ब्रह्मांड निर्मीती..ॐ=mc^2

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
3 Mar 2020 - 10:22 pm

ब्रह्मांड निर्मीती..ॐ=mc^2
मी कोण आहे..आदीचा शोध घेण्याचा प्रयत्न आपल्या वैदीक ऋषि नी केला..
योगविज्ञान.मेडिटेशन..चक्र ऎक्टिवेट केली अन त्याना तो अनाघत ओम्काराचा नाद ऐकु आला..तो अलोक दिसला..
व हे ब्रह्मांड म्हणजे अणु अन उर्जे पासुन निर्माण झाले असा सिद्धांत मांडला गेला
म्हणजेच पिता शीव व माता पार्वति म्हणजेच उर्जा असे तीला नाव दिले गेले..
ब्रह्मांडातल्या प्रत्येक गोष्टीत चराचरात व त्याच्या निर्मीतित शिव पार्वती तत्व आहे असा सिद्धांत मांडला गेला..
मात्र पाश्च्याताना हा सिद्धांत माहित नव्हता
त्यानी ब्रह्मांडाची विभागणी २ ढोबळ स्वरुपात केली..
१ म्य़ाटर..म्हणजे पदार्थ
२ एन्रजी म्हणजे उर्जा..
म्याटर/पदार्थ म्हणजे..गाड्या..विमाने मोटारी..ईमारती.
एनर्जी/उर्जा म्हणजे माणसे पशु पक्षी..
जगदीशचंद्र बसुनी वनस्पति श्वास घेतात हा सिद्धांत सिद्ध केल्यावर त्यात फुले वनस्पति आदी समाविष्ट झाले...
आइनस्टाइन यांनी E=mc2, हा सिद्धांत मांडला व जगास वैदिक सिद्धांत मान्य झाला..
ब्रह्मांडात सजिव निर्जिव असे काहि नसुन सारे अणु उर्जेचेच रुपे आहेत..
प्रत्येक अणुचे गुणधर्म ठरलेले असल्याने..आंब्याच्या झाडास नारळ येत नाहि..वा गायी ला वाघाचे पिल्लु होत नाहि..कारण अणुचे गुणधर्म बदलण्याची ताकद त्या योनी मध्ये नाही
मात्र मानव ही अशी एकच योनी आहे ज्याला अणु उर्जेचे गुणधर्म बदलता येतात त्याच्या जवळ ती शक्ति हत्यर आहे ज्याचे नाव "विचार"
त्या मुळे "सकारत्मक " विचाराना आपल्या कडे महत्व आहे..
साधक तुकोबा हे अतिशय दक्ष होते - मनाला मुठीत ठेवण्यासाठी, विचारांकडे साक्षित्वाने बघण्यात, ... तुकोबांनी मन पांडुरंगालाच वाहिले आहे
अणु मधे उर्जा कोठुन येते..हा मानवाला प्रष्ण पडला
क्वांट्म फिजिक्स चा जन्म झाला व अणु मध्ये जे photon electron neutron जे फिरत असतात त्या पासुन उर्जा मिळते असा सिद्धात मांडला गेला.. व पुढे "स्टिंग थिअरी" चा सिद्धांत पण मांडला गेला.
कित्येक हजार वर्षी पुर्वी आपल्या ऋषी मुनीनी हाच सिद्धांत मांडला होता..
अणुच्या गर्भात फीरणारे photon electron neutron ला त्यांनी ब्रह्मा विष्णु महेश अशी नावे दिली होती व त्यांच्या वैश्वीक उर्जेस त्यांच्या पत्नी मानुन सरस्वती..लक्ष्मी..पार्वती अशी नावे दिली गेली.व त्या वैश्वीक उर्जेचे आपण आजही पुजन करत आहोत..
तसेच त्यांनी "उत्पत्ती.स्थिति व लय" हा जगन्मान्य मांडला
एखादी गोष्ट निर्माण होते..काहि वेळ ती रहाते व नंतर अनंतात विलिन होते असे त्या सिद्धांताचे स्वरुप आहे..
निर्मीति करण्यास बुद्धिमत्तेची गरज असल्याने आपण सरस्वतिस ज्ञानाची देवता मानतो....
चलन वलन करण्या साठी धन धान्य समृद्धी ची गरज असल्याने माता लक्ष्मी स समृद्धीची देवता मानण्यात आले..
उत्पत्ति नंतर स्थिति मधे ज्या अमंगल शक्ति संतुलन बिघडवण्यास येतात त्यांचा विनाश करण्या साठी माता पार्वतिस काली चा दर्जा दिला गेला..
शिव व उमेचे नामस्मरण करत भगवान श्री कृणाने शिकवलेल्या कर्म योगा प्रमाणे कर्म करत रहाणे व आनंदी समृद्ध जीवन जगणे ही जीवनाची इतीकर्तव्यता आहे..
पिता शंभो व माता उमेस प्रंणाम व चरणी लीन

व्युत्पत्तीविचार

प्रतिक्रिया

अनन्त्_यात्री's picture

4 Mar 2020 - 1:12 pm | अनन्त्_यात्री

ह ह पु वा...और आन्दो

अनन्त्_यात्री सर,

अकुकाकांची "भावना" लक्षात घ्या !!
तांत्रिक बाबी बाजूला ठेवा.

Rajesh188's picture

4 Mar 2020 - 9:50 pm | Rajesh188

लेख छान आहे.
तुम्ही कुठून हे दिव्य ज्ञान आणता ह्या विषयी कुतूहल आहे

विजुभाऊ's picture

5 Mar 2020 - 7:21 am | विजुभाऊ

आपल्या अगाध ज्ञानाने थक्क झालोय.मला . या अज्ञानी बालकाला मार्गदर्शन करावे
काही प्रश्न आहेत.

१)

प्रत्येक अणुचे गुणधर्म ठरलेले असल्याने.

म्हनजे कसे. वाघाचा अणू किंवा गाईचा अणू किंवा आंब्याचा अणू कसा असतो? ( त्याची वॅलन्सी किती असते. वस्तुमान काय असते?
मुलद्रव्याचे अणू माहीत आहेत. पण वाघाचा किंवा गाईचा अणू असतो हे आजच समजले.
२) अणूच्या अंतरंगात फोटॉन असतो हे ही आजच समजले ( प्रॉटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रोन माहीत आहेत)
३) स्टिंग ऑपरेशन माहीत आहे. पण स्टिंग थेअरी काय असते?
४) बुद्धीमत्ता ही ऊर्जा आहे की मग त्यासाठी लागणारे अणू कोठून येतात?
५) वैश्वीक ऊर्जा कोणत्या स्वरुपात असते. ती स्थिर आहे की विद्यूत ऊर्जेच्या स्वरुपात आहे.( की आणखीन कसल्यातरी)
६ ) उर्जा एका रुपातून दुसर्‍या रूपात परिवर्तीत होत असते हे सर्वज्ञात आहे. उदा: स्थितीज ऊर्जा, गतीज उर्जा , औष्णीक उर्जा , विद्यूत ऊर्जा , प्रकाश ऊर्जा इत्यादी.
सर्व सजीव हे उर्जा परिवर्तन करतात हे शाळेत शिकलो होतो. ( अमिबा सुद्धा) ( उदा: अन्नातील स्थितीज उर्जेचे औष्णीक उर्जेत रुपांतर होते) . मानव थोडा प्रगत आहे इतकेच. ( या बद्दलही वाद आहेत)

बाकी या इतक्या अत्युच्च कोटीच्या भोंगळ विनोदी लिखाणाबद्दल धन्यवाद
अजून येवू देत.

विजुभाऊ's picture

5 Mar 2020 - 12:28 pm | विजुभाऊ

अहो बरेच छुपे गुण आहेत या लेखनात. संशोधन करावे लागले.
एकाच वेळेस बरीच माणसे कामाला लावली आहेत. आईनस्टाईन पासून ते जगदिशचंद्र बोस मधेच ऋषी पतंजली आणि ऋषी कणाद देखील येताहेत.

१ म्य़ाटर..म्हणजे पदार्थ
२ एन्रजी म्हणजे उर्जा..
म्याटर/पदार्थ म्हणजे..गाड्या..विमाने मोटारी..ईमारती.
एनर्जी/उर्जा म्हणजे माणसे पशु पक्षी..

हे पण नव्याने समजले. मग डोंगर नदी समुद्र ढग हे काय म्हणायचे?
आणि विद्यूत , प्रकाश , उष्णता , वेग , रासायनीक ऊर्जा हे काय समजायचे.
म्याटर सोबत अँटीम्याटर पण जरा सांगता का .
क्वांटम फिजीक्स आणि अ‍ॅटोमिक एनर्जी अशा बर्‍याच उड्या मारल्या आहेत अकु काकांनी.
अकुकाका या इतक्या महत्वाच्या शोधाबद्दल एखादे फँटम का होईना नोबल अवार्ड डिक्लेअर करायलाच हवे.
सद्य स्थितीत एक प्रश्न पडलाय. मानवी मेंदूला एक विचार करण्यासाठी किती कॅलरी ऊर्जा खर्च करावी लागते.

मराठी कथालेखक's picture

5 Mar 2020 - 12:30 pm | मराठी कथालेखक

अणुच्या गर्भात फीरणारे photon electron neutron ला त्यांनी ब्रह्मा विष्णु महेश अशी नावे दिली होती

एकदम झक्कास .. येवू द्या अजून :)

Rajesh188's picture

5 Mar 2020 - 8:38 pm | Rajesh188

तुम्ही असे आग्रह करता मग त्यांना राहवत नाही आणि ते नवीन विषय घेवून प्रगट होतात

त्यामुळे आमचे अज्ञान अपडेट होते हा किती मोठा फायदा आहे ना.

सोत्रि's picture

6 Mar 2020 - 7:21 am | सोत्रि

फॉर अ चेंज अकुंनी ह्यावेळी चांगल्या विषयाला हात घातला होता. पण मुद्दे चुकीच्या पद्धातीने मांडल्यामुळे आणि मुद्दे भरकटल्यामुळे लेख सुमार झाला आहे.

>> क्वांट्म फिजिक्स चा जन्म झाला व अणु मध्ये जे photon electron neutron जे फिरत असतात त्या पासुन उर्जा मिळते असा सिद्धात मांडला गेला..
हे अत्यंत हास्यास्पद आणि विनोदी झालं आहे.

त्यामूळे, 'क्वांट्म फिजिक्स/मेकॅनिक्स मधल्या क्वांट्म फील्ड्समधेच शास्त्र (सायंस) आणि अध्यात्म यांचा योग आहे' हा अत्यंत महत्वाचा मुद्दा हरवून गेला आहे.

- (क्वांट्म फील्ड्सच्या शोधात असलेला साधक) सोकाजी

गामा पैलवान's picture

6 Mar 2020 - 6:30 pm | गामा पैलवान

सोत्रि,

तुमच्याशी सहमत आहे.

क्वांट्म फिजिक्समध्ये प्रश्न काय विचारावा याचेच वांधे आहेत. अनेक प्रयोग असे आहेत की त्यांचं इंद्रियगम्य स्पष्टीकरण देता येत नाही. उत्तरं मिळणं दूर आधी प्रश्न काय विचारायचा तेच कळंत नाही.

ऐंद्रिय ज्ञानाच्या कक्षा अतिशय मर्यादित आहेत. त्यामुळे प्रयोगजन्य ज्ञानास मर्यादा पडतात. अशा वेळेस पारंपरिक ज्ञानाचा धांडोळा घ्यावा लागतो. त्यासाठी अध्यात्म कामी येतं.

आ.न.,
-गा.पै.

पैलवानजी, सद्ध्या क्वांट्म मेकॅनिक्सचा अभ्यास (वाचन) चालू आहे. हा विषय पचवायला जरा जड आहे. ह्या विषयावर मराठीत काही लिहीता येण्याइतकं समजू लागलं की लिहायचा विचार आहे. खुपच फॅसिनेटींग विषय आहे.

तुम्ही म्हणालात तसं इंद्रियांच्या पलीकडची अनुभूती आहे ही!

- (साधक) सोकाजी

गामा पैलवान's picture

7 Mar 2020 - 11:05 pm | गामा पैलवान

सोत्रि,

इंद्रियातीत अनुभूती पक्की असली की क्वांटम मेक्यानिक्स हळूहळू उलगडतं, असं ऐकून आहे.

आ.न.,
-गा.पै.

विजुभाऊ's picture

6 Mar 2020 - 10:51 am | विजुभाऊ

सोकाजी भौ. त्या क्वान्टम मेकॅनिक्स बद्दल ल्ह्या की एक डाव.

शा वि कु's picture

6 Mar 2020 - 9:20 pm | शा वि कु

ह्या आकुंबद्दल वाचून या आकुची आठवण झाली-
Long ago in a distant land, I, Aku, the shapeshifting master of darkness, unleashed an unspeakable evil. But, a foolish samurai warrior wielding a magic sword stepped forth to oppose me.
Before the final blow was struck, I tore open a portal in time and flung him into the future where my evil is law. Now, the fool seeks to return to the past and undo the future that is Aku.