हसता हसता जगणे शिका, हसण्याची सवय बनवा.

कबिर's picture
कबिर in जनातलं, मनातलं
4 Apr 2020 - 5:21 pm

चेहऱ्यावरील हास्य सर्व तणावाना दूर करते. हसरा चेहरा सर्वाना आकर्षित करतो.
अनोळखी व्यक्तीबरोबर हास्याद्वारे मैत्रीचे तार जुळतात. चेहऱ्यावरील हास्य दुसर्यांना आनंद देतेच पण स्वतःला एक आंतरिक प्रसन्नतेचा अनुभव देते.
तन मनाला ऊर्जा प्रदान करते. जी व्यक्ती हसत हसत प्रत्येक समस्येवर मार्ग काढते ती व्यक्ती जीवनात सफलता प्राप्त करतात.
हास्य एक व्यायामासारखे आहे, त्यामुळे चेहऱ्यावरील चमक वाढते.
लहान बाळ जन्मतःच रडतो. चार पाच हप्त्याने स्मितहास्य करतो. चार पाच महिन्यांनी हसायला लागतो. लहान बाळाचे हास्य निरागस असते.
खरे प्रेमयुक्त हास्याचा अभ्यास केल्यास संपूर्ण जीवनात साकारात्मक बदल दिसतात. हसत केलेला संवाद विश्वास व सदिच्छा निर्माण करतात.
खोटे हास्य, नकली हास्य आचरणावर काहीच परिणाम करत नाही.
जी वस्तू दिल्याने, वाटल्याने कमी होत नाही. तर हाय व्यक्त करण्यात कंजुषी का करायची.
क्षणभरचे हास्य मनुष्याला दुःखापासून कोसो दूर घेउन जाते. जे हसू शकतात तेच सौंदर्य पाहू शकतात व त्यांचे डोळे कधीही वृद्ध होत नाहीत.

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

6 Apr 2020 - 11:05 am | शाम भागवत

खरे प्रेमयुक्त हास्याचा अभ्यास केल्यास

हे फारसं कळलं नाही. पण चांगला विषय निवडलाय.

पण जसजसा राग व द्वेष कमी होतो, परिचयातील कोणतीही व्यक्ति टाळाविशी वाटत नाही, तेव्हा हाय हॅलो करताना, कोणतीच अपेक्षा नसलेले प्रेमयुक्त हास्य चेहऱ्यावर आपोआप येते व तो माणूस दृष्टीआड झाल्यावरही ते हास्य आपल्या चेहऱ्यावर काही क्षण रेंगाळते.

अंत:करण स्वच्छ होत जाणं हेच यामागचे कारण असते. असो.

कोणतीच अपेक्षा नसलेले प्रेमयुक्त हास्य चेहऱ्यावर आपोआप येते व तो माणूस दृष्टीआड झाल्यावरही ते हास्य आपल्या चेहऱ्यावर काही क्षण रेंगाळते. खुपच छान अवलोकन.

गोंधळी's picture

12 Apr 2020 - 11:47 am | गोंधळी

खोटे हास्य, नकली हास्य आचरणावर काहीच परिणाम करत नाही. समजल नाही.

कबिर's picture

16 Apr 2020 - 1:16 pm | कबिर

३५० वाचक द्यन्यवाद

चौथा कोनाडा's picture

18 Apr 2020 - 1:24 pm | चौथा कोनाडा

अभिनंदन !
आता ४१० झालेत.
मी ४११ वा !

सतिश गावडे's picture

18 Apr 2020 - 1:55 pm | सतिश गावडे

अभिनंदन !
आता ४१३ झालेत.
मी ४१४ वा !