माैन

मी-दिपाली's picture
मी-दिपाली in जे न देखे रवी...
21 Jun 2020 - 10:30 am

शब्दांचा प्रवास
काहीच फर्लांग
माैनाचा थांग
निरंतर...॥

शब्दांचा अर्थ
कळे यथामती
माैनाची महती
कोणा कळे ॥

शब्दांचे शस्त्र
जिव्हारी घाव
अंतरीचा ठाव
माैन घेई ॥

शब्दांचे धन
उजळली आभा
माैनाचा गाभा
अंधारात ॥

शब्दांचे नाते
नांदे जिव्हेसंगे
मनासवे रंगे
माैन परि ॥

कविता

प्रतिक्रिया

सनईचौघडा's picture

21 Jun 2020 - 12:43 pm | सनईचौघडा

आवडली आणि मौनाचा खरा अर्थ उलगडला हाच आहे.

सत्यजित...'s picture

21 Jun 2020 - 12:51 pm | सत्यजित...

अतिशय समर्पक मांडलीत मौनाची महती!

हे लिहिण्यास मात्र शब्द लागतातच,हा व्यत्यासच! तो ही मान्यच!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jun 2020 - 1:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मौनाचे अभंग आवडले.

-दिलीप बिरुटे

गणेशा's picture

21 Jun 2020 - 1:13 pm | गणेशा

शब्दांचे शस्त्र
जिव्हारी घाव
अंतरीचा ठाव
माैन घेई ॥

भारी

प्राची अश्विनी's picture

22 Jun 2020 - 10:15 am | प्राची अश्विनी

फार सुंदर!!!

प्रचेतस's picture

22 Jun 2020 - 11:49 am | प्रचेतस

अतीव सुरेख कविता

श्रीकांतहरणे's picture

22 Jun 2020 - 1:30 pm | श्रीकांतहरणे

फार सुंदर. मला आवडली पण मला संपुर्ण समजायला अजून माझी बौधिक पातळी मी वाढवायला हवी :-)

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, कमी बोलबच्चन (बहुदा मौन) करायचे, परंतु कामाच्या बाबतीत सिंह .. (अर्थव्यवस्थेला प्रगतीवर आणण्याचं व ठेवण्याचं महान कार्य )

अशी सुंदर कविता वाचनात आली, त्यांच्या सारख्या लोकांचं महानपण अधिकच उजळ होत.

I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media, or for that matter, the Opposition parties in Parliament. I cannot divulge all things that take place in the Cabinet system of government. I think, taking into account the circumstances, and the compulsions of a coalition polity, I have done as best as I could under the circumstances.
I do not believe that I have been a weak Prime Minister. That is for historians to judge.
-- डॉ मनमोहन सिंग (एक खरा पंतप्रधान )

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jun 2020 - 1:46 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/hand-clapping-smiley-emoticon.gif

मूकवाचक's picture

22 Jun 2020 - 4:51 pm | मूकवाचक

शब्दांचे शस्त्र, जिव्हारी घाव, अंतरीचा ठाव, माैन घेई .... _/\_

रातराणी's picture

22 Jun 2020 - 11:54 pm | रातराणी

वाह!! सुरेख!!

खिलजि's picture

23 Jun 2020 - 6:43 pm | खिलजि

मौनात गुंतले सारे
यौनाचे मुक्त वारे
धुंदावल्या दिशा दाही
भासे सम सूर्य तारे ''''''''''
क्षितिजात भेट झाली
हृदयात थेट आली
धमन्या त्या मंद साऱ्या
रक्ताची लाट उसळली '''''''''''
हास्यात स्मित दडले
डोळे डोळ्यांशी भिडले
मौनाने मात केली
हृदयाचे तुकडे पडले ''''''''''''
गुंगावली मती सारी
थंडावला जोश सारा
गात्रांनी मात देता
मेंदू ऊरे बिचारा ''''''''''''''