"तुला वारंवार कल्पना देउन आणी सावध करुनही काहिही फरक पडत नव्हता सुमती !! "
आज पुन्हा एकदा ईगलमधे फृटज्युस च्या जागी बिअर आॕर्डर करणाऱ्या सुमतीसमोर मी घसा कोरडा करत होतो.
सुमती .. माझ्याच कंपनीमधे ट्रेनी इंजिनियर म्हणुन अपॉईंट झालेली .येउन सात महिने लोटलेले.फ्रेश इंजिनियर होती.विस एकविस वर्षाच्या सुमतीचं जॉईन झाल्यावर एक महिन्यातच माझ्या डिपार्टमेंटला पोस्टींग झालं.आणी तीला प्रॉडक्शन प्लॕनिंगचे धडे देता देता कंपनीच्या वातावरणाचे ,आजुबाजूला वावरणार्या लोकांच्या मेंटलीटीचे धडे देणं गरजेचं वाटू लागलं.
आतापर्यंत गेल्या बारा वर्षात माझ्याकडे अकरा ट्रेनी ट्रेनिंग घेउन वेगवेगळ्या ठिकाणी सेटलही झाले होते.फ्रेश इंजिनियरना प्रॉडक्शन प्लॕनिंगच ट्रेनिंग द्यायला मिळतय याचा जाम अभिमान आणी आनंद मिळवला मी या काळात.इंजिनियर शब्दाचा आय देखील माहीत नसताना फक्त अनुभवाच्या जोरावर मी माझ्या डिपार्टमेंटचा रोल आणी पुर्ण वर्क प्रोसेस या नवोनिर्वाचीत अभियंत्यांना अगदी सहज समजावु शकत होतो.अगदी रॉ मटेरीयल रिक्वायर्मेंट ,कस्टमर अर्जंन्सिज,मशिन ॲव्हेलिबीलीटी,मॕन पॉवर,आॕल प्रोसेस आॕफ प्रॉडक्शन ,फिनीश गुड ,डिस्पॕच सर्वच.
पण या सगळ्याची माहिती आणी कार्यपद्धती समजावताना एक जाणीव नक्की असायची की आपण ट्रेन करतोय ते रोबोट नसुन करीअरची नवी सुरुवात करणारे फ्रेशर्स आहेत. त्यांच्या पालकांनी खुप कष्टाने शिकवुन आणी त्यांच्या भविष्याबाबत खुप चांगल्या आपेक्षा ठेउन त्यांना या मोठ्या जगात स्वतंत्र सोडलय. आपल्या अपत्यांकडुन अपेक्षा ठेवताना आणी फक्त त्यांच्या करिअरचाच विचार करताना बरेच पालक त्यांना वर्तमान जगरहाटी शिकवायला विसरतात हे मी एकंदरीत अनुभवाने सांगू शकतो.
पहिल्या दोन महिन्यातच सुमतीला वारंवार आपल्या केबिनमधे बोलावुन घेणारा आमचा मॕन्युफॕक्चरींग डायरेक्टर अरिंदम बॕनर्जी आणी केबिनमधुन बाहेर येताना सो कॉल्ड कौतुकाने हुरळुन गेलेली सुमती मी आॕब्झर्व करत होतो.अरिंदमने दिलेले अनइसेन्शियल टुकार टास्क की जेणे करुन ती त्यातच मशगूल रहावी आणी उशीरापर्यंत कंपनी प्रिमायसेस मधे रहावी, माझ्याशी तीचं असलेलं बाँडींग आणी कम्युनिकेशन थांबाव यासाठीच त्या हरामखोराचा हा प्रयास होता.कारण तो मला आणी मी त्याला चांगलेच ओळखुन होतो.
अरिंदम बॕनर्जी...
1996 जुन महिना ,बि .कॉमचा रिझल्ट लागलेला आणी कुणाच्यातरी ओळखीने मी या कंपनीत इंटर्व्युसाठी दाखल झालो.मुलाखत व्यवस्थित पार पडुन ट्रेनी ॲप्रेंटीस म्हणुन ppc डिपार्टमेंटला क्लेरीकल स्टाफ मधे वर्णी लागली.सकाळी सातलाच अॉफीस मधे रुजु झालो.
माझे डिपार्टमेंटमधले सिनीयर बोस साहेब मला कामाची एकंदरीत प्रोसिजर समजावुन सांगत होते.आणी 'शिकलोय काय अन करतोय काय ' या गोंधळात मी असतानाच या नमुन्याचं आगमन झालं.अचानक बॉसजी साहेब (हो साहेबच ,सिनीयर होते ना) उभे राहीले .तसं त्यांचा दृष्टीक्षेपाचा अंदाज घेत मी मान वळवली.एक साधारण चाळीशीचा ,उंचपुरा ,देखणा व्यक्ती चालत येत होता.पिंगट डोळे ,रिमलेस स्पेक्स , ग्रे हेअरलाईन सगळंच लक्षवेधक होतं.आम्हाला पास होउन तो त्याच्या कॉर्नर केबिन मधे गायब झाला.केबिनचं दार बंद होत असताना दारावरची पाटी झळकली 'A.R.Banarjee, director manufacturing' .
"हा कोण ? " मी दबक्या आवाजातच बॉसजींना विचारलं.बॉसजी ! बोस साहेब याच नावाने ओळखले जात. "हळु बोल ,ते कंपनीचे प्रोडक्शन डायरेक्टर आहेत " बॉसजींनी मला तेथुन उठवलं आणी चहासाठी कँटीनला नेलं. या बॕनर्जीने कशी त्याची माणसं कंपनीत पेरलीयेत ,त्याची एकंदरीत लॉबी , इंटरनेट ? आणी " कुणी जर गेट नंबर चारला पादलं ना चंदू तर या भडव्याला त्याचा केबिनमधे वास येतो " अशी त्याची महती वर्णन केली.
कालांतराने त्याची हुशारी ,कंपनीला त्याच्या कर्तबगारीने होत असलेला फायदा आणी डायरेक्ट एम डी नेच केलेली त्याची अपॉइंटमेन्ट , या बरोबर त्याचे कस्टमर बरोबर आणी सब कॉन्ट्रेक्टर बरोबराचे काळे कारनामे तसंच कंपनीतल्या लेडीज स्टाफ बरोबरची त्याची लगट आणी त्यात फसलेल्या स्टाफच्या ऐकीव कथा यामुळे इंप्रेसिव्ह असुनही त्याच्या व्यक्तीमत्वा बाजुची डार्क फ्रेम जास्त उठुन दिसू लागली.फक्त स्वतःवरच प्रेम करणारा ,कुणालाही गरजे पुरतच वापरणारा ,एकीकडे कंपनीचा फायदा करत त्यापेक्षा जास्त स्वतःची तुंबडी भरणारा आणी यामुळेच घरातही नकोसा झालेला अरिंदम मला पुढच्या थोड्याच दिवसांत समजु लागला.
प्रतिक्रिया
8 Jan 2020 - 7:13 pm | दुर्गविहारी
मस्त सुरवात झाली आहे. क्रमश: असेल तर तसे लिहा.
9 Jan 2020 - 9:34 am | प्रमोद देर्देकर
पहिले ती भुताटकीची कथा पूर्ण करा मग ही कथा लिहा.