आजि मराठीचा दिनु!

Primary tabs

Sumant Juvekar's picture
Sumant Juvekar in जे न देखे रवी...
1 Mar 2020 - 11:02 pm

आज मराठीचा दिन
ठोकू घोषणा भर्पूर !
करू फॉरवर्डं मेसेज
घेऊ बडवून ऊर !!
माये मराठी पहा गं
प्रेमा आला महापूर !
सोनियाचा दिनू आता
नाही राहिला गं दूर !!
पोरे पाठवू आमची
इंग्रजि माध्यमामध्ये!
शिल्लक जागा राहतील
मराठीच्या शाळांमध्ये !!
याला म्हणतात त्याग
खळबळ मनी माजे!
मराठी बांधवांसाठी
इत्के केलेची पाहिजे!!
मेसेजेस इंग्रजीत
इंग्रजीत बोर्ड सारे!
वाचवण्या मराठीला
काहीतरी करूया रे !!
शिकू इंग्रजीमधून
इंग्रजीमधून बोलू!
वाट इंग्रजीची धरू
वाट मराठीची लावू !!
मराठीला वाचवा हो
अशा बोंबा तरी मारू!!
मराठीच्या दिनी तरी
गोष्टी मराठीत करू !
गड यायला हवाय
सिंह नकोय जायला !
जन्मा यावा तानाजी तो
पण- दुसऱ्या घराला !!!

दणकवून फॉरवर्ड करा आणि मराठी वरील प्रेम व्यक्त करा

-दादासाहेब दापोलीकर
9967840005

हास्यकविता

प्रतिक्रिया

जळजळीत अंजन आहे वरवरचे मराठी प्रेम दाखवणार्‍यांना. एकदा डोळ्याखालून घाला म्हणजे डोळे उघडतील.

प्राची अश्विनी's picture

2 Mar 2020 - 9:04 am | प्राची अश्विनी

+१
सहमत