बँक ऑफ इंडीयाचा नॅशनल इंशुरन्सबरोबर मेडी-क्लेमचा टाय-अप होता.
बँकेच्या कस्टमर्सना माफक प्रिमियममधे मेडि-क्लेम कवर अशी योजना होती.
फॉर्म भरतांनाच तिथे असलेल्या स्टँडींग इंस्ट्रक्शनवर सही करणं
(प्रिमियम ड्यू डेटला खात्यातून परस्पर नॅशनल इंशुरन्सला पाठवला जाईल) अनिवार्य होतं.
त्याशिवाय तो फॉर्म वॅलीड नव्हता.
सात वर्ष प्रिमियम योग्य वेळी बँकेतून परस्पर खात्याला डेबीट होऊन पॉलिसी ऑटोमॅटीक रिन्यू होत होती.
आठव्या वर्षी बँकेच्या गफलतीनं प्रिमियम भरायचा राहिला आणि पॉलिसी लॅप्स झाली.
नेमक्या त्याच वर्षी पत्नीला हॉस्पिटलाइज करावं लागलं.
पॉलिसी लॅप्स झाल्याची मला कल्पनाच नव्हती.
तीला डिसचार्ज मिळाल्यावर क्लेम लॉज करायला गेलो तेंव्हा
ही भानगड उघडकीला आली !
________________________________
यावर बँकेनं खालील प्रमाणे सुरुवात केली :
१. अशी स्टँडींग इंस्ट्रक्शन नव्हतीच !
२. प्रिमियम भरला की नाही हे पाहणं खातेदारीची जवाबदारी आहे.
३. आम्ही तुम्हाला फोन केला होता ! ( भिकारचोट वकिली सल्यानं धादांत खोटं )
४. तुम्ही पूर्ण बिल मिळण्यासाठी बँकेला फसवून प्रिमियम चुकवला ! ( वकिली हलकटपणाची परिसीमा)
____________________________________
मी झोनल मॅनेजरला रितसर मेल पाठवली (तक्रार अर्ज) आणि भेटायला गेलो.
कारण ग्राहकमंचाकडे तक्रार करण्यापूर्वी बँकेला रिड्रेसलची संधी मिळावी अशी अट आहे.
त्यानं केबिनमधे असून पिएमार्फत भेट टाळली आणि
माझा तक्रार अर्ज फेटाळला !
आता बँकेला अश्वदर्शन घडवल्याशिवाय सुधारणार नाही, हे लक्षात आल्यावर
ग्राहकमंचाकडे दावा दाखल केला.
___________________________________
या कामाला बरीच चिकाटी लागते कारण बँकेचा वकील तद्दन हलकट आणि मुरलेला असतो.
तारीख-पे-तारीख आणि बरीच काऊंटर आर्ग्युमंटस होतात.
__________________________________________
मला दोनच गोष्टी प्रूव करायच्या होत्या :
१. स्टँडींग इंस्ट्रक्शन असतांना बँकेनी प्रिमियम भरला नाही,
त्यामुळे पॉलिसी लॅप्स झाली.
(माझा ओरिजिनल फॉर्म, जो मी नॅशनलकडून मिळवला)
२. ड्यू डेटला माझ्या खात्यात प्रिमियमपेक्षा जास्त बॅलन्स होता.
(माझ्या बँक स्टेटमंटची कॉपी)
_____________________________________
याच्या जोडीला मी आणखी दोन गोष्टी मिळवल्या :
१. सात वर्ष पॉलिसी रिन्यू झाल्याची नॅशनल इंश्युरन्सचं हिस्ट्री स्टेटमंट आणि
२. नॅशनल इंश्युरन्सनी बँकेला माझ्या पॉलिसीचा प्रिमियम भरण्यासाठी महिनाभर आधी पाठवलेली नोटीस !
हा सर्वात महत्त्वाचा पुरावा होता कारण त्यामुळे इंशुरन्स कंपनी जवाबदारीतून मोकळी होत होती आणि
बँकेच्या गहाळपणाचा आरोप सिद्ध होत होता.
_________________________________
मी सर्व कागदपत्र आणि माझं आर्ग्युमंट रितसर दाखल केल्यावर बँकेच्या वकिलाला तो पुरता कॉर्नर झाल्याचं लक्षात आलं.
मग त्यानं तारखा मागायला सुरुवात केली.
दुसर्या वेळी मी जजेसनां विनंती केली की जर बँकेचा वकिल पुढच्या वेळी हजर झाला नाही
तर तुम्ही एकतर्फी सुनावणी करावी.
_____________________________________
सुनावणीला भारी मजा आली !
वकिलानी आणखी सहा/सात खातेदारांचे अकाऊंटस आणले आणि असा स्टँड घेतला की
इतर खात्यातून प्रिमियम्स वेळच्या वेळी गेलेत.
बँकेची फिर्यादीशी दुश्मनी नाही.
पण बँकेनं वेळोवेळी फोन करुन फिर्यादीनी पॉलिसी रिन्यू करण्याबाबत काहीच न सांगितल्यानं त्याची पॉलिसी लॅप्स झाली !
__________________________________
मी पॉलिसी हिस्ट्रीकडे निर्देश करुन सांगितलं की खातेदाराला फोन करण्याचा प्रष्णच येत नाही.
माझी स्टँडींग इंस्ट्रक्शन होती आणि
बँक सात वर्ष त्याच बेसिसवर प्रिमियम भरत होती.
मला कुणाचाही फोन आला नव्हता.
ज्या वेळी इंशुरन्स कंपनीनं महिनाभर आधी बँकेला पाठवलेली नोटीस, बँकेच्या सही-शिक्यासहित दाखवली गेली;
तेंव्हा जजेसनं त्यावर वकिलाला त्याचा काऊंटर विचारला !
वकिल तोंडात मारल्यागत चूप झाला.
आणि निकाल माझ्या बाजूनं लागला !
_________________________________
साधारण एक वर्ष ही प्रोसेस कंप्लीट व्हायला लागलं,
पण माझं संपूर्ण बील (चाळीस हजार),
इंशुअर्ड रकमेच्या आत असल्यानं,
फक्त सात दिवसात माझ्या खात्यात जमा झालं !
प्रतिक्रिया
18 Jun 2020 - 3:40 pm | कानडाऊ योगेशु
ग्रेट अनुभव.गचाळ सिस्टीमच्या विरोधात उभे राहुन असा लढा दिलेल्यांचे कौतुक वाटते.
एक शंका आहे. अश्या केसेस वैयक्तिकपणे लढाव्या लागतात कि वकिलांमार्फत?
18 Jun 2020 - 3:49 pm | संजय क्षीरसागर
स्वतः लढवता येतात > त्यासाठी कोणतीही सनद लागत नाही.
शिवाय कोणतीही कोर्ट फी नसते.
18 Jun 2020 - 3:46 pm | मराठी_माणूस
जो मनस्ताप झाला त्याची परतफेड कशी ? बँकेच्या चुकीला काय दंड झाला ?
18 Jun 2020 - 3:51 pm | संजय क्षीरसागर
देतं > मनस्तापाला भरपाई नाही
पण मला लढतांना मजा आली.
18 Jun 2020 - 4:33 pm | अभिजीत अवलिया
अभिनंदन. दावा लढवायला आलेला खर्च, वकीलामार्फत केस लढल्यास वकील फी भरपाईत मिळते ना?
18 Jun 2020 - 5:51 pm | संजय क्षीरसागर
पण अर्ज करतांना रिलीफ सॉटमधे ती आधी नमूद करावी लागेल आणि जजेसना ती योग्य वाटली पाहिजे > त्याचे नॉर्म्स मी बघितले नाहीत
18 Jun 2020 - 4:55 pm | ज्ञानोबाचे पैजार
भारी किस्सा...
नॅशनल कडे बरी तुमच्या अर्जाची प्रत सापडली.
असल्या अर्जांची प्रत स्वतः कडे काढून ठेवली तरी ऐत्या वेळी सापडत नाही.
असे दगडावर डोके आपटून घ्यायला मजा येते,
अभिनंदन
पैजारबुवा,
18 Jun 2020 - 5:56 pm | संजय क्षीरसागर
बॅंकेकडे प्रिमियम मागितला जायचा !
खरं कौशल्य बॅंकेची सही शिक्का असलेली इंटीमेशन मिळवण्यात होतं > ती कल्पना मला दावा दाखल करतांना सुचली !
18 Jun 2020 - 5:29 pm | कंजूस
भारी काम केलेत.
हे सर्व थोडं थर्ड पार्टी झालं का? म्हणजे तुमचा इन्शुअरन्स कंपनीचा हप्ता बँक भरणार? यात थोडा घोळ होतो हे पाहून पुढील लोक जागे होतील.
18 Jun 2020 - 5:59 pm | संजय क्षीरसागर
स्टँडींग इंस्ट्रक्शनबद्दल आरबीआय नोटीफिकेशन आहे > मी तेही जोडलं होतं
18 Jun 2020 - 6:03 pm | संजय क्षीरसागर
सविस्तर लिहायला सांगितलं होतं > म्हणून सर्वांसाठी ही पोस्ट!
18 Jun 2020 - 6:28 pm | अनन्त्_यात्री
बँकेला पाठवलेल्या नोटीशीची प्रत पाॅलिसी होल्डरला पाठविणे बंधनकारक नसते?
18 Jun 2020 - 7:07 pm | संजय क्षीरसागर
ते बंधनकारक नसावे > पण मुद्दा योग्य आहे.
नोटीस आली असती तर मी बँकेत फॉलो-अप केला असता.
18 Jun 2020 - 7:48 pm | सुबोध खरे
सरकारी बँका आणि सरकारी विमा कंपन्यांचा माझा अनुभव एकंदर अत्यन्त निराशाजनक आहे. त्यातून बँक ऑफ इंडिया तर सर्वात भिकार ग्राहक सेवा देते.
त्यांच्या बी के सी मधील मुख्यालयात तक्रार केली तरी काहीही कार्यवाही होत नाही असा माझा अनुभव आहे.
एखादे काम करायचे नसेल किंवा केले नसले आणि सरळ सरळ अकार्यक्षमता असेल तरी सिस्टीम अशीच आहे म्हणून तुम्हाला फुटवतात.
बाकी आमच्या वडिलांनी ग्राहक न्यायालयात स्वतः लढून जिंकलेल्या केसचा किस्सा येथे लिहिला आहे
https://www.misalpav.com/node/28999
यात आमच्या वडिलांना व्याजासकट मुद्दल आणि खटल्याचा खर्च मिळाला.
या खटल्यात आमच्या वडिलांनी वरील खर्च हा विमा कंपनीच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करून द्यावा अशी विनंती केली होती पण ती न्यायालयाने मान्य केली नाही. (असा निकाल ठाणे येथील ग्राहक न्यायालयाने दिलेला आहे ह तेथे वडिलांनी नमूद केले होते )
जोपर्यंत न्यायालये हा खर्च बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या पगारातून देण्याचा हुकूम सार्वत्रिक रित्या देणार नाहीत तोवर सरकारी अधिकारी निगरगट्टपणे ग्राहकांच्या कडे दुर्लक्ष करत राहतील.
18 Jun 2020 - 7:51 pm | सुबोध खरे
आपण बँकेला धडा शिकवला याबद्दल आपले अभिनंदन
(जोवर अशा बेजबाबदार अधिकाऱ्याच्या वेतनातून यातील काही/ अंशरूप रक्कम वजा केली जात नाही तोवर ते धडा शिकतील यावर माझा फारसा विश्वास नाही). असो
18 Jun 2020 - 8:24 pm | संजय क्षीरसागर
बँकेला बसलेल्या भुर्दंडाची यथोचित चवकशी होते कारण :
१. अशी रक्कम नक्की कुणामुळे भरावी लागली (सिस्टम फॉल्ट / पर्सनल फॉल्ट) हे तपासलं जातं.
जेणे करुन पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये.
२. पर्सनल फॉल्ट असेल तर त्या एंप्लॉइला रितसर नोटीस देऊन जाब विचारला जातो आणि ती गोष्ट त्याच्या सीआरमधे येते.
३. ही रक्कम नक्की कोणत्या खात्यात टाकायची हा प्रश्न पार वरपर्यंत जातो
तस्मात, ती रक्कम एंप्लॉइला भरावी लागली का याची मी चवकशी केली नसली तरी
प्रकरणाचा इतका गवगवा झालेला असतो की
इतर सर्वांना त्याचा योग्य धडा मिळतो.
19 Jun 2020 - 10:19 am | सुबोध खरे
पार वरपर्यंत जातो
हे पार वरपर्यंतचे लोक सुद्धा खालूनच चढत चढत आलेले असतात.
त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष वरिष्ठांपर्यंत तक्रार केली तरी "तुम्ही" विरुद्ध "ते " असाच अविर्भाव असतो.
मुंबईतच मुख्यालये असूनहि दोन बँकांच्या वरिष्ठ व्यवस्थापकांपर्यंत लेखी तक्रार नेऊनहि स्थानीक शाखेतील कर्मचारी काहीही दखल घेत नाहीत असा अनुभव दोन्ही वेळेस आला आहे.
कारण सरकारी नोकरीत जोवर तुम्ही घोटाळा करत नाही तोवर तुमच्या नोकरीला काहीही होत नाही आणि बहुसंख्य स्त्रीवर्गाने बाहेर बदली नको म्हणून बढती नाकारलेली असते. त्यामुळे त्यांना काहीही फरक पडत नाही. कितिहि मेमो द्या आणि काही करा.
18 Jun 2020 - 8:17 pm | दादा कोंडके
कौतुक वाटतं. माझ्याकडे तेव्हडी चिकाटी नाही आणि या गोष्टीचा मला मनस्तापसुद्धा खूप झाला असता.
एकुण सरकारी बॅकेचा गचाळ कारभार पाहता, तुमच्यासारखी लोकं खूप कमी असावीत. या गोष्टीची दखल घेउन बॅकेला धडा शिकवण्यासाठी एकूण खर्चाच्या कमितकमी दहा दंड वसूल करावा. त्यापैकी काही रक्कम तक्रारदाराला देउन उर्वरीत एखाद्या सरकारी केअर फंडमध्ये जमा करण्याचे आदेश द्यावेत. यामुळे तरी बॅकेवर दहशत बसेल आणि कारभार सुधारेल.
18 Jun 2020 - 8:37 pm | संजय क्षीरसागर
सर्व काही ठरवतो.
मी हा दावा म्हणजे चाळीस हजाराची प्रोफेशनल असाइन्मंट म्हणून पाहिला आणि
त्यात सर्व प्रोफेशनल स्कील (लिगल नॉलेज, लॉजिक आणि आर्ग्युमंट) पणाला लावलं.
त्यामुळे दावा लढतांना मजा आली
___________________________
मग मी अब्रू नुकसानीचा दावा (मुख्य दाव्याला रिजॉइंडर) म्हणून स्टेट फोरमकडे दाखल केला !
कारण बँकेनं मी फ्रॉड्युलंटली प्रिमियम भरायचं टाळलं आणि मला फोन केले होते असं लिखित विधान केलं होतं
पण दरम्यान माझी आणि जजेसची (निकालानंतर) पर्सनल ओळख झाली.
ते म्हणाले की तुम्हाला ९% व्याज दिलेलं आहे आणि
अब्रू नुकसानी हा सिविल कोर्टाचा मॅटर आहे,
तुम्ही योग्य तो निर्णय घ्या.
ते योग्य होतं, मग मी तो क्लेम फॉलो केला नाही.
18 Jun 2020 - 9:20 pm | अर्धवटराव
चिकाटीने प्रयत्न करुन प्रकरण शेवटास नेले, हे उत्तम.
एकतर यांच्या चुकीमुळे आपल्याला मनस्ताप, वरुन हेच आपल्याला फ्रॉड वगैरे म्हणणार, मग कोर्टात तारेख पे तारीख घेऊन आपल्याला घायकुतीला आणण्याचा प्रयत्न करणार.
कमि पैशात औट ऑफ कोर्ट सेटलमेण्ट वगैरेचा तोडगा नाहि सुचवला का बँकेने?
18 Jun 2020 - 9:53 pm | प्रमोद देर्देकर
अभिनंदन संक्षी साहेब.
18 Jun 2020 - 10:13 pm | तेजस आठवले
तुमची हरकत नसल्यास ह्या खटल्याची लिंक देऊ शकाल का, म्हणजे पूर्ण दावा-खटला वाचता येईल.
18 Jun 2020 - 10:39 pm | संजय क्षीरसागर
ग्राहकमंच्याच्या पोर्टलवर आहे.
कारण दाव्याची संपूर्ण प्रोग्रेस तिथे केस नंबरनी आपण ट्रॅक करू शकतो.
सुनावणी दरम्यान मी ती सतत ट्रॅक करायचो
लिंक सहज सापडली तर देतो.
20 Jun 2020 - 4:10 pm | संजय क्षीरसागर
या CC/16/322 केस नंबरनी संपूर्ण खटला वाचू शकता.
18 Jun 2020 - 10:14 pm | तेजस आठवले
आणि हो अभिनंदन सुद्धा. चिकाटी दाखवून निगरगट्ट लोकांना कायदेशीर मार्गाने वठणीवर आणल्याबद्दल.
18 Jun 2020 - 10:23 pm | रीडर
बॅंकेकडे प्रिमियम मागितला जायचा !
खरं कौशल्य बॅंकेची सही शिक्का असलेली इंटीमेशन मिळवण्यात होतं > ती कल्पना मला दावा दाखल करतांना सुचली !>>>>> हे बँकेकडून मिळवण्यासाठी काय करावे लागले?
18 Jun 2020 - 10:42 pm | संजय क्षीरसागर
नॅशनलच्या एजंटकडून अक्षरशः १० मिनीटात वॉटस-अपवर मिळवली > त्यानी डायरेक्ट फोटोच पाठवला !
19 Jun 2020 - 3:40 am | रीडर
माहितीबद्दल धन्यवाद. इन्शुरन्स कंपनीने पाठवलेल्या इंटिमेशन वरती बँकेचा सही शिक्का कसा घेतात कळले नव्हते. बँकेकडून पोचपावती घेते का इन्शुरन्स कंपनी?
19 Jun 2020 - 8:57 am | संजय क्षीरसागर
कस्टमर्सना प्रिमियम इंटीमेशन्स पाठवण्याचा स्क्रोल एक महिना आधी जनरेट होतो.
डायरेक्ट कस्टमर्सना अशी इंटीमेशन येते हा तुमचा अनुभव असेल.
इथे ग्रुप इंशुरंन्स असल्यानं आख्ख्या स्क्रोलवरच बँकेचा शिक्का आणि सही घेतली जाते.
बँकेला स्टँडीग इंस्ट्रक्शन असल्यामुळे कस्टमरला इंटीमेशन न जाण्याची शक्यता आहे
19 Jun 2020 - 5:26 pm | रीडर
अच्छा आले लक्षात. माहितीसाठी धन्यवाद.
18 Jun 2020 - 10:29 pm | वीणा३
ह्या धाग्याची लिंक काही ग्रुप वर पाठवलीये, उपयोगी आहे. बरेच जण वैतागेलेलं असतात बँकेच्या गहाळ कारभारावर, त्यांना नक्कीच उपयोग होतील.
एक प्रश्न, किती वेळ लागला ह्या सगळ्या गोष्टीला (ग्राहक मांचाही तारीख मिळायला)? आणि मिळाल्यावर त्याच दिवशी काम झालं का? मागे ओळखीत २-४ जणांच बँकांच्या विचित्र कारभारामुळे नुकसान झालं होतं, पण नुकसान + वेळ वाया असं दुप्पट नुकसान म्हणून सोडून दिलं होतं.
18 Jun 2020 - 10:47 pm | संजय क्षीरसागर
पण रक्कम किती आहे हे बघून लढायला काही हरकत नाही.
सुनावणी दरम्यान बहुतेक केसेस बिल्डर्स आणि ट्रॅवल कंपनीजच्या होत्या
20 Jun 2020 - 2:08 am | वीणा३
एक प्रश्न, किती वेळ लागला ह्या सगळ्या गोष्टीला (ग्राहक मांचाही तारीख मिळायला)? आणि मिळाल्यावर त्याच दिवशी काम झालं का?
म्हणजे कधीपण प्रॉब्लेम आला तर पुढे जायचं का नाही ठरवता येईल. २-४ खेपांमध्ये काम होणार असेल तर ठीक आहे, नाहीतर ४ आण्याची कोंबडी १२ आण्याचा मसाला व्हायचं.
20 Jun 2020 - 11:42 am | संजय क्षीरसागर
तुम्ही आधी फी ठरवून आणि पारखून वकिल नेमू शकता.
शिवाय सगळी प्रोसिडींग्ज फोरमच्या पोर्टलला अपडेट होत असतात,
त्यामुळे तुम्हाला घरबसल्या प्रोग्रेस ट्रॅक करता येते.
18 Jun 2020 - 10:44 pm | पहाटवारा
चिकाटीने जर तुम्ही प्रयत्न केले तर काही ना काही मार्ग माणसाला जरुर सापडतो. त्यामागे खूप वेळही जातो.
पण कुणी तुमचा गैरफायदा घेत असेल किंवा दुसर्याच्या गचाळ कारभाराचा तुम्हाला भुर्दंड पडत असेल तर हा मार्ग चोखाळायला हरकत नाही.
संक्षी सर .. उत्तम केलेत !
18 Jun 2020 - 10:48 pm | संजय क्षीरसागर
कायम मजा येते !
19 Jun 2020 - 12:01 am | जेडी
मला तर सर्वच बॅन्का काही ना काही घोळ घालतात असे वाटते.
19 Jun 2020 - 12:47 am | Prajakta२१
अभिनंदन
संजय क्षीरसागर सरांचे अभिनंदन पु ले शु
सगळ्याच बँका असे काही नाही मी एका सहकारी बँकेत असताना ECS ,तसेच अन्य चेक क्लिअरिंग साठी साठी पण मान्यवर ग्राहकांना फोन करायचे (खात्यात पैसे नसले तर,सही चुकत असल्या तर आणि मोठ्या रकमांसाठी )नंतर नंतर ते काम बॅक ऑफिस कडे शिफ्ट झाले
बॅक ऑफीस ला ग्राहक माहिती नसतात त्यामुळे ते वेळ झाली कि रिटर्न करतात ब्रांच लेवल ला आपल्या ब्रान्चनुसार आपल्या ग्राहकांची यादी बघून त्याप्रमाणे
काम करावे लागते हे सकाळीच पूर्ण करायचे असते
काही काही ग्राहक पैसे भरतो असे सांगून बऱ्याचदा संध्याकाळपर्यंत टांगून ठेवतात एक उदाहरणात एका रिअल इस्टेट एजन्ट असणाऱ्या सूशीक्षित बाईने
बँकेची वेळ संपेपर्यंत पैसे भरले नव्हते(संध्याकाळी ७) ऑफिसरने जबाबदारी घेऊन प्रोसससिंग केले होते त्यामुळे ऑफिसरची BP वाढले होते
शेवटी बरीच फोनाफोनी करून बँक संपताना त्या बाईने पैसे भरले अशीही उदाहरणे आहेत
तसेच सुट्टीच्या दिवशी क्लिअरिंग चालू असले तर ते सिस्टिम थ्रूच होते तेव्हा ब्रांच लेवल ला काही करता येत नाही
वरील उदाहरणात तांत्रिक कारणाने बँकेकडून ECS रिटर्न गेला असल्याची शक्यता आहे ब्रांच ने पाठपुरावा करणे आवश्यक होते
सिस्टिम update नसेल तरी पण तांत्रिक कारणाने तसेच ECS स्टँडिंग instruction एंटर करताना ७ वर्षे च एंटर केली गेली ,चुकीची तारीख एंटर झाली
किंवा सिस्टिम error हि कारणे वाटतात
19 Jun 2020 - 9:06 am | संजय क्षीरसागर
डायरेक्ट सिस्टममधून हँडल केली जाते का ?
मला वाटतं ट्रन्झॅक्शन एम्प्लॉइला जनरेट करून ऑफिसरला ऑथोराईज करावी लागते.
19 Jun 2020 - 10:14 pm | Prajakta२१
स्टँडिंग instruction -सुरवातीला एकदाच एंटर होते
हो सुरवातीला क्लार्क एंटर करून वरचा ऑफिसर व्हेरिफाय करतो (मेकर-चेकर )
पण काही काही ठिकाणी एकच ऑफिसर लेव्हलची व्यक्ती पण करू शकते (क्लार्क उपलब्ध नसणे,सिस्टम जशी असेल त्याप्रमाणे )
SI साठी SB A/C नंबर ,तारीख,frequency(मंथली ,yearly यापैकी ),cr a/c नंबर हि बेसिक माहिती एंटर करावी लागते
अजून बरेच आहे जसे कि अकाऊंट ऍक्टिव्ह स्थितीत असणे तारीख हा working डे असणे आणि बँकेची सिस्टिम चालू असणे
एकदा SI एंटर होऊन व्हेरिफाय झाली कि मग एंटर केलेल्या माहितीनुसार त्या SI पडत राहतात
त्यामुळे SI एंटर/व्हेरिफाय करणारा स्टाफ ह्यासाठी जबाबदार धरला जाऊ शकतो
si चा दिवस रविवार ,सुट्टीचा दिवस असणे ह्यात SI मध्ये आदला/पुढला दिवस असे options असतात जो एंटर होईल त्याप्रमाणे si
पडते जर विमा कंपनी आणि बँकेचे हे दिवस जुळत नसले (बँकेने पुढचा धरला आणि विमा कंपनीने आदला दिवस धरला असेल )तरी पण si न पडता ECS रिटर्न जाऊ शकतो
ECS क्लिअरिंग बाबतीत saving चा स्टाफ जबाबदार धरण्याची शक्यता कमी आहे कारण सर्व प्रकारचे ECS हे तुमच्या आदल्या दिवसाच्या बॅलन्स वर क्लिअर होत असतात
ग्राहक अगदीच ओळखीचे,मान्यवर किंवा स्टाफ पैकी असले तर बँकेच्या दिवसाच्या सुरवातीच्या अर्ध्या तासात बॅलन्स आणून क्लिअर होऊ शकतात
ECS साठी सही न जुळणे आणि अकाउंट ची ऍक्टिव्ह स्थिती हि कारणे लागू पडत नाहीत (बँक ऑफ इंडिया चे नियम माहिती नाहीत ह्या बाबतीत)
त्यामुळे SI हीच शक्यता राहते
20 Jun 2020 - 12:59 pm | संजय क्षीरसागर
> si चा दिवस रविवार ,सुट्टीचा दिवस असणे ह्यात SI मध्ये आदला/पुढला दिवस असे options असतात जो एंटर होईल त्याप्रमाणे si
पडते जर विमा कंपनी आणि बँकेचे हे दिवस जुळत नसले (बँकेने पुढचा धरला आणि विमा कंपनीने आदला दिवस धरला असेल )तरी पण si न पडता ECS रिटर्न जाऊ शकतो
हे कसं होतं सदोहारण सांगू शकाल का ?
20 Jun 2020 - 11:44 pm | Prajakta२१
एखाद्या व्यक्तीची विमा प्रीमियम भरण्याची तारीख १० ऑक्टोबर आहे पण
१० ऑक्टोबर रविवार आहे तर तिच्या बचत खात्यातून विमा प्रीमियम ११ तारखेला जाणार (सर्वसाधारणपणे )
ह्यात जर सूचना देताना विमा कंपनीच्या फॉर्म वर previous डे चा पर्याय टिक केला
तर तो ९ तारखेला जाणार
पण बँकेने बँकेच्या सिस्टिम मध्ये एंटर करताना नेक्स्ट डे चा पर्याय एंटर केला
तर ९ तारखेला विमा कंपनी कडून बँकेच्या खात्याला ECS लागणार आणि बॅलन्स नसेल तर रिटर्न
१० सुट्टी त्यामुळे काही करता नाही येणार
आणि मग ११ ला रिटर्न चे लक्षात येणार
शक्यतो असे होत नाही पण सरकारी बँकांचे जास्त माहिती नाही
कधी कधी तो रिटर्न ECS दुसऱ्या दिवशी पण लागू शकतो तेव्ह बॅलन्स असेल तर क्लिअर पण बँक ऑफ इंडिया त कसे आहे ते माहिती नाही
ह्यात कधी कधी विमा कंपन्या मोबाइल नंबर लिंक असेल तर पॉलिसी तारखेच्या आसपास ग्राहकांना msg पाठवतात खात्यात बॅलन्स ठेवण्यासाठी
20 Jun 2020 - 11:58 pm | संजय क्षीरसागर
चांगली माहिती दिलीत.
19 Jun 2020 - 10:12 am | सुबोध खरे
सहकारी बँकात अशी वैयक्तिक स्वरूपाची सेवा जास्त चांगली मिळते. परंतु सह्कारी बॅन्कांची संगणक प्रणाली तितकी अद्ययावत नसते.
याउलट सरकारी बँकात सेवा अत्यंत निम्न स्वरूपाची मिळते असा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. परंतु त्यांची संगणक प्रणाली जास्त अद्ययावत असते तरीही त्यांच्या सेवकवर्गाची मला काय घेणे देणे आहे या स्वरूपाची विचारसरणी आहे.
अर्थात सरकारी बँकात नोकर भरती बऱ्याच वर्षांपासून स्थगित आहे किंवा अत्यंत कमी स्वरूपात आहे यामुळे तेथील सेवकवर्ग हा मध्य वयीन किंवा निवृत्तीला जवळ आलेला असतो. त्यांना वेगाने बदलणाऱ्या संगणक प्रणाली शिकण्याची फारशी इच्छा नसते किंवा शैथिल्य असते.
त्यातून या बँकातील कार्यक्षम सेवकवर्ग निवृत्तिवेतनास पात्र झाला ( २० वर्षे झाली ) कि ते फायदे घेऊन अधीक पगारासाठी खाजगी बँकात जातो. यामुळे बहुसंख्य सरकारी बँकात अक्षरशः गाळ राहिलेला आहे.
मी सरकारी बँकाशी व्यवहार करणे सोडून दिलेले आहे. परंतु आमच्या आईवडिलांची खाती अजून सरकारी बँकातच आहेत. साध्या सध्या कामासाठी इतके खेटे मारायला लागतात कि विचारू नका.
या बद्दल जितके लिहावे तितके थोडे आहे.
19 Jun 2020 - 5:15 am | सोत्रि
झालेल्या चुकीचा योग्य तो पाठपुरावा करून चुक दुरूस्ती करून घेतली हे एकदम झक्कास!
- (सामान्य) सोकाजी
19 Jun 2020 - 8:34 am | आगाऊ म्हादया......
खूप भारी, स्वतः केस लढलात. थँक्स. प्रेरणा मिळाली.
19 Jun 2020 - 6:19 pm | तुषार काळभोर
असं काही (बँकेसारख्या) बलाढ्य सिस्टीम शी लढून करता येईल अस वाटलं नव्हतं. पण प्रयत्ने कण वाळूचे रगडिता तेलही गळे, असं कुणीतरी (बहुधा शेक्सपियर किंवा मोरोपंत) म्हटलेलं आहेच.
21 Jun 2020 - 1:10 am | Rajesh188
मला तर ही रचलेली कथा वाटत आहे .
इथे कोणतेच पुरावे दिलेले नाहीत.
पॉलिसी नंबर नाही
पॉलिसी किती रुपयाची होती ह्याची माहिती नाही.
बँकेची ब्रंच कोणती आहे त्याची माहिती नाही.
किती हफ्ते थकल्यावर पॉलिसी निष्क्रिय होते ह्याची माहिती नाही .
पॉलिसी निष्क्रिय झाली आहे हे किती महिन्यांनी माहिती पडले ह्याची माहिती नाही.
ह्या सर्व कारणांमुळे माझे असे ठाम मत आहे लेखकाने ही कथा रचलेली पूर्ण बनावट स्टोरी आहे.
21 Jun 2020 - 10:21 am | संजय क्षीरसागर
कारण त्यांच्यासारखाच,
काहीही न वाचता,
तुम्ही हा अत्यंत निर्बुद्ध प्रतिसाद दिला आहे.
______________________________
तुम्ही कॉन्फोनेटला जाऊन
20 Jun 2020 - 4:10 pm | संजय क्षीरसागर
या CC/16/322 केस नंबरनी संपूर्ण खटला वाचू शकता.
हा प्रतिसाद तुमच्या प्रतिसादाच्या वर आहे.
तुम्हाला इंग्रजी वाचता येत असेल आणि
इंटरनेट वापरता येत असेल तर तिथे जाऊन
माझ्या नांवासकट तुम्ही संपूर्ण दावा ट्रॅक करु शकता
______________________________________
तुम्हाला मुद्दा काय आहे याचाशी काही
घेणं-देणं नसतं हे तुमचे असंबद्ध आणि पाल्हाळीक प्रतिसाद
नेहेमीच दर्शवतात, तरी
तुम्ही दावा नीट वाचलात, तर लक्षात येईल की
जे स्वतःच्या खर्या नांवानी,
संपूर्ण जवाबदारी घेऊन लिहितात
कुठल्याही प्रकारची टोपणं घालायची ज्यांना काहीही गरज नसते
अशा दुर्मिळ अंतरजालीय आयडींपैकी एक आयडी, माझा आहे.
__________________________________
आता थोडी फार सभ्यता उरली असेल, तर
केलेल्या प्रकाराबद्दल इथे माफी मागा.
आणि ही आपल्या ज्ञानात भर पडली असं समजून
निदान माझ्याबाबतीत तरी,
पुन्हा असा प्रकार होणार नाही याची दक्षता घ्या.
21 Jun 2020 - 11:05 am | Rajesh188
तुमचा वरचा प्रतिसाद न वाचता प्रतिसाद दिल्यामुळे चूक झाली ती कबुल आहे.
बाकी इंग्लिश येते नाही येत.
इंटरनेट येते नाही येत
हे तुम्हाला जाणून घेण्याची का इच्छा आहे.
स्वतः व्यतिरिक्त बाकी लोक सुद्धा चार बुक शिकलेली आहेत ह्यावर तुमचा विश्वास नाही का?
21 Jun 2020 - 2:43 pm | संजय क्षीरसागर
तुम्ही एकदम व्यक्तिगत हल्ला केल्यामुळे
मीही थोडा तिरकस प्रतिसाद दिला.
मॅटर सेटल्ड !
तुमचे मनःपूर्वक धन्यवाद !
21 Jun 2020 - 12:14 pm | Vivekraje
माझे ICICI बँकेत गृहकर्जखाते आहे, त्याला संलग्न अशी त्याच बँकेची प्रोडेनशूल टर्म पॉलिसी आहे. कर्ज आणि पॉलिसी एकाच वेळी काढली. त्यानुसार कर्जाच्या खात्यातून पहिल्या पाच वर्षात रक्कम पॉलिसीत वर्ग होईल असे सांगितले. पहिली तीन वर्षे व्यवस्थित रक्कम वर्ग झाली. चौथ्या वर्षी मात्र कर्ज खात्यातून रक्कम वर्ग झाली नाही. मी चौकशी केली पॉलिसी ब्रँच ने लोन ब्रँच कडे बोट दाखवले, तिथल्या मॅनेजर नी आधितर असे कुठलेच ऑप्शन नसत असं सांगितलं. मग थोडं इतिहास सांगितला तेव्हा म्हटला ठीक आहे बघतो..हे बघतो म्हणजे तीन महिने झाले तरी बघतो पर्यंत होतं. मी तोपर्यंत नोडल ऑफिसला , ग्राहक सेवा केंद्राला तक्रार दिली त्यांचं उत्तर ठरलेलं...सात दिवसात आपली समस्या सोडविली जाईल.... ते सात दिवस पाच महिन्यापर्यंत चालले.....त्यात पॉलिसी ची अशुर्ड रक्कम 15 लाखा हुन 12 लाख झाली...
आणि मग एकदा त्याच पॉलिसीची जाहिरात फेसबुक वर फ्लोट होत होतो...मी त्यावर अत्यन्त नकारात्मक अशी आणि बँक नंतर कुठलाच प्रतिसाद देत नाही, ही पॉलिसी लोकांनी काढुच नये अशी कमेंट दिली...अर्थात त्याचा काही उपयोग होईल असं मला वाटलं नव्हतं...पण ती कमेंट दिली आणि त्याला लोकांनी प्रतिसाद द्यायला सुरुवात केली...दुसऱ्याच दिवशी मला बँकेतून फोन आला आणि माझ्या कमेंट आणि तक्रारी बद्दल जाणून घेतले...आणि चक्क पुढच्या चार पाच दिवसात माझ्या पॉलिसीत पैसे भरून बँकेने ऑपलोजी मेल पण पाठवला....सामाजिक माध्यमात बँकेचं नावं खराब होण बँकेला परवडणार नव्हतं...
21 Jun 2020 - 12:29 pm | चौथा कोनाडा
+१
21 Jun 2020 - 2:51 pm | संजय क्षीरसागर
छान !
हा सुद्धा एक उपाय आहे.
तो प्रायवेट बँकाच्याबाबतीत हमखास लागू पडतो.
लोक आपल्या हक्काप्रती जितके जागरुक
तितकी सर्विस बेस्ट !