कायाच्या फॅशन हाऊस मध्ये कामाला सुरुवात करायचे ठरले. ठरल्या प्रमाणे शिवीन व रिचा 11 वाजता कायाच्या ऑफिस मध्ये हजर होते. काया अजून आली नव्हती पण सुधीरने त्यांचे स्वागत केले व काया पोहचतच आहे असे तो म्हणत होता. तोच काया ऑफिसमध्ये आली.
ते चौघे ही कॉफर्न्स हॉलमध्ये गेले कारण कायाने प्रोजेक्टच्या कामासाठी तिच्या ऑफिस मधील ही प्रशस्त जागा निवडली होती. प्रोजेक्ट विषयी सुरवातीची चर्चा झाली. त्यात वेस्टर्न कंपनीला कशा डिजाईन अपेक्षित आहेत तसेच इंडोवेस्टर्न या कॅटेगरीत काय- काय येऊ शकत व सुरवात उमन्स वेअर पासून करावी. अशी अनेक मुद्यांवर चर्चा झाली. काया बरोबर पहिला दिवस तर रिचा आणि शिवीनचा चांगला गेला पण पुढचे सगळे दिवस हे रिचा आणि शिवीनची परीक्षा पहाणारे होते.
दुसऱ्या दिवशी पासून खऱ्या कामाला सुरवात झाली रिचा आणि शिवीनने काही डिजाईन बनवून आणल्या होत्या पण कायाने त्या सरळ रिजेक्ट केल्या आणि हे रिजेक्शन पुढे चालूच राहिले. रिचा तशी स्वभावाने शांत होती पण शिवीन मात्र खूपच चिडायचा कायावर पण काया मात्र शांत होती. एक दिवस असेच रात्र भर जागून शिवीनने डिझाईन तयार केले होते. आपली कल्पकता व अनुभव दोन्ही त्याने त्या डीझाईन्स मध्ये ओतले होते. कारण प्रोजेक्ट सुरू होऊन एक महिना झाला तरी एक ही डिझाईन ना फाईनल झाले होते ना वर पाठवण्यात आले होते. मग प्रोडक्शन तर लांबच राहिले आणि काम ही तसे जास्त व वेळ कमीच आहे असे त्याला वाटत होते.
शिवीन ते डिझाईन घेऊन कायाच्या ऑफिस मध्ये गेला. रिचा ही त्याच्या मागोमाग आलीच होती. काया ही ऑफिस मध्ये हजर होती. सुधीर व कायाचे काही तरी डिस्कशन चालू होते.शिवीनने त्याचा लॅपटॉप काढला व फाईल बॅगेतून बाहेर काढले व काया समोर ठेवले. काया, रिचा व सुधीर डिझाईन्स पाहू लागले. रिचा म्हणाली.
रिचा,“ डिझाईन्स छान आहेत आपण या डिझाईन्स वर अप्रुअल साठी पाठवू शकतो.”
काया, “ no way! मला हे डिझाईन्स अजिबात आवडले नाहीत.” ती तोंड वाकडे करत म्हणाली.
शिवीनचा मात्र पारा चढला व तो बोलू लागला.
शिवीन,“ नेमके कसले डिझाईन्स हवेत ते तरी सांग; किंवा तू तुझे डिझाईन्स का नाही दाखवत ते आपण पाठवू; आपल्याला बारा महिन्यांचा कालावधी दिलाय त्यातला एक महिना तर गेला आणि फॅशन शो ऑर्गनाईझ करायला कमीत कमी दोन महिने लागतील. राहिले नऊ महिने जर असत चालत राहिले तर हे प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही वेळेत.” तो रागाने लालबुंद झाला होता. आणि काया त्याच्या कडे एकटक पाहतच होती.”
सुधीरला त्याचे पटत होते पण कायाच्या विरुद्ध तो बोलू शकत नव्हता.तो कायाच्या बाजूने काही स्पष्टीकरण द्यायला बोलणार तोच कायाने त्याला थांबवले व ती बोलू लागली.
काया,“ वेळेत काम पूर्ण करायचे आहे पण इथून भरमसाठ डिझाईन्स आपण पाठवून ते वेळेत पूर्ण होईल का? कारण त्यांनी आपण पाठवलेल्या डिझाईन्स रिजेक्ट केल्या तर म्हणून अशा डिझाईन्स आपण त्यांना पाठवायच्या की ते त्या डिझाईन्स रिजेक्ट करूच शकणार नाहीत.” काया डोळे बारीक करून शिवीन कडे पाहत बोलत होती.
शिवीन, “ मग तू अशा डिझाईन्स बनवल्या असतील तर दाखव ना!” तो तणतणतच म्हणाला.
काया, “ हो आहेत ना मी त्याच आज दाखवणार होते तू आणि रिचाने ज्या डिझाईन्स तयार केल्या होत्या त्या मी जरा modify केल्या आहेत पाहा” असे म्हणून तिने लॅपटॉप शिवीन आणि रिचाच्या समोर ठेवला.
रिचा व शिवीन डिझाईन्स पाहत होते. त्या त्यांनीच केलेले डिझाईन्स होते पण कायाने त्यात छोटे-छोटे बदल केले होते. त्या मुळे ते डिझाईन्स आणखीन खुलून दिसत होत्या. शिवीन तर पहातच राहिला कारण त्याने अशा छोट्या गोष्टींचा विचारच केला नव्हता. तो कायाच्या या कामाने इंप्रेस झाला होता. कायाचे सगळे लक्ष शिवीनचे हावभाव टिपण्याकडे होते.
शिवीन, “nice job kaya. You are so talented! ” अस म्हणून त्याने उस्फुर्त पणे तिला मिठी मारली. काया मात्र वेड्यासारखी त्याच्या मिठीत विसावली शेवटी शिवीननेच तिला दूर केले.
त्या नंतर मात्र प्रोजेक्टचे काम सुरळीत सुरू झाले. रिचा व शिवीन डिझाईन्स तयार करायचे व काया त्यात बदल करायची तर कधी काया डिझाईन्स तयार करायची व रिचा किंवा शिवीन त्यात बदल सुचवायचे. आता कपड्यांचे प्रोडक्शन ही सुरू झाले होते. वेस्टर्न फॅशन हाऊस ही त्यांच्या कामावर खुष होते. त्यामुळे काया व शिवीनला फाईनान्स ही लवकर मिळत होता वेस्टर्न फॅशन हाऊस कडून.
पण रिचाला मात्र कायाचे वागणे खटकत होते; कारण कायाच्या ऑफिस कडून तिला मिटिंगचा चुकीचा टाईम कळवला जात होता. शिवीन तिच्या तास भर अगोदरच हजर असायचा काया च्या ऑफिस मध्ये आणि काया व त्याचे डिस्कशन संपत आलेले असे. वरून शिवीन रिचालाच उशिरा आल्या बद्दल ओरडत असे. काया अस का करत असेल हा प्रश्न तिला सतावत होता.बरं शिवीनला हे पटत नसे की तिला वेगळा टाईम कायाच्या ऑफिस मधून कळवला जातो ते. या वर रिचाने एक तोडगा काढला ती शिविनालाच विचारू लागली मिटिंग कधी आहे ते व त्याच्या बरोबरच ती कायाच्या ऑफिसमध्ये जाऊ लागली. पण तिने कायावर नजर ठेवायचे ठरवले.
काया मात्र रिचा; तिच्या व शिवीनच्या मध्ये येत होती म्हणून खूपच चिडली होती. तिला रिचा खटकायला लागली होती कारण रिचा सतत शिवीनच्या बरोबर असे त्या मुळे तिला शिवीन बरोबर मोकळेपणाने वागता येत नव्हते.शिवीन मात्र कायाच्या ट्यालेंटकडे व तिच्या डॉमिनेटिंग व गूढ स्वभावाकडे आकर्षीत होऊ लागला होता.
एक दिवस मॅन्स वेअर डिझाईन्ससाठी फॅब्रिक(कापड) कोणते वापरावे याची चर्चा सुरू असताना शिवीन बोलत होता. तर काया त्याच्याकडे वेड्यासारखी एकटक पाहत असलेले रिचाच्या लक्षात आले आणि तिला खात्री पटली की कायाच्या मनात शिवीन विषयी काही तरी आहे. त्या नंतर तर रिचा शिवीनला काया बरोबर एकटे सोडे नाशी झाली. रिचा कायम सावली सारखी शिवीनच्या मागेच असे. यात तिचा असुरक्षितपणा किंवा शिवीन आपल्याला सोडेल अशी भीती नव्हती. तर शिवीन विषयी वाटणारी काळजी होती. कारण काया एक तर सनकी म्हणून कुप्रसिद्ध होती आणि ज्या विचित्र पद्धतीने काया शिवीनकडे पाहत असे त्याची रिचाला भीती वाटत असे. शिवीन व रिचामध्ये प्रेम नसले तरी खूप गाढ मैत्री होती. त्यामुळे रिचाला शिवीन बद्दल खात्री होती की तो तिला कधीच फसवणार नाही.
शिवीन मात्र या सगळ्या गोष्टीं पासून अनभिज्ञ होता. त्याचे स्वतः चेच स्वतः शी वेगळेच द्वंद्व सुरू होते. कारण तो कायाकडे आकर्षित होत चालला होता. पण तो रिचाशी कमिटेड होता. त्याला काया विषयीच्या त्याच्या भावना म्हणजे रिचाशी प्रतारणा करणे असे वाटत होते. या दोलायमान स्थितीत त्याच्यावर त्याच्या फॅशन हाऊसला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याची मोठी जबाबदारी ही होती. कदाचित म्हणूनच त्याने हे सर्व विचार बाजूला ठेवून फक्त कामावर लक्ष केंद्रीच करायचे ठरवले.
इकडे कायाला रिचा डोळ्यात कुसळ रूतावे तशी रूतत(खटकत) होती. म्हणून तिने रीचाला बाजूला करायचा एक प्लॅन मनात आखला होता व तो तडीस नेण्यासाठी तिने सुधीरला आज घरी बोलावले होते.
आज असा ही रविवारी होता त्यामुळे ऑफिसला सुट्टीच होती. सुधीर सकाळी आकारा वाजता कायाच्या घरी पोहचला. त्याने बेल वाजवली दार शांताबाईने उघडले. सुधीरने तिला इशार्यानेच काया कुठे आहे असे विचारले. तिने इशार्यानेच त्याला काया हॉल मध्ये पित बसली आहे असे खुणावले. सुधीर आत आला व शांताबाई तिच्या कामाला निघून गेली. काया सोप्यावर वाईन पीत बसली होती. तिने सुधीरला पाहीले व ती बोलू लागली.
काया,“ ये सुधीर तू पण घेणार का थोडी शी.” बाटली दाखवत काया म्हणाली. सुधीर काहीच न बोलता तिच्या समोर जाऊन बसला. त्याला माहित होते की काया आज टेन्शन मध्ये असणार कारण ती टेन्शन मध्ये असली की वाईन घेत असे पण आज कायाला कशाचे टेन्शन आहे याचा सुधीरला थोडा फार अंदाज होता.
कायाला कशाचे टेन्शन आले होते? व रिचाला बाजूला करण्यासाठी तिने काय प्लॅन बनवला होता? सुधीरला ती काय करायला सांगणार होती?
प्रतिक्रिया
27 Jan 2020 - 2:43 pm | शब्दांगी
https://shabdagan.blogspot.com/2020/01/blog-post_17.html