कुल्फीच्या बिस्किटाच्या पापलेटाची कोशिंबीर

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
18 May 2020 - 8:24 pm

आदाब आदाब, मोहतरम आम्ही माहितगार है. हम मिसळपाववर कोणतेबी वीषयपर खीस पाडणे मे माहिर है. मगर आज ज्या गोष्टीपे खीस करेंगे ती गोष्टच अशी रम्य काल्पनिक कथा आहे की, आम्ही किती खीस पाडेंगे तरी आमची खिसी कोशिंबीर वाटेल आता ज्यांना मूळ अनुवादच भारी आवडलाय त्यांना आमची खिसी फ्रुट सॅलड सारखी सुद्धा लाजवाब लागू शकती है! कारण उसमे मूळ कथासे अधिक इन्ग्रिडीएंटची तरफ ध्यान दिलाया आहे.

आता म्हणाल की कोणते इन्ग्रिडीएंट? तर कुल्फी आहे, बिस्किट आहे, पापलेट आहे. आता कथा अनुवादक सुरवातीसच सांगायचा विसरल्यामुळे शेवटच्या भागातून तुमच्या सोबतीला सुगंधी इत्रवाली आहे, बीर्‍याणीवाली आहे, एक फौजण आहे आणि त्यांचे फौजाई सुद्धा आहेत.

तेव्हा ह्या खिसीला कोशिंबीर म्हणायचे की पनीर पापलेटचे फ्रुटसालेड किंवा अजून काही हे ज्याचे त्यानी ठरवावे.

या दीर्घ कथेतील आम्हाला आवडलेले नंतर देतो प्रथम आमच्या साशंकता आणि सुटलेल्या बाजूंची यादी.

कथा एक उत्तम अनुवाद वाटते या बाबत शंका नाही. मायबोलीवरील चर्चेत बहुधा अनुवादक महोदय ते स्विकारताना दिसतात, पण मूळ कथा कोणती त्याचे श्रेय मूळ कथेस आणि कथाकारास दिले जाताना आढळले नाही. अनुवादातील रंगरंगोटीमुळे कथेला मराठीपण आले असले तरी कथा बहुधा हिंदी भाषिक क्षेत्रात किमान तीस एक वर्षापुर्वी लिहिलेली असावी असा कयास करावासा वाटतो. कयास कयास असतो चुकूही शकतो. मूळ साहित्यकारास मायबोलीवर श्रेय दिले न जाण्याबद्दल मागच्या वेळी केव्हातरी कुणीतरी महोदयांना टोकलेही असावे असे गूगल मियांचा शोध घेतल्यास आढळते. तुर्तास हा मुद्दा गौण धरुन पुढे जाऊ.

कथाकार अंशतः सुधारणावादी तथाकथीत सेक्युलर बाजूचा असण्याची शक्यता वाटते. कथेचे मूळ पींड कलेसाठी साठी कला या स्वरुपात असावे ज्यामुळे प्रबोधनाची केलेली अप्रत्यक्ष पेरणी चटकन न खुपता, वाचक कथेतील वर्णनात रमलेला रहातो. कथेत मुलीला (निलोफर उर्फ बिस्कीट) - मदरसा शिक्षणातून काढून रेग्युलर शाळेत टाकण्यासाठी सुद्धा, घरात एक चहाच्या कपातला संघर्ष होतो आणि रेग्युलर शाळेची संधी मिळते. या आंशिक सामाजिक बदलाची नोंद घेताना, भारतीय मुस्लीम समाजाचा एक बराच मोठा वर्ग सर्व ज्ञानशाखांना आतंर्भूत करणार्‍या आधुनिक शिक्षणापासून वंचीत रहातो. तेवढेच नाही, त्यांचे परकीय शब्द संग्रह आणि परकीय लिपीचे अत्याधिक आग्रह ऊर्वरीत समाजा सोबतच्या सामाजिक संवाद आणि समरसतेपासून दूर ठेवतात. म्हणजे या कथेसारखे साहित्य मराठी किंवा इतर भाषेतील संस्थळांवर फार कमी येते. महाराष्ट्रीय किंवा एकुणच भारतीय मुस्लीम समाज सर्वजनीय प्लॅटफॉर्मवर सामील होताना दिसतो का तर अती अती अल्प प्रमाणात. बरे असे सुधारणावादी साहित्य भारतीय उर्दू माध्यमातून किती प्रसारीत होत असेल, याची सुद्धा साशंकताच वाटते.

हिंदू द्वेष आणि भारत द्वेष हे मुद्दे काही क्षणांसाठी बाजूला ठेवले तर पाकीस्तानात ज्या टक्केवारीत सुधारणावादी संघर्ष तेथिल मुस्लिमात दिसतो ते पहाता; जगातील दुसर्‍या क्रमांकाची मुस्लीम लोकसंख्या असून अपे़क्षीत प्रमाणात सुधारणावाद भारतीय मुस्लिमात सुधारणावाद अद्याप पुरेसा पुढे येताना दिसत नाही. मग भारतीय मुस्लिमात सुधारणावाद्यांची संख्याच कमी आहे, की त्यांना पुढे येण्यास संधी मिळत नाही, हा एक मोठा प्रश्न अद्याप नीटसा समजून येत नाही. असो, पुढच्या मुद्द्याकडे जाऊ.

मुळ कथाकार आणि अनुवादक यांनी मुलींचे आणि स्त्री भावविश्व स्वतःच्या आदर्शवादाच्या परिपेक्षात उभे करण्याचा यथोचित प्रयत्न केला असला तरी सुद्धा, 'चौकी - निकाह (विवाह) - चार दिवारी'चा उंबरठा कथाकार आणि अनुवादकाचे आदर्शवाद ओलांडताना दिसत नाही. समारोपाच्या परिच्छेदात राण्या आपापल्या राजांच्या घरी सुखी! अशी सुखान्तिका आहे. पण त्यात तीन पैकी एखादी मुलगी करीअर मध्ये यशस्वी झालेली दाखवता आली असती पण कथाकार आणि अनुवादकांचा आदर्श तिथपर्यंत पोहोचताना दिसतच नाही.

कथाकार आणि अनुवादक अंशतःका होईना धर्मनिरपेक्षतेचे मुल्य पुढे ठेवताना दिसतात हे स्वागतार्ह म्हणता येऊ शकेल. कथेतील मुली त्यांच्या धमाल प्रॉजेक्टमध्ये हिंदू मंदिराची सफर करताना दिसतात. इथे कथाकार मुस्लिम समाजापुढे अधिक सकारात्म्क मुल्य ठेवताना दिसतो हे ही स्वागतार्ह आहे.

त्याचवेळी मुस्लीम व ख्रिश्चन तवज्ञानात आणि समजात जोपासला जाणारा मुर्तीपूजा द्वेष आणि अनेकेश्बरवाद द्वेष; हिंदू धर्मीयांचा अधिकतम सकारात्मकता वाद आणि मुर्तीपूजा आणि अनेकेश्वरवादाचा सहसंबंध समजून घेण्यास कमी पडत आला आहे. याचे कारण अगदी सुधारणावाद्यांनाही हा सहसंबंध कधी नीटसा समजून घेता आलेला नाही. त्यामुळे मुर्तीपूजा आणि अनेकेश्बरवाद नाही पाळले तरी त्या संबंधाने जी भिती आणि द्वेषनिर्मिती हिंदू द्वेषात परिवर्तित होऊन, जी सामाजिक दरी निर्माण होते त्या बद्दल मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजियांसमोर पुरेशा क्षमतेने प्रश्न विचारले जाताना दिसतच नाहीत. (अशी नकारात्मक विचारसूत्राची समस्या त्यांच्यात आहे या बद्दल बहुसंख्य हिंदू अनभिज्ञ असतो.) जेव्हा वैचारीक दृष्ट्या मुद्दा समजून घेतला जात नाही तेव्हा त्याचे समुह द्वेषात आणि सामाजिक दरीत रुपांतरण होत रहाते.

कथेत हिंदू मदिराचे अस्तीत्व सकारात्मकतेने रंगवले तरी नाईलाजाने एका डॉक्टर पलिकडे हिंदू समाजाचा सांस्कृतिक सहसंबंधांचा अभाव कथाकाराने मांडला नसला तरी समिक्षकीय दृष्टीतून सुटणारा नाही.

जेव्हा कथा तशीही काल्पनिकच आहे तेव्हा एखादी मैत्रिण / शिक्षक किंवा समारोपाच्या उल्लेखातील नवरा हिंदू दाखवता आला नसता का? पण कथा आणि एकुणच भारतीय आणि मुस्लिम साहित्य तेवढी झेप घेण्यात कमी पडते. यामुळे कथाकार आणि अनुवादकाच्या धर्मनिरपेक्षतीची मुल्ये कदाचित कुठे खुजी, बोटचेपी आणि तथाकथीत स्वरुपाची नाहीत ना ही साशंकता शिल्लक रहाते. तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांचे हे बोटचेपेपण आणि खुजेपण मुस्लिमातील कर्मठांना वैचारीक दृष्ट्या शिंगावर घेण्यापासून अंगचोरी करत रहाते.

एखादा साहित्यिक समिक्षकाप्रमाणे वैचारीक वाद घालू शकेल असे नव्हे पण ज्याप्रमाणे कथेतील मुलींनी मंदिराची चक्कर मारली, तसे समारोपात एखादीने हिंदू पती केल्याचे दाखवता आले असते, पण हे धाडस अगदी काल्पनिक कथा लेखनातही हे अर्ध-सुधारणावादी करु शकत नाहीत! या वरुन सुधारणावाद्यांच्या सुधारणेचेच आवाहन केवढे मोठे आहे याची कल्पना यावी.

कथेत एक डॉक्टर गुप्तांचे पात्र रंगवले आहे! ते निलोफर उर्फ बिस्कीटच्या कुटूंबीयांची शारिरीक व्याधींची काळजी घेते इथपर्यंत ठिकच आहे. सोबत कथेत जुम्मनचाचाच्या रुपाने दंगल पिडीताचे एक पात्र, जाणवेल पण सहज खुपणार नाही अशा सब्टल पद्धतीने रंगवले आहे. पण कथेत डॉ. गुप्तांना निलोफरच्या जुम्मनचाचाच्या असंतुलित मानसिक आरोग्यावर जुम्मनचाचाला मानसशास्त्रीय वैद्यकांकडे पाठवण्याचा सल्ला न देता कुटूंबीयांनी त्यांच्या बेकरीच्या तळघरातील काळकोठडीत डांबून ठेवण्याचे साक्षीदार दाखवले आहे! जुम्मनचाचा दंगल पिडीत असणे आणि दंगली आणि हिंसेच्या मानसिक प्रभाव दाखवण्यास काहीच हरकत नाही. पण यात सुटलेले धागे कोणते ?

१) कायदा हातात घेऊन केलेले हिंसाचार समर्थनीय ठरत नाहीतच पण दोनपैकी केवळ एकाच समाजाची बाजू अधिक बाधीत दाखवणे कसे श्रेयस ठरते ? (दंगलीत निरपराध लोक कसे सापडू शकतात याची दखल घेणे योग्यच पण सर्वांनाच निरपराध घोषीत केल्या नंतर दंगली घडतात भूते येऊन दंगली घडवतात का काय आणि कशा हा एक वेगळ्या चर्चेचा मुद्दा)

२) कुटूंबीयांना जुम्मनचाचांना कोंडून ठेवावे लागते आहे हे जसे कथेतला एक ट्विस्ट रंगवते तसे एकच समाज व्हिक्टीम कसा आहे याचे कार्ड कुरवाळत ठेवते. प्रत्यक्षात बेकरी पदार्थांचा वास घेऊन जुम्मनचाचा घराकडे ओढला जातो घरच्या पदार्थाचा वास येतो पण घरच्यांना ओळखता येत नाही ही टिव्ही सिरीयल टायीप मेलोड्रामाची हाईट असते, त्यामुळे प्रसंग काल्पनिक आहे यात शंका नाही.

सुधारणावादी सेक्युलर आहात तर जे काही रंगवताय ते एकच समाज बाधीत होत असल्यासारखे का रंगवताय? म्हणूनच आधी म्हटल्या प्रमाणे तथाकथित धर्मनिरपेक्षता आणि सुधारणावाद्यांच्या सुधारणेचीच आधी गरज आहे. निरपेक्षतेत निष्पक्षते बद्दल प्रचंड काळजी घेतली जावयास हवी अन्यथा विश्वासार्हता ढासळते आणि ज्या काही सकारात्मक उद्देशाने साहित्य निर्मिती केली तो यशस्वी होण्यापासून दूर रहातो.

३) भारतीय उपमहाद्वीपातील जातीय आणि धार्मीक परस्पर हिंसाचाराच्या असंख्य घटना होऊनही, अशा घटनांमध्ये सहभागी आणि साक्षीदारांची घटनांचे विश्वासार्ह वर्णन करणार्‍या विश्वासार्ह आत्मचरित्रे पुढे येताना दिसतच नाहीत. सगळे कसे कथाकारांच्या कल्पना विश्वावर चाललेले असते.

धार्मीक संघर्षातून जुम्मनचाचाला आणि एकुण समाजाला ज्या दिव्व्यातून जावे लागते त्याचा कथेत गवगवा न करताही वाचकाच्या मनावर प्रभाव कोरण्यात कथा यशस्वी होताना दिसते.

४) कथेत एक बाजू सांगितली गेली नाहीए ती ही, वराह द्वेषाप्रमाणेच कुत्रा द्वेषही केवळ प्राणी विषयक रॅशनल समस्या म्हणून नव्हे तर मुस्लीम अंधश्रद्धेचा भागही आहे हे स्पष्ट करताना कथा दिसत नाही. मुस्लिम धर्मीय अंधश्रद्धा आणि कर्मकांडांची मुस्लीमधर्मीय सुधारणावादी चर्चा करताना फार कमी दिसतात. जीव लावलेल्या कुत्र्याच्या पिलांचे दुरावणे कथेतील मुलींना अवघड जाते, याची तुलना गायींचे दुरावले जाणे एखाद्या समुहास खुपत असू शकते हे समजण्यासाठी का केली जाऊ नये?

अर्थात उपरोक्त साशंकता आणि समिक्षकीय दृष्टीस दिसणार्‍या सुटलेल्या बाजू सोडून केवळ लहान मुलींचे भावविश्व या दृष्टीने एक उत्तम वाचनीय कथा म्हणून कथा पुढे येते. कथा लेखक आणि अनुवादक लहानमुलींच्या भावविश्वात बर्‍यापैकी परकाया प्रवेश करु शकले हे स्विकारले तरी एकुणच मुस्लीम स्त्रीयांच्या आत्मचरित्रांची आणि स्वतःची भावविश्वे स्वतः रंगवण्याची आणि सुधारणावादाची कास धरण्याची जागतिक आणि भारतीय मुस्लीम स्त्रीत मोठी कमतरता शिल्लक रहाताना अद्याप तरी दिसते.

कथेतील आवडलेली वर्णने (ब्रेक के बाद) लेखात जोडेन. इतर वाचकांनीही त्यांना आवडलेली वर्णन प्रसंग सांगण्यास हरकत नसावी.

* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे, व्यक्तिगत टिका आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.

kathaaसमीक्षा

प्रतिक्रिया

कथाकाराचा तसा मोठा व्यापक संदेश वगैरे पोहोचवण्याचा उद्देश नसून फक्त करमणूक आहे.

विजुभाऊ's picture

19 May 2020 - 2:52 pm | विजुभाऊ

हे सगळे लिखाण मायबोलीवर हायझेनबर्ग या आयडीने आलेले आहे