प्राणप्रिये

Primary tabs

डॉ.अमित गुंजाळ's picture
डॉ.अमित गुंजाळ in जे न देखे रवी...
9 Sep 2020 - 1:08 am

प्राणप्रिये,
सात फेरे घेऊन जीवनात माझ्या आलीस ,
अन अंगणातील तुळस झालीस तू.
हसून खेळून सुखी संसाराची स्वप्ने रंगवतेस,
अन मला समाधानाचा गारवा देतेस तू.
प्राणप्रिये,
अंधाराच्या जाळ्यामध्ये ही प्रकाशाची फुंकर घालतेस,
अन प्रितीच्या वाऱ्यावर झोका झुलवतेस तू.
जिद्दीने उंच उंच भरारी घेण्यास शिकवतेस,
अन मनाच्या गाभऱ्याचे दरवाजे उघडतेस तू.
प्राणप्रिये,
सहजीवनात आधार देऊन साथ निभावलीस,
अन माझ्या घरची परसबाग झालीस तू.
सुख दुःखाच्या प्रत्येक गोष्टीत भागीदारी केलीस,
अन जीवन माझे रोशन केलेस तू.
प्राणप्रिये,
अमाप प्रेम करून वर्षोनुवर्षे संगत केलीस ,
अशीच या पूढेही करशील ना तू.
जन्मोजन्मी एकत्र राहण्याची तू शपथ घेतलिस,
देतो ग्वाही मी पण , संग राहू मी आणि तू.
प्राणप्रिये,
संग राहू मी आणि तू,
संग राहू मी आणि तू.

कविता माझीकविता