पौष शुद्ध १५ अर्थात शाकंबरी पौर्णिमा

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
28 Jan 2021 - 5:06 pm

बनशंकरी

मागे पुराणकाळी पृथ्वीवर अवर्षण पडले ते १०० वर्षे चालले. अन् त्यामुळे समस्त मानव प्रजाती अन्नावाचून नष्ट होण्याची भिती निर्माण झाली. मानवाची अन्नासाठी वणवण सूरू झाली. केवळ मानवच नाही तर सकल प्राणीमात्र अन्नावाचून तडफडू लागला अन् नष्टत्वाच्या फेऱ्यात सापडला.

अशा भयाण काळी साक्षात आदिशक्ती जगद्जननी भगवतीचे मातृहृदय तळमळून जागे झाले. आपल्या लेकरांचे दु:ख तिला पाहवेना, सोसवेना. त्याच्या दु:खावर फुंकर घालून ते शांत करण्यासाठी आवश्यकता होती अन्नाची अन् पाण्याची त्यासाठी भगवतीनेच अवतार धारण केला. अन् आपल्या लेकरांवर कृपा केली.

ममत्वाने त्यांना खाण्यासाठी आपल्या शरीरातून पालक, करडी, शेपू, हादगा, मेथी शेवगा, कोथिंबिर यासारक्या हजारो शांक अर्थात पालेभाज्या अन् पडवळ, भोपळा, देवडांगर, मुळ्याच्या शेंगा, केळी यासारख्या फळभाज्यांचा निर्मिती तिने केली. प्रजा पोटभर खावून सुखावली. तसेच देवीने पातालातून हरिद्वार तीर्थाचे पाणी आणून प्राणी मात्रांची तहान भागविली प्रजा संतुष्टली.

त्यामुळे आदिशक्तीच्या या अवकाराला अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच त्यामुळे तिची शाकंबरी नावाने उपासना केली जाते शाकंबरी म्हणून विशेष पुजा केली जाते .

या देवीचे मुळस्थान कर्नाटकातील बदामी जवळ ६ मैलावरच्या चोलचगुडू लहानश्या या गावी आहे.

गावजवळच्या वनातली देवी असल्याने तिला बनशंकरी असेही म्हणतात. या वनाला तिलकवन म्हणून पुराणात उल्लेखले आहे.

देवीच्या कृपेने तिलकवनाचा वृक्ष लतांनी बहरला, फळाफुलांनी लगडला समृृद्ध झाला. त्यामुले राक्षसांनी तिथे जावून नासधूस केली म्हणून देवीने वाघावर स्वार होवून रणांगणात त्यांचा पराभव केला. देवतांनी आनंदून त्या क्षेत्री हरिद्वारतिर्थ अन् तैलतिर्थाच्या मदे सिंहारूढ मूर्ती स्थापून तिची पूजा केली. तीच बनशंकरी. या तिलकवना वरील दुष्काळ देवीच्या १०० नेत्रातील दयाद्रदृष्टीमुले पाऊस पडून हटला म्हणून या देवीला शताक्षी ही म्हणतात तसेच विष्णुधर्मसूत्रात पश्चिम राजस्थानातील जोधपूर, जयपूरचे सीमेवरच्या सरोवराकाठी हिचे एक स्थान आहे. त्याशिवाय हरिद्वार - केदार रस्त्यावर कुमाऊँ टेकडीवरही एक स्थान आहे. इथे मातेने १००० वर्षे तपश्चर्या केली ती केवळ शाकभाज्या खाऊन. त्यामुळेहि या देवीला शाकंबरी म्हणतात.
पौष शु ७ ते पौर्णिमा पर्यंत देवीचे नवरात्र उत्सव होते. समाप्तीला देवीला साठ शाक भाज्या अन् ६० कोशिंबिरीचा गोडाधोड पक्वान्ना सह नैवेद्य समर्पिला जातो.

बनशंकरी यास्थानी पुरातन दगडी मंदिर असून तिथे अष्टभुजा रूपातील देवी असून तिचे ८ ही हातात आयुधे आहेच. देवी सिंहावर स्वार असून सिंहाच्या पायाखाली हत्ती आहेत. नित्य त्रिकाळ पूजा होवून प्रत्येक शु्क्रवारी देवीची पालखी निघते. तर उत्सवकाळी मोठा रथोत्सव होतो.
या पौर्णिमेला पंढरी नगरीत मिळणाऱ्या ६० भाज्या

कवाळ, आवळा, देवडांगर, कारले, भोपळा, काळी कोयरी, काळमाशी गड्डा, शिंगोळी, चिंच, उंबरदोडी, काळा मका, मुकणी, राजगीरा, तांदुळसा, वासनवेल, पाणर, कातमोडा, कडापाला, राजहंस, मोहरी, माठ, काटेमाठ, हुंजीर, कासोटा, आंबाडा, जवस, चुका, चाकवत, चुची, कपाळकुटी, सुपारीवेल, शेवगा, सराटा, शेंगी, काळकुसूद, कुरडा, तुरी, दुधणी, पडवळ, तोंडली, पटारी शेंग, गोकर्ण, कवठ, बोर, केळी कोबाद, केळी फुल, रताळी वेल, कामोत्या, आळू, आळू गड्डा, पपई, हरभरा, गाजर, गाजरपान, मेथी, काशीफळ भोपळा, पुदिना, देशी टोमॅटो (बेलवांगे), हादगा फुल, हादगा पान, हादगा शेंगा, शिवगंगा फुल, शिवगंगा पान, शिवगंगा शेंगा, मुळा, मुळ्याच्या शेंगा, मुळ्याचे पान, मुळ्याचे फुल, वांगे दोडका, गवार, भेंडी घेवडा, पावटा, दुधी भोपळा, आवळा, कारले, कोबी, फुल कोबी ( फ्लाॅवर), वाटाणा, शेपू, पालक, मिरची, करडा, घोळ, कोथिंबीर, घोसावळे, चवळी

© आशुतोष अनिलराव बडवे पाटील
पंढरपूर

इतिहास

प्रतिक्रिया

Ujjwal's picture

29 Jan 2021 - 12:06 am | Ujjwal

_/\_