मी पाहिलंय...

आर्णव's picture
आर्णव in जे न देखे रवी...
4 Dec 2020 - 7:20 am

मी पाहिल्यात इच्छा आकांक्षांच्या कळ्या.
उमलताना फुलताना, मस्त बहरताना.
काहींना झाडावरच कोमेजताना.
काहींना निर्माल्य होताना.

मी पाहिलेत निर्धाराचे पाषाण.
अविचल स्तब्ध असताना.
प्रयत्नांचे घण चिकाटीने सोसतांना.
मूर्ती बनून श्रद्धास्थानी बसताना.

मी पाहिलंय सदा भुकेल्या अहंकाराला.
अधाशीपणे सुख उपभोगताना.
कधी सोयीस्कर मस्तक झुकवताना.
कधी दैवाकडे जोगवा मागताना.

मी पाहिलेत बुद्धीचे गगनचुंबी मनोरे.
अंतराळाला गवसणी घालताना.
हव्व्यासाच्या नादी लागताना.
जमिनीशी नातं तोडून टाकताना.

मी पाहिलेत प्रतिभेचे सूर्य.
संपदेचं तेज उत्सर्जताना.
काही उगवताना, आकाशात तळपताना.
काही आळसाच्या अंधारात मावळुन हरवताना.

मी पाहिलंय खूप काही, असलेलं आणि नसलेलं.
काही उघड होतं, काही लपून बसलेलं.
काही दिसत होतं, काही भासत होतं.
माझं मन मलाच खाण्यासाठी आ वासत होतं.

कविता

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

4 Dec 2020 - 3:34 pm | टवाळ कार्टा

कच्चा माल =))