बागी ( वांगी ) ३ परीक्षण

हस्तर's picture
हस्तर in जनातलं, मनातलं
9 Mar 2020 - 3:48 pm

थोडक्यात :- पहिला इंटर्वल पर्यन्त भाग साऊथ च्या तडाका चा कॉपी आहे ,पण मूळ चित्रपट सरस आहे ,दुसरा भाग फक्त टायगर श्रॉफ ची हाणामारी आहे

गरिबांचा रेम्बो टायगर ने जेवढे जमेल तेवढ्या उडया मारल्या ,मारधाड मध्ये त्याला सौमर साल्ट असे काहीतरी म्हणतात आणि गाणे चालू असताना उड्या मारल्या कि डान्स म्हणतात

तडकानुसार मोठा भाऊ अनुकंपा तत्वाने इन्स्पेक्टर बनतो पण दरवेळी लहान भाऊ येऊन त्याचे काम करतो ,दोन बहिणी ,त्यांच्याशी भांडण मग मुलगी बघायला त्यांच्याच घरात जात सगळे सारखे आहे पण मूळ चित्रपट ज्यात तमाना भाटिया आहे तो जास्त नेत्रसुखद आहे

तडाका मध्ये भित्रा भाऊ पण शेवटी एकशन करतो इकडे ते पण धड नाही

ट्रेलर नुसार भावाला सीरिया मध्ये किडनॅप केले जाते मग डिरेक्टर ची १०० माणसे ५ ६ हेलिकॉप्टर ,१० १२ टॅंक आणि १००० १२०० गोळ्यांचा पाहुणचार घ्यायला टायगर जातो
आणि मधेच दिशा येऊन लव्ह मी लव्ह मी करून जाते ,का ते मात्र कळत नाही

चित्रपट मध्ये
दोन भावांचे प्रेम धड दाखवले नाही
ना लव्ह स्टोरी नीट
ना गाणे ओरिजिनल,सर्व गाणे रीमिक्स आहेत

चित्रपट डब्बा

रेटिंग १/५
१ मधील . रितेश आणि विलेन साठी आणि बाकी . टायगर च्या उड्या साठी

बाकी आनंदी आनंद

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

खिलजि's picture

9 Mar 2020 - 4:18 pm | खिलजि

हायला गेले १२०० रुपये पाण्यात आज रात्री .. आता मुलांना पोटभर खायला घालूनच घेऊन जातो म्हणजे तेवढीच खिशाला कात्री ...

हस्तर's picture

9 Mar 2020 - 5:35 pm | हस्तर

का घेतले तिकट?