मिया आणि व्हाईट लायन(२०१८)
तोत्त्तोसारखीच मिया ही एक चिमुकली आहे.आईवडिलांबरोबर दक्षिण आफ्रीकाला ते वास्तव्यास येतात.त्यांच्या जंगली प्राण्यांचा एक फार्म असतो .तेव्हा १० वर्षांच्या मियाचा आणि छोट्याशा चार्ली या नष्ट होत चाललेल्या पांढऱ्या सिंहाची मैत्री होती.ती इतकी घट्ट असते की मिया त्याच्याशिवाय चार्ली मियाशिवाय वेगळे राहूच शकत नाही.
मियाला जेव्हा शाळेत दूर टाकतात,तेव्हा ती त्याला इतकी मिस करते की थेथून पळून पुन्हा फार्मवर येते.चार्लीतर खूप दिवसांनी तिच्या हातूनच धुध पितो...इतक खास नात असत त्यांच.चार्लीमुळे मिअयाच्या वडिलांचा प्राण्यांची सफारी व्यवसाय तेजीत असतो.पण चार्ली या बंदिस्त वातावरणात थोडा अस्वस्थच राहतो.तेव्हा एका पर्यटकावर तो हल्ला करतो.मिया त्याला पुन्हा संभाळते.तेव्हापासून चार्लीजवळ कोणीच जात नाही फक्त मियासोडून.पण व्यवसायामुळे त्याला पाळणे मियाच्या वडिलाना खूप गरजेच असते.
चार्ली दुर्मिळ सिंह असल्याने त्याला विकत घेण्यासाठी अनेक दक्षिण आफ्रिकेतले caaned hunt वाले मियाच्या वडिलाना भरपूर मोबदला तयार असतात.पण ते टाळत असतात.अशातच मियाच्या भावाला चार्ली हल्ला करतोय असा गैरसमज होऊन ,त्याला विकण्याच ठरवतात पण मिया चार्लीला नाही भेटणार अस असे वाकॅहन देत त्यांना थांबवते.
मियाचे स्वप्न असते की,ती चार्लीला या अस्वथेतून मोकळ करणार ,सुंदर त्याला स्वातंत्र्य देणार.हि गोष्ट तिच्या वडिलाना समजते आणि ते गुपचूप चार्लीला caaned hunt ला देण्याचे ठरवतात.पण मियाला जेव्हा हे समजते...ती प्रत्यक्ष डोळ्यांनी असे क्रूर प्राण्याची हत्या करण्याचा प्रकार पाहते ..तिच्या आणि आपल्याही डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागतात...तेव्हा ती चार्लीला मुक्त करण्याचा आता बेडाच उचलते.
तिम्ब्वती हा संरक्षित विभाग असतो,जिथे प्राण्यांचा मुक्त संचार असतो...त्यांना अभय असते.तेथे चार्लीला सुरक्षित पोहचवण्याचे काम आता मियाला करायचे असते.त्यासाठी घरून चाव्या चोरत ती चार्लीला मुक्त करते आणि ते दोघे त्या दिशेने चालत राहतात.
आता मात्र सर्व प्रशासनही चार्लीला जागेवर संपवा असा आदेश काढते.पण मिया लपत छपत चालत राहते.मिया यासठी वडिलांना गुंगीचे बाण मारत त्यांची गाडी घेत पळून जाते.चार्ली जेव्हा पहिल्यांदा शिकार करतो ,तेव्हा मियाआला खूप आनंद होतो.जस आईला आपल्या मुलाला जिंकल्याच पाहून होतो अगदी तसाच.मिया दमते ठाकते,पाणी अन्नाशिवाय चालत राहते चार्लीसाठी....
तो दुष्ट canned hunt वाला जेव्हा मियाला मारायला जातो,तेव्हा चार्ली त्याच्यावर हल्ला करतो आणि ते तिथून सुटका करतात.
मियाला नकाशा सापडतो तिम्ब्वतीला जाण्याचा ..तेव्हा तो फार जुना असतो आणि त्या ठिकाणी एक mall आता असतो.तेव्हा ती तो mall ओलांडून चार्लीला थेथे भर माणसात आणते..तो प्रसंग फारच मस्त आणि सुखकारक वाटतो.मिया किती शूर आहे ते कळते.
आता मिया आणि चार्ली तिम्ब्वतीच्या सीमेवर असतात.तोच तेथे प्रशासनाची मानस येतात.चार्लीला मारण्यासाठी...मिया चार्ली पळ..असा घोका सुरु करते..इथे मियाच्या वडिलांना आपली चूक सुधारण्याची संधी मिळते आणि ते त्याला संरक्षित करत चार्लीला त्या संरक्षित विभागात जायला मदत करतात.आणि चार्ली ठीथे पोहचतो ..मोकळ्या हवेत..त्याच्या हक्काच्या घरात...तिथले लोक त्याचे मुक्त स्वागत करतात...
मियाच स्वप्न पूर्ण झालेलं असते....
ह्या सिनेमाच वैशिष्ठ्य म्हणजे यात कोणताही स्पेशल इफ्फेक्ट न वापरता खरा खुरा थोर नावाचा सिंह वापरला आहे.आणि सिनेमा ३ वर्षाच्या काळात चित्रित केलाय. canned hunt ही आफ्रिकेतील लीगल समस्या यात मांडली आहे.
---भक्ती
प्रतिक्रिया
21 Dec 2020 - 11:06 am | गोंधळी
ह्या सिनेमाच वैशिष्ठ्य म्हणजे यात कोणताही स्पेशल इफ्फेक्ट न वापरता खरा खुरा थोर नावाचा सिंह वापरला आहे.
हो. त्यामुळे फिल्म बघताना मजा येते.
21 Dec 2020 - 6:03 pm | पॉइंट ब्लँक
गोष्ट छान सांगितली आहे. असाच एक मनुष्य आणि प्राणी ह्यांच्यातील जिव्हाळ्याचा दर्शन घडवणारा चित्रपट- ड्रिमर - https://www.imdb.com/title/tt0418647/
बालकलाकरचा अभिनय खरच खुप सुंदर आहे.