सहजच...

Primary tabs

भटक्य आणि उनाड's picture
भटक्य आणि उनाड in जे न देखे रवी...
17 Nov 2020 - 1:04 pm

सहज त्या दिवशी तू
फोटोसाठी पोज़ काय दिलीस,
नकळत माझ्या ह्रदयाची
तार छेडुन गेलीस..

कस् सांगू तुला काय
झक्कास दिसलीस तेव्हा,
असाच मला छळायचा
तुझा छद जगावेग.ळा..

काढलेस जरी असले फोटो तर
प्लीज़ दाखवू नकोस मला,
ते क्षण मिस केल्याचा
त्रास होतोय मनाला..

कधी वाटल नव्हत की
तू मला अशी भेटशील,
भेटली ती भेटलीस पण
माझ ह्र्दय घेऊन गेलीस..

बस जरा तिथेच स्टेज वर
दिलखुलास आवाजचे सूर छेड,
मनासारखे तुझे फोटो काढायचेत
हवाय त्यासाठी थोडासा वेळ..

तुझे फोटो ठेवणार मी
देणार नाही कुणाकुणाला,
किती हटटी आहे तुझ्यासाठी
एकदा सांगायचय तुला...

कविता

प्रतिक्रिया

रंगीला रतन's picture

28 Apr 2021 - 1:02 pm | रंगीला रतन

भावना पोचल्या!
पण हे काय?
तुझा छद जगावेग.ळा..
तुझा छंद जगावेगळा.. असे पाहीजे ना!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Apr 2021 - 1:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चालू द्या शुभेच्छा. ...! :) करोना काळात इकडे तिकडे फ़िरु नका. काळजी घ्या.

बाय द वे, रचना थेट भिडली लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

28 Apr 2021 - 1:36 pm | प्रचेतस

+१, काळजाला भिडणारी कविता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Apr 2021 - 1:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अच्छा. काळजाला भिडणारी कविता म्हणाला म्हणून एक प्रश्न विचारावा वाटतो.
तुमच्या काळात खालील चार ओळीबाबत काय अनुभव असायचा...

सहज त्या दिवशी तू
फोटोसाठी पोज़ काय दिलीस,
नकळत माझ्या ह्रदयाची
तार छेडुन गेलीस..

-दिलीप बिरुटे
(उत्सुक)

प्रचेतस's picture

28 Apr 2021 - 1:43 pm | प्रचेतस

तेव्हा क्यामेरे वगैरे सहज उपलब्ध नसायचे हो. हल्ली फोनमुळे लगेच चंबू वगैरे करता येतात. आमच्या काळात प्रत्यक्षच असायचं सगळं.
तुमचा काय अनुभव?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Apr 2021 - 1:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्या काळात प्रत्यक्षच असायचं सगळं

हे राम, आपली फ़ार पुढील आवृत्ती दिसते. कठीण आहे सगळं.

तुमचा काय अनुभव?

आमचं ठरलेलं होतं, म्हणजे एक अलिखित गोष्ट होती.
आपल्या आठवणी कोणालाही सांगायच्या नाहीत.

पण, तुमच्यामुळे मला नियम मोडावे लागतात. (पण परवानगी घेऊन.)
तर आमच्यावेळी सायंकाळी एखादे डोंगरावरील लेणी-मंदिर भटकंती.

अजून येतो वास फ़ुलांना,
अजून माती लाल चमकते,
खुरट्या बुंध्यावरी चढून
अजून बकरी पाला खाते,

कविता, मराठी गाणी, गझला. असो.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

28 Apr 2021 - 2:12 pm | प्रचेतस

क्या बात..!
तुमच्या काळात रात्र रात्र चालणारे काव्यशास्त्रविनोद (अर्थात फोनवर) चालत नव्हते वाटतं.