एका सैनिकाची परीक्षा.. मातृभूमीच्या प्रेमासाठी...

भटक्य आणि उनाड's picture
भटक्य आणि उनाड in जे न देखे रवी...
17 Nov 2020 - 1:02 pm

तुला कसँ सांगू आई, आज माझी परीक्षा आहे
या रणागणावर उरलेला मी शेवटचा सैनिक आहे,

खूप दिवस झाले होते इथे येऊन
सगळे कनटाळले होते सराव करून करून
या असल्या वातावरणात आम्ही काय काय नाही केल
ऊन थंडीमुळे आमच्या रक्ताच पाणी झाल
सगळ्याना वाटत होत की आता हे संपाव
हसत खेळत आपापल्या घरी जाव
पण बहुतेक हे आमच्या नशिबात नव्हत
दुर्दैवाने कालच रात्री हे रणागण पेटल...

अचानक हल्ला झाला, गोळयाचा पाउस पडला, बॉम्ब पडले, धुरात काहीच दिसेनास झाल,
सुरुवातीला बरेच पडले पण बाकीच्यानी सांभाळल, पण अपुर्‍या शक्तिवर आम्ही किती सावरायच?
शेवटी तेच झाल जे अपेक्षीत नव्हत, एक एक करत सगळ्याच आयुष्य थांबल...

आता इथे फक्त एकटा मी उरलो आहे,
बाजूला निष्पराण देहांचा खच पडला आहे..

समोरून शत्रू हजारोनि पुढे येतोय, आणि इथे मी हळुहळु शुद्धीवर येतोय,
इथे सगळे संपलेत तरी मला भीती वाटत नाही,
जोपर्यंत माझ रक्त लाल आहे तोपर्यंत मी मागे वळनार नाही,
जे आजवर शिकलोय ते अस वाया का घालवायच?
भीती एव्हढीच आहे की आई तुला कस सोडून जायच?

तुला कसँ सांगू आई, आज माझी परीक्षा आहे
या रणागणावर उरलेला मी शेवटचा सैनिक आहे,

माझी स्वप्न मी आता माझ्याबरोबर घेऊन जातोय,
माफ कर आई पण तुला दिलेल वचन मोडतोय..
पण आता मी तुला नवीन वचन देतो,

या जन्मात या मातीच कर्ज चुकवतो आणि पुढल्या जन्मात तुझ,
म्हणुनच आज मला जाउ दे, शेवटच कर्तव्य पूर्ण करू दे...

तू हे कधी वाचलस तर रडू नकोस, नको बघूस या रणागणाकडे, ना त्या देहांकडे,
डोळ्यांसमोर आण फक्त मी, चाललाय पुढे... एकटा...
एका हातात बंदुक आणि दुसर्या हातात उरलेला श्वास घेऊन...
निघालोय मी त्या असीम शौर्याला भेटायला... अनंताच्या प्रकाशात विलीन व्हायला !!!!!

कविता

प्रतिक्रिया

अथांग आकाश's picture

19 Nov 2020 - 3:53 pm | अथांग आकाश

मनाला भिडणारी कविता!!
.