नमस्कार मी कोल्हापुरी दादा
नाद करायचा नाही.....
अहो घाबरुन जाउ नका ही फक्त बोलण्याची पद्धत आहे .
तर मी एक ११वीत शिकणारा विद्यार्थी आहे .आणि स्वघोषित लेखक ..
तर मी आजच या हॉटेलचा कायमस्वरुपी सदस्य झालो त्यामुळे हा माझा पहिला लेख ...येथील नियमांची अजुन पुरेशी कल्पना नाही त्यामुळे सांभाळुन घ्या.
मी माझे मन मोकळे करण्यासठी लिहितो पण हे मन म्हणजे काय .
त्याचीच गोष्ट सांगणारा आणि माझ्या लेखनप्रवासाचा श्रीगणेशा करणारा हा लेख ....
मनाच्या कुपीत
जगाची रचना करून दमलेले देव शांतपणे विश्रांती घेत बसलेले होते.पण देवच ते विश्रांती तरी किती वेळ घेणार .नवीन काय करायचे याचे बेत त्यांच्या डोक्यात चालू होतेच .काय करायचे कसे करायचे?एवढे वैविध्यपूर्ण जग बनवताना प्रत्येकाने आपली प्रत्येक शक्ती प्रत्यक कौशल्य पणाला लावलेले होते .त्यानी निसर्गाचा कण आणि कण विचारपूर्वक निर्माण केला होता .मग आता काय करायचे करायला वेगळे असे काहीच उरलेले न्हवते आणि इतक्यात एक देवाच्या डोक्यात ट्यूब पेटली..... करायचे काहीतरी वेगळे करायचे आणि त्याच्या मनातली निर्मीती होती माणुस .हा असेल इतरांसारखाच पण त्यांच्यात राहुन त्यांच्यापेक्षा वेगळा !आपण आपल्या विविध शक्त्या वापरून जग घडवले आता ह्या शक्ती आपण मानवाला देवू .पण मग माणूस आणि देव यांच्यात फरकच उरला नसता .मग आता काय करायचे .पण शेवटी देवच ते त्यानी यावर पण उत्तर शोधले .आणि त्या उत्तराचे त्या खटपटीतुन निर्माण झालेल्या उत्पदिताचे नाव होते मन... हा मन हा प्रकार थोड़ा अजब होता ना यावर मानवाचे नियंत्रण होते ना देवाचे .तो पूर्ण स्वतंत्र होता त्यात देवानी फ़क्त कही मुळ धारणा टाकल्या होत्या बस !त्यामुळे म्हटल तर त्या मनात काहीच नव्हते आणि म्हटले तर पर्वताची विशालता, नदीचा अवखळपणा सर्व काही होते
झाले एक शुभ दिवशी मानव पृथ्वीवर अवतरला .मनाचे खेळ चालू झाले .सारे देव आपणच निर्माण केलेल्या या बाळाच्या बाललीला उत्साहाने पाहत होते.हळुहळु माणूस प्रगत होत गेला मन बाल्यावस्थेतुन तारुण्यावस्थेत गेले .त्याने अवघ्या जगाचे ज्ञान मिळवले .मन प्रगल्भ होत गेले .त्यातून येणारा विचारांचा प्रॉडक्ट कालानुसार बदलत राहिला हळुहळु विचारांची द्वंद्व खेळली गेली ,विचारांच्या भावनांच्या थोडक्यात मनाच्या कक्षा वाढल्या कधी कधी तर हेच मन भावंनाना ठोकारु लागले .त्याने अखिल मानवी शरीरावर कब्जा केला .मानवाला विचारांशिवाय जगणे अशक्य झाले .विचार आणि मन दोघेही एकमेकाना पूरक होते .देव शांतपणे हे सर्व पाहत होता कधी त्याला मनाची भरारी पाहून अभिमान वाटला तर कधी आपण असे मन बनवून चुक तर केली नाही ना असे वाटले
काळ मात्र कधीच कुणासाठी थांबत नाही येथेही नही थांबला तो उडत्या पानाप्रमाणे पुढे सरकला तपे काय युगे सरली विज्ञानयुग आले .मानव ,समाज सगळे बदलले ही सर्व मनाचीच किमया होती आणि एवढे सगळे झाल्यावरही आजही मन हे खेळ खेळत आहे .आता तर मनाची व्याप्ती खुपच वाढली आहे .त्याच्या कुपीतुन क्षणाक्षणाला विचाररूपी गंध बाहेर पडत आहेत आणि अनादी कालापर्यंत पडत राहणार आहेत .त्यातलेच कही सुगंध वेचून आपल्यापुढे ठेवतोय .खास आपल्या मनासाठी हे मनाच्या कुपीतले ..........
प्रतिक्रिया
28 Nov 2008 - 1:58 pm | टारझन
कोल्हापुरी दादा साहेब ... अफ्रिकन महादादांचा णमस्कार्स !!
आपले मिसळपाव वर स्वागत आहे. इथं जास्त नियम णाहीत. शुद्ध नाही लिहीलं तरी चालेल.. पण ते वाचनिय असु द्या हो. वाचायला अंमळ तरास झाला.
लिवायची पिरॅक्टिस करा .. लै सोप्प आहे.
- टारझन
28 Nov 2008 - 2:22 pm | विनायक पाचलग
धन्यवाद मित्रा
पहिल्यन्दा झालेल्या चुका काढल्या आहेत आत वाच
28 Nov 2008 - 2:05 pm | ओमकार
:H भावा,जिन्कलस की ! लै भारी.........नाद खुळा.
28 Nov 2008 - 2:05 pm | ओमकार
:H भावा,जिन्कलस की ! लै भारी.........नाद खुळा.
28 Nov 2008 - 2:35 pm | अनिल हटेला
येल्कम कोल्हापूरी दादा.....
पहीला लेख चांगला लिवलाय....
थोडी कालजी घे मनजे आमाला वाचायला तरास नाय होणार....
(चीनी दादा)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
28 Nov 2008 - 3:09 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त्त रे मर्दा !!
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य