भादरायला हवे वाढलेले, भादरायला गेलो

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
27 Feb 2020 - 3:03 pm

भादरायला हवे वाढलेले, भादरायला गेलो

न्हावी होता बिझी म्हणून पेपर वाचू लागलो

पेपर वाचता वाचता एक जाहिरात बघितली

होती तशी छोटी पण लक्षात बाकी राहिली

नंबर आला जवळ म्हणून पेपर घेतला छाटून

न्हावी होता मग्न कामात , दिला खिशात ढकलून

भादरवुन थेट घरी मी अंघोळीला गेलो

जाहिरात तशीच खिशात पडून , विजार मागे सोडून आलो

दुसर्या दिवशी आरोळीने जाग मला आली

मला वाटलं मनातल्या मनात, आमची हि खपली

उभा राहिलो बघण्यासाठी , बघतो तर हे काय

जाहिरातीचे पान हाती घेऊन डोके पिटत होती हि बाय

सांगून सांगून थकलो तिला हरलो सारे उपाय

अक्कल सारी गुडघ्यात यांची , दुसरं करणार तरी काय ?

लंपट समजून मला तिने , मुलं वेगळी केली

फोन लावूनी सार्यांना, कपाळात आणल्या भाय

जाहिरातीचे पान थेट समाजात उभे केले

आईबापासंगे सारे सोयरेपण आले

मुलगा माझा नाही त्यातला, सांगत होती आई

सासूसासरे बोंबलत होते लंपट निघाला ओ जावई

सांगून सांगून थकलो तरी ऐकत नव्हते कुणीच

हळूहळू आईही माझी समजू लागली मला नीच

मोर्चा वळवला सलून मध्ये , जमले तेथे सारे

न्हावीही ते कळताक्षणी बोंबाबोंब सूरु करे

झक मारली नि भादरावयाला या सलूनमध्ये आलो

जाहिरात राहिली बाजूला , पण लंपट मात्र झालो

===================================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

समाजजीवनमानआईस्क्रीमडावी बाजूराहणीव्यक्तिचित्रमौजमजा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

27 Feb 2020 - 3:06 pm | प्रचेतस

=))
लै भारी

खिलजि's picture

27 Feb 2020 - 3:10 pm | खिलजि

मराठी भाषा दिनाच्या आणि माझ्या बोलीभाषेच्या वर्धापनाच्या हार्दिक शुभेच्छा ...

दुर्गविहारी's picture

27 Feb 2020 - 7:06 pm | दुर्गविहारी

धन्य ! _/\_
असल्या जाहिराती खिशात ठेऊ नयेत. ;-)

जाहिरातीसाठी नव्हे तर मागच्या मजकूरासाठी तो कोपरा कापला असे (कोबीसारखे) ठासून सांगायचे ना!

खिलजि's picture

28 Feb 2020 - 12:28 pm | खिलजि

पाभे हे कारण बाकी भारी हाय

टवाळ कार्टा's picture

27 Feb 2020 - 8:34 pm | टवाळ कार्टा

=))

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Feb 2020 - 11:50 am | ज्ञानोबाचे पैजार

बायका अपल्या नवर्‍याची लायकी ओळखून असतात.

कायप्पा वर वाचलेला एक विनोद :-
मैत्रीण १ - अग ती टवळी बघ किती वेळची तुझ्या नवर्‍या कडे टक लावून बघत बसली आहे
मैत्रीण २ - मीच सांगितल आहे तिला तस करायला
मैत्रीण १ - का ग?
मैत्रीण २ - मला पहायच आहे तो पोट आत ओढून किती वेळ थांबू शकतो ते.

पैजारबुवा,

धन्यवाद सर्वाना ..

@ पैंबुकाका ,, इनोद लाइकला है

धन्य ती आपुली माय मराठी

धन्य ते प्रतिसादक तिच्यासाठी

धन्य तो महाराष्ट्र आपुला

जिथे जागली जोपासली मराठी

गुरुदेव हि सर्व तुमची कृपा बरं का ... आपल्या निव्वळ आगमनानेच आमच्या अंतरात्म्याला ताडताड भेगा पडून अशी निर्मिती होत जाते .. आपण यावं आणि एकदा तरी आपला प्रतिसाद द्यावा या पामराला हि नम्र विनंती .. गुरुदेव आज या कल्पनेला एवढे प्रतिसाद आले ते बघून मला कससंच होतंय .. गरुदेव कि जय हो .. अक्कुऊकाकांचा विजय असो ... गुरुदेव हि खालील रचना फागस्त तुमच्यासाठी ...........

तुला जेव्हा जेव्हा वाचतो

फुटतात धुमारे शब्दांचे

तूच रे, तो शिल्पकार माझा

तूच बांधिले रस्ते वाक्यांचे

हरवली होती वाट माझी

त्या दाट विखारी प्रतिसादांत

तूच दाखविली दिशा मजला

करुनि साऱ्या व्यथांचा अंत

विसरणे एव्हढे सोप्पे नसते

आत धगधगत असते काहीतरी खंत

एक धागा येताक्षणी तुझा

पुन्हा प्रज्वलीत साऱ्या भावना

ज्वलंत ज्वलंत दिगंत

========================

गरुदेव कि जय हो, अक्कुकाकांचा इजय असो .........

चौथा कोनाडा's picture

29 Feb 2020 - 5:47 pm | चौथा कोनाडा

ती जाहिरात इथं टाका, साधकबाधक चर्चा करता येईल, मिपाकर पुढच्या वेळचा उपाय नक्की सुचवतील.