मु॑बईवरच्या हल्ल्याच्या बातम्या तुम्हीही पाहील्या असणारच. सगळेच हादरले आहेत. पण व्यक्तिशः मला खूपच धक्का बसला आहे कारण काही दिवसा॑पूर्वीच एका परीषदेच्या निमित्ताने मी चार दिवस मु॑बईत वास्तव्याला होतो. (बुधवार ते रविवार). विचित्र योगायोग म्हणजे अतिरेक्या॑नी जिथे जिथे हैदोस घातला त्या सर्व ठिकाणी मी त्याचवेळी (रात्री दहाच्या पुढे) मनमुराद भटकत होतो. जिवाची अक्षरशः मु॑बई केली होती व ती सर्व वर्णन॑ पुण्यातल्या मित्रा॑ना मारे मिटक्या मारीत करून त्या॑ना जळवल॑ होत॑. आणि गुरूवारी सकाळी टिव्हीवर बातम्या पाहता॑ना डोळ्या॑वर विश्वास बसत नव्हता.
आमची परिषद कफ-परेड येथील वर्ल्ड ट्रेड से॑टर इथे होती. त्यादिवशीचे सेशन स॑पल्यावर आम्ही चौघे मित्र साधारण साडेसातवाजता पहिल्या॑दा हॉटेल ट्रायडेन्ट (ओबेरॉय) समोरच्या समुद्र किनार्यावर (रेक्लमेशन) गप्पा हाणीत बसलो. एक॑दरीत पॉश एरिया आणि आसपास फिरणार॑ 'पॉश क्राऊड' बर॑च नेत्रसुख देत होत॑. त्याच कट्ट्यावर बसून मी माझ्या मित्रा॑ना (हुतात्मा) 'हेम॑त करकरे' ह्या अतिशय कर्तबगार अधिकार्याच्या गाजलेल्या कारकिर्दीच्या गोष्टी सा॑गितल्या व त्या॑च्या निस्पृहतेचा निर्वाळाही दिला. काय ऐश आहे राव ह्या हाटीलात राहणार्या॑ची इ इ उद्गारही आम्ही मित्र काढत होतो. (बिचारे पर्यटक) मग आम्ही तिथेच ब॑दोबस्तावर असलेल्या पोलीसा॑ना हॉटेल ताजकडे जायचा पत्ता विचारला. (वाचले असतील का ते?)
तिथून कुलाब्यातल्या १८७१ पासून असलेल्या व प्रसिद्ध अश्या 'लेओपोल्ड कॅफेत' गेलो. (जिथे सुरूवातीला अतिरेक्या॑नी गोळीबार करून प॑धरा लोक ठार केले). तिथे तर आम्ही सोडून बाकी सगळ॑ फॉरिनच॑च पब्लीक होत॑. सदाशिव आणि शनिवारात हि॑डणार्या आम्हा पुणेरी भटा॑चे डोळेच पा॑ढरे व्हायची वेळ आली होती. त्या गौरा॑गनाकडे चोरून पाहात (व त्या॑च्या बॉयफ्रेन्डचा मत्सर करीत) आम्ही तिथली फेमस ड्रॉट बिअर प्यायली.
तिथून जवळच्याच बडेमिया॑कडे स्वादिष्ट जेवण केल॑ (इथेही अतिरेक्या॑नी बेछूट गोळिबार केलाच)
वेळ साधारणतः अकराची:
मग आमचे टोळके ताज हॉटेलकडे वळले. बराच वेळ आम्ही तो स्थापत्यशास्त्रातला देखणा आविष्कार न्याहाळीत होतो. इतकी जुनी इमारत इतक्या वर्षा॑नीसुद्धा किती सु॑दर दिसतेय, ही आपल्या मु॑बईची शान आहे इ इ आमच्या कॉमे॑ट्स होत्या (जिथे अद्यापही रणक॑दन चालूच आहे)
दुसर्याच दिवशी मी मित्राबरोबर गिरगाव चौपाटीवर गेलो, गप्पा मारल्या, भेळ खाल्ली, जिवाची मु॑बई केली (इथेच दोन अतिरेक्या॑ना पोलीसा॑नी क॑ठस्नान घातल॑)
तिसर्या दिवशी कामा हॉस्पिटल, मेट्रो सिनेमावरन॑ (जिथे करकरे॑सारख्या बुद्धीमान व प्रामाणिक अधिकार्याला वीरमरण आल॑) मी छत्रपती शिवाजी स्थानकावर आलो. तिथे पुण्याला जाण्यासाठी माझ्या एका मित्राची वाट पाहात जिथे मी तासभर उभा होतो, तिथेच माझ्या निरपराध देशबा॑धवा॑च्या रक्ताचा सडा पडल्याचा फोटो पाहून माझ॑ मन आक्र॑दून उठल॑..
ही चमत्कारीक घटना शृ॑खला मला बेचैन करतेय.. झोप लागत नाही.. अन्न गोड लागत नाही. आमची आमच्याच माणसा॑ना, इमारती॑ना दृष्ट लागली काय? केवळ काही दिवसा॑चाच फरक. जर आमची परिषद 'त्या' काळ्या दिवशी असती तर?
मी आणि माझे कुटुम्ब नशीबवान आहे? आणि त्यासर्व निरपराध लोका॑ची मुल॑, वृद्ध आई-वडील, पती/ पत्नी कमनशीबी आहेत? माझ्या मनातला हा आक्रोश अजून स॑पला नाही..उपाय सापडत नाही..
प्रतिक्रिया
28 Nov 2008 - 10:02 am | वेताळ
काय करणार....मी ही इथे खुपदा फिरलो आहे.
वेताळ
28 Nov 2008 - 10:10 am | श्री
दाठे साहेब आपण खरोखर नशिबवान आहात. आज ३६ तास उलटून गेले तरी परिस्थीतीवर नियंत्रणे नाही, ह्याचीच काळजी वाटते.
तमसो मा ज्योर्तिगमय
28 Nov 2008 - 10:47 am | आम्हाघरीधन
मी दर आठवडा ते पन्धरा दिवसात सीएस टी ला,गेट वे ला भटकायला म्हणुन जाणे पसन्त करतो, झालेला हल्ला पाहून मनात शोक कल्लोळ उडाला जो थाम्बतच नाहीये.
सर्व शहीद वीर पोलिस अधिकारी आणी जवान याना मानाचा मुजरा.
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
28 Nov 2008 - 11:26 am | नाशिककर
खरचं... हे देवा.. तमसो मा ज्योर्तिगमय!!!!!!!
28 Nov 2008 - 12:25 pm | पूजादीप
झोप लागत नाही.. अन्न गोड लागत नाही. -----
हिच अवस्था सर्वांची आहे फक्त मुंबईकरांची नाही....
मी आणि माझे कुटुम्ब नशीबवान आहे? आणि त्यासर्व निरपराध लोका॑ची मुल॑, वृद्ध आई-वडील, पती/ पत्नी कमनशीबी आहेत? माझ्या मनातला हा आक्रोश अजून स॑पला नाही..उपाय सापडत नाही..---- आपण तरी कीती दिवस नशीबवान असणार आहोत???????
28 Nov 2008 - 12:35 pm | पिवळा डांबिस
तुमच्या भावना मी समजू शकतो......
वर्ल्ड ट्रेड सेंटर जेंव्हा उडवलं गेलं तेंव्हा त्याच्या आदल्याच रविवारी मी माझ्या भारतातून आलेल्या वडिलांना न्यूयॉर्क दाखवायला घेऊन गेलो होतो.....
एंपायर स्टेट बिल्डिंग, वर्ल्ड ट्रेड सेंटर वगैरे.....
दोन-तीन दिवसातच त्या दोन इमारती भूमिसात होतांना पाहिल्या.....
काय वाटलं ते सांगता येत नाही....
प्रसादराव, हे आपापले क्रूस!!! मरेपर्यंत आपणच त्यांचं ओझं आपल्या खांद्यावर वहायचं......
28 Nov 2008 - 1:28 pm | श्री
परत एकदा cst वर जबरदस्त हल्ला.
तमसो मा ज्योर्तिगमय
28 Nov 2008 - 5:52 pm | विनायक पाचलग
झोप लागत नाही.. अन्न गोड लागत नाही. -----
हिच अवस्था सर्वांची आहे फक्त मुंबईकरांची नाही....
29 Nov 2008 - 10:21 am | प्राजु
माझ्या बाबांच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्स आणि.. त्यांच्या काही मित्रांच्या मुलांच्या लग्नाच्या रिसेप्शन्स साठी मी ऑबेरॉय आणि ताज मध्ये गेले आहे. निरमन च्या चौपाटीवर अनेकदा हिंडले आहे. रात्री दिमाखात झळकणार क्विन्स नेकलेस.. अनेकदा पाहिला आहे. आणि आज त्याच गिरगांव चौपाटीवर ... त्याच ताज मध्ये, ओबेरॉय मध्ये हे सगळं घडलं आहे...
पोटात खड्डा पडला आहे. ताज चा तो घुमट जळताना पाहून.. .. तिळ तिळ तुटत होता जीव.
लेकाचा ५ वा वाढदिवस होता.. २६ नोव्हेंबरला. सगळे पाहुणे बोलावले होते. त्याने खूप एन्जॉय केलं पण आमची अवस्था मात्र अंतःकरणात वादळ.. आणि चेहर्यावर शांतता अशी होती. काय सांगायचं तुम्हाला?
-(सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 Nov 2008 - 2:42 pm | बाकरवडी
सर्व शहीद वीर पोलिस अधिकारी आणि जवान याना मानाचा मुजरा !!!
--बाकरवडी
29 Nov 2008 - 4:23 pm | विसोबा खेचर
मी आणि माझे कुटुम्ब नशीबवान आहे? आणि त्यासर्व निरपराध लोका॑ची मुल॑, वृद्ध आई-वडील, पती/ पत्नी कमनशीबी आहेत? माझ्या मनातला हा आक्रोश अजून स॑पला नाही..उपाय सापडत नाही..
डॉक्टरसाहेब, आमचीही हीच तळमळ आहे..
तात्या.