Ford vs Ferrari हा सिनेमा जरूर बघा ...

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
17 Feb 2021 - 1:39 pm

मी रोज रात्री, एक तरी सिनेमा बघतोच...पण कधी कधी चांगला चित्रपट मिळाला नाही तर, Avengers जिंदाबाद...

मी Captain Marvel बघत होतो, तितक्यात मुलगा म्हणाला, की हा सिनेमा किती वेळा बघणार? कालच मी, Ford vs Ferrari बघीतला.जबरा पिक्चर आहे.मुलांना, Tenet, Inception,.वगैरे सिनेमे आवडतात.आम्ही कुणीच, खानावळीत जेवत नाही.

मुलांची आवड माहिती असल्याने, लगेच सिनेमा बघीतला.संवाद हिंदीतून असल्याने, सिनेमा समजायला पण सोपा गेला.

Fordच्या गाड्यांची मागणी घटत असल्याने,मागणी वाढवायची असेल तर, फोर्डने गाड्यांच्या शर्यतीत उतरावे, असा सल्ला, ली आयकोका देतो. (ली आयकोका बद्दल वाचायचे असेल तर, बोर्डरूम हे पुस्तक जरूर वाचा. खरं तर 'ली आयकोका' सल्ला देत आहे, ह्या घटने नंतरच मी सिनेमात रस घ्यायला सुरूवात केली.)

गाड्यांच्या शर्यतीत तो पर्यंत, फोर्डने कधीच भाग घेतलेला न्हवता.फेरारीचे मात्र, अशा शर्यतींवर वर्चस्व होते.

फेरारी डबघाईला आली असल्याने, फोर्डने आणि फेरारीने एकत्र करार करावा म्हणून, ली आयकोका, फेरारीकडे प्रस्ताव घेऊन जातो.

पुढची कहाणी सांगत बसणार नाही.कारण, ह्या कहाणीला अनेक पैलू आहेत.

मालकांचा उद्धटपणा आहे, मुजोरी आहे, संधीसाधू पणा आहे, कंपनी मधील अंतर्गत राजकारण आहे, योग्य माणसाची पारख करणे, मैत्री आहे, परस्पर सामंजस्य आहे....

सिनेमा बघीतल्या नंतर, माझ्या एकच गोष्ट लक्षांत राहिली आणि ती म्हणजे, स्वार्थी माणसांपासून दूरच रहा आणि मित्रांना कधीच दूर लोटू नका.

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

भंकस बाबा's picture

17 Feb 2021 - 3:50 pm | भंकस बाबा

अतिशय सुंदर मांडणी , उत्तम अभिनय, सशक्त कथानक

मुक्त विहारि's picture

17 Feb 2021 - 5:19 pm | मुक्त विहारि

बद्दल ऐकले होते...

पण, आता वाचायलाच पाहिजे.

फोर्ड आणि कॅरोल शेल्बीची पहिली मीटिंगच मस्त दाखवली आहे ...

आणि नंतर, फोर्डला GT40 मधून 200 किमी प्रति तास, प्रवास घडवून, मला स्वायत्तता का पाहिजे? हे पटवून देणे, पण उत्तम दाखवले आहे ....

प्रत्येक सीन महत्वाचा आहे ...

फोर्ड आणि फेरारीचा मालक, प्रत्यक्षांत एकमेकांना कधीच भेटत नाहीत...पण, कोल्ड वाॅर मात्र असतेच...

आपल्या आयुष्यात पण काही वेळा असेच घडत असते...युद्ध कुणाचे आणि त्रास कुणाला?

भंकस बाबा's picture

17 Feb 2021 - 7:06 pm | भंकस बाबा

युद्ध कोणाचे, त्रास कोणाला अनुभवतो आहे
इथेच

कुठे बघायला मिळेल हा चित्रपट

मुक्त विहारि's picture

17 Feb 2021 - 10:08 pm | मुक्त विहारि

नक्की बघा ....

पण, थोडासा अभ्यास करा ...

फोर्ड, ली आयकोका, फेरारी, कार रेसिंग,

अभ्यास केल्या शिवाय, ह्या सिनेमाची मजा घेता येणार नाही ...

मला पण, मी जेंव्हा, फेरारी आणि कॅरोल शेल्बी यांच्या विषयी वाचन करून, मग सिनेमा बघीतला, तेंव्हा जास्त समजला...

वाचन केल्या शिवाय, हा सिनेमा बघू नका.

सुखी's picture

17 Feb 2021 - 9:58 pm | सुखी

मस्त पिक्चर आहे हा

Check out Ford v Ferrari on Disney+ Hotstar! https://www.hotstar.com/1260029222

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Feb 2021 - 8:02 pm | राजेंद्र मेहेंदळे

मुलाला गाड्यांची आवड असल्याने त्याने सुचवला आणि आम्ही सहकुटुंब बघितला. नंतर स्टार मुवि, अँड फ्लिक्स वगैरेवर बरेच वेळा लागला आणि तुकडे बघितले गेले. शेवटची शर्यत उत्कंठावर्धक आहेच पण एकुणच मत्सर ,स्पर्धा,मैत्री,प्रेम सगळेच मस्त दाखवले आहे. टेक्निकल विरुद्ध बिझनेस असा दृष्टिकोनही छानच दाखवला आहे.
एकुणात पैसे वसुल.
द आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन हा ही असाच सुंदर चित्रपट. मोटारी आणि कुत्रे आवडत असल्यास जरुर बघा.

प्राण्यांची आवड असल्यास अजुन भरपुर चित्रपट आहेत.

वेगवान गाड्यांची अजिबात आवड नसली तरी चुकून रष हा चित्रपट पहिला. प्रचंड आवडला. F१ चे चाहते असाल तर हा चित्रपट खूप चांगला आहे. जेम्स हंट आणि निकी लावडा ह्यांचा बायोपिक आहे. ह्यांची रेसकोर्सवरील दुश्मनी फेडरर आणि नदाल प्रमाणे बहुचर्चित होती.

मुक्त विहारि's picture

19 Feb 2021 - 6:18 am | मुक्त विहारि

ह्या सिनेमात, रेस हा तर फक्त कॅटॅलिस्ट आहे ....

खरे युद्ध चार विविध पातळ्यांवर होते

ड्रायव्हर, इंजिनीयर, मॅनेजमेंट आणि मालक

Race is also one type of War