पाउलोच लिहू शकतात हे जाणवलं.यांत त्यांनी सुंदर छोट्या छोट्या रूपक ,सत्य कथा लिहून कधी प्रेमाच,शांतीचे,मरणाच अस्तित्व उलगडल आहे.पुस्तक वाचून झाल्यावर नक्कीच काहीतरी नवीन गवसलं आहे हि अनुभूती येते.

प्रत्येक वाक्य एक शब्दांची नशा आहे....काही वाक्ये
--आपल्या पराजयाची गोळाबेरीज म्हणजे अनुभव
--अनुभवामुळेच कोणतीही गोष्ट करतांना मी नेहमी असाच विचार करते,”आपल्या मार्गावर आपल्या चालीने ,गतीने जावे ; दुसऱ्यांच्या नाही.
--अनोळखी शहराचा भूतकाळ बघण्यापेक्षा त्याचा ‘आज’ पाहणे जास्त मनोरंजक आहे.
--हा आहे आताचा क्षण! त्याला ण बिचकता पकडायाचा प्रयत्न करत जा आणि हे करताना कोणतीही भीती वा अपराधी भावना मनात ठेऊ नकोस.
--जेथे एरव्ही असंभवनीय ,अशक्य वाटते ,तेथीही प्रेमामुळेच संवाद घडू शकतो.
--अनपेक्षित काही समोर येणे हे नसर्गिक आहे.त्यामुळे जखमाही होण्याची शक्यता आहे.जखमा भारतात;उरतात केवळ व्रण..एखाद्या वळणावर त्यामुळे जीवन सुसह्य होईल.
--कधी कधी जेव्हा एकटेपणा सर्व सौदर्यांचा नाश करतो,तेव्हा त्याला विरोध करण्याचा एकाच मार्ग उरतो ,तो म्हणजे मुक्त राहणे,मोकळे होणे.

शेवटी पाएलो यांच्या जीवनाची कहाणी दिली आहे ,जी खरोखर मला माहित नव्हती...एवढ्या छळानंतरही आयुष्याशी किती सकारात्मक सुंदर एकरूप होऊन लिहतात ते...नतमस्तक
त्यांच्या या पुस्तकातील तुनळीवर काही दुवे आहेत.
https://youtu.be/t_cxvEovrI0

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

त्याचा ‘आज’ पाहणे जास्त मनोरंजक आहे.

प्रचंड सहमत आहे...

प्रतिक्रियेसाठी आभार!